आरक्त चेह~याने सांज ढळते
अन् पाखरांची किलबिल होते
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते
तेच कुठेतरी सॅक फेकून देणे
तेच घाईघाईत कपडे बदलणे
अस्ताव्यस्त कपडे उचलताना
मात्र आई तुझी आठवण येते
एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं
दुस~या हाताने कडवट चहा पिणं
तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
प्रतिक्रिया
5 Apr 2008 - 6:11 pm | मीनल
खूप छान आहे .
नेहमी रिकाम्या घरट्यात असलेल्या आईचे वर्णन वाचण्यात येते.
इथे उडून गेलेल्या पिल्लची मनस्थिती वर्णन केली आहे.
खूप रिऍलिस्टीक आहे.
तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे.
या कवितेते तीच भावना उघड केली आहे.
कुणाही आईच्या डोळ्यात आसव आणेल अशी कविता आहे .
5 Apr 2008 - 8:38 pm | इनोबा म्हणे
अप्रतिम कविता.अगदी मनापासून आवडली.
तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे.
या कवितेते तीच भावना उघड केली आहे.
हेच म्हणतो
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
5 Apr 2008 - 6:37 pm | मदनबाण
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
खरच.....
(आईचे कोकरु)
मदनबाण
5 Apr 2008 - 7:04 pm | प्रभाकर पेठकर
ही कविता त्या माऊलीच्या दृष्टीस पडू नये, हीच देवाचरणी प्रार्थना.
5 Apr 2008 - 7:08 pm | चेतन
सुदंर वर्णन
आरक्त चेह~याने सांज ढळते
अन् पाखरांची किलबिल होते
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते
(होम सीक) चेतन
5 Apr 2008 - 8:55 pm | चतुरंग
अरे पुरुषांना रडायचा अधिकार देणारी आईच असते! तिच्याजवळ मनमोकळे पणाने रडता येते तसं कुठेही रडता येत नाही हे खरं.
फारच नशीबवान असाल तर बायकोजवळ रडू शकता पण आई ती आईच!
साधी, सरळ, सुंदर कविता थेट आत जाऊन भिडली. अभिनंदन.
(अवांतर - तू कुठे आहेस? अमेरिकेत की आणखी कुठे?)
चतुरंग
5 Apr 2008 - 9:59 pm | llपुण्याचे पेशवेll
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
सुंदर कविता आहे र...
(काहीशा अशाच अनुभवातून जाणारा)
पुण्याचे पेशवे
5 Apr 2008 - 9:59 pm | llपुण्याचे पेशवेll
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
सुंदर कविता आहे र...
(काहीशा अशाच अनुभवातून जाणारा)
पुण्याचे पेशवे
6 Apr 2008 - 8:05 am | विसोबा खेचर
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
वा! खूप सुंदर, साधी सोपी अन् बोलकी कविता...!
तात्या.
6 Apr 2008 - 9:54 am | गोट्या (not verified)
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
...................
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
6 Apr 2008 - 4:33 pm | सुधीर कांदळकर
अभिप्रायांशी सहमत आहे.
सुधीर कांदळकर.
10 Apr 2008 - 11:18 pm | सचिन
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
अक्षरशः मनातले बोललात ! डोळ्यात अश्रू उभे राहिले !
जर अशी भावना खरच आईसमोर मला व्यक्त करता आली तर....
(आईपासून दुरावलेला) सचिन
15 Apr 2008 - 9:47 am | hemali
ह्रदय्स्पर्शी
15 Apr 2008 - 3:18 pm | विदेश
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते
खरं आहे-पण काळजी नको, कुठतरी वाचलेलं आठवत..
ज्याच्या घरी आहे आई,
सारी सुखे त्याच्या पायी!
15 Apr 2008 - 6:03 pm | नीलकांत
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
खरं आहे हो अगदी खरं आहे. खुप छान केलीये ही कविता.
नीलकांत
16 Apr 2008 - 5:53 pm | अन्जलि
sorry marathit lihayala avadle asate pan marathi typing yet nahi kavita khup touchi hoti dolyamadhe pani ale. ata mala kalte ahe mazya mulana kase vatat asel karan mazi don mule servicesathi ani shiknyasathi dur rahatat. kavita vachun kalale tyana sarkha aila phone karavasa ka vatto ani te kiti miss kartat. thank you. me hya bhavana lakshat thevin.
16 Apr 2008 - 6:02 pm | गावठी
शाब्बास रे!! तुच खरा आईचा पुजारी .
16 Apr 2008 - 11:26 pm | संदीप चित्रे
सतीश ... कविता छान आहे ... आतून येतं ते सहज उमटतं.
भारताबाहेर कुठे मुक्काम?