ग्रेव्हयार्ड - लिटरेचर

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जे न देखे रवी...
29 Mar 2010 - 5:48 pm

रस्त्यावरून जाताना
दिसायच ग्रेव्हयार्ड
लक्ष वेधून घेणारी पांढ-या फुलांनी
आच्छादित कबर
वाटायच आकर्षण त्या
नाजूक फुलांच
जाव आत लावावा हात
उचलून आणावीत ओंजळभर
केला धीर गेलेच एकदा
उचलली फुल थोडी
पलीकडच्या कबरीवर
दिसली तितक्यात

-------------------------------

एक मुलगी शुभ्र वेश
जणू परी अस्मानीची
हातात तशीच पांढरी फुल

त्या कबरीवर नाव

JOHN ANDREWS
15/12/97

आणि माझ्या समोरच्या कबरीवर

MERRY JOHN ANDREWS
15/12/97

अंगावर काटा..........
निशब्द सायंकाळ..........

आणि एकच हवेचा झोत............

- सोनाली घाटपांडे

कविता

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2010 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता नीटशी कळली नाही ...

छिद्रान्वेषीपणा: ख्रिश्चन लोकांमधे मुलींचं मधलं नाव नवर्‍याचं किंवा वडीलांचं नसतं तर स्वतःचंच दुसरं नाव असतं. आणि मुलीचं नाव साधारणतः Mary असं लिहीतात MERRY नव्हे!

अदिती

शैलेन्द्र's picture

30 Mar 2010 - 9:18 pm | शैलेन्द्र

ही कविता ग्रेव्हयार्ड लीटरेचर या संग्रहात आधी वाचली होती. तो तुम्ही लिहीलाय का?