स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ?

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
22 Apr 2010 - 10:29 am

स्वामीं ! तुम्ही सुद्धा ? ? ?

टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, कानोंकानी खबर आली,
xxxx स्वामींना गुन्हयासाठी अटक झाली.
मोर्चा, लाठीमार, सारं काही झालं.
पोलिसांनी तरी त्यांना गजाआड केलं !

भरल्या घरची लेक, *पोटुशी राहिली होती.
अन स्वामींची तक्रार, पोलिसांत नोंदली होती.
जमानत ! सुटका ! ! सारं रीतसर झालं ! ! !
स्वामींनी सगळं कसं सहज “म्यानेज ” केलं !

भरल्या घरच्या लेकीला “ गुरुमाय ” केलं.
अन संग संग विमाननं “फॉरेन “लाही नेलं !
वासनेच्या घरांतच महात्मेही वसतात
महात्म्यांचे पाय सुद्धा मातीचेच असतात ! ! !

*पोटुशी = गर्भवती

निरंजन वहाळेकर

कविता

प्रतिक्रिया

पिंगू's picture

22 Apr 2010 - 12:12 pm | पिंगू

अगदी अचूक मर्मभेदी!!!!!