वासंतिक पेयाखेरीज चैत्रोत्सव कसा बरं पूर्ण होणार?
प्रकार-१
५,६ कैर्या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे
कैर्या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो. उन्हातान्हातून घरी आल्यावर त्यातील २ चमचे बलक एका पेल्यात घेऊन थंड पाणी घालावे व चांगले ढवळावे आणि आस्वाद घेत प्यावे.
साखरेऐवजी गूळही घालता येईल.गूळाच्या पन्ह्याला एक वेगळाच स्वाद असतो तो बरेच जणांना आवडतो.
प्रकार-२
साहित्य वरील प्रमाणेच.
कैर्या किसाव्यात व थोड्या पाण्यात कोळाव्यात. हे पाणी गाळून घ्यावे.त्यात वेलदोडेपूड,केशर, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.हे पाणी बाटलीत भरून ४,५ दिवस ठेवता येते व पन्हे प्यायचे असेल तेव्हा बाटली चांगली हलवून त्यातील पाव ते अर्धा पेला अर्क घालावा. उरलेला पेला पाणी घालावे, ढवळले की पन्हे तयार!
पाण्याऐवजी सोडा घातला तरी मस्त पन्हे तयार होते.
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही त्यांना हे पन्हे जास्त आवडते.
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 12:31 pm | बेसनलाडू
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे!
(प्रवासी)बेसनलाडू
8 Apr 2008 - 7:01 pm | प्राजु
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे!
हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :)))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2008 - 12:23 am | बेसनलाडू
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :)
(शीघ्रप्रवासी)बेसनलाडू
8 Apr 2008 - 12:31 pm | विसोबा खेचर
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :)
स्वाती, चिअर्स!
मला दुसर्या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है....
समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा!
तात्या.
8 Apr 2008 - 12:38 pm | नंदन
पाककृती आणि लेखाचं शीर्षक दोन्ही आवडले.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 Apr 2008 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर
'कैर्या किसून कोळाव्यात' म्हणजे काय ते कळले नाही. किसून पाण्यात किती वेळ ठेवायच्या?
8 Apr 2008 - 1:32 pm | स्वाती दिनेश
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.
9 Apr 2008 - 12:13 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद स्वाती दिनेश,
खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.
8 Apr 2008 - 5:10 pm | अन्जलि
मराथि लिहिने जमत नहि कसे लिहवे ते सन्गअल का?
8 Apr 2008 - 6:46 pm | स्वाती दिनेश
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा).
तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल.
शुभेच्छा!
स्वाती
8 Apr 2008 - 6:54 pm | मनस्वी
तोंडाला पाणी सुटले! आणि जोडीला कैरीची डाळ हवीच!
8 Apr 2008 - 7:03 pm | वरदा
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही
अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....
8 Apr 2008 - 7:14 pm | स्वाती राजेश
नावावरूनच आकर्षक दिसते.....
नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..
8 Apr 2008 - 7:42 pm | केशवसुमार
काय योगा योग..
आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि.....
संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर..
टूक टूक..
(तृप्त)केशवसुमार