प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.
----------------------------------------------------------------------------------------
सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
----------------------------------------------------------------------------------------
उद्या उठुन लचके तोडणार्या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?
----------------------------------------------------------------------------------------
तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.
----------------------------------------------------------------------------------------
(लेखन इतरत्र पुर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
24 Apr 2010 - 11:34 pm | विसोबा खेचर
हा हा हा! हे बाकी क्लासच! :)
बाकी काय बोलू आंद्या.. तुझी असली ही छोटेखानी मुक्तकं मला नेहमीच फार आवडत आलेली आहेत.. वाचतावाचताच मनात घर करून राहतात..
जियो...!
तात्या.
25 Apr 2010 - 12:03 am | टारझन
आंद्या भावा ... तिन वर्ष मागं घेऊन गेलास रे :( :)
क्लासिग सेंटिमेंटल !!
-(अंमळ हळवा) हवाईयात्री
25 Apr 2010 - 1:07 pm | रामदास
हम दोनोच्या गाण्याची आठवण झाली.
नंतर आणखी गाणी आठवतच गेली.
शेवटचं आठवलं ते चल बैठे चर्च के पिछे.
त्याच्या पुढच्या वर्षात बैल बडवला गेला आणि ....
25 Apr 2010 - 1:29 pm | llपुण्याचे पेशवेll
छान छान छान. काहीबाही छान लिहीलं आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
25 Apr 2010 - 2:46 pm | ज्ञानेश...
लिखाण आवडले !
25 Apr 2010 - 2:51 pm | डावखुरा
प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
:X 8>
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
25 Apr 2010 - 2:54 pm | दत्ता काळे
आवडलं.
25 Apr 2010 - 4:31 pm | घाटावरचे भट
मस्तच!!
25 Apr 2010 - 5:27 pm | वेताळ
शब्द अन शब्द खरा आहे. =((
वेताळ
25 Apr 2010 - 5:42 pm | अनिवासि
Really enjoyed this little piece and some of the comments. I am new to this site. Am still learning to type in Marathi and having trouble with some letters. Once I master the craft- will write in Marathi.
In the meantime-- this piece took me bal some 50-55 years! thanks for the memories!
anivasi
25 Apr 2010 - 6:02 pm | सुबक ठेंगणी
नाही. माझ्यामते एका सुखातून पुढचं निर्माण करत जायचं. बस!
छान 'आनंदयात्री' सिग्नेचर मनोगत! आवडलं.
25 Apr 2010 - 6:10 pm | मस्त कलंदर
सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
:(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Apr 2010 - 6:43 pm | पर्नल नेने मराठे
#o
चुचु
25 Apr 2010 - 9:39 pm | प्रभो
झकास रे आंद्या!
25 Apr 2010 - 10:59 pm | धमाल मुलगा
हा आनंदयात्री मोठा अजब माणुस आहे.
खरडवहीमध्ये, खरडफळ्यावर मोठा दंगामस्ती-विनोद करुन हसवतो आणि ज्या गोष्टीला लेखही म्हणता येणार नाही अशी लांबी असलेल्या पाच-पंधरा ओळी लिहुन टचकन डोळ्यातुन पाणी काढतो. :(
लेख म्हणावा तर एव्हढास्सा....पण हातभर लांब लिहिलेल्यापेक्षा बेक्कार भिडतो. साला, ह्या माणसाला 'दर्द' ह्या भावनेची नस अचूक सापडते. आमच्यासारखा दगडालाही आतुन हलवण्याची ताकद असणारी ही लेखणी थांबवु नका पंत.....
लिहिते रहा!
तुमची ही स्फुटं वाचुन आमच्यासारख्या पाषाणहृदयींना 'आपणही माणुसच आहोत की' ही जाणिव होते हेच तुमच्या लेखनाचं यश!
जियो आंद्या...जियो!
25 Apr 2010 - 11:36 pm | इनोबा म्हणे
खरडवहीमध्ये, खरडफळ्यावर मोठा दंगामस्ती-विनोद करुन हसवतो आणि ज्या गोष्टीला लेखही म्हणता येणार नाही अशी लांबी असलेल्या पाच-पंधरा ओळी लिहुन टचकन डोळ्यातुन पाणी काढतो.
खरं आहे भाऊ. कधी कधी तर याला काय प्रतिसाद द्यावा हेच कळत नाही.
26 Apr 2010 - 11:26 am | निखिल देशपांडे
हा आनंदयात्री मोठा अजब माणुस आहे.
हे असे हळवे करणारे लिखाण आंद्यानेच करावे...
डोळ्यातुन पाणी काढतो...
बाकी ते सुख वापरणे वाक्य क्लासच
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
26 Apr 2010 - 12:09 am | शुचि
>>प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ? >>
सुधारणा - प्रेम ही चीज हे रसायनच मोठं अद्भुत आहे ... कमाल आहे.
लेख मस्तच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
26 Apr 2010 - 8:01 am | डॉ.प्रसाद दाढे
मस्त आहे, आवडला लेख!
26 Apr 2010 - 8:19 am | बेसनलाडू
कधीकधी अफूच्या गोळीने येणारी हवीहवीशी नशा वाटावेसे लेखन. आवडले.
(व्यसनी)बेसनलाडू
26 Apr 2010 - 3:35 pm | टुकुल
आंद्या, लेका तु लिहितोस कमी आणी विचार जास्त करायला लावतोस, तुझा लेख म्हंटल कि वाचला तरी त्रास आणी न वाचला तरी :-D.
--टुकुल
26 Apr 2010 - 3:42 pm | धमाल मुलगा
खरंय. च्यायला, हा माणूस लिहायला बसताना नक्की काय खाऊन बसतो ते पहायला हवं एकदा :)
26 Apr 2010 - 3:50 pm | बिपिन कार्यकर्ते
मी वाचलाच नाही. ;)
बिपिन कार्यकर्ते
26 Apr 2010 - 4:09 pm | रानी १३
मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'.
शब्द अन शब्द भिड्तो मनाला!!!!! मस्त लेख!
26 Apr 2010 - 4:11 pm | अश्वत्थामा
उद्या उठुन लचके तोडणार्या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?.
वाह!
-अश्वत्थामा
27 Apr 2010 - 7:06 pm | जोश्या
अप्रतिम
मला ७ वर्शापुर्विचे अम्चे दिवस अथ्वले पन सुदैवने आम्च्या दिशा ,रस्ता अनि सन्गत बदललि नहि