Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिंतातुर जंतू on Wed, 05/26/2010 - 14:09
महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याला फेसबुकच्या एका पानावर बंदी आणायची आहे, अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिध्द झाली. ती व तीवरील प्रतिक्रिया वाचून अंमळ करमणूक झाली. कारणः
  • २२ मेच्या बातमीनुसार जे पान गृहखात्याला बंदीच्या कारवाईयोग्य वाटत होते, ते फेसबुकनेच आदल्या दिवशी (मे २१) काढून टाकले होते. आम्हांस हे कसे ठाऊक? कारण आम्ही आदल्याच दिवशी (मे २०) तेथे जाऊन मुहम्मदाची चित्रविचित्र चित्रे चवीचवीने पाहिली होती, पण दुसर्‍या दिवशी काही मित्रांस पाठवू जाता ती गायब झालेली दिसली.
  • बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रिया या एका चुकीच्या गृहितकावर आधारित होत्या. ते गृहितक म्हणजे पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र सरकार अख्ख्या फेसबुकावरच बंदी आणणार. असे त्या बातमीत कुठे म्हटलेले आम्हाला आढळले नाही. त्यामुळे आंतरजालावर वावरणार्‍या सुशिक्षित भारतीयांचा मूर्खपणा/भयगंड कसा पराचा कावळा करतो, ते पुन्हा एकदा दिसले.
  • काही प्रतिक्रियांमध्ये या विषयाच्या मिषाने पुन्हा एकदा हुसेन यांचे (अर्थात जळजळीत) उल्लेख सापडले. त्यामुळे हुसेनचे भूत भारतीयांवरून काही केल्या उतरत नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले.
एकंदरीत, इतरांच्या (विशेषतः आपल्याच देशबांधवांच्या) मूर्खपणामुळे आपले रंजन होते याचा आनंद मानावा, की दु:ख हे आमचे अजून ठरत नाही. आपणांस काय वाटते?
  • Log in or register to post comments
  • 25953 views

प्रतिक्रिया

Submitted by चिंतातुर जंतू on गुरुवार, 06/10/2010 - 16:05

In reply to हे ख्रिस्तपिता जोसेफ नाही हो त्यांच्याही फार आधीचे जोसेफ by वाहीदा

Permalink

धन्यवाद

या युसुफविषयी माहिती नव्हती. ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद! - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 06/10/2010 - 19:19

In reply to मुहम्मदाच्या प्रतिमेची परंपरा by चिंतातुर जंतू

Permalink

यू. एस. सुप्रिम कोर्ट

यू. एस. सुप्रिम कोर्टात मुहम्मदाची नंगी तलवार घेतलेली कोरलेली प्रतिमा आहे. मला आठवते त्यानुसार बहुधा ती १९३६ मध्ये कोरली गेली. या सभागृहात छायाचित्रणाची परवानगी नसल्याने माझ्याकडे फोटु नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 05/29/2010 - 06:13

Permalink

प्रतिसाद

प्रस्तावलेखकाने सांगितलेली माहिती, त्या माहितीतले संदर्भ , त्याचे स्वरूप हे सगळे खरेच वाचनीय. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा घेतलेला स्टँड स्पृहणीय. मात्र "त्यामुळे, हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे मेंदू सभ्यपणा बाळगून गप्प बसण्यापोटी सर्व काही होते आहे" या एकारलेल्या निष्कर्षाशी पुन्हा एकदा असहमत व्हावे लागेल. सर्व प्रकारच्या आविष्काराची मुभा हवी हे विधान एका निर्वात पोकळीमधे - किंवा युटोपियन व्यवस्थेमधे - अगदी आदर्शवत आहे. मात्र आजूबाजूचे वास्तव , त्यात अस्तित्त्वात असलेली व्यवस्था, त्यात असलेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि एकंदर प्रशासनाची असलेली जटिल स्थिती या सर्वांचा विचार इथे होतो असे मला वाटत नाही. अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीमधे, सहज भडका उडेल अशा गोष्टींच्या उच्चारा-आविष्काराच्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजविघातक घटक करू शकतात - नव्हे करताताच. या सार्‍याचा कुठेही मागमूस या विवेचनात येत नाही. मी येथे मांडलेल्या मुद्द्यांमधे पुनरुच्चार आहे हे मान्य. मात्र प्रस्तावलेखकाच्या विवेचनातही आहे हे नमूद करून थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Dipankar on Sat, 05/29/2010 - 08:30

Permalink

फेसबुक वर

फेसबुक वर बंदी जुरुर घाला. पण हुसेन ला मग वेगळा न्याय का?? मग त्याच्या वर पण सरकारी कारवाई का नाही????? आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतातुर जंतू on Sat, 05/29/2010 - 16:06

Permalink

आविष्कार स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव

आजूबाजूचे वास्तव , त्यात अस्तित्त्वात असलेली व्यवस्था, त्यात असलेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आणि एकंदर प्रशासनाची असलेली जटिल स्थिती या सर्वांचा विचार इथे होतो असे मला वाटत नाही. अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीमधे, सहज भडका उडेल अशा गोष्टींच्या उच्चारा-आविष्काराच्या स्वातंत्र्याचा उपयोग समाजविघातक घटक करू शकतात - नव्हे करताताच. या सार्‍याचा कुठेही मागमूस या विवेचनात येत नाही.
यात एक मूलभूत प्रश्न प्रथम उपस्थित करावा लागेल. तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरता मर्यादित नाही: व्यापक समाजहितासाठी प्रसंगी जनतेस अप्रिय निर्णय घेण्याची आपल्या सरकारची तयारी असते का? याचे उत्तर आज खेदाने नाही म्हणून द्यावे लागते. एकेकाळी सती वा विधवा विवाह प्रथेवर बंदी घालताना या व्यापक समाज हिताचा विचार असावा, पण शाहबानो (१९८६) वा ताजे राम सेतू प्रकरण अशा प्रसंगी सरकारे बोटचेपी भूमिका घेताना सातत्याने दिसतात. येथे 'आमच्या भावना भडकतात', हे एक प्रभावी शस्त्र झालेले आहे, असे दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रकरणांच्या बाबतीत असेच होताना दिसते. सलमान रश्दी प्रकरण (१९८८) आणि शाहबानो प्रकरण (१९८६) यांमध्ये हे साम्य आहे. या काळात हा बोटचेपेपणा वाढू लागला. 'भावना भडकल्या म्हणून दंगल' ही आता (इतक्या वर्षांच्या बोटचेपेपणापोटी) इतकी चिघळलेली बाब बनली आहे, की कोणती दंगल उत्स्फूर्त आणि कोणती घडवलेली, हेच सांगता येणे कठीण झाले आहे. नुकतीच तेहेलकाने उघड केलेली 'श्रीराम सेने' विषयीची माहिती वा मागच्या वर्षीच्या मिरज दंगलींच्या पूर्वनियोजिततेविषयीची हळूहळू बाहेर आलेली माहिती ही कोणत्याही समंजस माणसास भयावहच वाटावी. या परिस्थितीत कोणत्याही गोष्टीमुळे (निव्वळ अभिव्यक्तीच नाही) दंगल होईल, या भीतीने सरकारने बोटचेपे धोरण स्वीकारणे म्हणजे एक प्रकारच्या दहशतवादास शरण जाणे आहे. परिस्थिती आधीच हाताबाहेर गेलेली आहे, पण केव्हातरी हा बोटचेपेपणा सोडला नाही, तर परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात राहील. हृदयांच्या एकाधिकारशाहीसंदर्भातली भीती ही अशी व्यापक आहे. यामध्ये आशादायी काहीतरी शोधायचे झाले, तर ते असे: सरकारे जरी भावनांचे लांगूलचालन आणि बुध्दीचा अवमान करीत असली, तरी न्यायालये मात्र या बाबतीत आपले काम बर्‍यापैकी चोखपणे करीत आहेत. पूर्वीच्या काळातल्या मर्ढेकर वा तेंडुलकर (बाईंडर, गिधाडे) प्रकरणांत असो, वा अधिक ताज्या शेखर कपूर (बँडिट क्वीन - १९९४) वा खुशबू प्रकरणांत असो, न्यायालयांनी दिलेले निर्णय हे राज्यघटनेच्या चौकटीतच राहून, सारासार विचाराअंती, समंजसपणे दिलेले दिसतात. शाहबानो प्रकरणातही न्यायालयाचा निर्णय समंजसच होता. त्यामुळे अखेर असा विचार मांडून थोडे हलके वाटते की, आपली राज्यघटना व न्यायालये गंभीर अभिव्यक्तीच्या (म्हणजे अगदी गांभीर्याने केलेल्या रंजक खोडसाळपणाच्याही!) पाठीशी उभी राहातील, अशी आशा आहे. मात्र त्या त्या प्रकरणात निर्मिकाने (म्हणजे अभिव्यक्तीच्या लेखकाने) या हृदयांच्या एकाधिकारशाहीविरोधात न्यायाची भीक मात्र मागावी लागेल. म्हणजे अगदी माओवादी घटनाविरोध करण्याची गरज नाही, पण घटनात्मक विरोध मात्र हवा. थोडक्यात, सरकारने बोटचेपेपणा केला, तर व्यक्तीवर येणारी लोकशाही जबाबदारी वाढते. या वाढत्या जबाबदार्‍या स्वीकारण्यास आपणा सर्वांस शुभेच्छा. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Sat, 05/29/2010 - 18:43

In reply to आविष्कार स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव by चिंतातुर जंतू

Permalink

+१

पूर्ण सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 06/09/2010 - 11:11

In reply to आविष्कार स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव by चिंतातुर जंतू

Permalink

पुर्ण

पुर्णपणे सहमत! तुमचे मुद्दे आणि विवेचन दोन्हीही एकदम योग्य! [दुर्दैवाने :( माझ्या कडे योग्य शब्द नाहीत माझे विचार व्यक्त करायला, त्यामुळे जास्त काही लिहीत नाही :) ]
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 06/08/2010 - 18:11

Permalink

संपूर्ण

संपूर्ण चर्चा 'वाचनखुण' म्हणून साठवली आहे. विशेषतः जंतू आणि मुक्तसुनित यांची रंगलेली जुगलबंदी उल्लेखनिय. बर्‍याच दिवसांनी इतकी सुंदर, संयत आणि समृद्ध करणारी चर्चा वाचायला मिळाली. अशाच अनेक अजून चर्चा वाचायला मिळोत ही मनापासून इच्छा. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Wed, 06/09/2010 - 19:21

In reply to संपूर्ण by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

हेच म्हणतो. वाचनखुण साठवल्यागेलेली आहे. - ओंकार.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com