रोजच्या कामातून मित्रानो ,थोडा वेळ काढूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
रंकाळ्यावरचा मस्त वेळ
एकदम झक्कास टी टाइम भेळ
पुन्हा एकदा खाऊया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
युनिवर्सिटीताली सुखद संध्याकाळ
पन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ
पुन्हा एकदा पाहूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
मिसळेचा जेवढा झटका
माणुसकीची तेवढीच गोडी
पुन्हा एकदा चाखूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
कट्ट्यावरची मस्ती
खासबाग ची कुस्ती
पुन्हा एकदा खेळूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
-के गा
प्रतिक्रिया
13 Mar 2010 - 7:09 am | विसोबा खेचर
वा! :)
13 Mar 2010 - 7:25 am | मदनबाण
झकास... :)
मिसळेचा जेवढा झटका
माणुसकीची तेवढीच गोडी
पुन्हा एकदा चाखूया
एखाद्या वीकेंड ला कोल्हापूर ला जाऊया
वा... :)
(चोरगेंची मिसळ चापणारा)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com