ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : अध्याय पहिला ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in विशेष
10 Jun 2010 - 11:55 am
फिफा२०१०

इंग्लंडच्या लिव्हरपुल ह्या क्लबचा लिजंडरी मॅनेजर 'बिल शाँक्ली' म्हणतो "Some people believe football is a matter of life and death. I'm very disappointed with that attitude. I can assure you it is much, much more important than that".

काय खोटे आहे त्यात ?
ह्यावेळच्या चॅम्पीयन्स लीगच्या वेळी मॅन्चेस्टर युनायटेडचा सुपरस्टार व इंग्लंडचा मुख्य आधारस्तंभ असलेला 'वेन रुनी' हा बायर्नच्या पहिल्या मॅचच्यावेळी अतिताणामुळे पायाच्या मसल्स फाटल्याने जखमी झाला व त्याला त्या रात्री अक्षरशः पायाला फ्रॅक्चर करुन बाहेर पडावे लागले. पण पुढच्या मॅचमध्ये मॅन-युची इज्जत पणाला लागली तेव्हा तो १००% फीट नसतानाही पुन्हा मैदानावर उतरला, परिणाम पुन्हा त्याची दुखापत वाढली.
रियालचा डिफेंडर पेपे ह्याचे चक्क डोके फुटले असतानासुद्धा हा पठ्ठ्या तात्पुरती पट्टी बांधुन पुन्हा मैदानात उतरला व गोलसमोर एका भिंतीसारखा उभा राहिला.
चेल्सीचा मुख्य आधारस्तंभ दिदियर ड्रोग्बाच्या छातीत अ‍ॅस्टॉनच्या एका प्रतिस्पर्धी मिडफिल्डरची एवढी जोरात लाथ बसते की त्याला २ मिनिटे मैदानावर तळमळत असताना पाहुन इकडे आमचे काळिज लक्ककन हालते, पण १० मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा पुन्हा मैदानात येतो व अ‍ॅस्टॉनवर एका झंझावातासारखा तुटुन पडुन त्यांची पार वाताहात करतो.
लिव्हरपुलची उरलीसुरली इज्जत वाचवण्याच्या प्रयत्नात फर्नांडो टोरेसला एक अशी खतरनाक टॅकल सहन करावी लागते की ज्याला उरलेल्या सिझनसाठी बाहेर बसवतेच पण आता त्याच्या विश्वचषकातल्या सहभागावरही प्रश्नचिन्ह उभी करते, तीच गत असते ती बार्काच्या जादुई मिडफिल्डर आद्रेयस इनियेस्टाची, त्याचा सहभाग ह्या विश्वचषकात अजुन निश्चित नाही व त्याने ऑलरेडी चॅम्पीयन्स लीगचे महत्वाचे सामने बेंचवर बसुन डोळ्यात पाणी आणुन पाहिले आहेत.
आर्सनेलचा बचावपटु विल्यम गॅलास एवढ्या तडफेने प्रतिस्पर्ध्यापुढे झोकुन देतो की त्याचा परिणाम डायरेक्ट त्याचे पायाचे हाड मोडण्यात होतो व तो आजही पुन्हा फिट होऊन फ्रान्सच्या स्कॉडमध्ये सामिल होण्यासाठी झगडत आहे.

पण हे झालं त्यांच्यासमोर पैशांची रास ओतणार्‍या "प्रोफेशनल क्लब्ससाठी" , तिकडे मिळालेल्या पैशाचे मोल द्यावेच लागते नाही तर कधी लाथ बसेल ह्याची खाती नसते. तरीही हे पठ्ठे एवढे एकढे जीव तोडुन खेळतात.
कारण ?

फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल
फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल
फुटबॉल ... फुटबॉल ... फुटबॉल

जगातल्या सगळ्यात वेगवान व सुंदर खेळ.
फुटबॉल म्हणजे केवळ वार्‍याच्या वेगाने धावत जाऊन आणि चित्याच्या चपळाईने प्रतिस्पर्धी बचावपटुंना भेदत जाळ्यात बॉल धाडुन केलेला गोल नव्हे, फुटबॉल म्हणजे आपले शरिर पणाला लाऊन समोरच्या स्ट्रायकरसमोर झोकुन देऊन आपल्या गोलचा बचाव करणे नव्हे, फुटबॉल म्हणजे आपल्या हजारो पाठराख्यांच्या अखंड प्रोत्साहनाच्या आक्रंदनात केलेला जबरदस्त खेळ नव्हे, फुटबॉल असतो एक अंतिम विजय ह्या सर्व गोष्टींच्या वरचा. फुटबॉल असतो तो एक खेळ एका पॅशनचा, त्या पॅशनने केलेल्या गोल्सचा आणि त्याच इर्शेने टॅकल करुन केलेल्या नेत्रदिपक डेफेंडिंग अ‍ॅक्ट्सचा. फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्ध्याला विजयची संधी दिली जात नाही किंवा आपण स्वतः जिंकण्याची वाट पाहिली जात नाही, फुटबॉल असतो तो प्राण पणाला लाऊन खेचुन आणलेल्या अंतिम विजयाचा.
फुटबॉल हा असा खेळ आहे की ज्यात २२ वेडे एका बॉलमागे जीव तोडुन धावतात, जीव खाऊन त्याला लाथा मारतात, शरिर पणाला लाऊन त्याला आडवतात आणि आणि हे सर्व आपला श्वास रोखुन पाहणारे पाठिराखे ह्या खेळाचे अंतिम विजेते असतात.

फुटबॉल म्हणजे विजय ....
फुटबॉल म्हणजे अंतिम विजय ...
फुटबॉल म्हणजे केवल विजय, विजय आणि विजय ...

हा विजय असतो तो त्या मैदानावर आपल्या पराक्रमाची शर्थ करणार्‍या व जादुई खेळ दाखवुन विजयश्री खेचुन आणणार्‍या ११ जणांचा, हा विजय असतो तो त्या सामन्यात न खेळलेल्या व बेंचवर बसुन आपल्या टीमला चियर करणार्‍या राखिव गड्यांचा, हा विजय असतो तो ह्या मैदानावरच्या अचाट लोकांच्या जादुई शक्तीला एक योग्य दिशा देऊन त्यांच्या कौशल्याला पैलु पाडुन त्याचे विजयश्रीच्या रुपाने सोने करणार्‍या मॅनेजरचा, हा विजय असतो तो ह्यांना प्रत्येक गोष्टीत आपल्या अनुभवाने आणि उपकरणांनी मदत करुन त्यांना 'फायनल जजमेंट'साठी तयार करणार्‍या सपोर्ट स्टाफचा, हा विजय असतो तो हजारोंच्या संख्येने स्टेडियममध्ये व लाखोंच्या संख्येने आपल्या टीमचे पोस्टर्स, झेंडे, पोशाख, टोप्या घेऊन येऊन उन्मादात आणि आरोळ्यांनी आपल्या टीमला प्रोत्साहन देणार्‍या व सामना जिंकल्यावर त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या व हारल्यावर आरोळ्यांच्या रुपाने आपल्या संघाचे सांत्वन करुन त्यांना धीर देणार्‍या लाखो अनामिक पाठिराखांचा, हा विजय असतो तो एका विशिष्ठ क्लबचा किंवा एखाद्या राष्ट्राचा किंवा संपुर्ण मानवतेचा ...

विजय !
विजय विजय !!
विजय विजय विजय !!!

ह्या वर्षीचा स्टार प्रशिक्षक 'जोस मोरिन्हो" म्हणतो "You can have the top stars to bring the attention, you can have the best stadium, you can have the best facilities, you can have the most beautiful project in terms of marketing and all this kind of thing. But if you don't win... All the work these people are doing is forgotten".

कुठलाही विजय हा महत्वाचा असतो, मग तो एका इंग्लंडमधल्या शाळकरी टीमने समोरच्या दुसर्‍या शाळकरी टीमवर मिळवलेला विजय असो वा 'कँप नोऊ' इथे इंटर मिलानने बलाढ्य बार्सिलोनाला त्यांच्याच मैदानावर केलेला चीतपट विजय असो, विजय हा विजयच असतो आणि तो महत्वाचाच असतो.

पण इथे सामना जर २ देशांमधला असेल तर ?
हा सामना जर विश्वचषकामधला असेल तर ?
हा सामना जर विश्वषकामधल्या अंतिम लढतीचा असेल तर ?
ह्या विजयाचा आनंद तुम्ही कशात मोजणार ? ह्या विजयचे मुल्य तुम्ही कोणत्या तराजुत तोलणार ? ह्या विजयाला तुम्ही कशाची उपमा देणार ? ह्या विजयाचा जल्लोश तुम्ही कसा साजरा करणार किंवा ह्या लढतीत झालेला पराभव कसा पचवणार ? तुम्ही तुमच्या लाखो पाठिराख्यांना विजयश्रीची भेट देणार की पराभवाचे दु:ख भोगायला लावणार ? ह्या लढतीनंतर तुम्ही कोट्यावधी लोकांसमोर अभिमानाने आपले राष्ट्रगीत वाजवत "विश्वचषक" उंचावणार की ही लढत हारुन आपल्या राष्ट्राला एका दुखवट्यात लोटणार ?

कोण म्हणतो की फुटबॉल हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे ?
अहो साहेब ह्या परिस्थितीत फुटबॉल आणि ह्या अंतिम विजयाची किंमत प्राणाहुन जास्त नाही का ?

इथे हवा आहे केवळ विजय.
हा विजय मिळवण्यासाठी हवे आहेत ते विजेते ... दी चॅम्पियन्स !
आणि ही स्पर्धा आहे ती सर्वोच्च अशा फुटबॉल विश्वचषकाची !

आफ्रिका खंडातल्या सोमालियातला एक फंकार 'कान (K'naan)' म्हणतो ...
Give me freedom, give me fire, give me reason, take me higher
See the champions, take the field now, you define us, make us feel proud
In the streets our heads are lifting, as we lose our inhibition,
Celebration, it surround us, every nations, all around us

हे आहे एक सेलेब्रेशन, एक जल्लोश, एक उन्माद !
हे सेलेब्रेशन आहे ते चॅम्पियन्सचे आणि त्यांच्या देशातल्या लाखो पाठिराख्यांचे !
हा उत्तुंग यशाचा अभिमान आहे ह्या चॅम्पियन्सचा आणि त्यांच्या देशाचा !
हा आहे ............ फिफा वर्ल्ड कप - २०१०, आफ्रिका !

इथे खेळणार आहेत ते चॅम्पियन्स आणि ते खेळणार आहेत ती आपल्या देशाला हा कप जिंकुन देण्यासाठी.
बहुतेक म्हणुनच ते खेळणार आहेत ते नेहमीपेक्षा १० पट जास्त जोशाने आणि तडफेने ...
इथे खेळणार आहेत ते ड्रोग्बा, मेस्सी, टोरेस, रुनी, डेव्हिड व्हिला, रॉबिन्हो, कार्लोस तवेझ, फ्रँक रिबरी, इट्टु सारखे वार्‍याच्या वेगाने हालचाली करुन विद्युल्लतेच्या चपळाईने बॉल जाळ्यात घाडणारे स्ट्रायकर्स ...
इथे खेळणार आहेत ते इनियेस्टा, फॅब्रिगास, झॅवी, गेरार्ड, लँपार्ड,क्रिस्तियानो रोनाल्डो, काका, स्नायडर, डी रोस्सी सारखे नेत्रदिपक खेळाने व अफलातुन पासेस आणि कमालीच्या ड्रिब्लिंग स्कीलने गोल सेट करणारे मिडफिल्डर्स ...
इथे खेळणार आहेत ते टेरी, पुयॉल, पिके, राऊल अब्लालियो, गलास, फर्डिनांड, नेस्टा, कॅनवॅरो सारखे आपले प्राण झोकुन प्रतिस्पर्ध्यांच्या चाली निष्प्रभ करत गोलसमोर एक मानवी भिंत उभा करणारे आणि अफलातुन टॅकल्सनी प्रतिस्पर्धी स्टायकर्सचा घामटा काढणारे डिफेंडर्स....
इथे खेळणार आहेत ते इकर कॅसिलास, व्हिक्टर वाल्देस, वॅन डर सार, करॅसो, पेपे रैना, ज्युलियो सिझर सारखे अभेद्य गोलरक्षक ...

चॅम्पियन्स !
चॅम्पियन्स !
चॅम्पियन्स !

तुम्ही येणार ना चॅम्पियन्सचा खेळ पहायला व फुटबॉलसारख्या नितांतसुंदर गेमचा आनंद घेऊन संपुर्ण मानवतेला विजयी करायला ?
ह्या विश्वचषकाचा उद्देश तोच आहे.
तुम्ही येणार असाल तर लक्षात ठेवा ह्या खेळाचे अंतिम विजेत "तुम्ही" आहात ...

आम्ही आजपासुन पुढे शक्य तितकी ह्या खेळाची, ह्या स्पर्धेची, ह्यांच्यातल्या टीम्सची आणि त्यांच्यातल्या चॅम्पियन्सची नवी माहिती आणि रोचक घडामोडी तुमच्यासमोर आणु.
आमच्या ह्या प्रयत्नात आमच्यासोबत आहेत ते ह्या खेळावर आमच्याहुन जास्त प्रेम असलेले 'बिपिन कार्यकर्ते, मेघवेडा, प्रभो आणि जे.पी. मॉर्गन' ............
फक्त तुमचे प्रेम आणो लोभ राहु द्यात ........... आमच्यावर आणि ह्या खेळावर !

Lets rejoice in the beautiful game,
And together at the end of the day.

We all say
When I get older I will be stronger
They’ll call me freedom, just like a wavin’ flag
When I get older I will be stronger
They’ll call me freedom, just like a wavin’ flag
So wave your flag, now wave your flag, now wave your flag

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Jun 2010 - 12:18 pm | अवलिया

गोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽल !

--अवलिया

जे.पी.मॉर्गन's picture

10 Jun 2010 - 12:20 pm | जे.पी.मॉर्गन

जबर्‍या सुरुवात रे......... पुढचा महिनाभर दंगा !

जे पी

भाग्यश्री's picture

10 Jun 2010 - 12:40 pm | भाग्यश्री

जबरी लेख! पुढील लेखांची वाट पाहतीय.

छोटा डॉन's picture

10 Jun 2010 - 12:49 pm | छोटा डॉन

मस्तच गाणे आहे.

ह्याच्याशिवाय अजुन एक गाणे इथे देत आहे.
ह्या गाण्याचे पिक्चरायझेन आणि लय भयंकर सुंदर आहे, आम्हाला फार आवडते हे गाणे.

">

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 1:24 pm | मेघवेडा

युट्युब हापिसात दिसत नै.. पण अंदाजाने सांगतो नॅन्सीचंच गाणं असणार हे??

सहज's picture

10 Jun 2010 - 12:43 pm | सहज

डॉनराव फुटबॉल विश्वचषक मालीकेवर आधारीत ही मालीका मसंस्थळावर गाजू दे!!!

वाह! मजा येणार जेव्हा डॉनराव, आपण व नॅन्सी अजरमतै गाणार ;-)
जस्ट लाईक अ व्हेव्हिंग फ्लॅग!

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2010 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त सुरुवात.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

10 Jun 2010 - 1:45 pm | गणपा

असच म्हणतो.
जियो डॉन्राव..

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 12:49 pm | बिपिन कार्यकर्ते

डान्या, चांगला उपक्रम. शुभेच्छा.

यानिमित्ताने:

०१. वरती जशा संपादकिय वगैरे लिंक्स दिसतात तशी एक 'फुटबॉल विश्वचषक' अशी लिंक असावी. त्यात या मालिकेतले सगळे धागे दिसावेत.

०२. सुरूवात म्हणून, प्रत्येक देशाची / टीमची ओळख द्यावी. मुख्य खेळाडू, कोच, खेळाडू आणि कोचची ख्याती / पूर्वेतिहास, पूर्वीच्या विश्वचषकातले रेकॉर्ड, क्लिपिंग्ज वगैरे.

०३. संपूर्ण स्पर्धेचा ड्रॉ. जसजशा मॅचेस होत जातील तसतसे हा ड्रॉ अपडेट व्हावा.

०४. प्रत्येक मॅच नंतर त्या मॅचचे अ‍ॅनलिसिस (चतुरंग ष्टाईल)... मॅचमधले हायलाइट्स, कोणी कशा मूव्ह्ज रचल्या, कसे डिफेंड केले वगैरे...

०५. लक्ष ठेवावे असे खेळाडू आणि त्यांची स्पर्धेतील प्रगती यावर एक वेगळा धागा. त्यात गोल्डन बूटाचे दावेदार त्यांच्यावर टिप्पण्या

करा चालू.........

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

10 Jun 2010 - 12:56 pm | नंदन

उत्तम उपक्रम. सुरुवात दणक्यात झाली आहे, बाकी बिकांच्या सुचवण्यांशी सहमत आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मस्त कलंदर's picture

10 Jun 2010 - 1:08 pm | मस्त कलंदर

बिका नि नंदनशी बाडिस.
मस्त झालाय लेख.. आता घाईघाईत वाचला... निवांतपणे वाचून आणखी प्रतिक्रिया देईन..

अवांतरः आता यावरून वायदे आझम इतर वायदे पूर्ण करणार असे मानायचे का?? ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रामदास's picture

10 Jun 2010 - 6:33 pm | रामदास

या निमीत्तानी मुलांच्या जवळ येण्यास मदत होईल.

काही दिवसापूर्वी झोपेत राफा ..राफा म्हणणार्‍या मुली आता रुनी वगैरे म्हणतील.

बाकी मांडणीसाठी चतुरंगची लेखमालीका पाठ्यपुस्तक म्हणून वाचावी असे सुचवतो आहे.

भारद्वाज's picture

10 Jun 2010 - 1:07 pm | भारद्वाज

ढडार टटार टटार टटार ..ढडार टटार टटार टटार...
ढडार टटार टटार टटार ..ढडार टटार टटार टटार...
तडग दडग दडग दडग तडग दडग दडग दडग ...ओ ओ ओ ओ..ओओओओ ..ओ ओ ओ ओ...we all say.....
-
जय हिंद जय ब्राझील

धमाल मुलगा's picture

10 Jun 2010 - 6:50 pm | धमाल मुलगा

सगळ्यात जबरा प्रतिसाद!
ह्याला म्हणतात रंगात रंगून जाणॅ :)
आवडलं सायबा.. लै आवडलं.

ओ ओ ओ ओ..ओओओओ ..ओ ओ ओ ओ...we all say.....

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 1:27 pm | मेघवेडा

डान्या कडक सुरुवात रे!! जेपी, सहजराव आणि बिकांशी बाडिस!! :)
सहजरावांनी म्हटलेल्या 'आपण' मध्ये माझा समावेश व्हावा या एकाच कारणासाठी त्यांच्याशी सहमत बरं का? :D

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2010 - 1:49 pm | स्वाती दिनेश

सुरुवात मस्तच...
उद्या मुहूर्ताचा नारळ फुटेल. किक ऑफ म्याच.. द.अफ्रिका वि मेक्सिको ...
इथेही फूटबॉलचे वारे वहायला लागले आहेतच,
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 5:41 pm | बिपिन कार्यकर्ते

जर्मनी हा अजून एक फुटबॉलवेड देश.

स्वातीताई, तू रोज तिथे विश्वचषकाबद्दल काय छापून येतंय, जर्मनीच्या मॅचेस नंतर कसं वातावरण आहे वगैरे लोकल अपडेट्स नियमितपणे टाकशील का?

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

10 Jun 2010 - 5:57 pm | छोटा डॉन

>>जर्मनीच्या मॅचेस नंतर कसं वातावरण आहे वगैरे लोकल अपडेट्स नियमितपणे टाकशील का?

+१, असेच म्हणतो.
असे अपडेट्स टाकावे अशी मी स्वातीताईला विनंती करतो.

सध्यासुद्धा एकुण वातावरण, मायकल बलाकच्या दुखापतीमुळे त्याची माघार व त्यावर पब्लिकची रिअ‍ॅक्शन. लोकल हिरो कोण आहेत ? लोकल मिडिया काय म्हणतो आहे वगैरेवर एक छोटेखानी लेख येऊदेत अशी विनंती.
जर्मनीचे वातावरण किती तापलेय ते तर कळुदेत ;)
------
(मायकल बलाकचा फॅन)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 7:02 pm | बिपिन कार्यकर्ते

एक छोटेखानी लेख येऊदेत अशी विनंती.

च्यामारी!!! मी नियमितपणे लिही म्हणून म्हणतोय आणि हे म्हणतंय एक लेख टाक.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2010 - 12:08 pm | स्वाती दिनेश

'परयत्न ' करते... :)
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2010 - 12:22 pm | बिपिन कार्यकर्ते

नुसता परयत्न नको... स्वयत्न पण कर आणि तुमच्याकडे आता एक पाहुणे येणार आहेत ना, त्यांना पण बसव लिहायला.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2010 - 12:50 pm | स्वाती दिनेश

पावण्यांना लिवायला बसवू म्हंतोस? अरे, त्यांना फ्राफु दावायचं हाये..
स्वाती

दिपक's picture

10 Jun 2010 - 2:02 pm | दिपक

दणक्यात सुरुवात. पुढचे भागही असेच जोरदार असतिल ह्याची खात्री आहेच.. :-)

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 2:20 pm | भडकमकर मास्तर

वा.. धागा आवडला...
( दर चार वर्षांनी विश्वचषक फॉलो करणारा) मास्तर
( इतर वेळी र्वांडा आणि बुरुंडीचे निकोलाय फोंण्टाना आणि झुब्रिक बाघेरा असतातच बरोबर ) :) :)

दत्ता काळे's picture

10 Jun 2010 - 5:00 pm | दत्ता काळे

लेख फार आवडला. एक नंबर.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Jun 2010 - 5:06 pm | llपुण्याचे पेशवेll

छान वाचतोय.
फुटबालातलं आपल्याला काही कळत नसल्याने नुसतच वाचर राहणार. उगा आपलं प्रतिसाद देऊन अज्ञान कशाला पाजळा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

Dhananjay Borgaonkar's picture

10 Jun 2010 - 6:26 pm | Dhananjay Borgaonkar

जे.पी शी सहमत. पुढील महिनाभर दंगा..
डॉनराव मॅच संपली की लेगेचच लेख टंका.
आपण बेटींग चालु करुया काय मिपा वर??

धमाल मुलगा's picture

10 Jun 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा

>>आपण बेटींग चालु करुया काय मिपा वर??
ओ दादा... _/\_ आत्ता कुठं पैल्या आगीची धग कमी होतीये...तुमी का परत मशाल घेऊन फिरताय? :(

Dhananjay Borgaonkar's picture

10 Jun 2010 - 7:03 pm | Dhananjay Borgaonkar

अहो पैसेवालं बेटींग नव्हे..आपण पाँईंट्स वर बेटींग खेळू.

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 9:10 pm | मेघवेडा

मी चुकून 'बॅटिंग' वाचलं.. :P

प्रभो's picture

10 Jun 2010 - 6:59 pm | प्रभो

उच्च लेख हो डॉनराव.......जहबहरा!!!!

बिकांच्या सुचनेवर काम करताना आमची काही मदत लागली तर सांगा हो... :)

आज झाली ती एक सुरवात होती.
अजुन भरपुर काही येणार आहे आणि आम्ही लिहणार आहोत.
मराठीतुन आख्खी स्पर्धा कव्हर करणारा एक 'उत्तम डेटाबेस' इथे बनवायची योजना आहे व त्यासाठी सध्या आमच्या बर्‍याच चर्चा चालु आहेत.

ह्यानिमित्ताने आम्ही मिपावर "फिफा विश्वचषक - २०१०" हा खास वेगळा विभाग चालु करण्याच्या विचारात आहोत की जेणेकरुन जे ह्यावर लिहु इच्छितात त्यांना एक खास वेगळे डेडिकेटेड असे व्यासपीठ मिळेल. त्यासाठी आवश्यक असणार्‍या टेक्निकल बाबींसाठी मी सधय संबंधितांशी बोलतो आहे व ती काम लवकरच होतील.

आता गरज आहे ती तुमच्या सल्ल्याची, तुमच्या मार्गदर्शनाची व तुमच्या भरिव योगदानाची :
१. सध्या विश्वचषकात भाग घेत असणार्‍या सदस्य देशामध्ये वास्तव्य करत असणार्‍या मिपाकरांकडुन आम्हाला तिथल्या लोकल "फुटबॉल फिवर" वर ४ शब्द किंवा छोटेखानी लेख हवे आहेत.
ह्यासाठी फुटबॉल संपुर्ण कळावेच अशी अपेक्षा नाही, फक्त तुम्ही काय काय पाहता आहात ? काय रिअ‍ॅक्शन्स आहेत ? पब्लिक आणि मिडिया काय बोलतो आहे वागैरेवर तुमच्याक्डुन तुमचा अनुभव हवा आहे.
२. नियमीत अपडेट्स कोण देणार असेल तर त्याचे नेहमीच स्वागत राहिल व व्यक्तिशः आम्ही त्याचे आभारी राहु.
३. ईएसपीएन, याहु सारख्या साईटवर जे 'सॉकर ब्लॉग्स' पडतात तसे सामान्य माणसाच्या नजरेतुन कुणाला काही शेअर करायचे असलल्यास आम्ही त्यांना कृपया लिहायला सुरवात करावी अशी विनंती करतो.
४. कुणाला काही लोकल मिडियाच्या लिंक्स, पोस्टर्स, व्हिडिओ क्लिप्स वगैरे शेअर करायच्या असल्यास ती दुधात साखर होईल.

ह्या लेखामालांच्या निमित्ताने मराठीत ह्या स्पर्धेचा एक अग्रगण्य आणि उत्तम डेटाबेस बनवावा असा आमच विचार आहे.
आपल्या मदतीचे व सुचनांचे स्वागत आहे.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रभो's picture

10 Jun 2010 - 7:38 pm | प्रभो

उत्तम योजना डॉनराव....फुल्ल्ल सपोर्ट आहे..

मेघवेडा's picture

10 Jun 2010 - 9:10 pm | मेघवेडा

माझाही!

:)

पंगा's picture

11 Jun 2010 - 4:30 am | पंगा

मराठीतुन आख्खी स्पर्धा कव्हर करणारा एक 'उत्तम डेटाबेस' इथे बनवायची योजना आहे व त्यासाठी सध्या आमच्या बर्‍याच चर्चा चालु आहेत.

योजनेमागील कल्पना चांगली आहे. अर्थात मला फुटबॉलमधले ओ की ठो कळत नसल्यामुळे भरघोस शुभेच्छांव्यतिरिक्त देण्यासारखे माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. त्यामुळे:

चालू द्या!

- पंडित गागाभट्ट.

नीलकांत's picture

10 Jun 2010 - 8:51 pm | नीलकांत

अतिशय जोशपुर्ण उपक्रम , डॉन राव आणि मंडळी आगे बढो ! :)

पुढील लेखांची वाट बघतोय.

बिकांच्या सूचनांशी सहमत.

- नीलकांत

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 9:27 pm | चतुरंग

डान्या, लेख मस्तच झालाय! जियो!! =D>
संगीत मानापमानाची नांदी आहे ना 'नमन नटवरा विस्मयकारा' अशा उत्साहाचा झालाय लेख. आता नाटक सुरु होणार सावरुन बसा सगळे! :)
(फुटबॉल विश्वचषक असा मुख्य पानावर नवा ट्रॅक काढल्याबद्दल नीलकांतचे आभार!)

चतुरंग

नंदन's picture

11 Jun 2010 - 3:47 am | नंदन

स्पर्धेच्या तयारीची काही प्रेक्षणीय छायाचित्रं

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 4:10 am | शिल्पा ब

छायाचित्रे छान आहेत...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

दिपक's picture

11 Jun 2010 - 10:26 am | दिपक
दीपक साकुरे's picture

11 Jun 2010 - 12:51 pm | दीपक साकुरे

जबरा लेख... आता अपडेट्ससाठी कुठेही जायला नको...
चालु ठेवा.. =D>