गाभा:
महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला फेसबुकच्या एका पानावर बंदी आणायची आहे, अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली. ती व तीवरील प्रतिक्रिया वाचून अंमळ करमणूक झाली. कारणः
- २२ मेच्या बातमीनुसार जे पान गृहखात्याला बंदीच्या कारवाईयोग्य वाटत होते, ते फेसबुकनेच आदल्या दिवशी (मे २१) काढून टाकले होते. आम्हांस हे कसे ठाऊक? कारण आम्ही आदल्याच दिवशी (मे २०) तेथे जाऊन मुहम्मदाची चित्रविचित्र चित्रे चवीचवीने पाहिली होती, पण दुसर्या दिवशी काही मित्रांस पाठवू जाता ती गायब झालेली दिसली.
- बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रिया या एका चुकीच्या गृहितकावर आधारित होत्या. ते गृहितक म्हणजे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र सरकार अख्ख्या फेसबुकावरच बंदी आणणार. असे त्या बातमीत कुठे म्हटलेले आम्हाला आढळले नाही. त्यामुळे आंतरजालावर वावरणार्या सुशिक्षित भारतीयांचा मूर्खपणा/भयगंड कसा पराचा कावळा करतो, ते पुन्हा एकदा दिसले.
- काही प्रतिक्रियांमध्ये या विषयाच्या मिषाने पुन्हा एकदा हुसेन यांचे (अर्थात जळजळीत) उल्लेख सापडले. त्यामुळे हुसेनचे भूत भारतीयांवरून काही केल्या उतरत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले.
एकंदरीत, इतरांच्या (विशेषतः आपल्याच देशबांधवांच्या) मूर्खपणामुळे आपले रंजन होते याचा आनंद मानावा, की दु:ख हे आमचे अजून ठरत नाही. आपणांस काय वाटते?
प्रतिक्रिया
26 May 2010 - 4:52 pm | युयुत्सु
जातीवंत बिनडोकपणाचा हा अजोड नमुना आहे. आमच्या कन्या रत्नाची आता समजूत कशी काढायची हा आम्हाला प्रश्न पडला आहे.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.जअतज
26 May 2010 - 5:50 pm | धमाल मुलगा
२० तारखेला लॉगिन करुन पहायला हवं होतं राव. गेलाच का चानस?
>>त्यामुळे हुसेनचे भूत भारतीयांवरून काही केल्या उतरत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले.
:) चालायचंच!
इतर, विशेषतः हिंदूधार्मिकांच्या भावना / श्रध्दा जिथे आहेत त्यांना विकृतरित्या नग्नतेमध्ये रेखाटण्याचा मुद्दाम केलेला उद्दामपणा आणि कायदेशीर कारवाईच्या भितीने देश सोडुन पळालेल्या त्या विकृत इसमाला 'समुहाची स्मरणशक्ती फार कमी असते' अशी भावना निदान अजुनतरी न बाळगता अजुनही लोक शाब्दिक का होईना फटकारताहेत ह्याचं थोडं बरंच वाटलं.
असो,
बाकी, मटामध्ये आलेल्या संध्यानंद छापाच्या बातम्यांनीही हल्लकल्लोळ माजलेला पाहिला आहेच की आपण. त्यात ही एक आणखी भर. :)
आणि काय त्या फेसबुकाला मोठं सोनं लागलंय होय? च्यायला..काही वर्षांपुर्वी मित्र विचारायचे "येड्या, ऑर्कुटवर नाहीस अजुन?" इतकं ते भिनलं होतं. आज काय आहे? ऑर्कुटच्या जागी फेसबुकाचं नाव आलं.... ते बंद केलं तर मायस्पेस येईल..टॅग्ड येईल, Hi5 आहेच....
जास्ती टेन्शन नाय लेनेका बंधु. जाऊ द्या हो, कुठं लै विचार करत बसायचं?
26 May 2010 - 7:07 pm | आनंदयात्री
+१
हेच म्हणतो.
फेसबुकाला काय मोठे सोने लागुन गेलेय .. असले तर राहिल नाय तर गेले उडत !
26 May 2010 - 5:57 pm | तिमा
ती चित्रे पहायला फेसबुकच कशाला पाहिजे ? जालावर ती सगळीकडे उपलब्ध आहेत. कंटाळा येईल इतकी!!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
26 May 2010 - 6:06 pm | llपुण्याचे पेशवेll
नाही हो.. आम्हाला ती चित्रे कुठेच पहायला मिळाली नाहीत. मागे ज्यावरून दंगल झाली होती ती चित्रे देखील कुठे पहायला मिळाली नाहीत. :(
नक्की असं भावना दुखावण्यासारखं काढलं तरी काय होतें बघायचे होते मला.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
26 May 2010 - 6:23 pm | धमाल मुलगा
असं म्हणु नका..शंकाही घेऊ नका.
त्यांच्या दुखावतात त्या भावना, हुसेन काढेल ती कला.
नीट लक्षात घ्या. पुन्हा असा गुन्हा करु नका.
26 May 2010 - 6:31 pm | चिंतातुर जंतू
मूळची डॅनिश व्यंगचित्रे इथे पाहावयास मिळतील. त्यांचे इंग्रजीतील वर्णन इथे पाहावयास मिळेल.
पूर्वअटः नंतर आम्ही जी हिंदू देवतांची (किंवा शिवाजीची, किंवा पेशव्यांची) चित्रे दाखवणार आहोत, त्यांनी आपल्या भावना दुखवून घ्यायच्या नाहीत हं!
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
27 May 2010 - 9:04 am | llपुण्याचे पेशवेll
पूर्वअटः नंतर आम्ही जी हिंदू देवतांची (किंवा शिवाजीची, किंवा पेशव्यांची) चित्रे दाखवणार आहोत, त्यांनी आपल्या भावना दुखवून घ्यायच्या नाहीत हं!
भावना दुखावण्यासारख्या असतील तर दुखतील जरूर. :) त्याची हमी आम्ही देणार नाही. शेवटी आपला तो बाळ्या आणि दुसर्याचं ते कार्ट ही निती गोर्या साहेबाकडून आम्हीही शिकलो आहोत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
26 May 2010 - 6:14 pm | चिंतातुर जंतू
हवे तेच चित्र पुन्हा शोधायला फार कष्ट पडतात हो. उदा. आम्हाला हे चित्र हवे होते. ते गूगलवर सातव्या की आठव्या पानावर आले:
सकाळी सकाळी जेव्हा धर्म भ्रष्ट होतो हे चित्र येथे आहे.
वि.सू. ह. घ्या. आणि संपादित करू नका, ही विनंती.
संपादकीय नोंद : मूळ प्रतिसादातल्या चित्राचे रूपांतर दुव्यात करण्यात आलेले आहे.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
26 May 2010 - 7:15 pm | आनंदयात्री
संपादकांनी या प्रतिसादावर तसेच इतर लिंक्सवर शक्य असल्यास योग्य ती कारवाई करावी ही विनंती.
-
आंद्या शेक्युलार
27 May 2010 - 12:30 am | मदनबाण
आंद्याशी सहमत...
चित्र सीता मातेचे असो वा प्रेशिताचे असो... भावना कोणाच्याही दुखावु नयेत.
चित्र वाद टाळण्यासाठी इथुन लवकरात लवकर काढुन टाकावे.
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
27 May 2010 - 8:11 am | II विकास II
जोपर्यंत कोणत्याही चित्राबद्दल तटस्थेने चर्चा करत आहोत तोपर्यंत चित्र काढुन टाकायची गरज नाही. लज्जागौरीचे चित्रही आक्षेपार्ह नव्हते आणि त्याला पार्श्वभुमीही होती.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
28 May 2010 - 6:49 am | टारझन
पार्श्वभुमी नव्हती असं कोण म्हणालं ? इनफॅक्ट ते चित्रंच पुर्ण पार्श्वभुमी दाखवणारं होतं .. :) तरीही आक्षेपार्ह नाही म्हणता ?
असो ...
ज्या दिवशी लज्जागौरीची पार्ष्वभुमी न पाहाता, पब्लिक तिचा चेहरा पाहिल तो दिवस म्हणजे आंबटशौकिणांचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
29 May 2010 - 8:10 pm | II विकास II
श्री टारझन, माझा प्रतिसाद पुन्हा नीट वाचावा, ही विनंती.
>>लज्जागौरीचे चित्रही आक्षेपार्ह नव्हते आणि त्याला पार्श्वभुमीही होती.
29 May 2010 - 10:48 pm | टारझन
श्री ||विकास|| ,
आपल्या विणंतीस माण देऊन , आपला प्रतिसाद जो इसवी सन २७ मे २०१० रोजी सकाळी ८:११ वाजता आपला शुभहस्ते मिसळपाव ह्या संस्थळावर , चिंतातुरजंतु लिखीत "महाराष्ट्रात फेसबुकवर बंदी?" ह्या काथ्याकुटपर लेखात छापुन आला आहे ,
तो मी "टारझन" , "२९ मे २०१० रोजी रात्रौ १०:५० च्या शुभमुहुर्तावर वाचेन , असे येथे नमुद करतो .
धन्यवाद .
आपला विनंतीपालक,
श्री. टारानंद गोमषास्त्री.
26 May 2010 - 6:00 pm | इंटरनेटस्नेही
फेसबुक या सर्वगुणसंप्पन बेबसाईट वर बंदी आणायचा मूर्खपणा आपले शासन कदापि करणार नाही अशी अशा वाटते.
फेस बुक चा विजय असो!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
26 May 2010 - 6:10 pm | आवशीचो घोव्
फोटो टाकल्या तर लगेच भावना दुखावल्या का? वाईट फोटो टाकले असतील तर काढलेच पाहिजेत. पण मुंबईच्याच मुस्लिमांना एवढा पुळका का आला? फेसबूक तर जगभर दिसते ना. महाराष्ट्र शासन त्याला काय करणार? फेसबूकचे सर्वर पोसायला लागणारा खर्च महाराष्ट्र शासन देते काय? फेसबूक वरचे पान बंद करायला ही पत्रापत्री. आणि अफझल गुरुच्या फाशी साठी लागणारी पत्रं वेळेवर मिळत नाहीत शिलाबाईंना. भारतीय डाक पत्रं फोडून वाचतं वाटते.
26 May 2010 - 6:26 pm | धमाल मुलगा
काय मुद्द्याचं बोललात द्येवा!
अग्गदी सहमत.
26 May 2010 - 9:14 pm | मुक्तसुनीत
रोचक धागा. विषय (अर्थातच) संवेदनशील आहे. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या श्रद्धा/विश्वास/मूल्यांवर अवलंबून.
काही डिस्क्लेमर्स : मी स्वतःला निरीश्वरवादी मानतो. माझा जन्म एक हिंदू म्हणून झाला या न्यायाने माझा धर्म हिंदू आहे. या अर्थाने हिंदू ही माझी आयडेंटीटी आहे. या खेरीज मी मला या धर्माचा पाईक , अभिमानी , प्रचारक मानत नाही.
मुख्य प्रतिसाद :
मुहम्मदाच्या चित्राची स्पर्धा या सारख्या गोष्टी करण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असायला हवे याला मला तात्विक मान्यता आहे. परंतु , असे करणे खोडसाळपणाचे आहे असेही मला वाटते. "मुहम्मदाच्या चित्राची स्पर्धा" हा प्रकार अप्रकाशित केल्यामुळे कुणाची मुस्कटदाबी होते, कुणाच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते असे धरले तर , खोडसाळपणा करण्याच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होते असे असे मला वाटते. थोडक्यात , एकंदर मूल्यव्यवस्था, स्वातंत्र्य, जबाबदार्या , सुव्यवस्था या सगळ्या गुंतागुंतीच्या संदर्भात "खोडसाळपणाचे स्वातंत्र्य" जर अन्य महत्त्वाच्या गोष्टींच्या आड येत असेल किंवा त्यांना धक्का लावत असेल तर त्याचा लोप करण्यास हरकत नाही असे मला वाटते. थोडक्यात ,
१. वेगवेगळ्या हक्कांमधे उतरंड आहे हे मला या घडीला स्वीकारावे लागते.
२. माझी वैयक्तिक मूल्यव्यवस्था ही उतरंड योजताना मी वापरतो.
३. या उतरंडीमधे मी ज्याला 'खोडसाळपणाचे स्वातंत्र्य' हे लेबल लावतो ते फारच खाली आहे आहे आणि ते सरळसरळ उतरंडीतील इतर
महत्त्वाच्या गोष्टींना विघातक आहे असे मला वाटल्याने त्याचा लोप व्हायला हरकत नाही असे वाटते.
26 May 2010 - 9:54 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
उत्तम प्रतिसाद.
नितिन थत्ते
27 May 2010 - 12:13 am | चिंतातुर जंतू
यावर आमचे एक प्रिय लेखक मिलन कुंदेरा (मूळचे चेक, आता फ्रेंच नागरिक) यांनी आपल्या 'दि अनबेअरेबल लाईटनेस ऑफ बीईंग' या कादंबरीत फार उत्कृष्ट भाष्य केलेले आहे. ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे, पण त्याचा किंचित गोषवारा इथे दिल्याशिवाय राहवत नाही. 'किच्' या संकल्पनेच्या अनुषंगाने ते काहीसा असा विचार मांडतात: मानवी अस्तित्वामध्ये अनेक गोष्टी या विविध कारणांपोटी रुचिहीन वा अप्रिय मानल्या जातात. शक्यतो अशा गोष्टींना दूर ढकलणे किंवा त्यांचे अस्तित्व नाकारण्याकडे समाजांचा कल असतो. विविध समाजांत अर्थातच वेगवेगळ्या गोष्टी या वर्गात मोडतात, पण त्यांचा एक समान गुणधर्म म्हणजे त्यांवर हृदयांची एकाधिकारशाही असते; एकदा हृदयाने एखादी गोष्ट रुचिहीन (वा रुचिपूर्ण) मानली की मेंदूला त्यावर आक्षेप घेणेच रुचिहीन वा असभ्य वाटू लागते. विश्वबंधुत्व वा तत्सम गोड भासणार्या कल्पनांच्या नावाखाली एका विशाल जनसमूहाला एकत्र आणण्यासाठी या 'हृदयांच्या एकाधिकारशाहीचा' राजकीय वापर केला जातो. अशा परिस्थितीत या विशाल समूहापासून वेगळी दिसणारी प्रत्येक कृती वा व्यक्ती ही त्या हृदयांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधातली आणि म्हणून धोकादायक मानली जाते. प्रत्येक शंका व प्रत्येक खोड ही मूलतःच अशा (कोणत्या ना कोणत्या) बहुजनवादी एकाधिकारशाहीच्या विरोधात असते. त्यामुळे अशा समाजांत सर्वप्रथम शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे यांवर बंधने येतात. यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात रुचिहीनता वाढते (लेखक 'शिट' असाच शब्द वापरतो), पण अशा समाजाच्या आविष्कारात मात्र वरवर पाहाता तिचा अभाव असावा, असे वाटते. (लेखक सोव्हिएट चित्रपटांतली निरागसता आणि प्रत्यक्षातले त्यावेळचे देशातले भयाण वास्तव यांचे उदाहरण देतो). थोडक्यात, शंका उपस्थित करणे, खोडसाळपणा करणे आणि त्याद्वारे या 'हृदयांच्या एकाधिकारशाही'स प्रतिकार करणे, हे कोणत्याही समाजाच्या निरोगीपणाचे लक्षण आहे; त्यास नाकारण्याने वास्तव अधिक सुसह्य न होता अधिक भयाण होऊ लागते.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
27 May 2010 - 6:49 am | मुक्तसुनीत
कुंदेरांच्या म्याग्नम ओपस बद्दलचे विवेचन मार्मिक. अनेक धन्यवाद.
मात्र या विवेचनाचा फलक्रम म्हणून वापर केलेला नाही ना ? अशी शंका मला चाटून गेली. "शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे" या दोन्ही गोष्टींची मोट एकत्र बांधणे म्हणजे दरवडेखोर आणि सत्याग्रही एकाच वेळी एकाच तुरुंगात आहेत म्हणून त्यांना एकाच मापात मोजण्याचा प्रकार झाला. विद्रोह (dissent) , "Question everything , believe nothing" , मूर्तिभंजन, समूहापेक्षा वेगळा आवाज , अल्पसंख्यांकांना वाटणारी सुरक्षितता हे सगळे आवश्यकच आहे. मात्र या सार्या उदारमतवादी मूल्यांबरोबर "खोडसाळपणा" , प्रोव्होकेटीव्ह गोष्टींना स्मगल करणे ही एकतर गल्लत तरी आहे किंवा अतिचतुर धोरण तरी. आणि दोन्ही अर्थातच त्याज्य.
आज मुहम्मदाच्या व्यंगचित्रांना "कलात्मक स्वातंत्र्य" या नावाखाली आपण चालवून घेऊ. उद्या हिंदू देवतांच्या नग्न अवताराला. या न्यायाने परफॉर्मिंग आर्ट च्या स्वातंत्र्याखातर मला मशीदीत डुकरांची सर्कस करण्याची परवानगी हवी. स्वतंत्र देशाच्या सार्वजनिक मलमत्तेच्या इंचाइंचावर अधिकार गाजवायला पुरुषाला बायकांच्या डब्यात , बायकांच्या प्रसाधनगृहात केव्हाही जाता यायला हवे. सार्वजनिक ठिकाणच्या अश्लीलतेचे , शुचितेचे नियम नावाचा प्रकार घटनेतून काढून टाकायला हवा. हे सर्व आपण समाजात राहाताना काहीएक नियम का पाळतो ? या गोष्टीपर्यंत सहज नेऊन ठेवता येईल.
म्हणजे मग तुम्हाला आचारसंहिता मान्य करावी लागते ना ? ठीक. सद्यस्थितीतल्या जगात (माझ्या मताप्रमाणे जगातल्या कुठल्याही ठिकाणी ) संवेदनशील गोष्टींबद्दल आचारसंहिता ही असतेच. यात युरप खंडामधली सर्वात जास्त उदारमतवादी राष्ट्रेही आलीच.
27 May 2010 - 8:25 am | पंगा
"फलक्रम" हा शब्द पहिल्या नजरेस संस्कृतोद्भव वाटल्याने बराच वेळ काहीही अर्थबोध झाला नाही. नंतर गोम लक्षात आली.
असा गोंधळ टाळण्यासाठी हा शब्द "फल्क्रम" असा लिहिता येईल काय? किंवा, याच अर्थीचा "टेकू" असा एक शब्द मराठीत आहे असे वाटते, त्याचाही विचार व्हावा.
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
27 May 2010 - 8:29 am | मुक्तसुनीत
आजचा गृहपाठ : ;-) (ह घ्या)
म्याग्नम ओपस आणि अन्य अन्यभाषिक शब्दांची सुचवणीसुद्धा आवडेल.
27 May 2010 - 8:35 am | पंगा
की "शंका उपस्थित करणे व खोडसाळपणा करणे" याकरिता शिक्षा? ;-)
(मराठी शिक्षा. हिंदी शिक्षा नव्हे.)
- पंडित गागाभट्ट.
27 May 2010 - 1:24 am | Pain
हुसेन करतो ते चालत का ?
उनक खून खून और हमारा खून पानी ?
आणि करावे तसे भरावे...
त्यांनी हिन्दू देवतांची चित्रे काढली आता लोक त्यांच्या देवाची काढत आहेत...(चित्रे)
27 May 2010 - 6:51 am | मुक्तसुनीत
पेन साहेब, यू आर बार्कींग अॅट द राँग ट्री. चूभूद्याघ्या.
27 May 2010 - 8:01 am | Nile
ही मिसेस द ट्री मोअर ऑफन दॅन नॉट! ;)
-Nile
27 May 2010 - 8:19 am | पंगा
बरोबर वाक्प्रचार "टू बार्क अप द राँग ट्री" असा आहे.
"अप". "अॅट" नव्हे.
धन्यवाद.
- पंडित गागाभट्ट.
27 May 2010 - 8:21 am | मुक्तसुनीत
धन्यवाद.
म्हणूनच चूभूद्याघ्या. म्हण्टले होते म्हणा ना ! ;-)
27 May 2010 - 8:30 am | पंगा
नजरचुकीने ते न पाहणेची भूल झाली.
चूभूद्याघ्या.
- पंडित गागाभट्ट.
28 May 2010 - 1:32 am | मिसळभोक्ता
पेन साहेबांना "यू आर पिसिंग ऑन द राँग हायड्रंट" म्हणायला हवे.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
28 May 2010 - 2:07 am | पंगा
'हायड्रंट' म्हणवले जाणार्यांची काही हरकत नसेल तर आमचे काही म्हणणे नाही.
- पंडित गागाभट्ट.
26 May 2010 - 10:40 pm | शिल्पा ब
इतके काय आक्षेप घेण्यासारखे आहे त्या चित्रात? आणि समजा होतं तर मग नग्न देव देवतांच्या चित्राबद्दल सरकारचं काय म्हणणं होतं? तेव्हा का नाही काही कारवाई केली? मुस्लीम धर्माधांना भिऊन जरा काही खुट्ट झाले कि शेपूट घालायची....हिंदू आणि त्यांच्या भावना गेल्या खड्ड्यात...नाहीतरी मुस्लीम vote bank हिंदूंपेक्षा कितीतरी जास्त आहे आणि वाढतच आहे...आणि तेच तर महत्वाचे आहे...नाही का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
26 May 2010 - 11:33 pm | फटू
काय फरक पडतो फेसबुकच्या राहण्यानं किंवा न राहण्यानं?
खुप पूर्वी दुरावलेल्या, वाढत्या वयाबरोबर कामानिमित्त, शिक्षणानिमित्त दूर गेलेल्या मित्रांना पुन्हा एकदा संपर्कात आणण्याचे काम ही सामाजिक संस्थळे करत असतीलही. परंतू एकदा का तो हेतू साध्य झाला की मग त्या संस्थळाचा उपयोग "हाय, हेल्लो, हाऊ आर यू" असल्या निरर्थक संदेशांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम एव्ह्ढाच उरतो.
काहींना तर आपल्या प्रोफाईलमधला भला मोठा मित्रांचा आकडा मोठं भुषण वाटतो. त्यातला किती मित्रांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असतात? प्रत्यक्ष भेटणं सोडा, ते कदाचित शक्य नसेलही. परंतू यातला किती जणांशी आपण फोनवर बोलतो?
कारण जो प्रत्यक्ष भेटावा, निदान ज्याच्याशी फोनवर बोलावे इतपत आपल्या जवळचा आहे तो आपल्या ओरकुट किंवा फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये असण्याची गरज नसते. किंबहूना तो बरेचवेळा नसतोच.
ओरकुटसारख्या संस्थळांवर तर तरुणाईमध्ये "मी तुला टेस्टीमोनियल टाक, मी तुला टेस्टीमोनियल टाकतो" असला प्रकार चालतो. कशासाठी तर जगाला दाखवण्यासाठी की पाहा, लोक माझ्याबद्दल कसे चांगलं चांगलं लिहितात.
माझ्या हापिसात तर असे नमुने आहेत की साला दिवसभर एकाच क्युबमध्ये माझ्या पाठीला पाठ लावून बसतात, पण कधी कधी अगदी एका अक्षराने बोलत नाहीत. पण घरी गेल्यावर ओरकुटवर "हाय, हेल्लो, हाऊ आर यू" असले स्क्रॅप मात्र जरुर टाकतात.
माझ्या मते या अशा सामाजिक संस्थळांकडे चार घटकेचा विरंगुळा म्हणूनच पाहावे. फार सिरियसली घेण्यात काही अर्थ नाही.
- फटू
26 May 2010 - 11:38 pm | मुक्तसुनीत
प्रस्तुत धागा हा फेसबुक-ऑर्कुटादि सोशल मिडीया/ सोशल नेटवर्कींग साईट्सची उपयुक्तता/आवश्यकता/महत्त्व या मुद्द्यांना प्राधान्य देऊन चर्चा घडवून आणण्याचा नसावा असे माझे मत आहे.
(अर्थात म्हणून कुणी त्या अनुषंगाने बोलूच नये असे मी म्हणत नाही. )
26 May 2010 - 11:47 pm | फटू
उपयुक्तता या मुद्दयाचा आधार केवळ सोशल मिडीयाला फारसं गंभीरपणे घेऊ नये हे मत व्यक्त करण्यासाठी घेतला होता. आणि हे मत मुळ चर्चेच्या अनुषंगाने आहे असं मला तरी वाटतं :)
- फटू
27 May 2010 - 8:13 am | II विकास II
ओरकुटसारख्या संस्थळांवर तर तरुणाईमध्ये "मी तुला टेस्टीमोनियल टाक, मी तुला टेस्टीमोनियल टाकतो" असला प्रकार चालतो. कशासाठी तर जगाला दाखवण्यासाठी की पाहा, लोक माझ्याबद्दल कसे चांगलं चांगलं लिहितात.
मी हाच प्रकार लिंक-इन मध्ये ही बघितला आहे.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
27 May 2010 - 11:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतर १: मुसु आणि जंतू यांचे प्रतिसाद आवडले. प्रत्यक्षात आणि संस्थळांवरही वादविवाद जरूर व्हावेत आणि ते अशा प्रकारचे व्हावेत असं अगदी मनापासून वाटलं.
महाराष्ट्र सरकारने बंदी घालण्यासाठी काही करावं हे काही अंशी योग्य वाटतं पण म्हणून फक्त महाराष्ट्रापुरती बंदी घालणं अतिशय हास्यास्पद आहे.
अवांतर २: एका मुसलमान धर्मीय चित्रकाराने हिंदू देवतांची अभिरूचीशून्य चित्रं काढली म्हणून आम्ही काही हिंदू असेच प्रकार करून इतर सर्व मुसलमानांच्या भावना दुखावणार हे म्हणजे पायाला जखम झाली म्हणून माणसाला मारून टाकण्यातला प्रकार वाटतो.
अवांतर ३: फेसबुक आणि ऑर्कुट या दोन्ही गोष्टी मलाही निरुपयोगी वाटतात. उपायः आपण त्याकडे दुर्लक्ष करणे!
अदिती
27 May 2010 - 11:48 am | नितिन थत्ते
>>एका मुसलमान धर्मीय चित्रकाराने हिंदू देवतांची अभिरूचीशून्य चित्रं काढली म्हणून आम्ही काही हिंदू असेच प्रकार करून इतर सर्व मुसलमानांच्या भावना दुखावणार
:). तसे नाही. शिवाजीने अफझलखानाला ३०० वर्षांपूर्वी मारले म्हणून आज एका खान नावाच्या माणसाने भोसले नावाच्या माणसाचा खून करण्यासारखे आहे.
नितिन थत्ते
27 May 2010 - 11:51 am | चिंतातुर जंतू
आपण ज्यांना गल्लत वा अतिचतुर धोरण म्हणून त्याज्य मानता आहात, त्या गोष्टींची मोट बांधणे हे कसे त्याज्य नाही, ते दाखवण्यासाठी दस्तुरखुद्द मध्य-पूर्वेतच एक सुप्रसिध्द उदाहरण आहे, ते म्हणजे मुल्ला नसरुद्दीन यांचे. एक मासला पाहा:
मुल्लाकडे एक शेजारी आला. त्याला काही सामान वाहून नेण्यासाठी मुल्लाचे गाढव हवे होते. मुल्ला म्हणाला 'माझे गाढव मी आज दुसर्या कुणाला तरी आधीच दिले आहे'. त्याच वेळी त्याचे गाढव ओरडताना ऐकू आले. शेजारी म्हणाला 'पण आपले गाढव तर आत ओरडते आहे!' मुल्ला म्हणाला 'काय? म्हणजे तुमचा मुल्लापेक्षाही गाढवावर जास्त विश्वास आहे तर!'
आता, ही गोष्ट सांगणे म्हणजे एकंदरीत मुल्लामौलवींविषयी निंदानालस्ती करण्याचा खोडसाळपणा करणे नव्हे का? कारण यातील मुल्ला खोटे बोलतो, व त्याला आव्हान मिळताच वर आपले मुल्लापण वापरून समोरच्यास गप्प बसवितो. मात्र, यात अंतर्भूत टीका काय आहे, ते लक्षात घ्या. वैज्ञानिक/तार्किक कसोटीवर एखादी गोष्ट सिध्द करण्यासाठी वापरता येईल, असा पुरावा दुर्लक्षून मुल्लामौलवींचे सांगणे अंधपणे ऐकण्यात काय धोका असतो, हे या प्रसंगातून दिसते. पण याला निव्वळ खोडसाळपणा मानून त्याज्य मानले, तर रंजनातून प्रबोधन करण्याचे एक प्रभावी अस्त्र समाज गमावून बसतो. आज अनेक समाज विविध कारणांसाठी हा हक्क गमावून बसत आहेत. सुशिक्षित, समंजस समाजाने तरी हा धोका ओळखला पाहिजे, असे आमचे मत आहे.
आम्ही पूर्वी एका धाग्यावर 'द राईट टु जोक' या निबंधाचा दुवा दिला होता. त्यात या विषयीचे अधिक सखोल विवेचन वाचता येईल, म्हणून तोच दुवा इथे पुन्हा देत आहे.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
27 May 2010 - 12:01 pm | Nile
किस्सा आवडला.
कुठपर्यंत खोडी काढलेली चालेल ही रेखा ठरवणे कठिण आहे खरे. पण कुणाच्याही बोलण्याने/वागण्याने/विचाराने समाजावर/समाजघटकावर निर्बंध न घालण्याइतपत समाज "प्रगत" व्हावा असे वाटते.
-Nile
27 May 2010 - 11:56 pm | चिंतातुर जंतू
इथे पाश्चिमात्य देश आणि भारत यांच्यात थोडी तुलना केल्याने कदाचित थोडी स्पष्टता येईल.
उदा: राष्ट्रध्वज वा राष्ट्रगीताचा अवमान केल्यास तो भारतात सरसकट गुन्हा ठरतो (यास अपवाद आहेत का?). फ्रान्सच्या कायद्यानुसार सार्वजनिक सरकारी सोहळ्यांत वा खेळाच्या मैदानात केलेला अवमान गुन्हा ठरतो, पण कलाकृतींना यातून सूट आहे. सरकारला सार्वजनिकरीत्या विरोध करण्याच्या मोर्चासारख्या पारंपरिक ठिकाणीही संयोजन सरकारचे नसल्यास अवमान करण्यास गुन्हा मानत नाहीत. सरकार अवमान करू शकत नाही, पण सरकारला विरोध करताना अवमान करण्यास वाव आहे, हे येथे महत्त्वाचे तत्त्व आहे.
भारतात चित्रपट किंवा नाटकांस सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र लागते. ते देण्यासाठी बोर्ड कलाकृतीत काटछाट सुचवू शकते. अनेक पाश्चिमात्य देशांत प्रमाणपत्र हे निव्वळ एक सल्ला देऊ शकते (१२ वर्षांच्या खालील मुलास प्रवेश नाही, वगैरे), पण काटछाटीचा हक्क त्यास नाही. विशिष्ट वयाच्या मर्यादेपलीकडे (उदा. १६ वर्षे) तुम्हांस कलाकृती पाहाण्यास कायद्याने प्रतिबंध करण्याचा हक्क सरकारकडे नाही. यामागे अंतर्भूत तत्त्व हे आहे की, विशिष्ट वयोमर्यादेपलीकडे आपल्या भावना न दुखवून घेण्याची जबाबदारी व्यक्तीकडे आहे, समष्टीकडे नाही.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
28 May 2010 - 7:07 am | Nile
पाश्चिमात्य जनता खरच प्रगत आहे(अंधविश्वास किंवा देवभोळे असलेले लोक परिचित आहेत) की उदासीन आहे हे मला माहित नाही(तेच लोक मात्र येशु/धर्मावर केल्या जाण्यार्या विनोद-व्यंगावर दिलखुलास हसतात हे ही पाहिले आहे). पण जर तुम्ही म्हणता तसे कायद्यात अशी सुट असेल तर मात्र हे चांगलेच, अशाने ह्यावर राजकारण करण्यार्यांची पोळी भाजायला फारशी मदत होणार नाही म्हणून.
-Nile
28 May 2010 - 12:13 am | मुक्तसुनीत
आपण ज्यांना गल्लत वा अतिचतुर धोरण म्हणून त्याज्य मानता आहात, त्या गोष्टींची मोट बांधणे हे कसे त्याज्य नाही, ते दाखवण्यासाठी दस्तुरखुद्द मध्य-पूर्वेतच एक सुप्रसिध्द उदाहरण आहे, ते म्हणजे मुल्ला नसरुद्दीन यांचे. एक मासला पाहा: ...
मुल्ला नसरुद्दीनचा किस्सा रोचक आहे. यामध्ये विनोद आहेच. परंतु प्रस्तुत संदर्भात तो कितपत रेलेव्हंट आहे याबद्दल मला शंका आहे.
विनोद, व्यंग, त्याचे विविध प्रकार शैली आणि खोडसाळपणा या माझ्या दृष्टीने दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत.
तुमच्याच किश्शाच्या संदर्भात सांगतो : "कहां मयखानेका दरवाजा़ गा़लिब और कहां वाईज़ , बस इतना जानते हैं , कल वो जाता था के हम निकले " या आणि अशा सारख्या असंख्य ओळी , किस्से या सार्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. यामधे मुस्लिम धर्मातला पाखंडीपणा इत्यादि गोष्टींवर टीका आहे.
मात्र, या सारख्या व्यंगाने दंगली होत नाहीत ( हे तुम्हालाही माहीत आहे.). लोक रस्त्यावर येऊन खासगी नि सार्वजनिक मालमत्ता जाळत नाहीत. निरपराधांचे जीव जात नाहीत. नग्न देवतांच्या चित्रांनी , त्यातल्या सीता-हनुमानाच्या चित्रिकरणाने , पैगंबराच्या व्यंगचित्रांनी हे होते. असे असेल तर, शासनव्यवस्था त्यावर बंदी आणत असेल तर मला हे मान्य आहे. या गोष्टी मुदलात रंजन करतात असे धरले तर "रंजनातून" कुठल्या "प्रबोधनाचे" व्याज यातून मिळाते हे समजायला माझी सौंदर्यदृष्टी , कलात्मक दृष्टी कमी पडते हे मान्य करायला मी येथे तयार आहे.
28 May 2010 - 12:49 am | चिंतातुर जंतू
एका प्रतिसादात वर मी दिलेले व्यंगचित्र उदाहरणार्थ घेतल्यास त्यात असे आहे, की रोज सकाळी दंतमार्जन करणारा मुहम्मद आरशात स्वतःला न्याहाळतो, व 'ब्लास्फेमी' असे चित्कारतो. प्रेषिताची प्रतिमा न काढण्यामागचा मूळ हेतू मूर्तिपूजा होऊ नये, हा होता. ज्यांना मूर्तिपूजा करायचीच असते, ते काबाची चित्रे, कुराणातल्या सुरा इथपासून ते ९/११ चे ट्विन टॉवर वा ओसामा बिन लादेनचे चित्र इथपर्यंत कशाचीही प्रतिमा समोर ठेवतात. मग स्वतःचीच प्रतिमा नको, असे म्हणणारा मुहम्मद रोज सकाळी आपलाच धर्म भ्रष्ट करतो का? जर तसे नसेल (कारण मुहम्मद आपला धर्म भ्रष्ट करत नाही, हे उघड आहे!), आणि जर इतर सर्व प्रतिमा विविध मिषाने वापरल्या जातच असतील, तर मग आता फक्त मुहम्मदच नको, या म्हणण्याला फारसा अर्थ नाही; विशेषतः प्रतिमांनी भळभळणार्या आजच्या जगात तर नाहीच नाही. असे तार्किक विवेचन मांडण्यासाठीही जर मुहम्मदाची वापरलेली उपरनिर्देशित (रंजक, खोडसाळ) प्रतिमा त्याज्य ठरत असेल, तर मुल्लाचा वरील किस्साही तसाच आहे.
कुंदेराचा मूळ मुद्दाही असाच आहे. एकदा सारासार विचार न करता कडक नियम (नियमासाठीच) पाळायचे म्हटले, की 'शिट'ला प्रातिनिधित्व नाही म्हणजे नाही. मग जे निर्माण होते, ते किच्. "Kitsch is the inability to admit that shit exists"
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
28 May 2010 - 11:52 pm | चिंतातुर जंतू
एक गंमत सांगायची राहिलीच. प्रत्यक्ष कुराणात मुहम्मदाच्या प्रतिमेला प्रतिबंध नाही. काही हदीथमध्ये (मौखिक परंपरेतून आलेले नियम) असलेला काही मजकूर इश्वराच्या निर्मितीच्या सदृश काही निर्माण करण्यापेक्षा एक गव्हाचा दाणा निर्माण करून दाखवा, वगैरे म्हणतात (क्रेग व्हेण्टरचे प्रयास पाहता, हे ही लवकरच शक्य व्हावे). त्यातही प्रत्यक्ष मुहम्मदाच्या प्रतिमेचा उल्लेख नाही. अधिक माहिती इथे मिळेल.
पर्शिअन वा तुर्की परंपरेत मुहम्मदाचे चित्र काढले जात असे. अशी अनेक चित्रे पूर्वी संग्रहालयांत वा ग्रंथालयांत पाहावयास मिळत. (मी पाहिलेली आहेत.) आजही, अगदी भारतातील काही प्रतिष्ठित मुस्लिम विद्यापीठांच्या ग्रंथालयांत, ती सामान्यजनांपासून लपवून, पण संग्रहित आहेत आणि अभ्यासकांस (थोडे कष्ट घेतल्यास) पाहावयास मिळतात. काही खानदानी मुस्लिमांच्या खाजगी संग्रहातही मुहम्मदाची चित्रे मी पाहिली आहेत. मुहम्मदाचे शाब्दिक वर्णन (तो उंच, गोरा होता; मानेवर रुळणारे केस होते; दाढी होती; डोळे मातकट रंगाचे होते, वगैरे) फोटोफ्रेम करून फोटोप्रमाणेच भिंतीवर टांगण्याचीही पध्दत मी पाहिलेली आहे.
त्यामुळे, हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे मेंदू सभ्यपणा बाळगून गप्प बसण्यापोटी सर्व काही होते आहे, असेच अखेर म्हणून कुंदेराचे पुन्हा एकदा स्मरण करणे योग्य होईल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
8 Jun 2010 - 5:58 pm | वाहीदा
प्रतिसादास सहमत पण मला स्वतःला हजरत युसुफ - Prophet Joseph (Yusuf) चे फोटो पहायला आवडतील कारण त्यांच्या बध्द्ल कुराणात, तौरात मध्ये (ज्यू लोकांचे धार्मिक पुस्तक आहे) , बायबल मध्ये खुप छान वर्णन आहे. (या सर्व वर्णानात कुठेही काहीही तफावत नाही - जे तौरात मध्ये आहे तेच कुराणात अन तेच बायबल मध्ये ही)
Surah Yusuf of the Qur'an is almost entirely about the life of the Prophet ... he was the most handsome man ...and the Most Noble !!
~ वाहीदा
9 Jun 2010 - 10:34 am | चिंतातुर जंतू
ख्रिस्ती धर्मात ख्रिस्तपिता जोसेफच्या अनेक प्रतिमा आढळतात, आणि त्यात तो (अगदी वृध्द असला तरीही) देखणा असतो. इथे काही प्रतिमा पाहाता येतील.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
9 Jun 2010 - 9:22 pm | वाहीदा
ओल्ड टेस्टामेंट मध्ये वर्णिलेले PROPHETयुसुफ (जोसेफ) जे याकूब PROPHET Jacob (YA'QUB) अन Rebecca चे पुत्र होते अन बेनजामिन चे भाऊ ..अतिशय देखणे ,ज्यांच्या प्रेमात अगदी लग्न झालेल्या बायका पण पडायच्या. अन त्या जुलेखा ने तर कहर च केला होता त्यांच्या प्रेमात.
(मी तुम्हाला व्यनी तून लिंक पाठविते त्या कथेची )
~ वाहीदा
10 Jun 2010 - 4:05 pm | चिंतातुर जंतू
या युसुफविषयी माहिती नव्हती. ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद!
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
10 Jun 2010 - 7:19 pm | प्रियाली
यू. एस. सुप्रिम कोर्टात मुहम्मदाची नंगी तलवार घेतलेली कोरलेली प्रतिमा आहे.
मला आठवते त्यानुसार बहुधा ती १९३६ मध्ये कोरली गेली. या सभागृहात छायाचित्रणाची परवानगी नसल्याने माझ्याकडे फोटु नाही. :(
29 May 2010 - 6:13 am | मुक्तसुनीत
प्रस्तावलेखकाने सांगितलेली माहिती, त्या माहितीतले संदर्भ , त्याचे स्वरूप हे सगळे खरेच वाचनीय. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा घेतलेला स्टँड स्पृहणीय.
मात्र "त्यामुळे, हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे मेंदू सभ्यपणा बाळगून गप्प बसण्यापोटी सर्व काही होते आहे" या एकारलेल्या निष्कर्षाशी पुन्हा एकदा असहमत व्हावे लागेल. सर्व प्रकारच्या आविष्काराची मुभा हवी हे विधान एका निर्वात पोकळीमधे - किंवा युटोपियन व्यवस्थेमधे - अगदी आदर्शवत आहे. मात्र आजूबाजूचे वास्तव , त्यात अस्तित्त्वात असलेली व्यवस्था, त्यात असलेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि एकंदर प्रशासनाची असलेली जटिल स्थिती या सर्वांचा विचार इथे होतो असे मला वाटत नाही. अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीमधे, सहज भडका उडेल अशा गोष्टींच्या उच्चारा-आविष्काराच्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजविघातक घटक करू शकतात - नव्हे करताताच. या सार्याचा कुठेही मागमूस या विवेचनात येत नाही.
मी येथे मांडलेल्या मुद्द्यांमधे पुनरुच्चार आहे हे मान्य. मात्र प्रस्तावलेखकाच्या विवेचनातही आहे हे नमूद करून थांबतो.
29 May 2010 - 8:30 am | Dipankar
फेसबुक वर बंदी जुरुर घाला. पण हुसेन ला मग वेगळा न्याय का??
मग त्याच्या वर पण सरकारी कारवाई का नाही?????
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
29 May 2010 - 4:06 pm | चिंतातुर जंतू
यात एक मूलभूत प्रश्न प्रथम उपस्थित करावा लागेल. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही:
व्यापक समाजहितासाठी प्रसंगी जनतेस अप्रिय निर्णय घेण्याची आपल्या सरकारची तयारी असते का? याचे उत्तर आज खेदाने नाही म्हणून द्यावे लागते. एकेकाळी सती वा विधवा विवाह प्रथेवर बंदी घालताना या व्यापक समाज हिताचा विचार असावा, पण शाहबानो (१९८६) वा ताजे राम सेतू प्रकरण अशा प्रसंगी सरकारे बोटचेपी भूमिका घेताना सातत्याने दिसतात. येथे 'आमच्या भावना भडकतात', हे एक प्रभावी शस्त्र झालेले आहे, असे दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रकरणांच्या बाबतीत असेच होताना दिसते. सलमान रश्दी प्रकरण (१९८८) आणि शाहबानो प्रकरण (१९८६) यांमध्ये हे साम्य आहे. या काळात हा बोटचेपेपणा वाढू लागला.
'भावना भडकल्या म्हणून दंगल' ही आता (इतक्या वर्षांच्या बोटचेपेपणापोटी) इतकी चिघळलेली बाब बनली आहे, की कोणती दंगल उत्स्फूर्त आणि कोणती घडवलेली, हेच सांगता येणे कठीण झाले आहे. नुकतीच तेहेलकाने उघड केलेली 'श्रीराम सेने' विषयीची माहिती वा मागच्या वर्षीच्या मिरज दंगलींच्या पूर्वनियोजिततेविषयीची हळूहळू बाहेर आलेली माहिती ही कोणत्याही समंजस माणसास भयावहच वाटावी. या परिस्थितीत कोणत्याही गोष्टीमुळे (निव्वळ अभिव्यक्तीच नाही) दंगल होईल, या भीतीने सरकारने बोटचेपे धोरण स्वीकारणे म्हणजे एक प्रकारच्या दहशतवादास शरण जाणे आहे. परिस्थिती आधीच हाताबाहेर गेलेली आहे, पण केव्हातरी हा बोटचेपेपणा सोडला नाही, तर परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात राहील. हृदयांच्या एकाधिकारशाहीसंदर्भातली भीती ही अशी व्यापक आहे.
यामध्ये आशादायी काहीतरी शोधायचे झाले, तर ते असे:
सरकारे जरी भावनांचे लांगूलचालन आणि बुध्दीचा अवमान करीत असली, तरी न्यायालये मात्र या बाबतीत आपले काम बर्यापैकी चोखपणे करीत आहेत. पूर्वीच्या काळातल्या मर्ढेकर वा तेंडुलकर (बाईंडर, गिधाडे) प्रकरणांत असो, वा अधिक ताज्या शेखर कपूर (बँडिट क्वीन - १९९४) वा खुशबू प्रकरणांत असो, न्यायालयांनी दिलेले निर्णय हे राज्यघटनेच्या चौकटीतच राहून, सारासार विचाराअंती, समंजसपणे दिलेले दिसतात. शाहबानो प्रकरणातही न्यायालयाचा निर्णय समंजसच होता. त्यामुळे अखेर असा विचार मांडून थोडे हलके वाटते की, आपली राज्यघटना व न्यायालये गंभीर अभिव्यक्तीच्या (म्हणजे अगदी गांभीर्याने केलेल्या रंजक खोडसाळपणाच्याही!) पाठीशी उभी राहातील, अशी आशा आहे. मात्र त्या त्या प्रकरणात निर्मिकाने (म्हणजे अभिव्यक्तीच्या लेखकाने) या हृदयांच्या एकाधिकारशाहीविरोधात न्यायाची भीक मात्र मागावी लागेल. म्हणजे अगदी माओवादी घटनाविरोध करण्याची गरज नाही, पण घटनात्मक विरोध मात्र हवा. थोडक्यात, सरकारने बोटचेपेपणा केला, तर व्यक्तीवर येणारी लोकशाही जबाबदारी वाढते. या वाढत्या जबाबदार्या स्वीकारण्यास आपणा सर्वांस शुभेच्छा.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
29 May 2010 - 6:43 pm | मुक्तसुनीत
पूर्ण सहमत आहे.
9 Jun 2010 - 11:11 am | समंजस
पुर्णपणे सहमत!
तुमचे मुद्दे आणि विवेचन दोन्हीही एकदम योग्य!
[दुर्दैवाने :( माझ्या कडे योग्य शब्द नाहीत माझे विचार व्यक्त करायला, त्यामुळे जास्त काही लिहीत नाही :) ]
8 Jun 2010 - 6:11 pm | बिपिन कार्यकर्ते
संपूर्ण चर्चा 'वाचनखुण' म्हणून साठवली आहे. विशेषतः जंतू आणि मुक्तसुनित यांची रंगलेली जुगलबंदी उल्लेखनिय. बर्याच दिवसांनी इतकी सुंदर, संयत आणि समृद्ध करणारी चर्चा वाचायला मिळाली. अशाच अनेक अजून चर्चा वाचायला मिळोत ही मनापासून इच्छा.
बिपिन कार्यकर्ते
9 Jun 2010 - 7:21 pm | मी_ओंकार
हेच म्हणतो.
वाचनखुण साठवल्यागेलेली आहे.
- ओंकार.