काही आठवत नाही

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
11 Apr 2008 - 5:51 pm

ही कविता मी ११ वीत असताना वाचली होती

एक तारका हवी होती
आकाश सजविण्यासाठी
एक स्पर्श हवा होता
धु॑द क्षण जगण्यासाठी
एक तुच हवी होतीस
मला साथ देण्यासाठी

कविता

प्रतिक्रिया

मनापासुन's picture

11 Apr 2008 - 5:56 pm | मनापासुन

११ वीत असताना ......
एक तुच हवी होतीस
मला साथ देण्यासाठी
मला उगीच वाटले होते की सरकारने लग्नाचे वय कमी करायची उगीच शिफारस केली. बहुदा हे विचार तुम्ही लिहीण्या अगोदर त्याना कळले असावेत.

पिवळा डांबिस's picture

12 Apr 2008 - 4:12 am | पिवळा डांबिस

एक स्पर्श हवा होता
धु॑द क्षण जगण्यासाठी

हल्ली अकरावीत काय काय मस्त शिकवतात! मजा आहे बॉ तुमची!!
बघतांय ना, प्रमोदकाका, चतुरंगजी?
आमच्याकाळी कबिराचे दोहे, तुलसीरामायणातले उतारे वगैरेच शिकवायचे!:(((
प्रोफेसरणीपण अगदी भांडी-कपडा असायच्या!!:(((
हल्लीच्या सारख्या सुस्वरूप (टंच म्हणणार होतो, पण... जाऊद्या!!) नव्हत्या!!

हल्लीच्या पिढीचा मत्सर करणारा,
पिवळा डांबिस

आनंदयात्री's picture

12 Apr 2008 - 7:04 am | आनंदयात्री

आहे कविता, कवितेचा लेखक कोण आहे ?

फटू's picture

12 Apr 2008 - 9:11 am | फटू

अकरावीतल्या वयाइतकीच हळूवार...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो
मी शोधतो किनारा...