एक प्रसंगः
आमच्या कंपनीच्या बसमध्ये एका बाकावर दोन मुली आणि एक मुलगा असे तीन मराठी वीर बसले होते. मी स्थानापन्न होत असतांना ऐकलेला संवाद असा:
एक मुलगी: अगं ते खलबत्त्यात कुटून घ्यायचं.
दुसरी: खलबत्ता म्हणजे?
पहिली: तुला खलबत्ता माहित नाही? तुला माहिती आहे का रे?
शुंभः (नंदीबैलासारखी मान हलवत) नाही.
पहिली: अगं खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठी एक लोखंडाचं भांडं असतं आणि एक जाड वजनदार असा लोखंडी रॉड असतो. त्याला बत्ता म्हणतात आणि ज्या भांड्यात कुटतात त्याला खल म्हणतात. मिक्सर वापरात येण्याआधी कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत. अजूनही खेड्यांमध्ये वापरतात.
दुसरी: मग ते इतिहासात खलबत असलं काहीतरी असायचं ते काय असायचं?
पहिली: ते वेगळं. ते खलबत म्हणजे जहाज!
मी: (मनात) नाही गं माझ्या मैने, ते गलबत! गलबत म्हणजे जहाज. आणि खलबत म्हणजे सुमडीत केलेली चर्चा, ऊहापोह, योजना तयार करण्यासाठी केलेली बोलणी! (मोठ्याने जाऊन सांगावं असं वाटलं पण स्वतःला आवरलं.)
शुंभः (अजून शुंभासारखेच भाव) असं आहे होय!
दुसरा प्रसंगः
एक ओळखीची मुलगी आणि मी असचं गप्पा मारत बसलो होतो. मी माझी कुठेतरी झालेली फजिती सांगत होतो आणि बोलता बोलता "मी खजील झालो" असे वाक्य बोललो. ती हसत सुटली.
मी: (विस्मयाने) काय झालं हसायला?
ती: खजील म्हणजे?
मी: अगं खजील म्हणजे काय हे तुला माहित नाही?
ती: नाही. मला एकदम 'फाजील' आठवलं आणि हसू आलं.
मी: अगं फाजील वेगळं आणि खजील वेगळं. खजील म्हणजे एम्बरासमेंट होणे किंवा एकदम आपली चूक लक्षात येऊन चपापणे.
ती: आणि फाजील म्हणजे काय? हिंदी पिक्चरमध्ये वकील "मेरे फाजील दोस्त" करत असतात नेहमी. पण फाजीलचा मराठी अर्थ काहीतरी 'वेगळा' आहे ना?
मी: अगं फाजील हा बहुअर्थी शब्द आहे. फाजील म्हणजे चावट असा ही होतो. फाजील म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त असा ही होतो. इंग्रजीमध्ये एक्सेस चा जो अर्थ आहे तोच अर्थ फाजीलचा मराठीमध्ये आहे. म्हणजे शेतातले फाजील पाणी काढून टाकावे याचा अर्थ शेतात साठलेले ज्यादा पाणी काढून घ्यावे. आणि हिंदी पिक्चरमधला फाजील हा उर्दू असावा पण त्याविषयी मला नक्की माहिती नाही. संदर्भावरून त्याचा अर्थ जाणकार, इतरांपेक्षा जास्त माहिती असलेले असा असावा असे वाटते. आम्हाला आमची आजी कधी-कधी "पुरे झाला आता फाजीलपणा" असे म्हणायची. त्याचा अर्थ की आता चेकाळणे, मस्ती करणे पुष्कळ झाले; आता नीट वागा. एकंदरीतच काहीतरी मर्यादेपलिकडे असा फाजीलचा अर्थ आहे आणि प्रसंगानुरुप त्याच्या विविध अर्थछटा निघतात.
ती: ह्म्म्म्म...
तिसरा प्रसंगः
आम्ही कंपनीच्या कँटीनमध्ये (चकाट्या पिटत) बसलो होतो. दोन मराठी मुली आणि मी ! कशावरुनतरी मराठी वृत्तपत्रांचा विषय निघाला. आणि अग्रलेखांचा बादशाह 'नवाकाळ' चा विषय निघाला. अग्रलेख हा शब्द उच्चारल्यावर-
पहिली: बाप रे, कितने सालों बाद ये वर्ड सुना. मेरे ग्रँडफादर को मैं बचपन में 'महाराष्ट्र टाईम्स' के अग्रलेख पढ के सुनाती थी.
(ही मुंबईची असणार हे जाणकारांनी ओळखले असेलच. मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो, दिवसातून कमीत कमी एकदा ही गोष्ट ते अभिमानाने सगळ्यांसमोर जाहिर कबूल करतात, कायम हिंदीत बोलतात, मराठीत बोलतांना अडखळतात, कुणीतरी फासावर लटकवेल अशी भीती चेहर्यावर बाळगून चोरी केल्यासारखे अशुद्ध मराठी बोलतात, मोजून १० सेकंदांनंतर पुन्हा हिंदीवर येतात, इंग्रजीची बोंब त्यांच्या इंग्रजी बोलण्यावरून जगजाहिर करतात, पुलं, कुसुमाग्रज यांना ऐकून माहित असतात, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर वगैरे मंडळी कुठल्या ग्रहावरची असा चेहरा त्यांचा विषय निघाल्यावर करतात, नारायण सुर्वे, कवी ग्रेस, ना. घ. देशपांडे, रमेश मंत्री हे निकारागुआ मधले रहिवासी असावेत असा यांचा विश्वास असतो, मराठी वृत्तपत्र वाचणे म्हणजे एकदमच गावठी कृत्य असं यांना कुणीतरी बाबा बंगालीने किंवा यांच्या हिंदीभाषक ज्ञानी मित्रांनी सांगीतलेलले असते. कुणी अस्खलित मराठी बोलत असल्यावर त्याच्याकडे हे तुच्छतेने बघतात आणि मोडकं-तोडकं हिंदी किंवा इंग्रजी बोलणार्यांच्या कळपात घुसून तसचं बोलण्यात धन्यता मानतात. मराठी सिनेमे, नाटकं वगैरे यांना अगदीच डाऊनमार्केट वाटतं. ग्रुपमध्ये 'अवतार' किंवा 'द हर्ट लॉकर' किंवा 'रॉकेटसिंग' विषयी हिरिरीने बोलतात पण 'नटरंग'चा विषय निघाल्यावर मात्र कसलं बोअरिंग डिस्कशन चाललयं असा भाव चेहर्यावर आणतात. बरं यांचं हिंदी देखील अगदी सुमार दर्जाचं असतं. एकूणच कुठल्याच गोष्टीचं सखोल ज्ञान नसलेला, अर्धवट हिंदीत बोलणारा आणि मुंबईला 'बॉम्बे' म्हणणारा कुणी मराठी इसम आपल्या पाहण्यात आला तर तो मुंबईचा आहे असे बिनदिक्कत समजा.)
मी: तू आता मराठी पेपर वाचत नाहीस का?
पहिली: नही यार, हम तो डीएनए पढते हैं. मराठी मैं ठीक पढ नही पाती....(काहीतरी बघत असते) अरे वो देखो एक गाडी खडी हैं ब्रिंक्स आर्या लिखा हुआ हैं उसपे. वो हमारे कँटीन को ब्रेड सप्लाय करते हैं क्या? मैंने बहुत बार देखी हैं ये गाडी कँपस में.
मी: (अगं माझ्या हुशार मैने, असं काय करतेस, जरा बघत जा ना नीट) आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम मशिन्समध्ये कॅश लोड करतात ते. त्याचं काँट्रॅक्ट ब्रिंक्स आर्या या कंपनीचं आहे.
पहिली: ओह, ऐसा हैं क्या....
दुसरी: हो, वैसाईच हैं वो.
वरचे प्रसंग बघता मराठीचं पुढल्या ५० वर्षात काय होईल हो? नक्राश्रू, राका, राकट, कातळ, कळकट, विचक्षण, ज्ञानपिपासू, विहंगम, हुंकार, प्रबुद्ध, हतबुद्ध, पाटा-वरवंटा, रवी (घुसळण्याची), महामेरु इत्यादी आणि असे बरेच शब्द इतिहासजमा होतील की काय? मराठी ही फक्त सपोर्ट लॅग्वेज म्हणून शिल्लक राहिल की काय?
"मी आधी एग व्हाईट आणि यलो एका पॅनमध्ये बीट करून घेतलं आणि मग त्यात हाफ कप शुगर आणि कार्डमम पावडर टाकलं...वॉव, तुला प्रमोशन मिळालं...आता तर माझा पार्टीचा हक बनतो...."
असलं मराठी वापरणार आहोत की काय आपण? हाय रे कर्मा, ये क्या सितम हैं, ये क्या जुलम हैं!!!
--समीर
प्रतिक्रिया
17 Mar 2010 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त लिहिलं आहे...
बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का? ;)
(अपवादातला) बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 3:09 pm | समीरसूर
थोडी असेलही कदाचित पण मला आमच्या कार्यालयात मुंबईचे जे २२ ते ३६ वयोगटातले मराठी तरुण भेटले त्यांचे वर्णन अगदी मी केले तसेच आहे. मी म्हटल्याप्रमाणे अपवाद असणारच नव्हे आहेतच पण विशेषतः मुंबईचा मराठी तरुण वर्ग थोड्याफार फरकाने असाच आहे असे माझे निरीक्षण आहे. सर्वसाधारणपणे अगदी अशी परिस्थिती नसली तरी याच्या अगदी जवळपास जाणारी नक्कीच आहे. :-)
तसा मी जळगावचा पण आता बरीच वर्षे पुण्यात राहत असल्याने "पुण्याचे का?" या प्रश्नाला "हो" असे उत्तर देण्याइतका इथे रुळलो आहे. :-)
धन्यवाद,
समीर
17 Mar 2010 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते
माझे म्हणणे अगदी उलट आहे... ते २२-२६ तरूण हे अपवाद असावेत. :) अर्थात मुंबईत राहून हे मत आहे.. तुम्ही मुंबईबाहेरून मत बनवले आसेल. ;) बाकी पुण्यात अगदी आवर्जून बाँबे म्हणणारी मंडळी भरपूर आहेत. सर्वच स्तरातली. पण आता मराठी विषयीच्या आंदोलनानंतर मुंबईतली तरूण मंडळी जास्तच जागरूक झाली आहेत. आणि नटरंग तर मुंबईत अमराठी मंडळींमधेही गाजला आहे असे ऐकतो आहे.
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 4:31 pm | शानबा५१२
आता तर मुंबईतली कॉलेजची मुलंही एकमेकांना सांगतात की मी काल अमुक मराठी पिक्चर पाहीला म्हणुन्,हे काही वर्षांपुर्वी अस नव्हत.
समीर,आज तुमचे वर्णन पहील्यासारखे(आधीच्या परीस्थीतीसारखे) जुळत नाही....
पण ते पुर्ण चुकही नाही.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
17 Mar 2010 - 4:45 pm | समीरसूर
२२-२६ वयोगटातले उलट जास्त हिंदाळलेले आहेत. त्याला कारण म्हणजे आता २२-२६ वयोगटात असणारे तरूण मुख्यत्वेकरून इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांचा मराठीचा संबंध अगदी फक्त घरात बोलण्यापुरता असतो. शिवाय बाहेर सर्वत्र हिंदी वातावरण म्हटल्यावर तेच संस्कार शाळा-कॉलेजात होतात. आपसूकच मराठी लेखक, वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल्स, चित्रपट यांना अडगळीत टाकले जाते. शिवाय मराठी माणसाला (तमाम) मराठीचा न्यूनगंड अनादी काळापासून आहे. अजूनही मी मराठी चॅनलवरचा अजय-अतुल यांचा गाण्याचा कार्यक्रम पाहिला या वाक्याने त्यांची उत्सुकता जेवढी चाळवली जात नाही जेवढी सब चॅनलवर 'तारक मेहता का उलटा चष्मा' पाहिले या वाक्याने चाळवली जाते. समोरचा माणूस थोडा टापटीप दिसल्यावर त्याच्याशी त्याने मराठीत सुरुवात करूनही हिंदीत बोलणारे मराठी महाभाग कमी नाहीत.
पुण्यात अजूनतरी मुंबईपेक्षा मराठी जास्त बोलले जाते. शिवाय मराठी चित्रपटांचा ७०% व्यवसाय पुण्यातच होतो हे ही विसरता कामा नये. 'रेस्टॉरंट', 'रीटा', 'गंध', 'गैर', 'उत्तरायण', 'कॅनव्हॉस', 'एवढसं आभाळ', 'आनंदाचं झाड', 'मातीच्या चुली' इत्यादी वेगळी वाट चोखाळणार्या मराठी चित्रपटांना पुण्यात चांगला व्यवसाय मिळाला. 'नटरंग', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हे चित्रपट तर पुण्यात ११-१२ आठवडे चालले.
--समीर
17 Mar 2010 - 4:49 pm | समीरसूर
मी देखील कधी काळी मुंबईत राहिलेलो आहे. माझी पहिली नोकरी मुंबईतच होती. ;-)
--समीर
17 Mar 2010 - 3:16 pm | विसोबा खेचर
थोडी नाही, बरीच अतिशोयोक्ति वाटते आहे!
बाकी लेख छान...
(मुंबैकर मराठी) तात्या.
17 Mar 2010 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख मस्तच, पण अपवादापेक्षा बरेच जास्त नग आहेत हो मुंबैत मराठी बोलणारे!
असो, आणखी एक सांगायचं म्हणजे कुसुमाग्रज, पुलं, विंदा वगैरे नावं माहित असतात कारण बालपण कुस्करणार्या मराठीच्या पुस्तकांमधून हेच लोकं भेटतात! (आमच्या शाळेत भाषेचे शिक्षक असे होते म्हणून मी त्याला बालपण कुस्करणं वगैरे म्हणते. अलिकडे मराठी आणि इंग्लिशशी वैर राहिलेलं नाही आहे.) तर मुद्दा हा की आजही माझ्या भावाचं स्पष्ट मत आहे, जे लोकं पाठ्यपुस्तकात भेटत्/ले नाहीत, उदा. कविता महाजन, मिलिंद बोकील, प्रकाश संत वगैरे लोकं काही खास नाहीत. प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाने का मराठी साहित्यच वाचलं पाहिजे, एखाद्या मराठी माणसाला गवंडीकामातच रस असतो.
अदिती
17 Mar 2010 - 4:13 pm | समीरसूर
तात्या,
धन्यवाद. आपल्याला इथे भेटणारी मुंबईकर मंडळी ही अपवाद असणारच पण मैं गीता पे हाथ रख के कसम खाता हूं की जो कहा हैं सच कहा हैं और सच के सिवा और कुछ नही कहा हैं. :-) माझ्या कार्यालयात आतापर्यंत मी तीन मुंबईकर मराठी तरुणांसोबत काम केले आहे. आणि अजून इतर ४-५ मुंबईकर मित्रांसोबत राहिलेलो आहे. ते अजिबात मराठी वृत्तपत्र वाचत नाहीत. तसही आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र वाचणार्या तरुणांची संख्या रोडावली आहेच. एका मुंबईच्या मित्राला पुलंविषयी विचारल्यावर त्याची प्रतिक्रिया "वो मराठी ऑथर ना? कॉमेडी लिखते थे..." अशी होती. :-)
--समीर
17 Mar 2010 - 6:26 pm | मराठे
थोडं अवांतरः तुम्ही आजकाल म.टा. वाचता का? म.टा. ची ऑनलाईन आव्रुत्ती वाचनीय पेक्षा प्रेक्षणीय झालेली आहे. मला तर इच्छा असूनही म.टा. वाचावासा वाटत नाही. लोकसत्तावर (ऑनलाईन) वर बातम्या एक दिवस उशीरा दिसतात. अश्या वेळी IBNLIVE.com किंवा NDTV.com शिवाय पर्याय उरत नाही.
17 Mar 2010 - 3:28 pm | सुनील
मुंबईकर मराठींचे दोन गट पडतात - एक, ३०+ वयाचे. जे बहुतांशी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यांच्याबाबतीत वरील वर्णन हे केवळ अतिशयोक्तीच नव्हे, तर तद्दन चुकीचे आहे.
आणि दोन, ३०- वयाचे, जे बहुतांशी इंग्लीश माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत. ह्यांचे इंग्लीश वर्णन केल्याप्रमाणे यथातथा नव्हे, तर बर्यापैकी सफाईदार असते. हां, ह्यांच्या तोंडी हिंदी पटकन येते (मराठीपेक्षा) परंतु, ह्यांचे मराठी काय किंवा हिंदी काय, अर्ध्याहून अधिक इंग्लीश शब्द वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही. ह्यांना पुल ऐकून ठाऊक असतात पण सुर्वे, ग्रेस वगैरे मडळी ठाउक नसतात, हे मात्र खरे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Mar 2010 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते
नॉट एक्झॅक्टली, यु नो... ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 4:24 pm | समीरसूर
प्रिय सुनील,
आजच २-३ तासांपूर्वी माझ्याच क्युबिकलमध्ये बसणार्या एका मुंबईकर मराठी माणसाला (वय वर्षे ३६) विंदा करंदीकर नावाचे एक कवी होते; त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि नुकतेच त्यांचे देहावसान झाले हे माहित नव्हते. त्याला सांगीतल्यावर त्याचा चेहरा कुणीतरी हिब्रू भाषेतून बोलल्यावर कसा असेल तसा होता. मग काही सेकंदांनंतर तो "आय डोण्ट नो अबाऊट धिस" असे काहीतरी पुटपुटला आणि कामाला लागला.
मराठीचा न्यूनगंड हे एकमेव कारण यामागे आहे. कुणाशीही बोलतांना आधी हिंदीतून सुरुवात करायची हे तर आता पुण्यातही नित्याचेच झाले आहे. एक मराठी मित्र माझ्याशी ज्ञानेश्वरांच्या गीतांवरही हिंदीतून बोलायचा. आणि बोलतांना त्यांने पंजाब्यांसारखी "चल कोई नई" अशी लकब अगदी प्रयत्नपूर्वक लावून घेतली होती. 'चक दे इंडिया' मधली एक माजोर्डी मुलगी हे पालुपद सतत म्हणत असते. आता अशा लोकांचे काय करावे?
--समीर
17 Mar 2010 - 4:34 pm | शानबा५१२
सहमत
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
17 Mar 2010 - 3:54 pm | संग्राम
मस्त लिहिल आहे ..
>>बाकी मुंबईबद्दलच्या निरीक्षणाबाबत थोडी अतिशयोक्ति वाटते आहे. तुम्ही पुण्याचे का?
=)) =))
17 Mar 2010 - 4:48 pm | मी_ओंकार
समीरच्या निरिक्षणाशी सहमत. तरुण वर्गात ( < ३०) हे लोक बरेच आढळतात. मी तर आपल्या आईवडिलांना देखील मराठी सोडून हिंदीत बोला असे सांगणारे लोक ही पाहिले आहेत. आणि हे साउथ मुंबई किंवा पश्चिमेच्या उपनगरातले नाहीत तर ठाणे डोंबिवली कडचे लोक.
तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित. अर्थात एक आहे. अशा लोकांचे मित्रमैत्रिणी हिंदी, गुजराती, मराठी असे सगळ्याच भाषा बोलणारे असतील त्यामुळे सवय लागत असेल पण म्हणून मराठी बोलणे तुच्छ समजणे पटत नाही. अशा मित्रांपैकी दोन मराठी जरी भेटले तरी लगेच हिंदीत बोलायला सुरू करतात. वाईट वाटते ते याचे.
बाकी समीरची भवितव्याची शंका रास्त. पण किती आणि काय बोलावे?
- ओंकार.
17 Mar 2010 - 5:04 pm | बिपिन कार्यकर्ते
तात्या किंवा बिका, तुमचा अशा वयोगटातील लोकांची फारसा संबध नसेल आला कदाचित.
तात्याचे माहित नाही... माझ्या बाबतीत असेल बहुतेक हे खरे... काही कल्पना नाही ब्वॉ!!! ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 3:27 pm | राजेश घासकडवी
असलं वाचताना पाणी वगैरे पिऊ नये. कंप्युटरचा स्क्रीन, कीबोर्ड इत्यादी निकामी होऊ शकतात...
मुंबईत नाही म्हटलं तरी मराठी माणूस राह्यलाय कुठे? पण म्हणून पुण्याच्या लोकांनी इतकं चढून जावं आणि मूठभर राहिलेल्या मुंबई-मराठीकरांना हिणवावं काय? त्यांना विक्षिप्त पाट्या लिहिता येत नाहीत म्हणून काय झालं? (चला चर्चेला एका दगडात दोन धागे फोडले... आता चटकन झाडावर चढून बसायचं)
राजेश
17 Mar 2010 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
धम्याला कांपिटीशन ... तो कॉफी उडवायचा, तुम्ही पाणी!
अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे.
मुंबैकरांनी विक्षिप्तपणा पुण्यात एक्सपोर्ट केलाय हल्ली!
अदिती
18 Mar 2010 - 7:17 am | मदनबाण
मुंबईत मराठी माणसांचं प्रमाण फक्त 28 टक्के आहे.
दुवा :---
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=44202707
हा आकडा २००३ चा आहे म्हणजे आता किती टक्के उरले असतील ?:?
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
18 Mar 2010 - 7:42 am | अडाणि
सहमत... नुसता विक्षीप्तपणाच नाही काय, अजून बरेच काही आहे त्यात...(जसे खवचटपणा...)
त्याचं काय आहे ना, कामधंद्यामुळे आणि पोटापाण्यासाठी बरीच मुंबईची लोकं आलीत पुण्याला ... एक्स्पोर्ट माल घेवून.
=)) =)) =)) =))
-
अफाट जगातील एक अडाणि.
19 Mar 2010 - 9:18 am | II विकास II
>>अजूनही मुंबैत ४४% मराठी लोक आहेत असं अलिकडेच कुठेतरी वाचलं होतं, आता चटकन संदर्भ आठवत नाही आहे.
मुंबईत ४४% मतदार मराठी लोक आहेत असे मी वाचले आहे,
19 Mar 2010 - 9:52 am | मदनबाण
खरचं खरा आकडा कळेल का कधी ?
काही दुवे:---
http://bit.ly/d6SdcQ
http://bit.ly/aGElKW
(मुंबईतील मराठी माणुस नक्की राहतो कुठे ? :?)
मदनबाण.....
स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्या सरकारचा मी निषेध करतो !!!
http://bit.ly/dlmzCy
17 Mar 2010 - 3:28 pm | II विकास II
मुंबईमधल्या बहुतेक सगळ्या ० ते ४० वयोगटातल्या मराठी लोकांना (अपवाद आहेत) नीट मराठी वाचता, लिहिता येत नाही, याचा त्यांना अभिमान असतो,
हे लिहील्याबद्दल धन्यवाद.
मी ज्या त्या ठिकाणी स्थानिक भाषा बोलणेच चांगले समजतो,.
17 Mar 2010 - 4:24 pm | शानबा५१२
दुसरी: हो, वैसाईच हैं वो ही कुठली? :)) व तितली का? यावर पण २ उतारे लिहा समीर.
बाकी जे मुंबईकराचे वर्णन दिलेय ते ईंग्रजी माध्यमात शिकलेले असतात असे आमचे ठाम मत.(आम्ही मुंबईच्या बॉर्डर्वर राहतो,न ओळखता येणा-या व्यक्तीरेखेत)
५०वर्षांनंतरच बोलाल तर मराठी खुप अभिमानाने जगणार आहे,तिला आधी न भेटलेले चांगल रुप भेट्णार आहे,इंटरनेट्वर खुप पसरणार आहे.___हे सर्व निष्कर्ष आमचे स्वःताचे,आमच्याशिवाय त्यांना दुस-या कशाचा आधार नाही.
लेख फार छान वाटला वाचायला,धन्यवाद.
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
17 Mar 2010 - 4:39 pm | अरुंधती
मी ज्या कॉलेजमध्ये होते तिथे सगळी आंतरराष्ट्रीय जनता! त्यांना मराठीच काय, हिंदीही जेमतेम ( ४-५ शब्द) आणि इंग्रजीही कसंबसं कळायचं. ती जनता इंग्रजी बोलायला लागली की अगदी कान देउन ऐकलं तरच काय बोलतात ते कळायचं. इतर जनता म्हणजे मल्लू, तेलुगू, उत्तर प्रदेशी व थोडेफार मराठी. त्यात अनेक मराठी लोक गावाकडून आलेले असायचे. त्यांचं मराठी ग्रामीण धाटणीचं... हिंदीही यथातथाच आणि विंग्रजीचं तर काय बोलूच नका ना भाऊ! त्यामुळे ते त्यांचा ग्रुप सोडला तर गप्पगप्पच असायचे.
आता अशा कॉलेजमध्ये मग वरच्या लेखाप्रमाणेच संवाद कानी पडून पडून, कॉलेज संपले तरी आजूबाजूला असेच दिव्य भाषा नमुने ऐकायला मिळाल्याने कानांना त्यांची सवय झाली आहे. त्यात खटकवून घ्यायचं ठरवलं तर खटकतं. नाहीतरी ही नवी हिंग्लीश/ मिंग्लीश भाषा सध्याच्या पिढीचा 'ट्रेडमार्क' आहे. आणि त्यात इंग्रजी क्रियापदांना मराठी प्रत्यय किंवा मराठी/ हिन्दी क्रियापदांना इंग्रजी प्रत्यय लावून वापरणे 'फॅशनेबल' (!) समजले जाते. उदाहरणार्थः पोस्टलं, टायपलं, एसेमेस्लं, रटोफाय करना वगैरे वगैरे. त्यातूनच मराठीचे नवे उत्क्रांत रूप पाहावयास मिळेल कदाचित! आणि सध्याच्या मराठीला 'ए कस्ली ओल्डी टाईपची मराठी आहे ना?!!!' असे शेलके शेरे ऐकणे नशीबी येईल!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
17 Mar 2010 - 5:32 pm | अप्पा जोगळेकर
लेख चांगला आहे. पण अतिशयोक्त आहे. का हो समीरसूर, मराठी भाषा हे काही पुणेकरांचं राखीव कुरण नाही. त्यांच राखीव कुरण आगाऊपणा हे आहे हे एकवेळ मान्य होऊ शकेल. आणि असं जरी असेल तरी लगेचच मी आरोपांची राळ उडवणार नाही की पुणेकर म्हणजे एक नंबर आगाऊ. छ्या, ह्या मुळामुठेच्या पाण्यातच काहीतरी दोष आहे.
(३० पेक्षा कमी वय असलेला मराठी अप्पा.)
- फारच राग असेल तर तीर्थरुपांना 'बाप' म्हणावे. 'पप्पा' किंवा 'डॅडी' अशा शिव्या देऊ नयेत.
17 Mar 2010 - 5:46 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर घासकडवी, सरका जरा... मी पण येतोय झाडावर... सनातन युद्धांपैकी एक सुरू झालं बहुतेक... ;)
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 7:15 pm | नितिन थत्ते
कित्ती कित्ती महिने झाले हा विषय निघाला नव्हता. =))
असो. "अस्सल मुंबईकर मुंबईला मुंबईच म्हणतो" इति पुलं
नितिन थत्ते
17 Mar 2010 - 6:44 pm | Dhananjay Borgaonkar
ए अप्पाच्या पप्पा...
खारं पाणी पिणार्याला नदीच्या पाण्याची चव नाही कळणार.
नको उगा बोट घालु.
तुला काय बोलाचय ते धागाप्रवर्तका बद्द्ल बोल.
ऊगी लै टिवटिव नको.
17 Mar 2010 - 5:52 pm | समीरसूर
प्रिय अप्पा,
अहो मी माझा अनुभव सादर केला आहे आणि माझा मुद्दा फक्त मराठी वापरणे आणि मराठी वापरायला न लाजणे असा आहे. मला खूप ज्ञान आहे, माझे मराठी खूप उच्च दर्जाचे आहे किंवा माझ्याकडे काहीतरी विशेष आहे असं अजिबात नाही. मी एक अगदी सामान्य कुवतीचा माणूस आहे. पण चार मराठी माणसं असतांना सरळ सोप्या मराठीत बोलायला लाजू नये, मराठीतलं ते फालतू असं कुणी मानू नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. याच्या अनुषंगाने मुंबईतल्या वातावरणामुळे आणि मराठी बोलण्याबाबतच्या न्यूनगंडांमुळे मुंबईतल्या तरुणांविषयी मी माझी काही निरीक्षणं आणि अनुभव मांडलेले आहेत. मराठी भाषा ही पुणेकरांचे राखीव कुरण अजिबात नाही. मराठी जळगाव, अकोला, कोल्हापूर अशी अवघ्या महाराष्ट्रात बोलली जाते, विविध रुपात आणि ढंगात बोलली जाते आणि तशी ती टिकावी म्हणून हा लेखप्रपंच. यात पुण्याच्या मक्तेदारीचा लवलेशही मला दिसला नाही. किंबहुना मराठी ही सगळ्याच मराठी लोकांची मक्तेदारी/कुरण व्हावे आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक आणि आभिमानपूर्वक मराठीचा वापर आणि विस्तार व्हावा म्हणूनच हा लेख लिहिलाय ना! :-) कुणालाही दुखावण्याचा हेतू अजिबात नाही. चू. भू. दे. घे. :-)
--समीर
17 Mar 2010 - 6:01 pm | मेघवेडा
समीर साहेब,
तुमचं निरीक्षण अचूक आहे. पण सरसकट अख्ख्या तरूणाईला यात खेचणे जरा अति होते. शितावरून भाताची परीक्षा या बाबतीत जरा अयोग्य वाटतेय! वानगीदाखल सांगायचं तर, आमच्या साठ्ये कॉलेजमध्ये दरवर्षी अॅन्युअलला दोन कार्यक्रम होतात. सकाळी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी हिंदी-इंग्रजी गाण्यांचा कार्यक्रम! माझ्या आठवणीप्रमाणे, मी कॉलेजात असताना तीनही वर्षं मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. (आणि मला अवघी ४ वर्षे झालीयेत हो कॉलेज सोडून!)
पण तुमच्या नाण्याची दुसरी बाजूही चुकीची वाटत नाही. मीही असे बरेच नग पाहिलेले आहेत जे हसत हसत "मला मराठीची तितकी सवय नाही" असं सांगतात! याच २२-२६ वयोगटातले! पण त्यातल्या बर्याच जणांना "आम्हाला कधी मराठीत कुणाशी कॉन्वर्झेशन करायचा चान्सच मिळाला नाही रे. मराठी बोलतो ते फक्त आम्च्या पेरंट्स शी!! त्यांच्याशी काय बोलणार कप्पाळ!! आमचे सगळे फ्रेण्ड्स नॉन महाराष्ट्रीयन्स**" असं खेदाने नमूद करतानाही पाहिलंय!! बरं असंही नाही की अशा सर्वांचेच पालक त्यांना लहानपणापासून मराठी भाषेशी संपर्क ठेवण्यापासून परावृत्त करतात.. ( म्हणजे असे करणारे आहेत काही महाभाग पण काय करणार अशांना आपण??) माणूस ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो! त्यामुळे मुंबईतल्या युवा मराठी जनतेबद्द्लच तुम्ही काढलेलं अनुमान काही प्रमाणात अचूक असेलही पण सगळ्या मुंबईकरांना नक्कीच लागू नाही हां ही थिअरी!! :). सध्याचे नवे मराठी चित्रपट, नवनवीन मराठी गाणी (त्यातही शंकर, सुनिधी, श्रेया असे अमराठी कलाकार मराठी गाणी गाताहेत हे पाहून) यांच्या निमित्ताने का होईना, मराठी भाषेपासून दुरावलेला जो तरूण वर्ग आहे तोही आज मराठी भाषेकडे वळतोय!! अर्थात ज्यांना मराठी 'न्यूजपेपर' मधली एक 'हेडलाईन' वाचायलाच दोन-चार मिनीटं लागतात त्यांच्याकडून मराठी साहित्याबद्दलच्या ज्ञानाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात तळं शोधण्यासारखं! पण त्या रूक्ष वातावरणातही एखादं 'ओअॅसिस'ही सापडतंच!! तसे माझ्या माहितीतही वर नमूद केल्याप्रमाणे "ओह माय गॉड, 'साहित्यिक' हा वर्ड आज कित्ती वर्षांनी ऐकला मी!!" म्हणणारे कोकणस्थ ब्राह्मणही पाहिलेत मी! पण त्याचबरोबर, त्यांचा "आपण आज मराठीतून शुद्ध बोललो" याचा आनंद गगनात मावेनासा होतानाही पाहिलंय. आणि तेव्हा सगळ्यांना सरसकट 'त्या' श्रेणीत बसवणं मनाला पटत नाही!
बाकी चालू द्या!
** अशा शब्दांबद्दल एकदा चर्चा करायला हवी! महाराष्ट्रीयन हा शब्द अनेक मराठी वृत्तपत्रांत वाचलाय मी! तसंच आयुर्वेदिक हा शब्दही मराठीत सर्रास वापरला जातो!! शी 'वेदिक' काय! वेदांचा अपमान केल्यासारखं वाटतं!
असो.
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
17 Mar 2010 - 6:07 pm | अप्पा जोगळेकर
(मथळा सौजन्य - केसरी)
समीरसूर,
अहो, तुम्ही इतकी समजूतदार भूमिका घेतल्यावर बोलणेच खुंटले. मला वाटलं होतं थोडी खणाखणी होईल आणि अंमळ मौज येईल. असो. मनावर घेऊ नका. बाकी तुम्ही मूळचे पुण्याचे नाही याची खात्री पटली.
17 Mar 2010 - 6:15 pm | डावखुरा
मी मुळचा जळगावचा आहे परन्तु शिक्शणच्या निमित्ताने मी "पुणे" व "मुम्बईत" वास्तव्य करुन आहे ह्या काळातील अनुभव लक्श्यात घेतल्यास मी या लेखातील विचारास काही अन्शी सहमत आहे...... अपवाद असु शकतात पण बहुतान्शी तरुण नोकरदार वर्ग असाच आहे...ह्यात पुणेकर आणि मुम्बईकर हा वादचा विषय होऊ शकत नाही...[येथे मी कोणाचेही मन दुखवू ईच्छित नाही]
या समस्येवर उपाय मात्र शोधणे ही काळाची गरज!!!!
[महाराष्ट्रीय मराठी]"राजे!"
17 Mar 2010 - 6:30 pm | प्रदीप
समीरसूर ह्यांच्याशी मी बराच सहमत आहे, अगदी खास, जुना(ट) मुंबईकर असून.
भाषेच्या संदर्भात मुंबईव्यतिरीक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचे व गावांचे माहिती नाही, मुंबई सोडूनही मला आता जवळजवळ दोन दशके होत आहेत. तेव्हा तेथील विशीतील पिढीविषयी मला स्वतःला काही फार अनुभव नाही. पण सर्वसाधारणपणे जे माझ्या तेथील भेटींत, माझ्या नात्यातील तरूण मुलांमुलींच्या बाबतीत जाणवले ते समीरसूर ह्यांनी लिहील्याप्रमाणे आहे. ही सर्व मुले अगदी खास मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील, तेव्हा हे पुरेसे प्रातिनिधीक मानावे असे मला वाटते.
तसेच माझ्या एका समवयस्क मुंबईकर मित्राने सांगितलेला अनुभव असा: कामानिमीत्त तो व त्याचे काही तरूण मुंबईकर मराठी सहकारी कामानिमीत्त इंगलंडला गेले असतांना, तेथील वास्तव्यात ही मुले बसमधे मागील बाकावर बसून एकमेकांशी मोठ्यामोठ्याने हिंदीतून बोलत असत. ही सुमारे दहा-बारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
मुंबईतील मराठी वर्तमानपत्रातून जी मराठी लिहीली जाते त्याविषयी मी तरी आता तक्रार करायचे सोडले आहे. तरीही अलिकडे हे पाहून राहवले नाही. 'ते दोघे कसारा जात होते', 'एक व्यक्ति ट्रेनमधे चढला'.. इ. हे फारच होते, तेव्हा मी कळवळून माझ्या मुंबईतील एका मित्राकडे त्याचे लक्ष वेधले. हे असे फॅशन म्हणून लिहीले जाते की त्या वार्ताहरांना आता सरळ चांगली मराठी येतच नाही, हा प्रश्न मला पडला आहे. कदाचित ही दोन्ही कारणे असू शकतील.
इथे भाषेच्या संदर्भात चर्चा चालली आहे, तरी अनेक उल्लेख मराठी (तरूणां)च्या आपल्या संस्कृतिच्या सामान्यज्ञानाच्या संदर्भातील आहेत. त्याविषयी मुंबई व पुणे येथून आमच्या येथे आलेल्यांच्या बाबतीत काही फार फरक आहे असे मलातरी दिसलेले नाही. अलिकडेच एका स्पर्धेत 'संगीत स्वयंवर' कोणी लिहीले ह्याचे उत्तर अगदी हिरीरीने हात वगैरे वर करून 'बालगंधर्वांनी' असे एका तरूणाने दिले होते. बाकी 'पिपात पडले मेल्या उंदीर' पासून 'देणार्याने देत जावे', 'ह्या शेताने लळा लाविला..' ह्या सर्व कवितांचे कवी 'कुसुमाग्रज' होते असे मुंबई- पुण्याची तरूण मुलेमुली स्पर्धेत सांगत होती!
18 Mar 2010 - 10:32 am | समीरसूर
दाक्षिणात्य मुले आपापसात कधीच हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलतांना दिसत नाहीत, अगदी त्यांना हिंदी किंवा इंग्रजी येत असले तरी! मग मराठी लोकांना काय साप चावतो की काय एकमेकांशी बोलतांना? आणि अधून-मधून इंग्रजी वाक्ये फेकणे ही आणखी आवड मराठी जनांची. "यु नो व्हॉट, गोईंग फॉरवर्ड, धिस इज गोईंग टू बी अ बिग प्रॉब्लेम." असल्या धरतीची वाक्ये पिस्त्याची पखरण केल्याप्रमाणे फेकली की आपण अगदी हाय-क्लास होतो हा समज मराठी लोकांमध्ये कुठल्या गाढवाने भरवला आहे कुणास ठाऊक. आणि मुळात मराठी बोलणे, वाचणे, पाहणे, ऐकणे आणि मराठीचा वापर संवादाची भाषा म्हणून करणे याचाच आपल्या लोकांना एवढा न्यूनगंड असतो की तळपायाची आग मस्तकाला जाते. तसेही मराठी माणसात सगळ्यात जास्त काय असेल तर न्यूनगंड! मराठीचा न्यूनगंड, चारचौघात धीटपणे बोलण्याचा न्यूनगंड, धंदा-व्यवसाय करण्याचा न्यूनगंड, सपासप बोलून समोरच्या व्यक्तींवर छाप पाडण्याचा न्यूनगंड, काहीतरी पुढाकार घेऊन एखादे कार्य तडीस नेण्याचा न्यूनगंड....ही मनोवृत्ती बदलायला हवी. परवा पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात एक साफसफाई करणारी मराठी मावशी आणि एक सेक्युरीटी करणारी मराठी महिला यांच्यातला संवाद मी ऐकला. दोघी तोंड भरून मल्याळी परिचारिकांचं कौतुक करीत होत्या. किती काम करतात आणि रात्रपाळीला एक क्षण झोपत नाहीत किंवा चेहर्यावर अजिबात थकव्याचा किंवा जागरणाचा लवलेशही नसतो आणि पटकन धावून जातात, रुग्णांची मनापासून सेवा करतात आणि विशेष म्हणजे सौजन्याने आणि आपुलकीने बोलतात इ. मल्याळी परिचारिकांचे मनापासून केलेले कौतुक ऐकून माझे हृदय भरून आले. शेवटी दोन मराठी बायका हे कौतुक करत होत्या. असे विहंगम, दुर्मिळ दृष्य बघून मला गहिवरून आले. मराठी माणसाला दिलखुलासपणे दुसर्याचे कौतुकही करता येत नाही असा सर्वसाधारणपणे अनुभव असतांना हे दृष्य खरच अनुकरणीय वाटले. विशेषतः चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांकडून असे कौतुक ऐकायला मिळणे यावरून त्या मल्याळी परिचारिका खरच किती कर्तव्यतत्पर असतील याची कल्पना येते.
मराठी वाहनचालक ही अशीच एक हरहुन्नरी जमात. वेळेवर हूल देणे, स्वतःला कधी-कधी साहेब समजणे, छोट्या गोष्टी लक्षात येऊन दुर्लक्ष करणे, अजिबात वेळ न पाळणे, थापा मारणे, गुर्मीत वावरणे.....बदलायला हवे. उत्तर भारतीयांविरुद्ध गळे काढून काही फायदा नाही.
--समीर
17 Mar 2010 - 6:40 pm | चिरोटा
मराठी/हिंदी मधील साम्य,महाराष्ट्रावर असलेला बॉलिवूडचा,उत्तर भारतिय संस्कृतीचा प्रभाव ह्याला कारणिभूत असेल का? की मराठी भाषेचा पाया इतर भाषांच्या(दाक्षिणात्य्/बंगाली वगैरे) मानाने ठिसूळ आहे?ईतर भाषिकांना(तामिळ्/तेलुगु/कन्नड) भाषिकांना जेव्हा मी हे सांगतो तेव्हा त्यांच्या भाषेबद्दल एवढी चिंता क्वचितच व्यक्त होताना दिसते असे ते म्हणतात.(वरील भाषिकांची संख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी आहे !!)
भेंडी
P = NP
17 Mar 2010 - 8:22 pm | भारद्वाज
समीर सूर यांनी व्यक्त केलेले त्यांचे निरीक्षण अगदीच काही मान्य करता येणार नाही, मात्र ते सरसकट नाकारताही येणार नाही अशी अवस्था झालीये मराठीची (म्हणजे कोमात गेलेली व्यक्ती धड जिवंतही नसते आणि मेलेलीही नसते.....तसं काहीतरी).
मराठी आवर्जून (?) बोलणारे आणि आपोआपच बोलणारे माझ्याही पाहण्यात आहेत. जर "मराठीचं पुनरुज्जीवन" ही एक लढाई मानली किंवा एक व्रत मानले तर आपणा सर्वांनाच ती नेटाने लढायची आहे आणि जिंकायची सुद्धा !!! मराठीच्या पिचेहाटीला सर्वस्वी मराठी माणूसच जबाबदार आहे,युपी-बिहारी नव्हेत.
मराठी टिकवण्यासाठी आपण सगळेच एकमेकांशी मराठीतच (समोरचा मराठी असो वा अमराठी) 'जणू काही घडलेच नाही' अश्या रीतीने बोलण ठेवलं की परिस्थिती सुधारण्यास नक्की हातभार लागेल....काय म्हणता?
आपला,
नवी मुंबईकर
17 Mar 2010 - 8:22 pm | चतुरंग
विनोदासाठी अतिशयोक्तीचा आधार घेतलाय हे निश्चित पण बिघडत नाही!
(खुद के साथ बातां : रंगा, कलगीतुरा सुद्धा सुर झालेला दिसतोय - पुन्हा थोड्या वेळाने तंबूत डोकावून जावे म्हणतो! ;) )
(बारा गावचं पाणी प्यालेला)चतुरंग
17 Mar 2010 - 8:22 pm | टारझन
मजेशीर चर्चा ... आणि लेख सुद्धा :) अभिनंदन समिरसुर !
अजुन येऊन द्या ! :)
17 Mar 2010 - 8:40 pm | मदनबाण
छान लिहलय...:)
मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा...
झारखंड-कोल्हापुर ट्रेन चालु झाल्यावर किती जणांनी त्याला विरोध केला होता त्यावेळी ? आता झारखंडवरुन इथे कोल्हापुरात कोणी तमाशाचे कलाकार तर येणार नव्हते...लोंढे येतायत...ते जसं वागतात तसच आम्हीही वागायला लागलोय आणि बोलायला तर कधीचेच.
महाराष्ट्रात काही दिवसांनी सगळेच मंत्री उत्तरभारतीय असतील आणि त्यांचे सेवक आजचे मराठी नेते-मंत्री असतील...
मराठी शाळाच बंद होतात तर मराठी बोलायचे कष्ट तरी कोण घेणार ???
सांग सांग भोलानाथ ऐवजी मेरी हॅड अ लिंटील लँब जिंदाबाद अजुन काय !!!
सांग सांग भोलानाथ ऐकुन बरेच दिवस झालेत ना ?
मग आता इथे ऐका :---
http://www.youtube.com/watch?v=5IaM5xNW5CI
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
18 Mar 2010 - 2:47 pm | सुधीर काळे
अवांतरः
'शांग शांग भोलानाथ' हे आमच्या नातीचं आवडतं गाणं आहे! अगदी छोटी असल्यापासून हे गाणं कुणी म्हटलं कीं कान टवकारायची!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
19 Mar 2010 - 2:32 pm | वाहीदा
आम्ही ही लहानपणी 'अम्मी, बाजी कहती थी ...चांद पे परियां रहती थी ' पासून ते 'अस्सावा सुंदर चोकलेट चा बंगला ..चंदेरी सोनेरी ...' सरसकट म्हणायचो पण माझ्या ताईची मुलगी मात्र 'रिंगा रिंगा रोझेस अन सगळ्या ईंग्लीश नर्सरी राईमस च म्हणते शाळेतलं वातावरण ही अगदी एंग्रजाळलेलं.... सगळंच फिरंगी .... :-(
खरच बालपणाचे दिवस कित्ती छान होते नाही आपले :-)
~ वाहीदा
17 Mar 2010 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला लेख....!
-दिलीप बिरुटे
[केवळ पोच देणारा]
17 Mar 2010 - 10:38 pm | पक्या
समीर, छान लेख. असे नग मी पण पाहिले आहेत. ( इथे खूप मॉस्क्यूटो आहेत असे म्हणणारी मुलगी एकदा भेटली होती.)
आपल्या लेखात अतिशयोक्ति आहे असे वाटत नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
17 Mar 2010 - 11:24 pm | टारझन
माझा एक मित्र म्हणाला .. "माझ्या चेहर्याला फोड्स आले आहेत "
=)) =)) =))
18 Mar 2010 - 12:35 pm | राजेश घासकडवी
त्यांनी तुमचे लेख्स वाचले असतील...;-)
राजेश्स
17 Mar 2010 - 11:30 pm | तुका म्हणे
अरे देवा! आता हो काय करायच? छ्या! पूर्वीचं बॉम्बे राहिलं नाही!
बाकी, सामीरसूर, तुमच्या प्रसंगांमध्ये, "ती", "पहिली", "दुसरी", "तिसरीच" इ.च जास्त! मज्जा आहे बुवा. नाही म्हणायला एक शुंभ आहे! बाकी, मुलींचे सर्व मित्र (आपल्या स्वतः शिवाय) शुंभच असतात म्हणा.
18 Mar 2010 - 10:11 am | समीरसूर
अहो मज्जा कसली त्यात, कार्यालयात कसली मज्जा!
शुंभ आहेत म्हणूनच मज्जा नाही ना ;-)
--समीर
17 Mar 2010 - 11:41 pm | शुचि
खरं पाहता अमेरिकेत राहून मुलीच्या भाषेचं भजं झालय. आम्ही प्रयत्न केले पण ते फारसे फलद्रूप झाले नाहीत. असो तो वेगळा मुद्दा.
एकदा रिया अमेरीकेत स्वच्छतागृहात गेली होती. मी बाहेर थांबले होते. बराच वेळ झाला ती येत नव्हती म्हणून मी विचारलं "काय करतेयस गं?"
उत्तर - आय अॅम पूसींग.
हे उत्तर मला कळलं पण काही अमेरीकन बायका ऐकून दचकल्या इफ यु नो व्हॉट आय मीन 8>
17 Mar 2010 - 11:46 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यायला!!!
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
17 Mar 2010 - 11:47 pm | चतुरंग
गोर्या अमेरिकन बायका पांढर्याफटक पडल्या असतील!! =)) =))
(धुविंग)चतुरंग
18 Mar 2010 - 12:04 am | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =))
- (प्रथमंच सहिला सहीने उत्तर देण्यास निरुत्तर झालो )
18 Mar 2010 - 12:41 am | स्वप्निल..
>>गोर्या अमेरिकन बायका पांढर्याफटक पडल्या असतील!!
=)) =))
18 Mar 2010 - 12:06 pm | Dhananjay Borgaonkar
:)) बिचारीला कळ्ळ पण नसेल आपण काय बोलुन गेलो ते.
असो पण थोड्याफार प्रमाणात ही गोष्ट आढ्ळुन येते.
त्या लहान पोरांची तरी काय चुक? मराठी फक्त घरीच बोलल जात परदेशात आणि बाहेर पडलं घरच्या की इंग्लिश चालू.
त्यामुळे बोलतान एकदम बावचळ्यासारख होत असेल.
इकडच तिकडे आणी तिकडच इकडे.
17 Mar 2010 - 11:54 pm | धनंजय
गमतीदार गप्पा.
(गोंयकार) धनंजय
17 Mar 2010 - 11:58 pm | रामपुरी
वर्तमानपत्रे यात आघाडीवर आहेत.
"प्रीती झिन्टा बाथरूममध्ये फसली" यासारखी वाक्ये
सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता मध्ये वाचायला मिळतात.
18 Mar 2010 - 2:36 pm | सुधीर काळे
मला या बाथरूम ('मोरी') या शब्दावरून बटाट्याच्या चाळीतलं "अन् वरदाबाईंनी 'तुमबिन मोरी'त तोंड घातलं" या वाक्याची आठवण झाली.
अमेरिकेत रहाणार्या माझ्या मुलाने व सुनेने माझ्या नातीला आतापर्यंत मराठीतच बोलायला शिकवले आहे, पण जशी ती बालवाडीत जाऊ लागली तशी अपेक्षेप्रमाणे तिच्या बोलण्यात मराठी व इंग्लिशची भेसळ होऊ लागली आहे. अगदी "आय् अॅम पुसिंग"चीच तर्हा! पण ऐकायला खूप मजा येते.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in
18 Mar 2010 - 1:57 am | बेसनलाडू
खलबत-गलबत वाला किस्सा वाचून झीट यायची बाकी राहिली.
(मराठमोळा)बेसनलाडू
18 Mar 2010 - 3:43 am | प्रियाली
पुणेकर मुंबईकर वाद चालूच राहतील पण वर दिलेल्या किस्स्यांवर (ते थोडेसे अतिशयोक्त आहेत असे मानले तरी) माझा विश्वास बसला.
,
मी सहमत आहे. आहे त्याला आहे म्हणावं. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत झाले. बर्याचदा माझे भारतातील जुने मित्र-मैत्रिणी माझ्या मराठीला फिस्सकन हसतात. मी चुकीचे बोलते म्हणून नाही तर मराठी बोलते म्हणून.
गेल्या वेळी नटरंग पाहिल्यावर कोणाला तरी म्हटले - "कालच एक मराठी चित्रपट पाहिला."
त्यावरचं वय वर्षे ४०चे मुक्ताफळ - "चित्रपट???? हे काय अगदी पेपरात रिव्ह्यू लिहिल्यासारखं बोलतेस."
बघा! वापरतो की नाही गैरमराठी भाषिक शब्द वाक्यागणिक आपण. ;) तसेच इंग्रजी शब्दही मराठ-मोळे होतील. आशावादी रहा - बी पॉझिटिव!
18 Mar 2010 - 7:54 am | II विकास II
+१
चित्रपट, ह्या शब्दाला काय काय झाले आहे. काही माहीत नाही. असाच अनुभव मला बर्याच ठिकाणी आला. असो.
हल्ली १ पेक्षा जास्त भाषांचे शब्द एकत्र करुन बोलण्याची पदधत चांगलीच पडली/पाडली गेली आहे.
18 Mar 2010 - 11:23 am | समीरसूर
प्रियाली,
माझे किस्से अतिशयोक्त नाहीत; अगदी १००% खरे आहेत. :-)
नेहमीच्या बोलण्यात देखील मी सवयीप्रमाणे आठवडा, रविवार, शनिवार, तारीख, आकडा हे शब्द वापरतो. म्हणजे मी जे बोलतो ते आजकाल कसे बोलले जाते:
मी: पुढच्या आठवड्यात बघू रे 'रिंगा रिंगा'
आजः नेक्स्ट वीक मध्ये बघू ना यार...
मी: मी शनिवारी संध्याकाळी गेलो आणि रविवारी दुपारी परत आलो.
आजः मी सॅटरडे इविनिंगला गेलो आणि संडे आफ्टरनूनला परत आलो.
मी: एकूण पंचेचाळीस माणसे होती.
आजः टोटल फॉर्टीफाईव्ह फोक्स होते.
मी: अरे, निदान एवढं तरी सांग की कधी फोन करशील मला.
आजः यार, अॅट लिस्ट एवढं तरी सांग की कॉल कधी करशील.
मी: अरे, दवाखान्यात जाऊन ये; ताप आहे तुला.
आजः गो, सी अ डॉक्टर, मॅन! तुला फिवर आहे.
अशी बरीच उदाहरणे देता येतील.
18 Mar 2010 - 4:52 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या मराठीला फिस्सकन हसतात.
माझी मावस सासु सुद्धा मला अशिच फिस्सकन हसते. कारण मी जेवण बनवले न म्हणता स्वयंपाक केला म्हणते. माझ्या नंणदा सुद्धा त्यावर हसतात कारण त्यान्च्यामते मी फारच शुध्द बोलते, त्याना सैपाक शब्द योग्य वाटतो. 'मी आली मी गेली 'असे अशुध्द मराठी बोलले जाते. मला अंगावर काटाच येतो.
चुचु
18 Mar 2010 - 6:37 pm | चित्रा
चुचुताई, मी आली/मी गेली, हे बर्याच घरांत अगदी सर्रास बोलले जाते. जाती-जातींमधील वैशिष्ट्यांवर, कुठे राहतात त्यावर अवलंबून असते. त्यात वैविध्य आहे म्हणून तर गंमत आहे.
-(सीकेपी मेव्हण्याची मेव्हणी) चित्रा
माझ्या सासरीही "ती असं 'करती' ", " 'पटकिनी' जा", असे ऐकून लग्नानंतर नक्की आपण कुठच्या ग्रहावर येऊन पडलो आहोत, असा विचार मनात आला होता ;) पण नंतर जिच्याबरोबर आयुष्यातली निदान पंधरा वर्षे खेळले/तिच्याबरोबरच वाढले, त्या मावसबहिणीनेच असे वाक्य मोठेपणी बोललेले पाहून आश्चर्याचा जो धक्का बसला तो कसा सांगू? आणि आता सासरची काही मंडळी असे बोलणार याची सवय झालेली आहे, कानालाही खटकत नाही.
तेव्हा ती शुद्ध-अशुद्धची भानगड नको, जशी सवय आहे तसे मराठीच बोलतायत ना? मग प्रश्न नाही! अर्थात तुमच्या मराठीला फिस्सकन हसतात हे चूक आहे. हसले तर दात दिसले, म्हणून सोडून द्या. ;)
तुमचं 'ध्यान' तर नाही ना हसत? मग झालं तर.
18 Mar 2010 - 9:51 am | राजाभाऊ
समीरशेठ, नशिबवान आहात; हे सगळे नमुने तुमच्याबरोबर काम करतात... 8>
18 Mar 2010 - 10:04 am | विजुभाऊ
माझे मराठी लेखन वाचन आणि बोलणे उत्तम आहे. मी शक्यतो मराठी बोलताना अस्खलीत भाषेत बोलतो. बरेचदा मुम्बैतील लोकाना मी मराठी बोलतो याचेच आश्चर्य वाटते. त्यातून कधितरी चुकून अम्मळ किंवा व्यदतोव्याघात असे शब्द वापरले की ते खूप गोंधळून जातात.
उपहास कथा हे जयवन्त दळवींचे पुस्तक माझ्या हातात होते त्यावर एकजण विचारायला लागला की उपास करताना ही कथा वाचायची असते का म्हणून?
पण शुद्ध मराठी शब्द ( प्यूवर मराठी वर्ड्स) वापरून या मंडळींची तंतरलेली बघताना जाम मज्जा येते.
बाय द वे ही मंडळी भेंडी / जुलाब /ढोस/ हे शब्द मात्र वेगळ्या अर्थाने अस्खलीतपणे वापरतात ;)
18 Mar 2010 - 12:56 pm | सुधीर काळे
समीरसूर-जी,
तुमचा लेख फारच सुंदर व काळजाला भिडणारा आहे. १० टक्के अतिशयोक्ती असेल पण तेवढीच. शैली व लेखाचा गाभा दोन्ही मस्त आहेत. असेच लिहीत जा.
प्रतिसाद मात्र बरेच भरकटलेले वाटले. मुंबई वि. पुणे हा वादही उगीचच उपटवला गेला व त्यामुळे लेखावरचे प्रतिसाद राहिले बाजूला पण पुणेकर वि. मुंबईकर हा सामनाच जास्त रंगला.
आज-काल राजाभाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नाने (व कांहीं अंशी 'अबू आझमी'टाईप 'प्रसादा'ने) मायमराठीला जरा बरे दिवस येणार असे दिसते! (राजाभाऊंनी आपले 'राज' हे पंजाबी थाटातले नाव सोडून राजाभाऊ हे अस्सल मराठी नाव वापरावे असे मला वाटते.) आपण सर्वांनी मराठीतच बोलायचे असा पण केल्यास हळू-हळू मराठीला वैभव प्राप्त होईल यात शंका नाहीं.
एक दुरुस्ती! बर्याच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या तामिळ व बंगाली तरुणांना तामिळ व बंगालीत बोलता येतं पण तामिळ व बंगालीत लिहिता-वाचता येत नाहीं. माझ्या तामिळ साहेबाचे उदाहरण मला वैयक्तिकरीत्या माहीत आहे!
------------------------
सुधीर काळे
President: presidentofindia@rb.nic.in; PM: pmosb@pmo.nic.in
18 Mar 2010 - 7:52 pm | भोचक
त्याचं मूळ नाव स्वरराज असं आहे.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
18 Mar 2010 - 1:22 pm | चिंतातुर जंतू
या सर्व चर्चेत मुंबईकर मराठी तरूण म्हणजे ब्राह्मणी वर्गातले किंवा तशी पार्श्वभूमी असलेले असे गॄहित दिसते. परंतु संख्याशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास दादर, परळ, लालबाग, वरळी अशा भागांत चाळींत राहणारे ते अगदी पार कांदिवली वगैरे उपनगरांच्या झोपड्यांत राहणारे मराठी तरुण संख्येने खूप जास्त असावेत, असे वाटते. त्यांच्या बाबतीत वरील चित्रण यथार्थ वाटत नाही. मनसे व शिवसेना यांच्या मराठीवादी आंदोलनांस या तरुणांचा मोठा पाठिंबा आहे, व त्यांत (म्हणजे राडे करण्यात) प्रत्यक्ष सहभागही आहे. या उलट (तशी तुलना करायची झाल्यास) पुण्यातील डेक्कन, औंध वा कोथरुडात राहणारी (म्हणजे ब्राह्मणी पार्श्वभूमीची) याच वयाची तरुण मुले-मुली अशीच मराठी बोलतात व असेच वागतात. अर्थात, पुण्यातही बहुजन समाजांतली मराठी मुले तशी नाहीत. सोमवार/रास्ता पेठ, शहरातील पूर्व भाग अथवा अगदी एरंडवन-डेक्कन परिसरात चाळी, झोपड्या, कच्ची घरे येथे गेलात, तर वेगळे चित्र आढळेल. आपले काहीतरी चुकले आहे, हे खरे; पण उगाच आपले दोष त्यांच्या माथी कशाला? त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
18 Mar 2010 - 2:23 pm | समीरसूर
मला वाटते इथे जातींचा तितकासा संबंध नाही. सामाजिक पार्श्वभूमीचा देखील संबंध नाही. थोडं खालच्या स्तरात बघितलं तर उलट मराठी बोलणार्या व्यक्तीशी देखील हिंदीतून बोलण्याची सवय फोफावत असल्याचे दिसते. मधम वर्गात देखील हीच सवय आढळून येते. मराठीच्या वापराचा न्यूनगंड ही एकमेव समस्या यामागचे कारण आहे आणि ती सगळ्याच स्तरातल्या आणि जातीतल्या मराठी लोकांमध्ये दिसून येते. उच्च वर्गात तर इंग्रजी आणि हिंदीचा प्रभाव जास्त आहेच. मी महाविद्यालयात असतांना उच्च वर्गातल्या मराठी मुली चुकूनही मराठी बोलत नसत आणि मराठी बोलणार्यांकडे तुच्छतेने बघत असत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे सामाजिक पार्श्वभूमी, जात वगैरेंचा या समस्येशी काही संबंध आहे असे मला वाटत नाही.
--समीर
18 Mar 2010 - 3:42 pm | चिंतातुर जंतू
मूळ लेख वाचून असे वाटले नाही. उदा:
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो. इंग्रजी नीट येत नसल्याचा न्यूनगंड बहुजन समाजात दिसतो. दोहोंत फरक आहे.
पुल, कुसुमाग्रज ऐकूनच माहीत असणे, ग्रेस वगैरे माहीतच नसणे वगैरे आपले आक्षेप पाहाता यात हे गृहित दिसते, की मराठी साहित्याविषयी किमान जाण प्रत्येक मराठी माणसास असावी. ग्रामीण आणि नागर बहुजन समाजात हे गृहितक कधीच रास्त नव्हते. त्यामुळे पुन्हा टीकेचा रोख विशिष्ट (ब्राह्मणी) जातींकडे असावा, असे वाटते.
मराठी वृत्तपत्र वाचणे - बहुजन समाजातले तरूण मराठी वृत्तपत्रे अजूनही वाचतात. सामना/म.टा/नवाकाळ/पुढारी/लोकमत वगैरे वाचताना तरुण दिसतात (लोकसत्ता मात्र क्वचितच!). मुंबईत म.टा.ने तर या तरुणाईस मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचले असावे. ते इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा प्रयास करीत असतात, पण राजकारण, चालू घडामोडी, वगैरेंचा स्रोत मराठी असतो.
मराठी चित्रपट - नटरंग हा बहुजन तरुणाईचा सध्याचा सर्वात लोकप्रिय चित्रपट आहे. ते अवतार बघतीलही, पण 'हर्ट लॉकर'? छे छे! ऑस्कर विजेते गंभीर चित्रपट पाहणे हे या समाजात रुढ नाही.
यामुळे निरीक्षणे ब्राह्मणी वर्गातूनच आली आहेत, आणि म्हणून प्रातिनिधिक नाहीत, असे वाटले. बहुजन समाजात स्वतःविषयी न्यूनगंड असतो, पण मराठीविषयी तुच्छता नसते, असा आमचा अनुभव आहे. राज ठाकरे त्यांना का भावतात, याचे एक कारण हा मराठीविषयीचा अभिमान आहे. ब्राह्मणी वर्गात आपली निरीक्षणे योग्यच आहेत.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
18 Mar 2010 - 4:41 pm | Dhananjay Borgaonkar
जातिवाचक उल्लेख अगदीच अवांतर आहे.
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो
अजिबात सहमत नाही.
18 Mar 2010 - 5:15 pm | चिंतातुर जंतू
आपले म्हणणे नीटसे कळले नाही.
मूळ लेखकास असे वाटते, की मराठी न येण्याचा अभिमान बर्याच मराठी युवकांमध्ये दिसतो. आम्ही म्हटले की निरीक्षण ब्राह्मणी वर्गावर आधारलेले दिसते, त्यामुळे हे ब्राह्मणी वर्गात दिसते, असे म्हणता येईल. बहुजन समाजात हा अभिमान आम्हांस दिसत नाही. आपण नक्की कशाशी सहमत नाही, ते कळले नाही. आपल्या मते हा अभिमान मराठी युवकांत एकंदरीतच दिसत नाही, की ब्राह्मण युवकांत दिसत नाही की आणखी काही?
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
19 Mar 2010 - 9:02 am | समीरसूर
आपणांस मराठी नीट येत नाही याचा अभिमान ब्राह्मणी वर्गात दिसतो.
मला असे वाटत नाही. मराठी नीट येत नसल्यचा अभिमान सरसकट सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये दिसतो. मी ज्या माझ्या सहकार्यांची उदाहरणे सांगीतली आहेत त्यात ब्राह्मण कुणीच नाही. किंबहुना मराठी नीट येत नसल्याचा अभिमान मला मुंबईच्या तरुणांमध्ये जास्त आढळला. त्यांच्यात जातीचा कुठे संबंध आल्यासारखे वाटले नाही. मुंबईचा मराठी तरुण हीच एक जात. उलटपक्षी ब्राह्मण समाजात थोडे सोवळे वातावरण असल्याने आणि जागृती जास्त असल्याने ब्राह्मण समाजातील तरूण त्यातल्या त्यात जास्त बिनधास्तपणे मराठी (बर्याच अंशी शुद्ध) बोलतांना, मराठी चित्रपटांवर हिरीरीने बोलतांना आढळतात.
आजकालच्या शहरी वातावरणात सगळी सरमिसळ झालेली आहे. आमच्या कार्यालयात सफाई करणारे दोन मराठी तरूण एकमेकांशी मराठी येत असून देखील हिंदीमध्ये बोलतात. चारचौघात बोलतांना आपण बोललेले हिंदी इतरांच्या कानावर गेले म्हणजे आपली पत वाढते असा एक गैरसमज बर्याच तरुणांमध्ये आहे. त्यातलेच हे उदाहरण.
बहुजन समाजातले तरूण मराठी बोलतात पण याच समाजात हिंदीच्या अव्वल असण्याच्या गैरसमजाचा पगडा देखील दिसतो. मी जर त्यांच्याशी मराठीत सुरुवात केली तर ते हिंदीत बोलतात. एका रुग्णालयात चतुर्थ श्रेणी मावश्या माझ्याशी प्रत्येक भेटीत हिंदीतून बोलत असत. मी मराठीच बोलतो हे लक्षात आल्यावर त्या नाईलाजाने मराठीतून बोलत असत. याला मराठीचा न्यूनगंड नाही तर काय म्हणावे?
बहुजन समाजातील तरूण मराठी वृत्तपत्र वाचतात पण ते अगदी वरवरचे. आणि खूप कमी बहुजन तरूण वृत्तपत्र वाचतात. 'पोलीस टाईम्स', 'संध्यानंद' इत्यादी भडक वृत्तपत्र वाचण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून ते हिंदीतून संवाद साधायचा प्रयत्न करतात. हिंदी देखील व्यवस्थित येत नाही म्हणून आपापसात मराठीत बोलतात. जर त्यांना यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली असती तर कदाचित त्यांनी देखील तिचा सर्रास वापर केला असता. सध्याच्या घडीला ते आपापसात मराठीत बोलतात यावरून त्यांना मराठीचा न्यूनगंड नाही हे सिद्ध होत नाही कारण त्यांच्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या हिंदीतून बोलण्याच्या अट्टाहासात त्यांचा मराठी किती कुचकामी आहे हा न्यूनगंड दिसून येतोच.
साहित्याची जाण प्रत्येकाला असावी हा निकष नाहीच. मी काही उदाहरणे दिली आहेत आणि ती एका विशिष्ट अपेक्षांच्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत. एका ३६ वर्षाच्या आयटी क्षेत्रात वरच्या दर्जाचे काम करणार्या मराठी युवकाला निदान साहित्याविषयी अगदी थोडी माहिती असावी ही अपेक्षा निराधार नाही. त्याने कमीत कमी कालचे वृत्तपत्र वाचलेले असावे आणि त्यात विंदांच्या मृत्यूची बातमी त्याने वाचलेली असावी ही अगदी न्यूनतम अपेक्षा त्याच्याकडून ठेवणे अजिबात गैर नाही. ही अपेक्षा मी रुग्णालयात काम करणार्या चतुर्थ श्रेणीतल्या मराठी कामगारांकडून खचितच करणार नाही. सगळ्यांकडून अपेक्षा एकच की मराठीची लाज वाटू देऊ नका. आज मराठी लोकांमध्ये (थोड्या फार प्रमाणात सगळ्याच जातींमध्ये, स्तरांमध्ये) मराठीचा न्यूनगंड दिसतो.
मी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शेवटी मुद्दा लाज न वाटू देता मराठी वापरण्याचा आहे. मराठीचा अभिमानाने वापर होत नाही ही सार्वत्रिक समस्या मांडणे हा माझा हेतू होता. यात जातीचा आणि सामाजिक पार्श्वभूमीचा संबंध आहे असे मला अजूनही वाटत नाही.
--समीर
18 Mar 2010 - 4:29 pm | अप्पा जोगळेकर
मुंबई-पुण्याच्या वादाचा काय फायदा परिस्थीती बदलायला प्रयत्न करायला हवा...
हेच ते. हेच ते. माझंदेखील हेच म्हणणं आहे. पण हा बोरु बघा की. लिहून लिहून झिजला तरी खोड जात नाही.
18 Mar 2010 - 4:43 pm | Dhananjay Borgaonkar
प्रतिक्रिया आवडली अप्पा.
:P :P
18 Mar 2010 - 5:50 pm | चिरोटा
मराठी न येण्याचा अभिमान मुंबईच्या काही मराठी युवकांत असेल असेल हे तेवढे पटत नाही.पण आपण शिकले पाहिजे हा विचारही दिसत नाही.मराठी न बोलण्याचे मुख्य कारण राज्यात हिंदीचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार हेच होय.म्हणूनच हिंदी+इंग्रजी बोलणे(जे हिंदी चित्रपटांत/मालिकांत दाखवले जाते) युवकांना शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा सोयिस्कर वाटते.
याच कारणांमुळे ग्रेस्/नारायण सुर्वेंपेक्षा गुलझार/जावेद अख्तर मराठी युवकांना जास्त माहित असतात.
भेंडी
P = NP
18 Mar 2010 - 5:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या खलबती मैत्रिणीला "मॉर्टर अँड पेसल" माहित असतील का हो?
अदिती
19 Mar 2010 - 9:09 am | समीरसूर
३_१४ विक्षिप्त अदिती,
मलाच 'मॉर्टर अअँड पेसल' म्हणजे काय ते माहित नाही. :-) काय आहे हे?
--समीर
19 Mar 2010 - 9:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंग्रजांचा खलबत्ता (आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडे असतो त्या प्रकारचा) !
मला प्रश्न असा पडला होता की जर त्या मुलामुलींना खलबत्ता कळत नसेल आणि 'मॉर्टर अँड पेसल'ही कळत नसेल तर सांगायचं कसं?
आणि हे कळत नसेल तर याचा अर्थ खलबत्ता आता सामान्य घरांमधनं हद्दपार होतो आहे असं मानायचं का?
सॉरी थोडं अवांतर होतं आहे, पण रहावलं नाही म्हणून विचारलं!
अदिती
(अवांतरचः चुचुने 'अशुद्ध मराठी'ची तक्रार करणं म्हणजे एक खेकडा दुसर्याला म्हणतो तू फेंगडा चालतोस!)
19 Mar 2010 - 9:37 am | बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे... बर्याच गोष्टी आपल्या जीवनातून नाहिश्या होत आहेत त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दही त्या बरोबर नाहीसे होत आहेत... द कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू... बर्याच नवीन गोष्टी आपल्या जीवनात येत आहेत आणि त्याच्याशी निगडीत नवीन शब्द भाषेत येत आहेत... नवीन संकल्पना नवीन वाक्प्रचार घेऊन येत आहेत. 'सगळंच मुसळ केरात' याचा अर्थ नवीन मुलांना कळणार नाही, पण एखादा आधुनिक प्रेमवीराला प्रेमभंगानंतर "जाऊ दे रे, सरळ फॉर्मॅट मार" असं सांगेल ते त्याच्या आजोबांनाच काय वडिलांनाही कळणार नाही.
बिपिन कार्यकर्ते
19 Mar 2010 - 5:20 pm | स्वानन्द
मला वाटतं तुम्ही म्हणता तो प्रश्न इंग्रज तरूणांना विचारला आणि जर त्याचा अर्थ त्यांना सांगता आला नाही तर, ती वस्तू वापरातून गेली असल्यामुळे ती त्याना माहीत नाही असे म्हणणे उचीत ठरेल.
समीर यांनी इथे त्या मुलींचं इंग्रजी उच्च दर्जाचे असते असे म्हटले नाही.
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!