मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भ्रष्टाचारमुक्त भारत याची देही याची डोळा पहायला मिळेल का?

मितभाषी · · काथ्याकूट
हरि ओम मिपाकरांनो, सकाळमधील ही बातमी वाचली आणि डोके गरगरायला लागले. भारतासारख्या गरीब देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार कसा करु शकतात हि लोकं. तसेच येवढा जेसीबीने पैसा ओढण्यासाठी हवे असलेले अनिर्बंध अधिकार एकट्या माणसाला कसे दिले जातात. १८०० कोटींची संपत्ती आणि दिड टन सोन्याचे हे महाशय काय करणार होते. अशा भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा का होत नाही? खरे तर आर्थिक घोटाळे करणार्‍यांना अत्यंत कठोर शिक्षा करावयास हवी, पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. भारतातील अशी बडी धेंडं पकडुन त्यांचा काळा पैसा पायाभूत सुविधांसाठी का वापरला जात नाही? दर दिवसाला नवा घोटाळा उघडकीस येतो, काही दिवसांच्या चर्चेनंतर जनता हे सर्व विसरुन आपापल्या कामाला लागतात. भ्रष्टाचारमुक्त देश्/समाज निर्माण करण्यासाठी आपण काय करु शकतो? मोठया नोटांचा लोचा बन्द केल्यास यापासुन मुक्ती मिळेल का? यासारख्या एक ना अनेक प्रश्न आमच्या छोट्या डोक्यात कल्लोळ माजवतात. तुम्हाला काय वाटते. जस्ट शेअर.......

वाचन 7648 प्रतिक्रिया 0