लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.

II विकास II's picture
II विकास II in जनातलं, मनातलं
27 Mar 2010 - 5:03 pm

http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता.

नोंदणी शुल्कः १५ रु
मासिक शुल्कः ३० रु

अधिक माहीती साठी पत्ता:
fuzzysoft@gmail.com
sahityasampada@gmail.com

दुरध्वनी:
०२४०-२३४७६३२
९४२२२ ०९४८६

टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.

भाषाप्रतिसाद

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

27 Mar 2010 - 5:56 pm | मी-सौरभ

जर तुम्ही लेख असाल तर
'क' राहीलाय.....
-----
सौरभ :)

II विकास II's picture

27 Mar 2010 - 6:15 pm | II विकास II

धन्यवाद,

बदल केला आहे.
---

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

श्रावण मोडक's picture

27 Mar 2010 - 7:30 pm | श्रावण मोडक

अरे वा. टीप इण्टरेस्टिंग आहे. एखादा लेखकाने त्याचा लेख येथे का लिहिला नाही, असा प्रश्न पडणार्‍या सदस्याने एकदम या संकेतस्थळाला काही लाभ मिळत नसल्याचा खुलासा करावा!!! छुपे संपादक ठाऊक होते, प्रवक्तेही छुपे आहेत की काय?
वेल, एवीतेवी हे संकेतस्थळ असे काही उद्योग करीत असेल असे वाटत नाहीच. अनेक ठिकाणी या संस्थळाच्या चालकांनी तसे खुलासे केल्याचे वाचण्यात आले आहेच. त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच! असो... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2010 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, चर्चाप्रस्तावातील टीप सोडून मुख्य मथळ्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी लेखकाच्या भूतकाळातील प्रतिक्रिया शोधून 'भलते' शोध घेण्याचा प्रयत्न आम्हाला आवडला.

स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...! :)

-दिलीप बिरुटे

सुरेखा पुणेकर's picture

27 Mar 2010 - 9:51 pm | सुरेखा पुणेकर

मास्तराशी फुल्ल सहमत हाये...ह्यो खोडसाळपना नाय काय? चतुरंग बिका??

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

Nile's picture

27 Mar 2010 - 9:59 pm | Nile

अरे रे, पुन्हा पुन्हा पाठीशी घालण्याच्या प्रयत्न अजिबात नाही आवडला.

श्रावण मोडक's picture

27 Mar 2010 - 10:05 pm | श्रावण मोडक

स्वगतः मी कशाला म्हणू काही प्रतिसाद खोडसाळपणाचे असतात म्हणून...!
अगदी पटलं. "मी कशाला आरशात पाहू गं, मीच माझ्या रुपाची रानी गं" हे गाणं खासच होतं. :)
'हलके घ्या' म्हणतात तसं आता 'दमानं घ्या' असंही म्हणण्यास सुरवात करावी. काय बाई, काय म्हणताय? की इथंही असहमतीच आहे? :)

शाहरुख's picture

27 Mar 2010 - 11:33 pm | शाहरुख

मोडकांकडून ही अपेक्षा नव्हती !!

(पिंक-टाकू) शाहरुख

श्रावण मोडक's picture

27 Mar 2010 - 11:50 pm | श्रावण मोडक

काय आहे सालं, दुनिया अशीच असते. आम्ही केलं इतिहासात थोडं खोदकाम तर ती बिघाडी आणि लोकांनी केलं तर पीएचडी... चालायचंच...
तुमच्या अपेक्षाभंगाबद्दल सॉर्री हां, शाहरूख! पुढच्यावेळेस काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.

शाहरुख's picture

28 Mar 2010 - 12:48 am | शाहरुख

तुमच्या चांगल्या लिखाणाचे जसे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे तसा इथे अपेक्षाभंग.बाकी काही नाही..असो.

II विकास II's picture

27 Mar 2010 - 10:31 pm | II विकास II

असेच एकदा, तात्यांनी माझ्या पिकनीकसंबधी धाग्यावर खुलासा केला होता. त्यासाठी मी ती टिप टाकली आहे.

>>प्रवक्तेही छुपे आहेत की काय?
>>त्यामुळं ही टीपही का दिली गेली असावी, असा प्रश्न पडतोच!
तुम्हाला आमच्याबद्दल शंका येतात, हे पाहुन आंनद झाला.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

श्रावण मोडक's picture

28 Mar 2010 - 12:37 am | श्रावण मोडक

अरेच्चा... प्रवक्तेविषयक मुद्दा वायला आणि टीपविषयीचा मुद्दा वायला आहे राव. हे मुद्दे म्हणजे स्वगत आहे राव. स्वगत! त्यामुळं तुमच्याविषयी शंका वगैरे नाहीत. भलतंच काही तरी... ;)

चिरोटा's picture

27 Mar 2010 - 9:35 pm | चिरोटा

चांगला उपक्रम आहे.नवोदित लेखकासाठी चांगली संधी आहे.
माहितीबद्द्ल धन्यवाद.
भेंडी
P = NP

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2010 - 9:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल आभारी आहे...!
धन्यवाद विकास...!

-दिलीप बिरुटे

सुरेखा पुणेकर's picture

27 Mar 2010 - 9:53 pm | सुरेखा पुणेकर

लै झक्कास! लावन्यांची बुकं पन हायेत का?

-- सुरेखा
कारभारी दमानं.....

ऋषिकेश's picture

27 Mar 2010 - 11:53 pm | ऋषिकेश

मिपावर जाहिरातीस बंदी आहे असे समजते. इथे लेखकाच्या स्वत:च्या कोणत्याही मताशिवाय केलेली ही शुद्ध जाहिरात आहे.
अश्या लिखाणास म्हणजेस जाहिरातीस मिपावर बंदी आहे ना?

आणिबाणी चालु आहे याचे भान ठेवावे

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

II विकास II's picture

28 Mar 2010 - 9:26 am | II विकास II

ह्या संबधित नियम पहायला मिळु शकेल का?

अवांतरः 'इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.' हे तुझ्या प्रतिसादात मला वाचायला मिळाले.

---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

II विकास II's picture

28 Mar 2010 - 9:23 am | II विकास II

पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन

खुलं झालय पुस्तकांचं 'ऑनलाइन' दालन

गौरी कानेटकर पुणे

पुस्तकं वाचायला आवडतात, पण दुकानात जाऊन ती खरेदी करण्याएवढा किंवा लायब्ररीत जाऊन पुस्तके नेमाने बदलत राहण्याएवढा वेळ नाही, अशी परिस्थिती शहरातील बऱ्याच जणांची आहे. साहित्य संमेलनासारख्या वाषिर्क अक्षरउत्सवामध्ये अशा प्रश्ानंची दखल घेतली जाते की नाही, हे अलाहिदा, पण यंदाच्या ग्रंथप्रदर्शनामध्ये वाचकांपर्यंत पुस्तके नेणाऱ्या दोन उपक्रमांचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत.

फजीसॉफ्ट सॉफ्टवेअर्सच्या अंजली कुलकणीर् यांनी इ-बुक्स वाचण्यासाठी साहित्यसंपदा डॉट कॉम ही वेबसाइट तयार केली आहे. तरुण इंटरनेट सॅव्ही वाचकांना किंवा इंटरनेटशी जुळवून घेतलेल्या प्रौढांनाही या साइटमुळे घरबसल्या पुस्तके वाचता येतील, असे उल्हास जोशी यांनी सांगितले. सध्या या साइटवर १२५ पुस्तके उपलब्ध आहेत. ही संख्या हळुहळू वाढत जाईल. यातील काही पुस्तके स्कॅन केलेली आहेत; तर काही पुस्तकांच्या निमिर्तीवेळी तयार केलेल्या पीडीएफ फाइल्स उपलब्ध झाल्या आहेत. एक पुस्तक वाचण्यासाठी साधारणदोन ते आठ रुपये फी असेल. सभासद होताना काही रक्कम प्रीपेडप्रमाणे भरावी लागेल. पुस्तके वाचली की, त्या रकमेतून ती फी वळती होत राहील. एका पुस्तकाची १० पाने आज वाचली, उद्या थोडे वाचले, अशी सोयही वाचकांना आहे. त्यामुळे आपल्या सवडीने, हवे ते पुस्तक वाचायला मिळेल, असे जोशी म्हणाले. अनेक लेखकांनी या उपक्रमाला पाठिंबा दाखवला आहे. सध्या कवी ना. धों. महानोर, ना. सी. फडके, प्रमोदिनी वडके-कवळे, बाबा भांड, रा. रं. बोराडे इत्यादींची पुस्तके वेबसाइटवर टाकण्यात आली आहेत. इतरही अनेकांनी अनुकूलता दाखवली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन आलेले आहे. त्यांना या वेबसाइटचा नक्की फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राहुल भांदुगेर् या पुणे विद्यापीठातून एमबीए झालेल्या तरुणानेही पुस्तकांच्या क्षेत्रातच प्रवेश केला आहे. लायब्ररीची सेवा ऑनलाइन देण्याचा विचार डोक्यात आल्याचे भांदुगेर् म्हणाले. त्यासाठी त्यांनी २५०० पुस्तकांची खरेदी केली असून त्यात १४०० मराठी आणि इतर इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. मायलायब्ररी डॉट इन या वेबसाइटवरून 'ऑनलाइन मेंबरशिप'ही घेता येईल. वेबसाइटवर पुस्तकांची यादी असून सभासदांनी आपल्याला हवे ते पुस्तक साइटवरून मागवायचे. त्यांना ते त्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये आणून देण्याची सोय आहे. पुस्तक वाचून झाल्यावर त्याची नोंद वेबसाइटवर करता येईल आणि पुढच्या पुस्तकांसाठी सभासदांना मागणी नोंदवता येईल. लायब्ररीतफेर् एक माणूस येऊन नवे पुस्तक घेऊन येईल आणि जुने घेऊन जाईल. आमच्या सभासदांनीच खरेदीसाठी नवी पुस्तके सुचवावीत, लायब्ररीच्या ऑनलाइन कामाबरोबरच वेबसाइटवर साहित्यविषयक चर्चा रंगाव्यात, पुस्तकांबद्दलचे अभिप्राय वाचकांनी लिहावेत, यासाठीही वेबसाइटवर वेगळा विभाग सुरू करणार असल्याचे भांदुगेर् यांनी सांगितले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5733549.cms

प्रकाश घाटपांडे's picture

28 Mar 2010 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

भुर्जपत्र ते वेबपेज या कार्यक्रमाच्या वेळी साहित्यसंपदा या वेबसाईटचे उदघाटन अनिल अवचटांच्या हस्ते झाले.
स्टॉलला भेट दिली होती. त्यांना मिपाविषयी माहिती दिली आहे. मिपावर साहित्य संपदाची ओळख करुन दिली आहे हे सांगितल्यावर अंमळ सुखावले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.