ही लपवाछपवी कशाला?

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
21 Apr 2010 - 6:14 am
गाभा: 

टोपणाचं काम फक्त बूचासारखं, बाटलीबंद करून आतल्या द्रावाची ओळख लपविण्यापुरतं !
मी म्हणतो हे झाकण आपल्या ओळखीला तुम्ही लावताच का म्हणून ? अरे आपण सिँहाचे छावे आहोत, समोरासमोर गर्जना करायची आपण ! आपण सगळे मराठमोळे मावळे आहोत, खऱ्‍या समशेरी घेऊन हल्ला करायचा आपण ! आपल्या आवाजात आसमंत दणाणून टाकणारी जरब असावी, वाघांची ती डरकाळी व्हावी,मांजराची मँव मँव नाही !
मग कशाला हे वाघाचं बेगडी कातडं पांघरता? ही लपवाछपवी कशासाठी? अरे स्वतःची ओळख ठासून सांगा.. अशी पुळचट अन् हसण्यावारी नेणारी नावे धारण करून स्वतःचं व्यक्तिमत्त्व दुभंगू देऊ नका. जे बोलायचंय ते स्वतःच्या खऱ्‍या ओळखिनिशी बोला. उद्या कुणी विचारले तुम्ही कोण तर मि.पा. वर लिहिणारा मी बुळचट ससा आहे अशी ओळख सांगावी लागू नये म्हणजे मिळवली!
प्रत्येकाकडे उत्तम प्रतिभा आहे, ती अशा ढक्कणाखाली झाकून ठेऊ नका. कोंडलेली वाफ स्वतःच्या ओळखीने प्रकट करा... वाघनख्या धारण करून गुदगुल्या करू नका म्हणजे झालं.
टोपण नावांचे फायदे तोटे यावर सन्माननीय मिपा करांनी स्वओळखीने चर्चा करावी...

प्रतिक्रिया

शुचि's picture

21 Apr 2010 - 6:38 am | शुचि

आभासी जग हे खर्‍या जगापासून वेगळं, स्वप्नवतच असलं पाहीजे. इथेदेखील आडनावं, नावं असतील सगळ्यांना तर ऑफीसात आल्यासारखं वाटेल.

इथे मला मोकळेपणा पाहीजे, फॅन्टसीमधे रमता आलं पाहीजे, आणि नंतर त्याबद्दल मला कोणी जाब विचारता कामा नये. म्हणून टोपणनाव पाहीजे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

राजेश घासकडवी's picture

21 Apr 2010 - 7:11 am | राजेश घासकडवी

एक फेमस वाक्य आठवलं.

'विलियम शेक्स्पिअरची नाटकं त्याने लिहिलेली नसून त्याच नावाच्या दुसऱ्या एका माणसाने लिहिलेली आहेत.'

एक नाव व दुसरं नाव यात फरक काय? खरं नाव सांगितल्याने तुम्ही मला अधिक कसे 'ओळखू' शकाल? मुळात 'खरं' - म्हणजे जन्मत: दिलेलं, सरकारी रजिस्टर केलेलं, फोनबुकमध्ये असणारं - हे जास्त चांगलं कसं? आपणच स्वत:ला बहाल केलेलं वाईट कसं?

राजेश घासकडवी
(हे माझं खरं नाव कशावरून? त्यात काही आयड्या नाक वर करून तुम्ही किती? असंही विचारतात...)

Nile's picture

21 Apr 2010 - 8:16 am | Nile

'विलियम शेक्स्पिअरची नाटकं त्याने लिहिलेली नसून त्याच नावाच्या दुसऱ्या एका माणसाने लिहिलेली आहेत.'

म्हणुनच बिलंदर 'व्हॉट्स इन नेम' म्हणुन गेला बरंका!

टोपण नाव घेण्यात काहीच चुक नाही, पण अनेक टोपण नावं घेणारे तमाशाबाजच असावेत काय? ;)

निखिल देशपांडे's picture

21 Apr 2010 - 9:54 am | निखिल देशपांडे

टोपण नाव घेण्यात काहीच चुक नाही,
मगं खर नाव घेण्या मधे आहे का ;)
असो ज्याला घ्यायचे ते नाव घ्या...
एखाद्याला मी मिसळपाव वर लिहिणारा बुळचट ससा मी म्हणायला काही वाटत नसेल... नाव काहिही घ्या हो...

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

Nile's picture

21 Apr 2010 - 9:56 am | Nile

नाव काहिही घ्या हो.

नाव घेताय? घ्या घ्या.

बाकी खरं नाव घेण्यात काय आहे हे पुन्हा नाही सांगत. ;-)

मिसळभोक्ता's picture

21 Apr 2010 - 9:59 am | मिसळभोक्ता

दिवटे साहेब,

तुमच्या धैर्याचे कौतुक वाटते.

माझे आडनाव दिवटे असते, तर मी टोपण नावानेच लिखाण केले असते.

माय नेम इज भोक्ता. मिसळ भोक्ता.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Nile's picture

21 Apr 2010 - 10:03 am | Nile

=)) =))

प्रियाली's picture

21 Apr 2010 - 10:42 pm | प्रियाली

बर्‍याच दिवसांनी दह्यास योग्य विरजण सापडले.

टारझन's picture

21 Apr 2010 - 10:53 pm | टारझन

आगायायायाया =)) =)) =)) =)) बाजार उठला =))

बाकी लेखाबद्दल आनंदी आनंद गडे :)

- डॉ. सखाराम पावटे

छोटा डॉन's picture

21 Apr 2010 - 11:34 pm | छोटा डॉन

>>माय नेम इज भोक्ता. मिसळ भोक्ता.
=)) =))
त्यापुढे एक राहुन गेले की ...
"माय नेम इज भोक्ता & आय एम नॉट (मिपा) द्वेष्टा ! " ;)
(पळा तिच्यायला ... )

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

अरुण मनोहर's picture

21 Apr 2010 - 10:02 am | अरुण मनोहर

खरे, खोटे, टोपण, ढक्कन
काहीही नाव घ्या. पण ईतरांना नावे ठेवू नका.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Apr 2010 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरं नाव म्हणजे नक्की काय? जे नाव कागदावर आहे ते नाव का ज्या नावाने चार लोकं तुम्हाला ओळखतात ते नाव?
काही लोकांची टोपणनावंच एवढी प्रसिद्ध आहेत की मराठी आंतरजालाबाहेर बोलतानाही त्यांना त्यांच्या टोपणनावानेच ओळखतात. पिडांकाका हे पिडांकाकाच आहेत, त्यांचं खरं नाव सांगितल्यावर कळणारही नाही. तसेच मुक्तसुनीत, चतुरंग इ.इ.
आपलं व्यक्तीगत आयुष्य आणि आपलं जालीय आयुष्य वेगवेगळं ठेवण्यासाठी घेतली टोपणनावं, काय फरक पडतो? केशवसुत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवकुमार ही सगळी टोपण नावंच होती ना? बालगंधर्वांचं खरं नाव काय असं विचारल्यावर आठवावं लागतं ना?
त्यातून, लोकांनी काय करायचं, काय नावाने कुठे वावरायचं हे आपण काय अधिकाराने दुसर्‍याला सांगणार?

(खोट्या-खर्‍या नावाची) अदिती

अवांतरः राजेश, तुम्ही एकच का अनेक? ;)

टोपण नाव घेण्यास काही हरकत नाही....!
उगाचच का हा कांगावा चालु आहे :)
कुणाला काय घ्यायचे ते घ्या...पण चांगले वाचनीय लेख येउ द्यात...!

मितभाषी's picture

21 Apr 2010 - 2:09 pm | मितभाषी

आमचा दिवट्या चिरंजीव मिपावर बोगस नावाने वावरत आहे.
कुणाला आढळल्यास संपर्क करा.

त्याच्या फार जवळ जावु नका कारण तो 'ढोरांचा डोक्टर' आहे. सुइ लांबुनच फेकुन मारतो. त्यामुळे सावधान.

पेशंट भावश्या.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Apr 2010 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

काल रात्री ब्रँड बदलला होता का काय ?

अवांतर :- "सिँहाच" ह्या शब्दाचा उच्चार कसा करायचा ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सन्जोप राव's picture

22 Apr 2010 - 5:13 am | सन्जोप राव

नावात 'डॉ', 'दि' आणि 'टे' ही तीन अक्षरे आली की माणूस कायच्याकाय भरताड लिहित बसतो असे आमचे निरिक्षण आहे.
सन्जोप राव
इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे?
शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो's picture

22 Apr 2010 - 5:19 am | प्रभो

ठ्यॉ.. =))

बेक्क्कार होता हा..

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Apr 2010 - 7:23 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री दिवटे, (पदव्या लिहिण्याचा बिनडोक चाळा आधी घालवा) बर्‍याचवेळा मावळे गुपचूप शत्रू गाफिल असतांना हल्ला करत असे वाचले आहे. बाकी तलवार, सिंह, मावळे इ. विषयी इतके प्रेम असल्यास स्वत:चे सदस्यनाम मावळा दिवटे असे घ्यायला हवे होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Apr 2010 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी सहमत.

सन्जोप रावांचे निरीक्षण लै बेक्कार!

अदिती

नितिन थत्ते's picture

22 Apr 2010 - 10:24 am | नितिन थत्ते

डॉ. श्रीराम दिवटे हे डॉ. दिलीप बिरुट्यांचे टोपण नाव आहे का?

नितिन थत्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2010 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>डॉ. श्रीराम दिवटे हे डॉ. दिलीप बिरुट्यांचे टोपण नाव आहे का?

च्यायला, या थत्त्यांना काही कामं दिसत नाही. [ह.घ्या.] :)

बरं झालं या धाग्याकडं लक्षं गेलं. नै तर कैच्या कै समज झाले असते.
दिवटे वेगळे आणि बिरुटे वेगळे. खुलासा संपला.

-दिलीप बिरुटे

मावळ्यामध्ये सुध्दा गुप्तहेर होते. टोपननावाने वावरणारे.
त्यांच काय करायच??????

(दिवट्या बुधल्या ) भावश्या.

इन्द्र्राज पवार's picture

22 Apr 2010 - 2:13 pm | इन्द्र्राज पवार

डॉक्टर दिवटे यांचे विचार चांगलेच आहेत, पण तरीही आंतरजालीय जग यांच्या काही संकल्पना (ज्या जगभर विविध भाषेत चालत आहेत) आहेत तीमध्ये "टोपण नाव" ही बाब गृहीत धरली असते, आणि तशी ती निरुपद्रवी बाब आहे. (इंग्लंड, अमेरिका येथील काही इंटरनेट साईट्स पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने लक्षात येईल.) वैचारिक देवाणघेवाण करताना अशा बाबी दुय्यम मानल्या जातात. नाव काय घेतले आहे, ते खरे आहे का, की आपल्या प्रमाणपत्रीय नावानेच व्यक्ती इथे व्यवहार करते का? या बाबी तितक्याशा महत्वाच्या नसून त्याचे येथील योगदान किती व कोणत्या दर्जाचे आहे हा खरेतर येथील उपस्थिती बाबतचा कळीचा मुद्दा व्हायला हवा. नाव "विवेकानंद" आणि बोलताना "आयला, मायला" शिवाय पुढे सरकत नाहीत, अशी उदाहरणे आपणास हरदिनी आपल्याच वस्तीत पाहायला मिळतातच ना ! येथे शेकडो सदस्य मूळ आणि स्वीकृत नावाने वावरताना दिसतात, परंतु याचा अर्थ असा नाही की हे सर्वचजण एकमेकात आदान प्रदान करतात. मैत्री अशांचीच होऊ शकते की, ज्यांचा येथील सहभाग हा अभ्यासू आणि निरोगी पातळीवरील आहे.

माझे खरे नाव "इंद्रराज पवार" असेच आहे आणि येथील व्यवहारासाठी माझ्या "वैयक्तिक माहिती" या पानावर सर्व प्रकारची सत्य माहिती मी दिलेली आहे तेंव्हा लपवाछपवीचा प्रश्न निदान माझ्या बाबतीत तरी मी येऊ दिलेला नाही. असे असूनही या पद्धतीत काही वावगे आहे असे वैयक्तिकरीत्या मला वाटत नाही. नेट राहू दे, आपल्या मराठी भाषेत आपण "गोविन्द्राग्रज, बालकवी, केशवकुमार, कुसुमाग्रज, विंदा, सख्याहरी, अज्ञातवासी, माधव जुलिअन, बी, गिरीश, संजीवनी" अशी नावे स्वीकारून त्यांचा आदर केलेला आहेच ना?

इथे पु. ल. देशपांडे यांच्या "असा मी असामी" ची आठवण येते. तिथेही "नावात काय असते?" या वर झकास भाष्य आहे ~~~ "आमचे नाव कसे का असेना, शेवटी जो तो आपल्या परीने जगत असतोच. नाहीतरी नाव लावायचे "भोसले" आणि चालवायची पिठाची गिरणी, याला काय अर्थ?" ---- हा खास पु, लं. फटका !

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2010 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरीजनल नावाचे तोटे आणि टोपणनावाचे फायदे होतात असे वाटते. :)

>>>>नावात 'डॉ', 'दि' आणि 'टे' ही तीन अक्षरे आली की माणूस कायच्याकाय भरताड लिहित बसतो असे आमचे निरिक्षण आहे.

=)) =)) =)) =)) मेलो.

स्वगत : 'आजच्या पुरुष प्रतिमा भाग एक' असे लिहावेसे वाटत आहे.

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.श्रीराम दिवटे's picture

22 Apr 2010 - 6:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे

लपवाछपवीच्या प्रश्नाला अनेक हितचिँतकांनी बरीच नवनवीन माहिती दिली त्याबद्दल सर्व मिपा सदस्यांचे जाहीर आभार!
ज्यांनी टोपणनावांची टोपी घालून माझी टर उडवली, त्यांना मनापासून धन्यवाद! आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो की त्यांनीही माझे खरेखुरे नाव शोधावेच...
दुवा-मी त्यांच्यापैकीच एक आहे!