मळमळ

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
26 Sep 2007 - 1:45 am

आमची प्रेरणा अमोल शिरसाट यांची सुरेख गझल दरवळ

कशी समजली माझी वळवळ
मलाच होते ठाउक केवळ.

सहन कराया कळ प्रसवाची
भगवंता दे आध्यात्मिक बळ

कथा वाचता सर्वा पटले ....
ही कोणाची आहे मळमळ .

प्रतिसादाने उठले वादळ
इथे अचानक झाली खळबळ!

कितीक द्यावी स्पष्टीकरणे...
हा नाही हो माझा दरवळ

कसे विसरलो अपुले मी वय...
मला लागला का आहे चळ?

मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ

मरशिल मेल्या "केश्या" आता
लावून पाय *डीला पळ

विडंबन

प्रतिक्रिया

सर्किट's picture

26 Sep 2007 - 1:59 am | सर्किट (not verified)

सहन कराया कळ प्रसवाची
भगवंता दे आध्यात्मिक बळ

मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ

मरशिल मेल्या "केश्या" आता
लावून पाय *डीला पळ

खरंच पळ !!!

अरे, मस्त आहे रे विडंबन..

- सर्किट

विसोबा खेचर's picture

26 Sep 2007 - 7:46 am | विसोबा खेचर

कसे विसरलो अपुले मी वय...
मला लागला का आहे चळ?

मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ

मरशिल मेल्या "केश्या" आता
लावून पाय *डीला पळ

केश्या मेल्या, खरंच पळ! :)

झकास विडंबन..

तात्या.

आजानुकर्ण's picture

26 Sep 2007 - 8:29 am | आजानुकर्ण

:)

सहज's picture

26 Sep 2007 - 9:08 am | सहज

ये हूई ना कूछ बात.

आम्ही वेळी अवेळी कूठे भटकत नाही म्हणून "दरवळ" माहीत नव्हती त्यामूळे आम्हाला तरी हे वोरीजनल वाट्ल बघा. :-)

--------------------------------------
जो जे वांछील तो ते लाभो. न मिळाले तर काव्य प्रसवो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2007 - 8:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवसेठ आपली विडंबने आम्हाला आवडतात.
पण केवळ वळ,पळ,बळ,असे शब्द वापरले म्हणजे विडंबन होत नसावे.

''तुला बिलगुनी आला वारा
इथे अचानक सुटला दरवळ!''

याचे काय विडंबन होणार , वरील ओळी ग्रेट आहेत !
लिहिणार नव्हतो पण आमची मळमळ सांगणार कोणाला म्हणून जरा स्पष्ट लिहिले किंवा विडंबनाचे आकलन आम्हाला नसावे म्हणूनही तसे होण्याची शक्यता आहे ! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

26 Sep 2007 - 8:45 am | बेसनलाडू

मळमळ सांगून(ही) काही फायदा व्हायचा नाही, हे माहीत असूनही राहवले नाही, म्हणून प्रतिसादाची ओकारी केली आहे. पुढील विडंबन यापेक्षा बेहतर असेल, अशी आशा करतो. तोवर
लावून पाय *डीला पळ
हेच उत्तम!
(हितचिंतक)बेशनशेठ

रंजन's picture

26 Sep 2007 - 8:56 am | रंजन

मळवळ .. बरे औषध घ्या . विडंबन चालू द्या.

बेसनलाडू:- ओ़कार्‍या करून वातावरण दूषित होते.. जरा सांभाळा.
राहवत नाही आणि स्वतः काही करवत नाही, ही स्थिती महाभयंकर वाटते. ओकारीने तुमची सुटका.. इतरांचे काय? जाऊ द्या. हे माझे स्वगत समजा.

बेसनलाडू's picture

26 Sep 2007 - 9:02 am | बेसनलाडू

बेसनलाडवाच्या गोडव्याचा इतिहास फार थोड्या जणांनाच ठाऊक आहे, असे वाटते. ही दर्पोक्ती नाही आणि दावा(तर मुळीच) नाही. मात्र एखाद्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार दिलेल्या मतावर प्रतिक्रियेची पिंक टाकताना येत्या काही दिवसात राहवत नाही आणि स्वतः काही करवत नाही, ही स्थिती महाभयंकर वाटते या विधानाने आपलेच दात घशात गेले नाहीत म्हणजे मिळवली. सावधगिरी बाळगा म्हणजे औषधपाण्याचा खर्च वाचेल :)
(वैदू)बेसनलाडू

धम्मकलाडू's picture

27 Sep 2007 - 10:31 pm | धम्मकलाडू

बेसनलाडवा तिरप्या प्रतिसादांचा बादशहा हायस की रं गड्या.

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 11:18 pm | बेसनलाडू

येथे 'तिरप्या'वर श्लेष आहे काय? असल्यास धन्यवाद ;)
(आभारी)बेसनलाडू

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 3:11 am | धम्मकलाडू

श्लेष नाही रं गड्या. आता व्हउन जाऊ दे आनखी योक तिरपा प्रतिसाद.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 3:42 am | बेसनलाडू

आता तुमी म्हनलात तर दिउनच टाकतु यक ;) ग्या!!
(त्यिर्पा)ब्येसनलाडू

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 11:13 am | धम्मकलाडू

हं आनखी योक मर्दा.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 11:52 am | बेसनलाडू

घ्या. आनखी?

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:01 pm | धम्मकलाडू

आनखी.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:03 pm | बेसनलाडू

घ्या

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:12 pm | धम्मकलाडू

योक घे बाश्शा!

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:14 pm | बेसनलाडू

काय लिहिलेत मला कळले नसले तरी फॉर द सेक ऑफ नडानडी नडताय, तर मीही नडूनच घेतो ;)

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:15 pm | धम्मकलाडू

योक दे बाश्शा.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:17 pm | बेसनलाडू

योक!

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:22 pm | धम्मकलाडू

आनखी.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:25 pm | बेसनलाडू

आनखी?

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:26 pm | धम्मकलाडू

योक.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:26 pm | बेसनलाडू

आन्खी?

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:27 pm | धम्मकलाडू

यड लागलंया. आन्खी योक.

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:27 pm | धम्मकलाडू

आन्खी योक.

बेसनलाडू's picture

28 Sep 2007 - 1:28 pm | बेसनलाडू

तरच 'आनखी' देईन. तोवर बसा बोंबलत ;)

धम्मकलाडू's picture

28 Sep 2007 - 1:29 pm | धम्मकलाडू

योक.

प्रमोद देव's picture

26 Sep 2007 - 8:43 am | प्रमोद देव

विडंबन सम्राट केशवसुमार ! हेही विडंबन मस्तच झालेय,

आणि सहजराव..
जो जे वांछील तो ते लाभो. न मिळाले तर काव्य करो......
इथे 'काव्य करो' च्या ऐवजी 'प्रसवो' नाही का चालणार?

प्राजु's picture

26 Sep 2007 - 9:40 pm | प्राजु

शाल जोडितून मारलेले समजले....

छान विडंबन..

- प्राजु.

प्रियाली's picture

27 Sep 2007 - 2:18 am | प्रियाली

शाल जोडितून मारलेले समजले....

मला वाटलं की फक्त जोड्यानेच हाणले आहे. :))

सही विडंबन! मी वाचलंच नव्हतं आधी... असं कसं राहून गेलं!

कृपा माऊलीची की आज वाचलं.

कसे विसरलो अपुले मी वय...
मला लागला का आहे चळ?

मला माउली म्हणते आता
भोग आपल्या कर्माचे फळ

हे तर अगदी भन्नाटच!

धोंडोपंत's picture

26 Sep 2007 - 10:09 pm | धोंडोपंत

वा वा केशवसुमार,

झकास विडंबन. मजा आली.

अशाच ग़ज़ला येथे याव्या
"पोस्टमनाची" नकोच जळजळ

आपला,
(शीघ्रकवी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु's picture

27 Sep 2007 - 1:17 am | प्राजु

धोंडोपंत राव,
तुम्ही तर त्यावर कडी केलीत...

चालू द्या....

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2007 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला वाटले आपण अमोल सिरसाटांच्या 'दरवळ' चे विडंबन केले पण ती आपली प्रेरणा होती हे आम्हाला समजलेच नाही !
( आमची घाई आम्हाला नडते )
विडंबनात आलेला विचार तर पोत्यात किलोकिलोचे माप टाकून पाहणा-याला वाटावे पोते झटकतोय पण आपण तर तब्येतीने ठोकून काढलंय मस्त हं !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे