घर
घर, एक वास्तू
विटा मातीची
घर, एक कल्पना
प्रत्येकाच्या मनाची
घर थारा निवारा
कष्टाचे अन घामाचे
घर इच्छा आशा
सुखद आठवणींचे
घर महाल वाडा झोपडे
वारूळ गुहा खोपटे
कधी कपार उंच कड्याची
कधी भुयार पोखरलेले
घर बालपणीचे
भातुकलीतल्या खेळातले
गोष्टीतल्या चिऊ काऊचे
एक मेणाचे एक शेणाचे
घर तारुण्याचे
जिद्ध अपेक्षा आकांक्षेचे
भविष्याच्या ओढीचे
गोड गुलाबी स्वप्नांचे
घर वार्धक्याचे
आश्रयाचे आधाराचे
स्मरीत, काही विस्मरीत, अशा
आठवणींच्या गोतावळयाचे
घर प्रेमाचे, विश्वासाचे
नाती - गोती, जुळलेल्या मनांचे
घर संशयाचे, विरल्या स्वप्नांचे
दुभंगले विखुरले विभागलेले
घर असते प्रत्येकाचे
किती भिंती खिडक्या दारे
सजवायचे कसे, भरावे कशाने
ते मात्र ठरवावे ज्याचे त्याने
सुरेश नायर
प्रतिक्रिया
13 Mar 2010 - 9:29 am | मदनबाण
अतिशय सुंदर...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
13 Mar 2010 - 10:55 am | शुचि
फार सुंदर
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
13 Mar 2010 - 11:59 am | राजेश घासकडवी
विटांची वास्तू व मन यांचा मेळ चांगला जमला आहे.
राजेश
13 Mar 2010 - 5:20 pm | जयवी
व्वा........ अतिशय सुंदर काव्य !!
14 Mar 2010 - 12:07 am | sur_nair
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद
19 Mar 2010 - 7:40 am | निरन्जन वहालेकर
अतिशय सुन्दर ! !
19 Mar 2010 - 11:50 am | राघव
सजवायचे कसे, भरावे कशाने
ते मात्र ठरवावे ज्याचे त्याने
हे खूप छान!
राघव
19 Mar 2010 - 1:01 pm | अश्विनीका
सुंदर कविता. आवडली खूप.
- अश्विनी
19 Mar 2010 - 1:02 pm | अश्विनीका
सुंदर कविता. आवडली खूप.
- अश्विनी
19 Mar 2010 - 7:23 pm | प्राजु
सुंदर कविता.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
19 Mar 2010 - 7:53 pm | विसोबा खेचर
नायरसाहेब,
सुरेखच कविता..!
तात्या.
20 Mar 2010 - 7:43 am | sur_nair
तात्या, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही हा फार छान कट्टा जमवून आणलाय. हेही एक वेगळ्या प्रकारचे 'घर'च म्हणावे लागेल.