विसंगती..

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
16 Apr 2010 - 2:23 am

फुललेल्या पळसाच्या सौदर्याची बात न्यारी!
पण पळसास आस, तेव्हा पानांचीच खरी..

झाड तुटे - तुटे जीव, घरटीही उलथती..
मी, नुसताच बघ्या.. सल लागतो जिव्हारी

विसंगती जीवनास पाचवीला पुजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्या(च) उरी

वादळाचा तिढा, आता कुणी कसा सोडवावा..
पणतीस तेवतांना बघण्याची ईच्छा धरी!

भुकेल्यास अन्न देता मनी नाही समाधान..
हिशेबात पुण्य येई.. अशी मनाची पायरी..

हसू राखतो जरासे.. तडजोड जगण्याशी
पण रोकडे सवाल.. ओघळती गालांवरी

राघव

कविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

16 Apr 2010 - 2:30 am | टारझन

साधी शिंपल कविता !! उगाच कोणते अवजड शब्द नाहीत .. ना इमोसनल अत्याचार @
म्हणुनंच आवडली !!
थँक्स राघव .. बाकी पेंटिंग बंद केलंस की काय भावा ?

- (चिक्कन) मागव

राघव's picture

16 Apr 2010 - 2:33 am | राघव

धन्यवाद!
सध्या तरी बंदच आहे रे.. फुरसतच मिळत नाही तेवढी! :(

राघव