आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात
आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश
तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो
दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर .... कार्यक्रमापेक्षा व्यत्ययाचीच पाटी अधिक
मालगुडी डेज ताना ना ताना ना ना ना
रामायण
देख भाई देख
मिले सूर मेरा तुम्हारा
टर्निग पॉईंट
भारत एक खोज
महाभारत
अलीफ लैला
व्योमकेश बक्शी
तहकीकात
ही म्यान
आणि ती सलमा सुलतान .........समाचार सांगणारी
विको तरमारिक नाही कॉस्म्यातिक ...
किंव्हा वॉशिंग पावडर निरमा ........दूध सी सफेदी निरामासे आयी रंगीन कपडेभी खिल खिल जाये ....
आय आम कॉम्प्लान बॉय आय आम ए कॉम्प्लान गर्ल
तो बॉय आता केवढा मोठा झाला आहे ... अहो तोच तो शाहीद कपूर आणि ती गर्ल
परवाच तीच म्हणे लग्न झालंय म्हणे ..... आयेशा टाकिया
आणि आपली रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक ह्यांची सुरभी
रघुवीर यादवचा गोंधळ ..... मुंगेरीलाल के हसीन सपने ,
गाजर खाणारा करमचंद,विक्रम वेताळ.....
आणि बरेच काही ........
हा आपला साधारणपणे ८० ते ९० चा काळ.. नो सीटबेल्ट,नो ऐअर ब्याग्ज.....ट्रकच्या फाळक्यावर बसून प्रवास आणि तो सर्वांना आरामदायी वाटायचा .....लहान मुलांसाठी त्या रंगीबेरंगी बाबा गाड्या ..... सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्ड चा तुकडा लावून त्याचा येणारा फटर फटर .. अगदी फटफटीचा आवाज ..त्यामुळे
सायकलची तास न तास भटकंती.....त्या सायकलच्या शर्यती .... ट्रीप ... नो सेफ्टी हेल्मेट्स,नो नी प्याड, नो एल्बो प्याड .......तहान लागली की दिसेल त्या सार्वजनिक
नळाला तोंड लावून पाणी प्यायचे ......... नो बॉटल वाटर .........ती पोस्टाची तिकिटे ...... काडेपेट्याची कव्हर्स , आणि बरंच काही जमा करायचंय आणि जोपासायचा छंद
आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर उनाडक्या.....खेळ ....मात्र कुठल्याही परिस्थितीत अंधार व्हायच्या आत घरात आणि नंतर शुभं करोति .......................
प्रतिक्रिया
14 May 2010 - 10:24 pm | एक
श्रिराम लागू चित्रकार असतो आणि सगळ्या मेलेल्या माणसांची चित्र काढत असतो..
बबब...
जाम टरकली होती..
14 May 2010 - 10:28 pm | jaypal
कथेच नाव होतं "पोर्ट्रेट" अजुन एक कथा आठवते "भुतनाथ" त्यामधे करमचंद फेम पंकज कपुर होता.बोलक्या बाहुलीत अत्मा वगैरे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
14 May 2010 - 11:47 pm | पक्या
अजून काही -
मिस्टर अँड मिसेस - अर्चना पुरणसिंग , जयंत क्रूपलानी. हलकी फुलकी कॉमेडी होती
वाह जनाब - शेखर सुमन , किरण जुनेजा
खानदान - बरेच कलाकार होते - किट्टू गिडवानी, मोहन भंडारी, सोनी राजदान.
सुबह - शिर्षक गीत मस्त होतं - ए जमाने तेरे, सामने आ गये ....
चुनौती - चन्ना रुपारेल , अरिफ जकारिया, सुचित्रा कृष्णमूर्ती
आ बैल मुझे मार - परेश रावल
गुब्बारे
कथाकलश
मालगुडी डेज- चिरकाल स्मरणात राहिली आहे.
फौजी - शाहरुख खान
नीव - शालेय जीवनावर होती..असगर अली आठवतोय त्यात
तेहकिकात - विजय आनंद , सौरभ शुक्ला
विक्रम वेताल - अरूण गोविल
गुल गुलशन गुलफाम - परिक्षित सहानी , राधा सेठ , कवलजित, कुणाल खेमू पण होता...डेब्यू रोल होता
एक अनुराधा पटेल आणि कवलजित ची पण सिरियल होति . नाव आठवत नाहिये.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
14 May 2010 - 11:55 pm | भारद्वाज
शेखर सुमन ची Reporter...त्यात बाबा-बुवा लोकांचा बुरखा टरकवणारा एपिसोड होता...खरंच काळाच्या पुढे आणि निर्भीड होता लेखक.
-
लहानपण देगा देवा
15 May 2010 - 10:40 am | मुशाफिर
अजून काही कार्यक्रम:
१) दुरदर्शन वर (बहुदा डी डी २/सह्याद्री वर) दर बुधवारी संध्याकाळी साडे सातला लागणारा 'कवी शब्दांचे ईश्वर' हा एक अविस्मरणिय कार्यक्रम होता. शाळेत शिकताना नुसत्या नावानी माहीत असलेल्या कवींच्या विविध कवितांची छान ओळख करून दिली ह्या कार्यक्रमाने मला.
२) रविवार सकाळी ७.३० वाजता लागणारा 'रंगोली' हा कार्यक्रम.
३) रविवार सकाळी ११ वाजता लागणारा 'नींव' हा कार्यक्रम.
४) अजून एक कार्यक्रम होता ज्यात प्राध्यापक राम शेवाळकर 'मेघदूत' उलगडून सांगायचे. पण आता नावं आठवत नाही.
५) 'द वर्ल्ड धिस विक' पण खुप छान कार्यक्रम असायचा.
६) 'होनी अनहोनी' हा एक खुप जबरदस्त कार्यक्रम लागायचा. जाम घाबरायचो मी तेव्हा तो बघायला. सत्य घटनांवर आधारित असही सांगायचे प्रत्येक भागाआधी. एका भागात एका लहान मुलाच्या अंगात भुत येत आणि तो जुलमी सावकाराचा खुन करतो अशी काहीशी कथा होती. त्या भागात एक पात्र (बहुदा तो सावकार) पैसाss पैसाss पैसाss.... नोटss नोटss नोटss असं काहिसं म्हणताना दाखवला होता. एकदम जबरा असायचे काही काही भाग! :)
मुशाफिर.
15 May 2010 - 12:11 pm | योगी९००
फ्लॉप शो मुळे तर रस्तात एखादा सरदारजी दिसला तरी खुप हसायला यायचे..
कोणाला "नीव" मालिका आठवते का? ४-५ एपिसोडच झाले..पण छान मालिका होती. "धरती पर्..सुरज की किरणे..रख्खे नीव उजाले की..." असे काहीतरी शिर्षक गीत होते..
ओहो दिपिकाजि आइये आइये, ये.............मान गये. किसे ? आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को..
यातला म्हातारा फारच रंगेल वाटायचा..या वरून मि.पा. वरच्या एका जेष्ठ सदस्याची आठवण येतेय..
सगळ्यात जाम पकवले असेल ते "चंद्रकांता" ने...मुळ कथा सोडून भलताच धिंगाणा चालू होता...
खादाडमाऊ