कोणत्याही वेबसाइट वर मराठीत टाईप करण्यासाठी...

भारद्वाज's picture
भारद्वाज in जनातलं, मनातलं
28 Apr 2010 - 12:56 am

हा दुवा खास मिपाकरांसाठी. ह्या दुव्यावरील निर्देशानुसार वागा. कोणत्याही वेबसाइट वर मराठीत टाईप करा. अगदी याहू/युट्युब्/जी-मेल टॉक इत्यादी.

http://t13n.googlecode.com/svn/trunk/blet/docs/help_mr.html

-
जे जे आपणांसी ठावे । ते ते इतरांसी कळवावे ॥
शहाणे करून सोडावे । सकल जग ॥

भाषाशिफारस

प्रतिक्रिया

वर्षा's picture

28 Apr 2010 - 2:16 am | वर्षा

दुव्यासाठी धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 10:43 am | जयंत कुलकर्णी

गंमत म्हणजे सगळ्यांचा बेस फाँट मंगलच आहे. त्यामुळे युनिकोड मधे फाँटची विविधता नाही :(
http://specials.msn.co.in/ilit/

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 11:25 am | प्रमोद देव

किंवा बरहा डायरेक्ट आवडतं....कुठेही लिहू शकता.
त्यामुळे इतर पर्यायांची गरज भासत नाही.
आजही ह्या क्षणाला इतरांच्या तुलनेत बरहा सर्वच बाबतीत पुढे आहे.

वर्षा's picture

28 Apr 2010 - 5:17 pm | वर्षा

बरहा चांगलंच आहे पण त्यामध्ये 'अ‍ॅ' टाईप करता येत नाही....
त्यामुळे गमभन जास्त चांगलं वाटतं. कोणी गमभन फाँटफ्रीडम वापरतं का?

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 5:47 pm | प्रमोद देव

तुमचं म्हणणं. अ‍ॅ च्या बाबतीत मात्र बरहात अजून बदल झालेला नाहीये.
सर्वसाधारणपणे गमभन नक्कीच चांगलं आहे...पण संवादकात(मेसेंजर) ते अजूनही नीट वापरता येत नाहीये...त्यातून त्यात कधी कधी एकाच्या ऐवजी दोन अक्षरे उगवायला लागतात...लिहितांना चूक झाली आणि बॅकस्पेसची कळ दाबली तर काही भलतीच अक्षरं उमटतात...असे काही ढेकूण(बग्ज)गमभन मध्ये अजूनही आहेत.

त्यामुळे अ‍ॅ सारखा एखादा अपवाद वगळता..बरहा जास्त सोयिस्कर वाटतं.
शेवटी काय, आपल्याला जे सोपं वाटेल ते वापरावे...काय मंडली,बराबर हाय ना?

वर्षा's picture

28 Apr 2010 - 7:32 pm | वर्षा

>>त्यातून त्यात कधी कधी एकाच्या ऐवजी दोन अक्षरे उगवायला लागतात...लिहितांना चूक झाली आणि बॅकस्पेसची कळ दाबली तर काही भलतीच अक्षरं उमटतात...

हा प्रॉब्लेम मला गमभनच्या पॅडमध्ये टाईप करताना येत नाही. पण इतर ठिकाणी येतो विशेषतः मायबोलीवर खूप येतो हा प्रॉब्लेम.

जर बरहाचा 'अ‍ॅ' प्रॉब्लेम सुटला तर फार बरं होईल.

जयंत कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 7:52 pm | जयंत कुलकर्णी

मी बाराहा बरोबर या बाबतीत पत्रव्यवहार केला. त्यांनी ते पुढ्च्या version मधे करू असे मला सांगितले होते. नवीन versionमधे त्यांच्या हेल्प फाईल मधे Tr. Rules मधे त्यांनी ते घातलेले पण आहे, पण नंतर मला ई-मेल पाठ्वला की ते फक्त बाराहाच्या एडिटर मधेच शक्य आहे. आपण सगळ्यांनी जर त्यांना ई-मेल पाठवला तर ते हे काम प्राधान्य देऊन करतील. मी आजच सकाळी त्यांना ई-मेल पाठवलेला आहे.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

वर्षा's picture

28 Apr 2010 - 8:08 pm | वर्षा

मीही बरहाशी मागेच संपर्क साधला होता तेव्हा त्यांच्याकडून असे उत्तर आले:
This character is character 0x0972 in Unicode (http://www.unicode.org/charts/PDF/U0900.pdf) but is not available in any devanagari fonts yet. Hence it is not supported in Baraha yet.

It is possible to produce the अ‍ॅ character using अ+0x200D+0x0945 combination as in your examples. But this technique may result in strange Devanagari characters such as इ‍ॅ उ‍ॅ. Hence this technique is isn't used in Baraha yet. May be in the future release, I can implement this as a temporary solution

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 8:54 pm | प्रमोद देव

आणि वर्षाताई...मी तोवर वाट पाहायला तयार आहे... :)

वर्षा's picture

30 Apr 2010 - 6:28 pm | वर्षा

आता बरहा वापरुन ’अ‍ॅ‍’ टाईप करता येतो आहे.
अ‍ॅनिमेशन
अ‍ॅप्लिकेशन
अ‍ॅप्लाय
अ‍ॅपल......

हुश्श्य! :)

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2010 - 9:40 am | जयंत कुलकर्णी

काय म्हणताय ? बघतोच आता !

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रमोद देव's picture

1 May 2010 - 9:43 am | प्रमोद देव

जय हो!

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2010 - 10:20 am | जयंत कुलकर्णी

हे तुम्ही बाराहा पॅड वापरून केले आहे का, वर्डमधे करता येतंय ?
मला दोन्हीमधे करता येत नाही. :-(

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रमोद देव's picture

1 May 2010 - 10:27 am | प्रमोद देव

जयंतराव, मी बरहा आयएमई वापरून लिहू शकतोय...थेट इथे.
अ‍ॅनिमेशन
अ‍ॅडोबे

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2010 - 10:30 am | जयंत कुलकर्णी

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रमोद देव's picture

1 May 2010 - 12:02 pm | प्रमोद देव

अ‍ॅ=~e

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2010 - 1:09 pm | जयंत कुलकर्णी

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

हो वर्डमध्ये अ‍ॅ टाईप करता येतोय

पण गंमत म्हणजे एक्सेल मध्ये येत नाहीये! ’अ’ च टाईप होतोय...:(

विकास's picture

30 Apr 2010 - 7:06 pm | विकास

बॅकस्पेसची कळ दाबली तर काही भलतीच अक्षरं उमटतात

मला गमभनचा हा अनुभव केवळ गुगल क्रोम वापरताना आला आहे.

बाकी: गुगल मराठी, गमभन, बरहा, किरण, अजून काही असेल ते, सगळे आलटून पालटून वापरताना प्रत्येक कळीचा वापर वेगळ्या कारणाने करायला लागून मेंदूला चालना मिळेल असे वाटते. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

30 Apr 2010 - 7:28 pm | II विकास II

बॅकस्पेसची कळ दाबली तर काही भलतीच अक्षरं उमटतात

मला गमभनचा हा अनुभव केवळ गुगल क्रोम वापरताना आला आहे.
== मला हा अनुभव क्रोम आणि गुगल वापरताना आला.

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

जयंत कुलकर्णी's picture

1 May 2010 - 10:41 am | जयंत कुलकर्णी

हं....
इथे येतंय पण word मधे येत नाही बहुतेक. आणि जर IME (EN) चालू ठेऊन, जर इथे टाईप केले तर अअ‍ॅ असे टाईप होतंय. IME (MR) चालू ठेऊन जर टाईप केले तर मात्र बरोबर येतंय.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

सुधीर काळे's picture

1 May 2010 - 8:32 pm | सुधीर काळे

वर्षा,
अ‍ॅ व बाँबसारखे (बरहात 'बॉंब' उठतं!) शब्द वापरायला मी चक्क खरडफळ्यावर जातो व ते शब्द तिथे लिहून कॉपी-पेस्ट करतो.
खरं तर 'गमभन' छान सॉफ्टवेअर आहे, पण मधेच त्याच्या अंगात येतं व कांहीं अक्षरं repeat होतात. असं कां होतं ते जर कळलं तर मी 'बरहा'ऐवजी 'गमभन' वापरेन पण माझ्यासारख्या 'नॉन-आयटी'वाल्याला कळेल असे सांगणारा अजून भेटला नाहींय्. बर्‍याच लोकांना असं होते हेही पटत नाहीं. म्हणून सध्यातरी 'बरहा'च वपरतो!
-------------------------------
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

जयंत कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 11:35 am | जयंत कुलकर्णी

फक्त एकच प्रॉब्लेम आहे. जर बाराहा मधे टाईप करून जर मिपावर चिकटवले तर चार पाच जोडाक्षरे परत टाईप करावी लागतात. मी पण आत्ता बारहाच वापरतो. पण एका मित्राने सांगितले की याच्यात किंवा गुगल ट्रा. मधे टाईप केले तर काहीच बदल होत नाही. जसे च्या जसे आपण चिकटवू शकता.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रमोद देव's picture

28 Apr 2010 - 11:38 am | प्रमोद देव

सरळ सरळ तुम्ही इथे टंकू शकता...म्हणजे मग तसा बदल नाही होत.

मी नेहमीच 'बरहापॅड'वर लिहून मिपावर कॉपी-पेस्ट करतो पण तुम्ही म्हणता तसा प्रॉब्लेम मला आढळला नाहींय्!
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

महेश हतोळकर's picture

28 Apr 2010 - 11:38 am | महेश हतोळकर

मला मिसळपाव आवडतं. "प्रतिक्रिया" मध्ये वाट्टेल ते टंकतो आणि वाट्टेल तेथे चिकटवतो.

गुगल शब्दकोश वापरुन शब्द पूर्ण करते त्यामुळे लेखन जलद होते.

उदा. tyamule असे सहज लिहिले तरी अपेक्षित शब्द "त्यामुळे" असा लिहिला जातो.

अर्थात मग मराठि मधे प्रचलित नसलेल्या प्रतिक्रिया लिहिणे जड जाते.

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

टारझन's picture

28 Apr 2010 - 8:27 pm | टारझन

सर्व फोटू छाण !!

काही णाही टेष्टींग करतो मराठी टाइप करायची :)

भय्या's picture

28 Apr 2010 - 9:58 pm | भय्या

किरण वापरून पहा. खाली लिंक देत आहे. किरण खुप चांगला वाट्ला.
http://www.kiranfont.com/kf/

जयंत कुलकर्णी's picture

28 Apr 2010 - 10:01 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते तो युनिकोड नाही. मग वेबवर कसा वापरणार ?

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com