लीलो चेवडो म्हणजे हिरवा चिवडा
साधन सामुग्री : कच्ची पपई , हिरव्या मिर्च्या , मीठ , शेंग दाणे ,मनुका, बेदाणे,कडीपत्ता,साखर ,मोहरी, चाट मसाला ,तेल , कढई , गॅस ई.
प्रथम कच्ची पपई साले काढुन बटाट्याचा खीस करतात तशी किसुन घ्यावी. खीस मिठाच्या पाण्यात टाकावा. साधारण तासाभरानन्तर पाणी काढुन टाकावे. व कापडावर खीस सुट्टा करुन वाळवावा.
तेल कडक तापवुन घ्यावे. त्यात वाळलेला खीस तळावा. यात चवी प्रमाणे हिरव्या मिर्च्याचे तिकडे तळतानाच टाकावे.
शेंगदाणे ,मनुका, कडीपत्ता ,तळुन त्यात टाकावा.
आवडत असल्यास मोहोरी, हिन्ग ची फोडणीत टाकु शकता.
चवीनुसार पीठी साखर, चाट मसाला टाकावा.
हा पदार्थ उपासाला चालतो. वाळलेला खीसनसल्यास तो रताळ्याच्या खीसा प्रमाणे शेंगदाणाकुट घालुन ओला खीस ही बनवतात
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 1:42 pm | विसोबा खेचर
पाकृ बाकी सह्हीच वाटते आहे. धन्यवाद विजूभाऊ!
तात्या.
11 Apr 2008 - 6:57 pm | डॉ.प्रसाद दाढे
हा पदार्थ उपासाला चालतो.
उपास आणि चकणा?? दोन अगदीच विरूद्धार्थी शब्द आहेत हो! ;)
बाकी पाक-कृती चा॑गली आहे, करून पाहिली पाहिजे
11 Apr 2008 - 7:20 pm | इनोबा म्हणे
हा पदार्थ उपासाला चालतो.
म्हणजे हा उपासाचा चखणा आहे तर...
उपासाला चालणार्या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
12 Apr 2008 - 3:32 am | पिवळा डांबिस
उपासाला चालणार्या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :)
आरं उपासाच्या दारूची रेसेपी कशाला? आरं वाईन! वाईन!!
आसं बघ, वाईनमध्ये काय आसतंय?
द्राक्षं = उपासाला चालतात
साखर - उ. चा.
यीस्ट - उ. चा. (उदा. दही, श्रीखंड)
पाणी - उ. चा.
म्हंजी वाईन उपासाला चालत्ये!!
आरं ख्रिस्ती लोकांत तर चर्चमध्येबी वाईन चालतेय!!
चिअर्स!!!
11 Apr 2008 - 7:21 pm | केशवसुमार
विजूभाऊ..
असाच एक पदार्थ थायलंड मध्ये मिळायचा..सोम डुम एकदम झकास लागते हे सालाड..
बरोड्यात ढोकळ्या बरोबर एक हिरव्या पपईची चटणी मिळते ती एकदम अप्रतिम लागते..
केशवसुमार
11 Apr 2008 - 7:25 pm | वरदा
बटाट्याऐवजी कच्ची पपई घेतली की बाकी प्रोसीजर बर्यापैकी सेम आहे...मस्त करुन पाहिला पाहिजे...तुम्ही केला असेल तर जरा कुरीयर टाका की इथे:))))))
11 Apr 2008 - 11:46 pm | रामदास
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?.सामान्य ज्ञानाची हौस भागवण्यासाठी प्रश्न विचारत आहे.
13 Apr 2008 - 7:37 pm | विजुभाऊ
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?.
अजिबात नाहीत. चवाणु म्हणजे मुखशुद्ध्ही साठी वापरतात त्याला चवाणु म्हणतात. यात खरबुजाच्या बिया/ बडीशेप/ जिरे वगैरे भाजुन टाकलेले असते
"चबिना" हा एक पदार्थ असतो . तांदळापासुन चुरमुरे करतात तत्सम .चखान्याच्या जवळ जातो. पण हा पदार्थ आता इतिहास जमा झाला आहे.
आमच्या गल्लीत एक बाई हा पदार्थ बनवायच्या. त्याची रेसीपी त्यांच्या सोबतच गेली.कोणाला ठाउक असेल तर पहातो.
च़खणा नावाचा कोणाताही पदार्थ आस्तित्वात नाही. हा शब्द पंजाबी लोकानी आणला " साथ मे चखने को क्या है" या प्रश्ना नन्तर "चखणा" हा शब्द मराठीत आला
12 Apr 2008 - 12:19 am | प्राजु
वरदा, मलाही असेच वाटते. बटाटा किंवा रताळ्या ऐवजी पपई.. कल्पना मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Apr 2008 - 7:08 am | मानस
विजुभाऊ
बडोद्याची आठवण झाली. फार सुरेख लिल्लो चिवडो मिळतो तिथे. तसा बर्याच ठिकाणी मिळतो, पण कुठलंतरी एक दुकान फारच प्रसिद्ध आहे. नाव आता खरच आठवत नाही. बर्यांच वर्षांत बडोद्यास जाणे नाही.
एकदा करून बघेन. अर्थात ह्या देशात पपई मिळणं जरा अवघडच. प्रयत्न नक्की करेन.
असो, जुन्या आठवणींना उजाळ्या दिल्याबद्दल धन्यवाद.
मानस
13 Apr 2008 - 12:51 am | स्वाती राजेश
विजुभाऊ, रेसिपी रताळ्याच्या आणि बटाट्याप्रमाणे आहे.
पण पपई ची कल्पना मस्तच, करून पाहिले पाहिजे.
बाकी अशाच आयडिया येऊ देत.:))))
17 Apr 2008 - 11:31 pm | पिस्तुल्या
आम्हाला चकणा फक्त एकाच गोस्ग्टीसाथि लागतो तो म्हणजे ते तुम्ही समजुन घ्या.