किनारा

आनंदयात्री's picture
आनंदयात्री in जे न देखे रवी...
25 May 2010 - 11:35 pm

उमललेले क्षण
पसरलेल्या आठवणी
दुर्दम्य ओढ
आणि हिरवा चुडा ल्यायलेल्या भिंती

श्वासांच्या जुड्या
पिवळ्या तपकिरी लाल निळ्या
जगवणारा काढा
तुरट कडसर गोडा खारा

माणसांच्या होड्या
सडा .. वेल्हावणारा वेडा
तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा ..

कविता

प्रतिक्रिया

मनिष's picture

25 May 2010 - 11:42 pm | मनिष

हा आंद्या ना!! जीवघेणे लिहितो....

मस्त कलंदर's picture

26 May 2010 - 12:13 am | मस्त कलंदर

खरंच.. कवितेतलं काही कळत नसलं तरी.. वाचून क्षणभर सुन्न व्हायला झालं...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अस्मी's picture

26 May 2010 - 2:45 pm | अस्मी

मस्त :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

श्रावण मोडक's picture

25 May 2010 - 11:43 pm | श्रावण मोडक

पूर्ण डोक्यात शिरली नाही. पण आक्रंदणारा किनारा ही कल्पना भिडली.
पण असंही वाटतं की, गलबत, होड्या वगैरेंवर थोडं आणखी काम करता आलं असतं...

मेघवेडा's picture

25 May 2010 - 11:56 pm | मेघवेडा

सुंदर कल्पना! मस्तच!!

-- मेघवेडा

प्रभो's picture

25 May 2010 - 11:58 pm | प्रभो

भारी रे आंद्या!

टारझन's picture

26 May 2010 - 12:17 am | टारझन

!!!!!

निरन्जन वहालेकर's picture

26 May 2010 - 12:56 pm | निरन्जन वहालेकर

तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा .
व्वा ! जबाब नही ! गलबलायला होतं ! ! !

निरन्जन वहालेकर's picture

26 May 2010 - 1:01 pm | निरन्जन वहालेकर

तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा .
व्वा ! जबाब नही ! गलबलायला होतं ! ! !

निरन्जन वहालेकर's picture

26 May 2010 - 1:01 pm | निरन्जन वहालेकर

तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा .
व्वा ! जबाब नही ! गलबलायला होतं ! ! !

सहज's picture

26 May 2010 - 4:07 pm | सहज

नेहमीच छान व इमोशनल लिहतो पण आज काही समजले नाही फारसे.

नंदन's picture

26 May 2010 - 2:48 pm | नंदन

...

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2010 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते

....

आपल्या बोटाला नाही तर कुठे तरी कधी कधी ब्लेड वगैरे लागते, जखम होते, रक्त येते. ४-५ दिवसांत ती जखम भरत येते. पण जखम पूर्ण भरायच्या आधी एक अवस्था अशी येते की त्या जखमेवर दाबले की दुखते खरे पण थोडेसे बरेही वाटते. आणि त्यामुळे आपण तिथे परत परत दाबतो. दुखता दुखता बरं वाटत राहतं. हा साला तसलंच लिहितो. खोलवर चटका लावतो. ते ही अगदी मोजक्या शब्दात. पण त्याला लिहायचं बंद कर असंही नाही म्हणू शकत. परत परत वाचावंस वाटतं.

बिपिन कार्यकर्ते

फटू's picture

26 May 2010 - 3:18 pm | फटू

विरहभावनेवर असावी कविता...

कविता पुर्ण कळली नसली तरी

तिच्या आठवणींचे गलबत
आक्रंदणारा वेडसर किनारा ..

या ओळी मात्र मनाला चटका लावून जातात.

- फटू

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 3:24 pm | llपुण्याचे पेशवेll

:( :( :( :( :( :( :( :( :(
:( :( :( :( :( :(
:( :( :( मी म्हणू कैसे फुला रे :( :( :(
:( :( :( :( :( :(
:( :( :( :( :( :( :( :( :(
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

मृगनयनी's picture

26 May 2010 - 3:52 pm | मृगनयनी

-----------------------------------------

प्लीज , नको रे असं लिहित जाऊस.... रडायला येतं.........

- नि:शब्द.

:|

-----------------------------------------

तिच्या जपलेल्या आठवणी..
तुझ्या डोळ्यातले अश्रू....

थोडीशी बेरीज, बरीचशी वजाबाकी..
आयुष्याचे गणित, पण उरते "तीच" बाकी...

नाविन्याचा प्रत्येक क्षण
तुझ्याचसाठी आसुसलेला...

आशेचा एक सोनेरी किरण...
कदाचित तिनेच पाठवलेला....

- तुझी मैत्रीण. (चिऊ)

______________________
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

आनंदयात्री's picture

27 May 2010 - 12:44 am | आनंदयात्री

सुरेख आहे कविता तुझी नयने !
इतके नितळ लिहायला तितकी निर्मळता हवी ..

प्रमोद देव's picture

26 May 2010 - 4:02 pm | प्रमोद देव

शरदिनीतैंनी डोक्यावर हात ठेवला काय रे? ;)

दोन रुपके एकत्र करून मिक्स लिहिलंयस का?
सहजराव म्हणतात तसं यावेळी भाव समजला तरी नेमका अर्थ नीटसा कळला नाहि

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

धमाल मुलगा's picture

26 May 2010 - 4:30 pm | धमाल मुलगा

:(

रडिवलंस ना? आता वाटलं का बरं? [(

काय लिहितो..काय लिहितो राव हा माणुस.. च्छ्या:! ह्याच्या कविता वाचायच्या म्हणजे काळीज करपवुन घ्यायची कामं राव. :(

निखिल देशपांडे's picture

26 May 2010 - 4:57 pm | निखिल देशपांडे

च्छ्या:! ह्याच्या कविता वाचायच्या म्हणजे काळीज करपवुन घ्यायची कामं राव.
अगदी मनातल बोललास...
:(

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

sur_nair's picture

26 May 2010 - 4:54 pm | sur_nair

'आणि हिरवा चुडा ल्यायलेल्या भिंती' आणि 'पिवळ्या तपकिरी लाल निळ्या' या ओळींचा नीटसा संदर्भ लागला नाही. कदाचित तिचं कुणाशी लग्न लागत असेल असा पहिल्या ओळीचा अर्थ काढू शकतो . पण त्या रंगांची श्वासाचा काय संबंध ते कळले नाही. शेवटचे कडवे सुंदर आहे.

भडकमकर मास्तर's picture

26 May 2010 - 6:11 pm | भडकमकर मास्तर

त्या एका ओवररेटेड कवयित्री ताई लिहितात तसं नाई का वाटलं?

बेसनलाडू's picture

27 May 2010 - 4:48 am | बेसनलाडू

विशेष आवडल्या.
(नावाडी)बेसनलाडू