आमच्या सम आम्हीच ! ! !
रुपयौवना जणू विश्वाची तू,
आम्हीही नाही कमी.
वृथा अभिमान सोड आता,
येईल प्रचिती तव सत्वरी !
सौंदर्य कसले बागेस त्यां
माळीच ज्यां निगेला नसे
चार दिसांचा ताटवा
मग़ पाकळ्यांची झड असे ! !
लावण्ण्याची बाधा तुला
लेखू नको मजला कमी,
पाहिले बाग़ अगणित आम्ही
गुलाबांची येथे नाही कमी ! ! !
निरंजन वहालेकर
प्रतिक्रिया
19 Mar 2010 - 2:00 am | शुचि
ओ वहालेकर साहेब
>>पाहिले बाग़ अगणित आम्ही
गुलाबांची येथे नाही कमी ! ! !>>
हे जरी खरं असलं तरी म्हणतात ना -
दिल आया गधीपे तो परी क्या चीज है ;)
कविता सह्हीच!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
19 Mar 2010 - 2:16 pm | निरन्जन वहालेकर
अभिप्रायाबद्दल व उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद ! आभार ! !
गधी तो गधी ही है,
परी भी कुछ कम ही होगी
जिसने लाखो हसी देखे हो,
उस कि नियत खराब क्या होगी
आमच्या सम आम्हीच ! !
20 Mar 2010 - 7:49 am | sur_nair
वाहलेकरसाहेब,
नक्की कुठल्या 'गुलाब' आणि बागेबद्दल लिहिलंय तुम्ही? जरा जपून बरंका, नाहीतर सगळेच गुलाब तुमच्यावर रुसतील आणि हाती फक्त काटे येतील:)
20 Mar 2010 - 8:52 am | निरन्जन वहालेकर
धन्यवाद ! !
योग्य सल्ला !
वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद ! ह्या पुढे काळजी घ्यायलाच हवी ! !