परम सन्तोश

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
10 Mar 2010 - 10:29 am

परमसंतोष

ज्ञात असते ती शोक इतुका,
करणार माझ्या मरणावरी
गाठले असते मृत्यो तुला
भेटुनी वरचेवरी !

भेटला आज उशिरा जरासा
पण योग्य समयी भेटला
आनंद आज सरणावरी
जळण्यांत मजला वाटला

निरंजन वहालेकर

कविता

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

10 Mar 2010 - 12:54 pm | नाना बेरके

दन्यात असते ती शोक इतुका ... हे कळाले नाही.

आणि . .

आनंद आज सरनावरी
जलन्यांत मजला वाटला .
सुरवातीला 'आनंद' हे मला एखाद्या व्यक्तीचे नांव वाटले.

फक्त दुसरे कडवे कळाले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचा भास झाला.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

निरन्जन वहालेकर's picture

10 Mar 2010 - 2:39 pm | निरन्जन वहालेकर

अभिप्राया बद्दल आभार. ज्ञात  शब्द बरोबर लिहिता आला नाहि.क्शमा असावि.

sur_nair's picture

12 Mar 2010 - 6:17 am | sur_nair

तेवढा 'ज्ञात' जरा एडीट करा म्हणजे पटकन कळेल. बाकी मस्त

राजेश घासकडवी's picture

13 Mar 2010 - 7:56 am | राजेश घासकडवी

शेर चांगले जमले आहेत. शुद्धलेखनाची फार चिंता करू नका. लिहीत राहा, आपोआप सवयीने सुधारेल.

राजेश

शुचि's picture

13 Mar 2010 - 5:25 pm | शुचि

कल्पना फारच सुंदर आहे.
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.