मुक्काम पोष्ट बेजींग

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
1 Oct 2007 - 9:04 am

शिकागो एअरपोर्टचे युनायटेड एअरलाइन्सचे टर्मिनल. आम्हा पाच जणांचा कंपू बेजींगच्या नॉनस्टॉप फ्लाइटच्या प्रतीक्षेत. इतक्यात सर्व प्रवाश्यांना रांगेत उभे करून त्यांच्या व्हिसाची तपासणी सुरू केली. काय कटकट आहे असे म्हणत आम्ही देखिल त्या लांबलचक रांगेत उभे राहिलो आणि आमचा नंबर आला तेव्हा काय आश्चर्य इकॉनॉमी क्लासच्या ५ सिटा मोकळ्या करण्यासाठी आम्हाला बाजुला घेऊन तिथल्या तरुणीने चक्क ५ बिजनेस क्लासचे बोर्डिंग पास बनवुन दिले. साडे बारा तासांची नॉन स्टॉप फ्लाइट आणि आम्हाला बिजनेस क्लास ..काय सांगता.. एखाद्या पावसाळी दिवशी शाळेच्या पटांगणातच, 'अमुक तमुक ह्यांचे ९२व्या वर्षी निधन झाल्याने आज शाळा भरणार नाही' अशी 'सुचना' दिल्यावर आमच्या मनाची जी स्थिती व्हायची पुन्हा एकदा अगदी तशीच झाली आणि अगदी बिजनेस क्लास मधले सराइत प्रवासी असल्यासारखे त्या गुबगुबीत प्रशस्त खुर्च्यांवर रेलून, उंची मद्यांचा आस्वाद घेत आम्ही आमच्या प्रवासाला सुरूवात केली.

मिठाईवालासुरूवात इतकी छान होणे ही पुढच्या आठवड्याभराच्या मस्त प्रवासाची नांदीच होती. चीनला जायचे ह्या नुसत्या कल्पनेनेच आम्हाला गेले काही महिने रोमांच आले होते. लाल गजांच्या मागे काय चालले आहे हे डोकावुन बघायची प्रचंड उत्सुकता लागली होती. बेजींगच्या 'कॅपीटल' विमानतळावर भर दुपारी आमचे आगमन झाले. इमिग्रेशन कस्टम हे सगळे सोपस्कार पार पाडत शेवटी एकदाचे आमच्या हॉटेल वर येउन ब्यागा आपटल्या. अंघोळी वगैरे उरकेपर्यंत संध्याकाळ झाली आणि आम्ही जेवणाची सोय करण्यासाठी बाहेर पडलो. आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येते होते की, जगभर 'मेड इन चायना' गोष्टी विकुन ह्या चिन्यांनी एकंदरीय बरीच माया गोळा केली आहे. कोणत्याही अमेरिकेतल्या शहरात दिसतील अश्या गाड्यांनी भरलेले आणि खड्डे विरहीत रस्ते. एकमेकावरुन जाणरे फ्लायओव्हरस, उंच उंच इमारती , त्यांच्यावरची नाविन्यपूर्ण रोषणाइ आणि नुसता झगमगाट, च्यामारी एकेकाळी कदाचित आपल्या पेक्षा दरिद्री असलेल्या ह्या देशात फिरताना पण आता 'फारिन' ला आल्यासारखेच वाटत होते. आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे इथल्या सिटी बसेस. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या विजेच्या तारांना लटकत जाणाऱ्या ह्या बसेस बघून आपल्याकडं पण ही इंधन वाचवणारी आणि प्रदुषणमुक्त युक्ति अवलंबली पाहिजे असे वाटले.

बांबुच्या वाडग्यातुन खाताना.. शेवटी एका उपाहारगृहा समोर बरीच गर्दी बघून आम्हीही पोटपुजेसाठी घुसलो. आत जाऊन टेबल पकडले खरे पण आता ऑर्डर का करायचे? तिथल्या एकालाही इंग्रजी समजत नव्हते आणि आम्हाला चयानीजचा गंध नव्हता. मेन्यू कार्डातील रँडमली काहीतरी ऑर्डर करायचे आणि अनेक ऐकीव कथां मधल्यासारखे पानात 'भरले मांजर' अथवा 'पीठ पेरलेली डासांची अंडी' असले काहीतरी पडायचे ही भिती!!! तसे रस्त्यावरती ठेल्यांवर विंचू, कसले कसले किडे काडीला लावून विकायला ठेवलेले पाहिलेच होते! कसेबसे बाकीच्यांचा टेबलाकडे बोटे दाखवून बियर तेवढी मागवता आली पण खाण्याचे काय? शेवटी आमची कुचंबणा बघून तिथल्या म्यानेजराने एक पाच-दहा इंग्रजी शब्द समजणारा वेटर धाडून दिला आणि आम्ही चिकन/लँब असे शब्द असणारे पदार्थ मागवण्यात यशस्वी झालो. हे हॉटेल प्रसिद्ध होते ते 'हॉट पॉट' नावाच्या प्रकारासाठी. हा हॉट पॉट म्हणजे टेबलाच्या मध्यभागी गरम पाण्याची एक परात उकळत ठेवतात आणि कच्चे मांस/ भाज्या समोर आणून ठेवतात हे कच्चे मास आणि भाज्या त्या पाण्यात थोडावेळ बुडवुन ठेवायच्या आणि खायच्या. आमच्या अमेरिकन सहकाऱ्यांनी लगेच हा प्रकार ऑर्डर केला तरी मला मात्रा काही फारसा झेपला नाही त्यामूले मी आपलं सरळ भरपूर शेंगदाणे घालून केलेल्या चिकनवर ताव मारल आणि होटेलवर येउन ताणून दिली.ताजे ताजे विंचू

एंप्रेस गार्डनदुसऱ्या दिवशी आम्हाला विशेष काही काम नसल्याने आम्ही निघालो बेजींग़ भटकायला. बेजींग शहर हे कांद्या सारखे अनेक पापुद्र्यांनी बनलेले आहे. अतिभव्य तिआन्नमेन चौक हा त्याच्या मध्याभगी असून त्याच्या भोवतीचे पापुद्रे म्हणजे अनेक वर्तुळाकार 'रिंगरोड' आहेत. आमच्या सुदैवाने आमचे होटेल हे अगदी तिआन्नमेन चौका पासून पायी जाण्याच्या अंतरावर होते. तेव्हा सर्वप्रथम भेट दिली ती ह्या तिआन्नामेन स्क्वेअरला. ह्या चौकात पोहचलो आणि 'चौक' म्हणजे आमच्या मनात जे चित्र उभे राहते त्याला पार उध्वस्त करुन टाकले. अक्षरशः दोन तीन क्रिकेट ग्राउंड उभी रहातील इतकी ह्या चौकाची व्याप्ती. चहुबाजुंनी रस्ते आणि मधोमध हा अतिविशाल चौक. ह्याच्या तीन्ही बाजुला पार्लमेंट,लष्कर मुख्यालय अश्या शासकीय ईमारती तर चौथ्या बाजूला उत्तरेकडे भव्य 'फॉरबिडन सिटी'.

फॉरबिडन सिटी तिआन्नमेन स्क्वेअरची भव्यता कितीही भारावून टाकत असली तरी ह्याच जागेवर झालेली मानवी हक्कांची अमानुष पायमल्ली आणी प्रसंगी अंगावरून रणगाडे चालवून मोडलेले तरुण आणि बुद्धीजीवींचे बंड अश्या कटू स्मृती देखिल ह्याच ठिकाणाशी निगडीत आहेत. आम्हा गळ्यात कॅमेरे लटकवलेल्या जत्थ्याचे मात्र पुढचे लक्ष्य होते 'फॉरबिडन सिटी'. तिआन्नमेन स्क्वेअर पाशीच एका वाटाड्याला पकडून आम्ही ६० युआन चे तिकिट काढून फॉरबिडन सिटी मध्ये घुसलो. इथली कोणतीही प्रेक्षणीय स्थळे पाहायला लागले सतत दोने नावे ऐकावी लागतात. चिंग डायनेस्टी आणि मिंग डायनेस्टी. ही इथली दोन अतिशय प्रसिद्ध राजघराणी. आमच्या वाटाड्याचे प्रत्येक वाक्य चिंग किंवा मिंग ह्या शब्दानेच सुरू व्हायचे. पहिल्या पहिल्यांदा आम्ही अगदी काटेकोर पणे चिंगांच्या राजाने काय केले मिंगांच्या राजाने काय केले असले ऐकून लक्षात ठेवायच प्रयत्न करायचो पण नुसत्या फॉरबिडन सिटीतच ५६ वेळा हा उल्लेख झाल्यावर मात्र आम्ही ह्या चंगू-मंगुचा नाद सोडून दिला. पण काहीही म्हणा शनवार वाड्यात फिरताना जे रोमांच उभे राहतात ते ह्या फॉरबिडन सिटीत नाय बॉ! लहानपणापासून शिकलेला इतिहास आणि वाटाड्याने अवघ्या काही मिनिटांपूर्वी सांगीतलेला इतिहास ह्यामूळे हा फरक पडत असावा. पण ह्या फॉरबिडन सिटीच्या मागे असलेली 'एंप्रेस गार्डन' मात्र भारी आहे हा. फंग शुई च्या सिद्धांताप्रमाने उत्तरेला टेकडी असली पाहीजे म्हणून फॉरबीडन सिटीच्या उत्तरेला देखिल एक मानव निर्मित चांगली पर्वती एवढी टेकडी बांधली आहे खूप इच्छा असून देखिल दिवसभराच्या पायपीटीने थकल्यामूळे ही टेकडी काही चढू शकलो नाह.

समर पॅलेस

टेंपल ऑफ हेवन फॉरबिडन सिटी बरोबरच बेजींग़मध्ये आवर्जून बघण्यासारखी ठीकाणे म्हणजे 'ग्रेट वॉल', 'समर पॅलेस' आणि 'टेंपल ऑफ हेवन'. ग्रेटवॉल पहाण्यासाठी बादालींग नावाच्याअ गावाला जावे लागते. तिथे फारच (अजानुकर्ण टाईप) हौशी असाल तरच पायी चढून जावे अन्यथा डायरेक्ट भिंतीवर नेऊन बसवणारी केबल कार आहे. आम्ही अर्थातच ह्या रज्जुरथाचा वापर करून भिंतीवर गेलो. ग्रेट वॉल प्रमाणेच इतर प्रेक्षणीय स्थळांच्या ठीकाणी देखिल मुबलक प्रमाणात माहिती देणारे गाईड मिळतात. ह्या सगळ्या ठीकाणांची नावे असलेले कार्ड आमच्या होटेलवाल्याने आम्हाला दिले होते. टॅक्सीवाल्याशी एकही शब्द न बोलता नुसते ह्या कार्डावरील ठिकाणावर बोट दाखवून तो नेईल तीकडे सुटायचे हे तंत्र अवलंबत आठवड्यात प्रचंड भटकंती खादाडी आणि खरेदी केली. पर्ल मार्केट, सिल्क मार्केट इथले कुठच्या कुठे भाव पाडणारे विक्रेते बघून माझे भारतीय मन आश्चर्यचकित होत होते तर आमच्या सोबत असणाऱ्या अमेरिकन मंडळींची काय अवस्था होत असेल ह्याची तुम्हीच कल्पना करा. ४०० आणि ५०० युआनला सुऱू होणारी घासाघीस २०-३० युवानवर संपे. पुण्या मुंवईतल्या फॅशन स्ट्रीट्स वर अवगत केलेली माझी घासाघीशीची कला पाहून पाश्चात्य मंडळींनी तोंडात बोटे घालणेच बाकी राहीले होते. हातात एक आठवडाच असल्याने आणि त्यातच ज्या परिषदेसाठी गेलो होतो त्या परिषदेत देखिल हजेरी लावायची असल्याने बेजींग व्यतिरिक्त अन्य कोठे मात्र फिरू शकलो नाही. तर मंडळी हा आमचा बेजिंगच्या धावत्या भेटीचा वृत्तांत आमच्या विद्यापिठातील किस्श्याने संपवतो. पर्ल मार्केट
ग्रेट वॉल

आमच्या विद्यापिठातील प्राध्यापकाशी गप्पा मारतना असंच एकदा चायनाचा विषय निघाल्यावर प्राध्यपकबुवांनी एक मजेदार किस्सा सांगीतला होता. त्यांच्या लहानपणी इथं अमेरिकेत कम्युनिझम हा वाईट असतो हे बिंबवताना चायना हा कम्युनिझमची राजवट असणारा देश म्हणजे म्हणजे अमेरिकेला किती मोठा धोका आहे असं ठसवलं जायचं. पण गंमत म्हणजे आता तिथला कम्युनिझम जेव्हा बाजारू तत्त्वांचा अवलंब करत आहे तेव्हा निर्माण झालेली भीती कितितरी अधिक प्रमाणात आहे अश्या गोष्टी हीच माणसे करू लागली आहेत. आणि खरंच हुकुमशाहीच्या बडग्यासमोर अस्ताव्यस्त पणे वाढत चाललेले इथले इंफ्रा स्ट्रक्चर बघून वारंवार त्याचात प्रत्यय आला.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

1 Oct 2007 - 9:34 am | गुंडोपंत

छोटाच पण मस्त लेख!
आवडला..
चिंग मिंग राजघराण्यांचे "चंगु मंगु" हे रुपांतर तर लैच भारी!
बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले!
(माझ्या चष्म्याचा परिणाम म्हणू का;)) )

इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले!
शिवाय जुन्या बिजींग शहराविषयी, परंपरां विषयी वाचायला आवडेल.

आपला
गुंडोपंत

चीनी ज्योतिष शास्त्राविषयीपण प्रचंड कुतुहल आहे. (माहीती मिळाल्यास कळवा!)

कोलबेर's picture

1 Oct 2007 - 9:45 am | कोलबेर

>>बाकी विंचुच्या फोटोत विंचू दिसत नाहीयेत... सी हॉर्स वाटले!

अहो ते दोन्ही बाजूला काडीवर एकएकटे बसले आहेत ते सी हॉर्स आहेत पण त्यांच्या मधल्या काड्यांवर विंचू आहेत.

>>इथल्या सामान्या माणसांवर, त्यांचे आयुष्य यावर अजून एक भाग आला तरी चालेल असे वाटले!

फारच धावता दौरा होता हो त्यामूळे काही फारशी माहिती मिळाली नाही. प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!

कोलबेर's picture

5 Oct 2007 - 7:39 pm | कोलबेर

गुंडोपंत अजुन विंचू सापडले नसतील तर ह्या चित्रात पाहा..

भाजलेल्या अळ्या आणि किडे

राजे's picture

5 Oct 2007 - 7:52 pm | राजे (not verified)

वा ... क्या बात है...
बस अजून काय हवे डिश मध्ये... ह्म्म्म एका झुरळाची कमी आहे पण त्या अळ्या ते काम पुर्ण करतीलच. काय कोलबेर साहेब एकटे
एकटेच डिशवर ताव मारता होय... आम्हाला ही थोडी टेस्ट घेऊ द्या.. आम्ही ही सांग्गू की आमच्या येणा-या मुलाबाळांना की आम्ही काय काय खल्ले ते ;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सहज's picture

1 Oct 2007 - 9:54 am | सहज

छायाचित्रे असली की कसा सूंदर दिसतो लेख. मस्तच.

तुमच्या "स्टीम बोटचा" (हॉट पॉट) पण एक टाकायचा की फोटो. हे कच्चे मास साठी "शेजवान" सॉस मागायचा की भलेभले गारद होतात त्या तिखट तर्री पूढे. पूढच्यावेळि स्टीमबोट कम हॉट प्लेट मागा.
मग विंचू चावला की नाही? माझा एक चायनीज मित्र म्हणतो, जे हालचाल करतय, श्वास घेतय ते सगळ आम्ही (चायनीज ) खातो. :-)

अवांतर ह्या नव्या बिजींगच्या जरा बाजूला गेले की दिसते भकास, बकाल वस्ती. जागतीककरणाच्या रेट्यात त्यांची वस्ती शहराच्या बाहेर टाकली आहे. पण तसेच व्हायला पाहीजे म्हणा. टोलेजंग इमारती च्या मधेच झोपड्या कसे कोण चालून घेईल बघा अगदी माओवादी देखील नाही. ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच.

गुंडोपंत's picture

1 Oct 2007 - 9:57 am | गुंडोपंत

ते चालवून घेणारे फक्त मतलालची समाजवादीच.

ही भारीच पिंक दिली टाकुन सहजराव!!
आता अचानक समाजवाद्यांवर का घसरलात?

(तुम्हाला ही वस्ती नकोशी वाटते ते ठीक हो... पण आपणच जेव्हा त्या वस्तीत असतो तर मग काय ?)

आपला
गुंडोपंत

मग सांगतो.

गुंडोपंत's picture

1 Oct 2007 - 11:52 am | गुंडोपंत

या वस्ती ला हुताँग असे काहीसे नाव आहे का?

आपला
गुंडोपंत

कोलबेर's picture

1 Oct 2007 - 11:06 pm | कोलबेर

हु टाँग असे इथल्या गल्ली बोळांना म्हणतात. सहजराव म्हणता आहेत तशी झोपडपट्टी बादालिंगला जाताना पहायला मिळाली. आमच्या ड्रायवर ने शॉर्ट कट मारण्यासाठी गाडी अश्या बोळांमधून काढली आणि रस्त्यावरचे खड्डे त्यात साचलेले पाणी असा प्रकार देखिल पहायला मिळाला. ह्या हु टाँग मधून सायकल रिक्षातून फिरवणार्‍या काही खास टूर्स देखिल असतात. अरूंद रस्ते असल्यामूळे मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत पण सायकल रिक्षा सहज जाते आणि आरामात रमत गमत जुने बेजींग बघायला मिळते. आमची ही सफर देखिल हुकलीच. :-(

सर्किट's picture

1 Oct 2007 - 10:06 am | सर्किट (not verified)

ह्यापूर्वी आमचे मित्र खिरे ह्यांनी शांघाईची अंगडाई हा चीनचा परिचय करून देणारा आणि एका क्रांतिकार्‍याने चीनचे अतिरंजित वर्णन करणारा लेख लिहिला होता. त्यापेक्षा ही लेखमाला वास्तववादी व्हावी हीच अपेक्षा.

- सर्किट त्से तुंग

आजानुकर्ण's picture

1 Oct 2007 - 10:23 am | आजानुकर्ण

लेख आवडला. (हॉपिसात चित्रे दिसत नाहीत :( )

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2007 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

'अमुक तमुक ह्यांचे ९२व्या वर्षी निधन झाल्याने आज शाळा भरणार नाही' अशी 'सुचना' दिल्यावर आमच्या मनाची जी स्थिती व्हायची पुन्हा एकदा अगदी तशीच झाली

च्यामारी एकेकाळी कदाचित आपल्या पेक्षा दरिद्री असलेल्या ह्या देशात फिरताना पण आता 'फारिन' ला आल्यासारखेच वाटत होते.

पण नुसत्या फॉरबिदन सिटीतच ५६ वेळा हा उल्लेख झाल्यावर मात्र आम्ही ह्या चंगू-मंगुचा नाद सोडून दिला.

भारीच सफर घडवून आणलीत
पुर्वी त्याला पेकींग म्हणायचे ना! कलकत्त्याला कोलकता, मद्रास ला चेन्नई, सिलोनला श्रीलंका अन ते सयामला का काय हो पुलंच्य पुर्वरंग मध्ये आहे?
प्रकाश घाटपांडे

नंदन's picture

1 Oct 2007 - 2:11 pm | नंदन

लेख आणि चित्रे आवडली. चिनी खाण्याविषयी जमला तर एखादा लेख नक्की लिहा. चिंग-मिंग बरोबर कुंग (पाओ) सुद्धा येऊ देत :)

बाकी, तिआनामेन स्क्वेअर बद्दल वाचून टाइम मासिकाने 'अननोन रेबेल' म्हणून विसाव्या शतकातील शंभर सर्वोत्कृष्ट छायाचित्रांत समाविष्ट केलेले हे छायाचित्र आठवले.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट's picture

1 Oct 2007 - 9:48 pm | सर्किट (not verified)

चीन मध्ये आता मिसळपाववर बंदी येणार.
पण खरंच, हे चित्र लोकशाही च्या कठीण वाटेची खातरजमा करणारे आहे.
हे चित्र पाहून मला "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" ह्या ओळी आठवतात.
(ता. क. ह्या रिबेलची चीनच्या तुरुंगात सरकारने हत्या केली.)

- सर्किट

कोलबेर's picture

1 Oct 2007 - 11:09 pm | कोलबेर

..चीनमध्ये ब्लॉगस ब्लॉक केलेलेच आहेत. इतकेच नव्हे तर विकिपीडिया देखिल उघडता येत नाही...अहो जिथे तुम्हाला मुलं किती हवीत देखिल सरकर ठरवणार तिथे विकिपीडियाची तक्रार कोण करणार? :-)

स्वाती दिनेश's picture

1 Oct 2007 - 4:09 pm | स्वाती दिनेश

लेख मस्त्,आवडलाच्,आणि काय योगायोग? 'इकडे'पण चीन आणि 'तिकडे 'पण चीन!
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2007 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला !
सफर वाचण्यात मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर's picture

1 Oct 2007 - 11:10 pm | कोलबेर

प्रोत्साहना बद्दल आभारी आहे! :-)

प्रियाली's picture

1 Oct 2007 - 11:43 pm | प्रियाली

लेख वाचायला थोडा उशीर झाला वाटतं.

>> मी आपलं सरळ भरपूर शेंगदाणे घालून केलेला चिकनवर ताव मारल

अमेरिकेत कंग-पाओ चिकन म्हणून शेंगदाणे घातलेले चिकन मिळते अर्थात, अमेरिकन चायनीज हा एक भारतीय चायनीजसारखा "अस्सल" प्रकार असावा. चीनमध्ये मिळणे कठिणच असावे.

>>पण ह्या फॉरबिडन सिटीच्या मागे असलेली 'एंप्रेस गार्डन' मात्र भारी आहे हा.

अशा ठिकाणांचा इतिहास नाही तरी विशेष तरी सांगा.

फॉरबिडन सिटीचा लावलेला फोटो पाहताना शांघाई नाईट्सची आठवण झाली.

अवांतरः
>>तिथे फारच (अजानुकर्ण टाईप) हौशी असाल तरच पायी चढून जावे अन्यथा डायरेक्ट भिंतीवर नेऊन बसवणारी केबल कार आहे.

अजानुकर्ण बहुधा भिंतीवर पायी चढून जातील. ;-)

विसोबा खेचर's picture

2 Oct 2007 - 7:50 am | विसोबा खेचर

उत्तम लेख.. तुझी लेखणी झकास सुरू आहे. औरभी लिख्खो..चित्रंही छान आहेत..

नंदन म्हणतो तसं चिनी खाण्यावर येऊ द्या काहीतरी! :)

तात्या.

चित्रा's picture

2 Oct 2007 - 10:19 am | चित्रा

तुझी लेखणी झकास सुरू आहे. औरभी लिख्खो..चित्रंही छान आहेत..

नंदन म्हणतो तसं चिनी खाण्यावर येऊ द्या काहीतरी! :)

चांगले चाललेय. लिहीत रहा.

बेसनलाडू's picture

2 Oct 2007 - 8:49 am | बेसनलाडू

वर्णन आवडले. बेजिंगची सफरच घडली. चित्रेही मस्त.
खाण्यावरील लेखाबद्दल नंदनशी सहमत आहे. लिहाच!
एक शंका - "फॉर्बिडन सिटी" हे नाव कसे पडले, याबद्दल काही माहिती मिळाली का?
(जिज्ञासू)बेसनलाडू

कोलबेर's picture

2 Oct 2007 - 9:37 pm | कोलबेर

साधारण १९२० पर्यंत फॉरबिडन सिटीत सामन्य माणसाला प्रवेश प्रतिबंधीत होता. ७२० चौ.मि. चा परिसर म्हणजे जणू एक गावच आणि त्यात राजा राणी, राजाची अंगवस्त्रे आणि हिजडे ह्या खेरिज कुणालाही आत प्रवेश नसल्याने ह्याचे नाव 'फॉरबिडन सिटी'. सामान्य जनतेच्या अतोनात पिळवणुकीला वैतागुन अखेर गावकर्‍यांनी बंड केले. उत्तरेकडून आलेल्या त्यांच्या फौजांनी (पेसंट अपरायजींग) फॉरबिडन सिटीवर कब्जा केला आणि सात आठशे वर्षे बंद असलेली फॉरबिडन सिटीची दारे उघडली.

राजे's picture

2 Oct 2007 - 11:52 pm | राजे (not verified)

मस्तच.

अजून काही अनूभव लिहला लवकर.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

मीनल's picture

24 Feb 2008 - 3:44 am | मीनल

अहो काय काय म्हणून सांगू .?मी तिथे ५ वर्ष राहिले आहे.मी १० -१२ लेख सकाळ मधे लिहिले आहेत.

आता अमेरिकेत आल्यावरही मी ते आयुष्य विसरणार नाही .

विचारा का काय ते.जमल तर उत्तर देते.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 3:51 am | llपुण्याचे पेशवेll

अहो जे काही चांगले वाईट अनुभव असतील ते बिनधास्त लिहा.
आता बघा कसे आहे, आलम दुनियेला आकर्षण असलेली अमेरीका मला मात्र फारशी भावली नाही मनाला. तसे ते त्या बिजींग मधे जे काही चांगले वाईट असेल ते मि.पा.कराना कळवा.
पुण्याचे पेशवे

चतुरंग's picture

24 Feb 2008 - 10:19 am | चतुरंग

छोटेखानी, सुंदर सफर घडवलीत. प्रकाशचित्रेही सुंदर.
तिथे म्हणे जिवंत साप तुमच्यासमोर सोलून लगेच फ्राय करुन देतात असं काही मिळालं का पहायला?

चतुरंग

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 10:43 am | सुधीर कांदळकर

'भरले मांजर' अथवा 'पीठ पेरलेली डासांची अंडी' ही कल्पना सुरेख.
बेजींग शहर हे कांद्या सारखे अनेक पापुद्र्यांनी बनलेले आहे. अतिभव्य तिआन्नमेन चौक हा त्याच्या मध्याभगी असून त्याच्या भोवतीचे पापुद्रे म्हणजे अनेक वर्तुळाकार 'रिंगरोड' आहेत. हे वर्णन छान.
चंगूमंगू हि कल्पना तर अफलातून.

पुढील भाग लौकर येऊ द्यात.