बाळाजी विश्वनाथ भट "पेशवे" होण्या पूर्वीची ही कथा आहे. नक्की काळ माहीत नाही परंतू संभाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर ही घटना घडली असावी. कदाचीत राजाराम महाराजांच्याही म्रुत्युनंतर असावी. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य महाराष्टात धुमाकूळ घालत होते. जवळ्जवळ सर्व किल्ल्यांना वेढे होते किंवा ते मुगलांच्या ताब्यात तरी होते.
बरयाच वेळा मराठे स्वता: किल्ला मुगलांच्या ताब्यात देत असत आणि थोड्या दिवसांनी परत जिंकून घेत असत!
असाच सिंहगडाला वेढा पडला होता. मुगलांचा किल्ला घेण्याचा उत्साह फारच होता! एक एक वेढा वर्ष वर्ष चालत असे. किल्ल्याला तशी फारशी तोशिश लागत नव्हती. परंतू किल्ल्यावरिल रसद मात्र जपून वापरावी लागत होती. किल्ल्यावरील मावळे मंडळी २/४ दिवसातून एखादा हल्ला वेढ्यावर करत असत आणि थोडीफार कापाकापी करून परत किल्ल्यावर पसार होत असत.
अश्याच एका ह्ल्ल्याच्यावेळी मावळ्यांच्या हाती दोन हत्ती लागले! महाबतखानाने औरंगजेबाला भेट देण्यासाठी म्हणून ते आणलेले होते. मावळ्यांनी हत्ती पळवत पळवत सिंह्गडावर नेऊन ठेवले. इतका बोजड प्राणी त्यांनी कसा वर नेला आणि मोगली सैन्याने ते कसे नेऊ दिले हे माहीत नाही. औरंगजेबाचे हत्ती पळवून आणलेले पाहून किल्लेदार फारच खूष झाला. परंतू किल्ल्यावरील हि खूषी २ दिवसातच चिंतेचा विषय झाली, आधिच गडावर रसद जेमतेमच होती त्यात हे दोन हत्ती पोसायचे म्हणजे सिंहगडाचे कंबरडेच मोडले! किल्लेदाराला हा प्रश्ण कसा सोडवायचा हे समजेना.
बाळाजी विश्वनाथ भट (पूढे पहिले पेशवे म्हणून प्रसिध्द) नावाच्या गडावरिल कारकूनाची मुत्सद्देगीरी या वेळी कामी आली!
त्याने इनायत खान नावाच्या एका मुगल सरदाराबरोबर संधान साधले. त्या दोघांमधे असा करार झाला कि, रात्री मावळ्यांनी ते हत्ती गडावरून खाली अणायचे, एक खोटी खोटी लढाई करायची, इनायत खान ते हत्ती जिंकून (?) महाबत खानाकडे घेऊन जाणार, त्यामूळे त्याचा मुगल दरबारी मान वाढेल, कारण हत्ती शेवटी औरंगजेबाचे होते! या बद्द्ल इनायत खानाने काही रक्कम किल्लेदाराला द्यावयाची!
ठरल्या प्रमाणे सर्व व्यवस्तित पार पडले! हत्तींना पोसण्याच्या त्रासातून मराठ्यांची सुटका तर झालीच पण त्याबद्दल फूकटचे पैसेही मिळाले!
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 1:55 pm | अप्पा जोगळेकर
बाळाजी भट म्हणजे ग्रेट माणूस. त्यांच्याबद्दल अधिक माहिती कान्होजी आंग्रे या पुस्तकात वाचली आहे. तरी जाणकारांनी त्यांच्यावर एखादा विस्तृत लेख लिहावा. आनंद होईल.
14 Mar 2010 - 5:11 pm | नितिनकरमरकर
कान्होजी आन्ग्रे हे फार सुंदर पुस्तक आहे. एकतर कान्होजी सारखा कथानायक, मुळगावकरांची ओघवती भाषा, आणि त्याला पु. ल. देशपांडे नावाच्या परिसाचा स्पर्श!
28 Mar 2010 - 1:00 pm | अनामिका
सहमत........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
14 Mar 2010 - 2:44 pm | Pain
मस्त :)
14 Mar 2010 - 3:21 pm | विसोबा खेचर
छान लेख..
तात्या.
14 Mar 2010 - 5:21 pm | jaypal
आजच्या भाषेत टेबला खालुनचा व्यवहर झाला तर ..... लै भारी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
14 Mar 2010 - 5:48 pm | आशिष सुर्वे
बहिर्जी नाईक आणि कान्होजी आंग्रे ह्यांच्याविषयावरील पुस्तके कुठे मिळतील?
मॅजेस्टिक मध्ये मिळतील का?
======================
विंदांना भावांजली
14 Mar 2010 - 6:09 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
25 Mar 2010 - 8:31 pm | अभिषेक पटवर्धन
मुळगावकर? मला वाट्टय की कोणी दाक्षिणात्य लेखक आहेत...नाव नक्की आठवत नाहीये..
25 Mar 2010 - 8:57 pm | अक्षय पुर्णपात्रे
मनोहर माळगावकरांनी कान्होजी आंग्रेंचे चरित्र लिहिले आहे. त्यांच्याविषयी अधिक विकिवर.
28 Mar 2010 - 12:24 pm | अप्पा जोगळेकर
दाक्षिणात्य वगैरे नाही. त्यांचं नाव शशी पटवर्धन आहे.