तुझ्या रेशमी केसांनी : एक सुडंबन
विजुभाऊंनी विघडवलेलं सुघडवण्याचा माझा प्रयत्न. मूळ विडंबनाशी एकनिष्ठ राहाण्यासाठी यमक, वृत्त, कवितेचा स्वर व बरेचसे शब्द तेच ठेवलेले आहेत. एक कडवं वाढवलेलं आहे, पण मूळ विडंबनकार मला त्याबद्दल क्षमा करतील अशी आशा करतो.
तुझ्या रेशमी केसांनी काय जादूटोणा केला
मंत्ररेषांमध्ये काळ्या जीव वेडापिसा झाला
का या करून गमजा काय सांगावे मनाला
भेटीमध्येच पहिल्या ठाव नाही राही त्याला
सोडला हा नाद झाले, नाही झेपणार मला
माझी झेप वीतभर तुझा कोसाचा ग पल्ला
तरी मी का झालो खुळा का ग आठवले तुला
तुझ्या स्वप्नवेळेसाठी साद घातली रात्रीला
कळायला सारे काही खूप उशीर जाहला
जादू मंत्रांची राहिली पीळ काळा तो जळाला
गेल्या झिजून झडून माझ्या रेषा हातातल्या
प्रियकरा हाती तुझ्या हात तुझा मी पाहिला
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 3:16 pm | अविनाशकुलकर्णी
तुझ्या रेशमी केसांनी काय जादूटोणा केला
टोण्या वरी शोधता उतारा,जिव घाबरा झाला
का या करून गमजा काय सांगावे मनाला
भेटीमध्येच पहिल्या,लागे मेंटल्च्या रस्त्याला
सोडला हा नाद झाले, नाही झेपणार मला
माझी झेप पेगची..तु खंबा रीचवी बैठकिला
तरी मी का झालो खुळा का ग आठवले तुला
हे वेड घराण्यात असे..माहित नसेल तुला
कळायला सारे काही खूप उशीर जाहला
केस झडले,दात पडले,जन्म वाया गेला
गेल्या झिजून झडून माझ्या रेषा हातातल्या
रेषा मस्तकाच्या सा~या आठ्या बनुनी राहिल्या..
राजेश आपली माफि मागुन...
14 Mar 2010 - 3:39 pm | विजुभाऊ
झकास....
फक्त मंत्ररेषांमध्ये
या ऐवजी मंत्ररेषात चपखल बसले असते.