खेळ मागल्यावेळी सारखाच. यावेळेस दुसरी ओळ दिलेली आहे अन् पहिली जमवायची आहे!
From Web Photos
.....
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या ओळीशी निगडीत अशीच पहिली ओळ असायला हवी!
शुभेच्छा!!
राघव
[फोटू: जालावरून साभार]
प्रतिक्रिया
18 Mar 2010 - 10:40 am | राजेश घासकडवी
खाउनि भरलास तू, लोणी आणि तूप,
'किती' बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
राजेश
18 Mar 2010 - 11:26 am | राघव
छानच की!
हे कसं -
मुखी लोणी लागलेलं, डोळी साठले अप्रूप!
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
राघव
18 Mar 2010 - 1:49 pm | राघव
अरे!! आज कुणाचा मूड नाही असं दिसतंय.. ठीके.. असो. :)
राघव
18 Mar 2010 - 5:13 pm | चतुरंग
मोरपीस खुले डोई, बालक निष्पाप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
चतुरंग
18 Mar 2010 - 5:48 pm | अनामिक
हाताची घडी, अन् तोंडाला कुलूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
-अनामिक
18 Mar 2010 - 5:48 pm | बहुगुणी
१.
जागा एक तू असावा, सारे जग चिडी-चूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
२.
डोळे भरून पहावे, आनंदावे खूप खूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
19 Mar 2010 - 1:54 am | अनामिक
प्रकाटाआ
-अनामिक
18 Mar 2010 - 6:18 pm | डावखुरा
शाम सावळा,मथुरेचा न्रुप.....
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
"राजे!"
18 Mar 2010 - 7:01 pm | राघव
:)
माझा आणिक एक प्रयत्न -
"दुडक्या" चालीत जसा दरवळे धूप..!
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
राघव
18 Mar 2010 - 7:57 pm | मदनबाण
अवघ्या जगाचा आधार तूच
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
18 Mar 2010 - 9:01 pm | क्रान्ति
वेणू, घुंगुर, मोरपीस गोजिरे, अनूप,
किती बघू बाळा तुझं साजरं ते रूप!
क्रान्ति
अग्निसखा
18 Mar 2010 - 9:36 pm | प्राजु
चाळवाळे छुमछुम, मनी आनंद अमाप
किती बघू बाळा तुझं साजरं ते रूप!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
19 Mar 2010 - 9:20 pm | sur_nair
घेउनिया मांडीवर, कुरवाळावे खूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
माथा मोरपीस तुझ्या, शोभे अनुरूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
हरपले ध्यान, गेली दूर तहान -भूक
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
लाभले कि मला, सात जन्माचे ते सुख
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
तुला पाहून वाटे, अन्य सारेची विरूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
19 Mar 2010 - 11:21 am | राघव
वा! मस्त!!
क्रांतीताई,
वेणू, घुंगुर, मोरपीस गोजिरे, अनूप
खूप सुंदर लिहिलंत.. क्लास!
प्राजु,
चाळवाळे छुमछुम
हा शब्दप्रयोग आवडला! :)
सुरेश,
तुला पाहून वाटे, अन्य सारेची विरूप
ही ओळ आत्यंतिक सुंदर. आवडेश!
माझा आणखी एक प्रयत्न -
कसा बसावा विश्वास (कि) तू मुळात अरूप!
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!!
राघव
19 Mar 2010 - 2:30 pm | अश्विनीका
मी दोनोळी ऐवजी चारोळीचा प्रयत्न केला आहे.
शिरी मोरपीसं , हाती मंजूळ पावा
बाळमुकुंदाच्या मुखी अमृताचा गोडवा
दुडूदुडू धावे , पायी वाजे छुमछुम
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
सावळा कान्हा माझा नटखट भारी
दूध दही खाण्या फोडी मडकी सारी
कान्हासवे खेळण्या आतुरले गोप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
श्रीरंगा लहानगा तू, दावी लीला अनंत
मोहक तुझ्या हासण्याने अंगणी फुले वसंत
कृष्णमाय जाहले मनी आनंद अमाप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप!
- अश्विनी
19 Mar 2010 - 5:16 pm | राघव
छानच. कविता म्हणून प्रकाशित करा की!
राघव
19 Mar 2010 - 5:56 pm | राघव
यावेळेस सुचलेल्या ओळीसाठी निगडीत ओळ शोधतांना कल्पनेला पुरेसा वाव नव्हता कदाचित. पुढल्या वेळेस जरा आणिक सोपी ओळ घेऊ यात!
खेळात भाग घेतलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. :)
राघव
20 Mar 2010 - 4:49 am | sur_nair
झुंजूमुंजू आलं, भाट आळविती भूप
किती बघू बाळा, तुझं साजरं ते रूप