हरि ओम मिपाकरांनो,
सकाळमधील ही बातमी वाचली आणि डोके गरगरायला लागले. भारतासारख्या गरीब देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार कसा करु शकतात हि लोकं. तसेच येवढा जेसीबीने पैसा ओढण्यासाठी हवे असलेले अनिर्बंध अधिकार एकट्या माणसाला कसे दिले जातात. १८०० कोटींची संपत्ती आणि दिड टन सोन्याचे हे महाशय काय करणार होते. अशा भ्रष्टाचार्यांना शिक्षा का होत नाही? खरे तर आर्थिक घोटाळे करणार्यांना अत्यंत कठोर शिक्षा करावयास हवी, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भारतातील अशी बडी धेंडं पकडुन त्यांचा काळा पैसा पायाभूत सुविधांसाठी का वापरला जात नाही?
दर दिवसाला नवा घोटाळा उघडकीस येतो, काही दिवसांच्या चर्चेनंतर जनता हे सर्व विसरुन आपापल्या कामाला लागतात.
भ्रष्टाचारमुक्त देश्/समाज निर्माण करण्यासाठी आपण काय करु शकतो?
मोठया नोटांचा लोचा बन्द केल्यास यापासुन मुक्ती मिळेल का?
यासारख्या एक ना अनेक प्रश्न आमच्या छोट्या डोक्यात कल्लोळ माजवतात.
तुम्हाला काय वाटते. जस्ट शेअर.......
प्रतिक्रिया
26 Apr 2010 - 12:12 pm | Manoj Katwe
हा देश पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात दिला पाहिजे.
भारतातील कुठलाच पक्ष साध्य योग्य पद्धतीने भारत चालविन्यास लायक नहीं. प्रत्येक पक्ष कुठे न कुठे तरी बरबटला आहे.
जेव्हा ब्रिटिश सगळी घान साफ करतील (जात, आरक्षण, भ्रष्टाचार, गुंडेगिरी ) तेव्हा पुन्हा एकदा स्वतंत्र मिलावायाचे
हाच एक मार्गे सुचत आहे
भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?
अन्यथा सध्यातरी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.
26 Apr 2010 - 12:52 pm | अरुण मनोहर
>>>>>जेव्हा ब्रिटिश सगळी घान साफ करतील .....<<<<
तुमांला असे म्हनायचे आहे का?---> जेव्हा ब्रिटीश सगळे धन साफ करतील, तेव्हा लुटायला काहीच उरनार नाही, व हा प्रश्न आपोआपच सुटेल.
26 Apr 2010 - 1:07 pm | Manoj Katwe
नाहीतरी राजकारणी लोक काय शिल्लक ठेवणार आहेत ?
सर्वेच्या सर्वे चाटून पुसून एक दिवशी हा देश सोडून पलुन जातील.
26 Apr 2010 - 12:54 pm | मराठमोळा
भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?
नाही.माझ्या मते कोणताही देश भ्रष्टाचार मुक्त कदापी होणार नाही.
भ्रष्टाचारमुक्त देश्/समाज निर्माण करण्यासाठी आपण काय करु शकतो?
आपण स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे का हा प्रश्न स्वःताला विचारु शकतो. :)
मोठया नोटांचा लोचा बन्द केल्यास यापासुन मुक्ती मिळेल का?
हॅ हॅ हॅ.. अजिबात नाही.
यासारख्या एक ना अनेक प्रश्न आमच्या छोट्या डोक्यात कल्लोळ माजवतात.
तुम्हाला काय वाटते. जस्ट शेअर.......
हे प्रकार जरी सगळ्यात जास्त त्रास सामान्यांना देणारे असले तरी सामान्य माणुस ह्यापासुन दुरच राहतो. हे प्रश्न आपले नाहीत असा मुद्दाम समज करुन आणी नकोच नसती भानगड म्हणुन. आपण बरं आपलं घर बरं! :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
26 Apr 2010 - 1:04 pm | Manoj Katwe
आपण स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या भ्रष्टाचाराचे समर्थन केले आहे का हा प्रश्न स्वःताला विचारु शकतो.
मला एकदा व्हिसा मिलविन्यासाठी एक वैद्यकीय अधिकार्याला (ससून हॉस्पिटल) ५०० रु. विनाकारण द्यावे लागले होते .(For medical fitness certificate)
अन्यथा त्याने मला निदान एक आठवडा तरी चकरा मारवायास लावले असते.
26 Apr 2010 - 1:16 pm | वेताळ
तुमचे अजुन इथे किती काळ वास्तव्य आहे हे कळत नाही तो पर्यत ह्या प्रश्नाचे उत्तर देणे संभव नाही.
वेताळ
26 Apr 2010 - 1:36 pm | मितभाषी
वरच्याने जेवधे हरिओम दिलेले आहे तोप्र्यंत आपण निश्चितच येथे वास्तव्य करनार. :)
माझा मुळ हरिओम असा होता कि, अनेक पंचवार्षिक योजना होवुनही आपला देश अजुन हरिओम म्हनुनच ओळखला जातो. एकिकडे गरीबी, उपासमार, कुपोषण, आरोग्य असुविधा इ. अनेक समस्यांनी आपला देश हरिओम आहे. मुलभुत सुविधांसाठी सरकारकडे पैसा नसल्याचे नेहमी हरिओम सांगितले जाते. तर दुसरीकडे असे लब्बाड नि लुच्चे पवलोपावली देसतात. ह्या भामट्यांचा पैसा काढुन देशाच्या प्रगतीसाठी हरिओम करण्यास काय हरकत आहे.
आर्थिक गैरव्य्वहार करणार्यांना चौकात उभे करुन चाबकाने हरिओम केले पाहीजे.
26 Apr 2010 - 5:30 pm | भारद्वाज
आर्थिक गैरव्यवहार म्हणजे काय हे ठरवायला एक समिती नेमली जाईल. अहवाल सादर करायला ती समिती ५-६ वर्षे घेईल. अहवाल सादर होताना विरोधी पक्ष सभात्याग करेल. अहवाल मंजूर की नामंजूर ते कोणालाही समजणार नाही. त्या अहवालावरून निवडणूका होतील. निवडणूकीनंतर 'चौकात उभे करुन' ऐवजी 'बसून' अशी सुधारणा सुचवली जाईल. तेवढ्या काळात चाबूक बनवण्याचं कंत्राट देण्याबाबत गोंधळ होईल (किंवा घडवून आणला जाईल). चाबकाच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी पुन्हा सभात्याग केला जाईल. तेव्हाचे सेनेचे कार्यकारी अधिकारी आदित्य ठाकरे "चाबकाचे खोटे कंत्राट मिळवणा-यांना त्यांच्याच पायातल्या जोड्यांनी ठोकून काढू" अशी गर्जना करुन शिवसेनेत जान फुंकतील आणि...............
-
समितीकार भारद्वाज
26 Apr 2010 - 11:22 pm | हुप्प्या
सोनिया गांधी, ओबामा आणि व्लादिमिर पुतिन एका चर्चेकरता एकत्र आले होते. अचानक प्रत्यक्ष परमेश्वर तिथे अवतरला आणि म्हणाला, "तुम्ही तिघे जगातील महासत्तांचे प्रमुख आहात. तुमची जबाबदारी ओळखून मी एक वर देतो. प्रत्येकाने एकेक प्रश्न मला विचारायचा आणि मी त्याची खरीखुरी उत्तरे देतो. चीनचे प्रमुख देव मानत नसल्याने ते कटाप!"
आश्चर्याचा भर ओसरल्यावर प्रे. ओबामाने पहिला प्रश्न विचारला. "अमेरिकेची आर्थिक घडी पार विस्कटलेली आहे. पुन्हा एकदा अमेरिका समृद्ध कधी होईल?" देव म्हणाला अजून ३० वर्षे तरी लागतील. तू राष्ट्रपती असताना नाही पण तुझ्या जितेपणी तुला अमेरिका पुन्हा समॄद्ध झाल्याचे दिसेल. ओबामा थोडे दु:खी झाले पण थोडे समाधानही झाले.
मग पुतिनची पाळी. " कम्युनिझम संपल्यापासून रशियात पार बजबजपुरी आहे. माफिया राज्य करते असे वाटते. रशियाला कधी सुबत्ता मिळेल?"
देव म्हणाला निदान १०० वर्षे तरी लागतील. तुला ह्या जन्मी तरी ते बघायला मिळणार नाही. पुतिनला खूप दु:ख झाले. त्याने थोडे अश्रू ढाळले. पण निदान माझ्या माघारी तरी आपला देश सुधारेल हे समजल्यावर त्याला थोडे बरे वाटले.
आता आपल्या माता सोनियाची पाळी आली. तिने परमेश्वराला विचारले की
"भारतात तर भ्रष्टाचाराने नरक बनवला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत याचि देही याचि डोळा मला बघायला मिळेल का? " हे ऐकून तो सर्वशक्तीमान परमेश्वर ढसढसा रडू लागला. म्हणाला, "सोनिया, तुझ्याच काय, पण माझ्या अनादि अनंत जीवनातही हे झाल्याचे मला दिसणार नाही. भारत हा असाच रहाणार".
हे ऐकताच सोनिया संतुष्ट झाली. खिशातील स्विस बॅंकेच्या लॉकरच्या किल्ल्या कुरवाळीत सुखस्वप्ने रंगवू लागली.
26 Apr 2010 - 11:46 pm | टारझन
मला ह्याच गोष्टींमुळे आपला हिरव्या माजाचा पर्याय योग्य वाटतो. इथुन काही पैका मिळत नाही. थोडा अमेरिकेतनं हिरवा पैका भारतात आणावा "आपल्यापुरता" .. :) बाकी मी काही करु शकत नाही....
साला परवा कुठल्यातरी चर्चेत ऐकलं .. ह्या "माहितीचा अधिकार " नियमांतर्गत कोणीतरी कोणाकडे माहिती मागितली ... खुण पडला बिचार्याचा :)
अवघडंच नाही .. तर नामुणकिण आहे :)
26 Apr 2010 - 11:48 pm | इंटरनेटस्नेही
प्रश्नः
भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?
उत्तरः
नाही.
27 Apr 2010 - 12:03 am | अविनाशकुलकर्णी
मला एकदा व्हिसा मिलविन्यासाठी एक वैद्यकीय अधिकार्याला (ससून हॉस्पिटल) ५०० रु. विनाकारण द्यावे लागले होते .(For medical fitness certificate)
अन्यथा त्याने मला निदान एक आठवडा तरी चकरा मारवायास लावले असते.
»/////////////
अहो घोटाळे ३० हजार..६०हजार..१० हजार कोटींचे आहे....
27 Apr 2010 - 12:14 am | सोम्यागोम्या
घोटाळ्यांची संक्षिप्त यादी पहायचीए? इथे टिचकी द्या
27 Apr 2010 - 3:38 am | राजेश घासकडवी
आपण दिलेला दुवा तपासून पाहिला.
त्यांनी सगळ्याची बेरीज करून ७३ लाख कोटी रुपये म्हटलं आहे. पण त्यांनी जी मुख्य मोठ्या घोटाळ्यांची यादी दिली आहे त्यात एकही आकडा एक लाख कोटीच्या वरचा नाही. बेरीज ७३ लाख कोटी झाली आहे ती ७१ लाख कोटीचा स्विस बॅंकेतल्या आकड्याच्या अंदाजावरून. पण गेल्या अठरा वर्षांच्या मुख्य घोटाळ्यांचा हिशोब फक्त २ लाकोचा असताना, स्विस बॅंकांत ७१ लाको असतील यावर विश्वास बसायला कठीण जातं...भारतात लाचलुचपत आहे हे खरं आहे, पण जीडीपीच्या दीडपट पैसे कुठे तरी पडून आहेत हे पचायला जड जातं.
७१ लाकोरु आकडा आला तो शरद यादवांनी दिला. (आमचं सरकार आलं तर आम्ही काळा पैसा खणून काढू अशा आश्वासनात) नंतर अडवाणींनी तो २५ ते ७० लाको असावा असं म्हटलं. (संदर्भ वगैरे काही नाही, शिवाय रेंज एकदम बदलली) समजा तो खरा मानला, तरी त्यातले सगळे पैसे अर्थातच काळे नाहीत. भारतातल्या भारतीयांचे किती हा आणखीनच वादाचा मुद्दा आहे. जगभरात सुमारे २ कोटी भारतीय राहातात. त्यांचं उत्पन्न सुमारे वर्षाला २० ते २५ लाकोरु असेल असा अंदाज आहे. त्यांपैकी काहींचे पांढरे स्विस अकाउंट असणं सहज शक्य आहे. (अधिक माहितीसाठी हे वाचा)
कधीकधी असं वाटतं की आपण वाईट बातमीतल्या वाईटातल्या वाईटावर चटकन विश्वास ठेवतो. जर कोणी राजकारण्याने भारतीय सरकारने जनतेचं प्रचंड प्रमाणात भलं केलं आहे असं म्हटलं तर आपण खोदून खोदून आकडेवारी तपासून बघू... पुन्हा, भारतात लाचलुचपत नाही असं म्हणायचं नाही, पण आकडे नीट तपासून पाहावेत असं वाटतं.
27 Apr 2010 - 1:55 am | सोम्यागोम्या
महासंत प. पू. श्री. केतन देसाईंचे चरणस्पर्श खालील संस्थांमध्ये झाले आहेत ! इथे भक्त जनांनी जबरदस्तीने सोन्याच्या विटा दक्षिणा म्हणून दिल्यावर ते तरी काय करणार बिचारे.
# Medical Council of India, New Delhi
: President (1996 -2001; 2009 onwards)
# Indian Medical Association, New Delhi
: National President (2001-02); Current Member.
# Gujarat Medical Council:
President (1999 onwards till date).
# World Medical Association
: Current Council Member; Member- Ethics Committee and Member- Finance Committee.
# Confederation of Medical Associations in Asia and Oceania
:Present Council Member.
# BJ Medical College and Civil Hospital, Ahemdabad
Professor & Head, Department of Urology .
# Dental Council of India
Current Member.
# Gujarat University
Chairman and Member- Clinical Board of Studies; Member- Executive council; Member- Academic Council; Court Member and Academic Dean Medical Faculty of Gujarat University (1991-1997).
# Institute Body of Post Graduate Institute of Medical Education and Research, Chandigarh
Member.
# All India Institute of Medical Sciences, New Delhi
: Chairman- Staff Selection Body and academic Committee (1999-2001) and Member- Institute Body (1999-2001).
# Drug Technical Advisory Board, New Delhi
: Member.
# Indian Council of Medical Research (ICMR)
: Member- Governing Body.
# National Board of Examination (NBE)
i: Member- Governing Body (1996-2001).
# Baba Farid University of Health Sciences, Faridkot- Punjab
: Member- Board of Management.
# Sardar Patel University
: Member-Board of Studies (Clinical, 1992-95).
# National Commission on Population, Govt. of India
: Member- National Commission on Population.
# Maharashtra University of Health Sciences, Nashik
: Member-Search Committee for Selection of Vice Chancellor.
# Employees State Insurance Corporation, Govt. of India
: Member-Governing Body.
27 Apr 2010 - 9:09 am | हेरंब
हा देश भ्रष्टाचारमुक्त होईल अशी स्वप्ने बघु नयेत, कारण ते शक्य नाही.
त्यापेक्षा भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलावी.
ज्या व्यवहाराबद्दल पुरावा देता येईल तोच फक्त भ्रष्टाचार. (सरकारला वा कोर्टालानाही, पण ज्या काही लोकांना या देशात सर्व काही आलबेल आहे असे मनापासून वाटते, त्यांना!)
27 Apr 2010 - 11:14 am | इन्द्र्राज पवार
आपल्या समाज जीवनात भ्रष्टाचार किती फोफावला आहे हे वरील विवेचनावरून दिसून येतेच, त्यावर उपाय शोधणे ब्रह्मदेवाच्या बापालाही जिथे जमणार नाही तिथे आपण दगडावर डोके आपटून काहीही होणार नाही.
एक छोटेसे उदाहरण देतो, ती वरून भ्रष्टाचार किती "निर्लज्ज" पातळीवर उतरला आहे हे दिसून येईल.
कोल्हापुरात दोन तीन महिन्यापूर्वी शासनाच्या "विक्री कर" (आताचे वाट) कार्यालयातील एका अधिका-याच्या कार्यपद्धतीवर येतील व्यापा-यांनी जिल्हाधिका-यांकडे आपले गा-हाणे मांडले होते. कारवाई काही नाही...... निकाल शून्य !! संबधित अधिकारी किती भ्रष्टाचारी आहे (होता) ही बाब सर्वदूर पसरली होती. तेंव्हा काही व्यापा-यांनी योग्य तो "सापळा" रचून शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकरवी या अधिका-याला त्याच्याच कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. कार्यालयात, अशावेळी जो गोंधळ होतो तो झाला, पोलीस गाडी आली, स्थानिक वृत्तपत्र, केबल प्रतिनिधी आले, त्याच सायंकाळी दूरदर्शन, इ टी.व्ही. आदिवरून ही बातमी साग्रसंगीत प्रकाशित झाली. दुस-या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रातून नेहमीप्रमाणे रकाने, फोटो छापून आले. लोकांनी चर्चा केली (जशी आपण आता करीत आहोत त्या धर्तीवर...!)
ही गोष्ट मंगळवारची.....मध्ये बुधवारचा एक दिवस शांत गेला....आणि पुढचा दिवस गुरुवार !! याच दिवशी, याच विक्री कर भवन कार्यालयात, त्याच अधिका-याच्या खुर्चीवर "तात्पुरती" निवड झालेल्या हेड क्लार्कला त्याच वेळी, त्याच लाचलुचपत प्रतिबन्धक अधिका-यांनी एका किरकोळ व्यापा-याकडून ३५० रुपयांची लाच घेताना पकडले.....परत तोच गोंधळ....परत तीच पोलीस व्हॅन....परत तेच (अजिबात उत्सुकता नसलेले, पडेल चेह-यांचे) पत्रकार.... दुस-या दिवशी परत पेपर मध्ये तेच ठराविक साच्याचे रकाने...... रंकाळ्यावर नागरिकांची परत त्याच वैतागलेल्या आवाजात चर्चा !!! रिझल्ट ~~ बिग झिरो !
म्हणजे मग कोणत्या निर्लज्ज पातळीवर शासकीय वा तत्सम ठिकाणी काम करण-यांची मानसिक स्थिती झाली आहे? केवळ एकाच दिवस अगोदर आपल्या अधिका-याला याच ठिकाणाहून पोलिसांनी लाचेबद्दल पकडून नेले आहे, आणि कोडगेपणाने आपण त्याच खुर्चीवर बसून पुन्हा तेच शेण खात आहोत? याचे काय परिणाम होतील याची पुसटशीदेखील जाणीव वा भीती त्या हेड क्लार्कला वाटली नसेल का? म्हणजे यांच्या रक्तात नेमके कोणते घटक असतात?
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
27 Apr 2010 - 7:24 pm | शाहरुख
>>रिझल्ट ~~ बिग झिरो !
असे का म्हणता ? (जरी तिसर्या अधिकार्याने पहिल्याच दिवशी पैसे खायला सुरुवात केली असली तरी)
(तुमचा गाववाला) शाहरुख
27 Apr 2010 - 11:36 am | Dipankar
भ्रष्टाचार हा कधिच नाहिसा होणार नाही मग ब्रिटिश येवोत अथवा न येवोत, अमेरिका ब्रिटन हे देश सुद्धा भ्रष्टाचार मुक्त नाहित पण फरक येवढाच आहे तिकडील राजकारणी हे बाकीच्यांना विकुन म्हणजे इतर देशांना लुबाडुन (जसे इराक) पैसे उभारतात तर आपले राजकारणी आपल्याच देशाला विकुन पैसे मिळवतात
27 Apr 2010 - 12:13 pm | चिरोटा
फक्त राजकारणी लोकांना दोष देणे चुकीचे वाटते.अधिकारी वर्गही तेवढाच जबाबदार आहे आणि जनताही जी वारंवार भ्रष्ट राजकारणी लोकांना निवडून देते.वर श्री पवार ह्यांनी उदाहरण दिलेच आहे.
महत्वाच्या जागी बडी धेंडेच आहेत. सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीशपण पैसे घेवून न्याय देतात तिथे कसली शि़क्षा?सध्याच्या आय्.पी.एल्.चेच उदाहरण घ्या. आता शरद पवारही म्हणत आहेत की दोषी व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे.! :D
भेंडी
P = NP
28 Apr 2010 - 4:53 am | इंटरनेटस्नेही
http://www.indianviral.com/madhuri-gupta-ifs-officer-arrested-for-spying/ बातमी पहा.
28 Apr 2010 - 6:45 am | मदनबाण
बँका बुडतात (बुडवल्या जातात हो...),कंत्राट देण्यात झोल होतो...
आता आयपीएलच उदाहरण पहा...जे पैसे लावणार होते त्यांची नावे जाहीर न करण्या संबंधी काही नियम होता म्हणे !!! (जो मोदीने तोडला...) पण जर ही गुंतवणुक गैरमार्गातुन आलेल्या पैशाची नसेल तर मग गुंतवणुक करणार्यांची नावे का जाहीर करत नाहीत ?
देशातले नागरिक इतके सुजाण आहेत की घोटाळा चालु आहे हे दिसतय तरी यांचे लक्ष फायनल मॅच मधेच लागलेले होते.
जिथे जनताच जाब विचारणे सोडुन देते...तिथे भ्रष्टाचार कमी होईलच कसा ?त्यामुळे भ्रष्टाचार मुक्त जिवन हिंदुस्थानात मिळणे केवळ अशक्य आहे...
राजकारण्यांचे सुखी जिवनाचे तत्व :--- एकमेका सहाय्य करु सगळेच होवु श्रीमंत...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
28 Apr 2010 - 9:32 am | Manoj Katwe
उभ्या आयुष्यात कधी भारत भ्रष्टाचार मुक्त होणार नाही,
कारण जेव्हा सगळे जबाबदार तेव्हा कोणीच जबाबदार नाही , लोकशाही म्हणजे हे अस आहे.
आणि जर कोनच जबाबदार नाही तर मग कधीच काही होणार नाही.
हे असंच चालू राहणार.
भारताला संपूर्ण लोकशाही आणि फुकटच स्वातंत्र्य हा एक लागलेला शाप आहे.
माझा ऐका, जास्त विचार करू नका
भारत एके काळी खूप महान होता. पण आता नाही.
शिका मोठे व्हा, आणि हा देश सोडून जावा.
(निदान एखाद्या लोकल ट्रेन मध्ये बोंब स्फोट होऊन मरायची पाळी आपल्यावर न येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना)
एक दिवस जगात सर्वत्र भारतीय असतील, पण भारत कुठे नसेल.
अवांतर : आमच्या कडे एकदा एक कौल घेण्यात आला होता.
कि अमेरिका, चीन , पाकिस्तान पैकी कोणी भारतावर आक्रमण करून भारतावर राज्य केलेलं आवडेल.
(नाहीतरी शेवटी हे सगळे राजकारणी मिळून हा देश विकून खाणारच आहे.
पाकिस्तानला आक्रमण करून भारत जिंकायची काहीच गरज नाही,
ते फक्त अतिरेकी पाठवून देश काबीज करू शकतात.
आणि आपले पंतप्रधान फक्त निषेध, तीव्र निषेध, खलिते पाठवतील)
मी (नाईलाजाने) अमेरिकेला प्राधान्य दिलं.
आपण कोणाला प्राधान्य द्याल ?
28 Apr 2010 - 10:00 am | भारद्वाज
:S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S :S
:( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :( :(
:< :< :< :< :< :< :< :< :< :< :< :< :< :< :< :<
म्हणजे आपण सगळेच परप्रांतीय होवू !!!!
~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X( ~X(
28 Apr 2010 - 10:04 am | II विकास II
>>अमेरिका, चीन , पाकिस्तान
ही नावे वाचुन बरीच मौज वाटली.
अजुन बांग्लादेश, म्यानमार, उत्तर कोरीया अशी पण नावे पण टाकता येतील. ;)
बाकी चालुद्या.
इथे, भष्टाचारांबद्दल गप्पा मारणार्यापैंकी किती जण असे आहेत की ज्यांनी कधीच भष्टाचार केलाच नाही. असो.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
28 Apr 2010 - 10:41 am | आनंदयात्री
टारझन ला नविन मित्र मिळाल्याचे पाहुन अंमळ मौज वाटली !!
28 Apr 2010 - 11:48 am | इन्द्र्राज पवार
"....इथे, भष्टाचारांबद्दल गप्पा मारणार्यापैंकी किती जण असे आहेत की ज्यांनी कधीच भष्टाचार केलाच नाही. असो....."
श्श्री. विकास यांचा हा एक बिनतोड मुद्दा आहे, खरंच ! भ्रष्टाचार केला नाही, किंवा त्याला उत्तेजन दिले नाही असे देखील म्हणणारे फारच कमी असतील. मी स्वत: आमच्या ग्रुपच्यावतीने तसेच अन्य उपक्रमातून भ्रष्टाचाराविरुद्ध कोकलत असतो, पण ज्यावेळी माझ्या आजीच्या मृत्यूचा दाखला आणण्यासाठी महानगरपालिकेच्या बजबजपुरी असलेल्या कार्यालयात गेलो, त्यावेळी तिथे कळाले कि अशा "दाखल्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही...." (महानगरपालिकेच्या प्रशासनाने तसा फलक देखील दर्शनी भागावर लावला अआहे...) पण खरा दणका पुढेच होता, तो असा कि, जर दाखला लागलीच हवा असेल तर तेथेच घोंघावत असलेल्या आतील क्लार्कच्या "एजंट" ला २० रुपये दिले कि मयताचा दाखला चटकन मिळतो....आणि तसे २० रुपले मी दिलेसुद्धा (कारण वकिलांनी त्याच दिवशी तो दाखला आणायला सांगितले होते)....आणि दाखला मिळाला देखील. म्हणजेच भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारे पण या स्थितीला तितकेच जबाबदार !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
28 Apr 2010 - 12:42 pm | Dipankar
>>>शिका मोठे व्हा, आणि हा देश सोडून जावा.
मनोजराव भ्रष्टाचार मुक्त वातावरण सध्या प्रुथ्वीसोडून(हा शब्द कसा लिहायचा) सर्वत्र आहे
तुम्हाला परदेश जर तेथील जीवनशैली साठी खूणावत असेल तर भाग वेगळा, पण
भ्रष्टाचार मुक्त वातावरण ही अपेक्षा पूर्ण होणे अशक्य
गिरीश कुबेर यांचे अधर्म युद्ध हे पुस्तक वाचा, यात रोनाल्ड रेगन यांनी इराणला अपहरण झाल्येला अमेरीकन लोकांची सुटका करु नये (उद्देश वर्तमान अध्यक्ष निवडणूक हरावे) या साठी लाच कशी दिली याचे वर्णन आहे
29 Apr 2010 - 12:30 pm | इन्द्र्राज पवार
"पृथ्वी" असे लिहा...."pruthvi"
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
29 Apr 2010 - 4:24 pm | नितिन थत्ते
pRuthvI
नितिन थत्ते
7 May 2010 - 5:22 am | Manoj Katwe
भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?
हे माहित नाही.
पण कसाब सुटलेला मात्र नक्कीच बघायला मिळेल.