तुझा हात सोडून पुढे जाताना,
एक क्षणभरच..
त्या वळणावर रेंगाळले..
आणि मग आठवल्या...,
त्या सावल्या ...!
तुझ्या असण्याच्या...
तुझ्या असण्यात माझ्या...
हलकेच विरघळण्याच्या...!
वेड्या सावल्या...
माझ्याभोवती फेर धरून नाचणार्या...
नाचता नाचता अलगद..
तुलाही खुणावणार्या...
मग तुझ्याशी खेळता खेळता...
मलाच विसरणार्या...
या अशा का गं?
आपल्या आपल्या म्हणताना..,
क्षणात परक्या होणार्या...
मी विचारलं...
माझ्या सावलीला...,
तर मलाच विचारते...,
......,
......,
प्रेम खरंच वेडं असतं का गं?
विशाल
प्रतिक्रिया
15 Apr 2010 - 2:35 pm | निरन्जन वहालेकर
तुझ्या असण्याच्या...
तुझ्या असण्यात माझ्या...
हलकेच विरघळण्याच्या...!
वेड्या सावल्या...
वा ! ! ! कुलकर्णी साहेब ! क्या बात है ! ! !
अतिशय सुरेख कविता ! ! खूप ...खूप ...खूप ............ आवडली
15 Apr 2010 - 5:28 pm | विशाल कुलकर्णी
मन:पूर्वक आभार निरंजनजी ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
15 Apr 2010 - 11:36 pm | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू