ढोकळा

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
11 Mar 2010 - 7:02 am

साहित्य-----दोन वाट्या थोडेसे आंबट ताक,एक वाटी बेसन्,एक चमचा खण्याचा सोडा,मिरची कोथिंबीर्,मोहोरी,हिंग्,तेल,मीठ
कृति---सुमारे चार तास ताकात बेसन भिजवून ठेवावे,नंतर पीठ थोडे फुगलेले दिसल्यावर त्यात मिरची वाटून ,चवीपुरते मीठ,खायचा सोडा घालावा.कुकरमधील एका भांड्याला तेल लावून त्यात मिश्रण ओतावे,कुकरची शिट्टी न लावता भांडे १० ते १५ मिनिटे कुकरमध्ये वाफवावे,सुमारे एक तासाने गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व वरून मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Mar 2010 - 7:13 am | विसोबा खेचर

साधी, सोपी, सुंदर पाकृ..

परंतु फोटो? :)

तात्या.

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:17 am | मंगेशपावसकर

नवीन लेख आठवणी ने वाचा

शेखर's picture

11 Mar 2010 - 10:22 am | शेखर

कोदाची आठवण झाली.....

टारझन's picture

16 Mar 2010 - 11:59 pm | टारझन

नाही नाही मंग्याच आहे तो .. "आणि हो प्रतिक्रीया द्या.." कुठे लिहीलंय त्यानं ? :)

बाकी ढोकळाच आहे आमच्या णशिबी .. त्यामुळे पर्वा इल्ले :)

-(ढोकळा प्रेमी) टी

अस्मी's picture

11 Mar 2010 - 10:32 am | अस्मी

छान पाकृ....खरंच सोपी आहे :)

- मधुमती

युयुत्सु's picture

11 Mar 2010 - 6:42 pm | युयुत्सु

सोडा किती घालायचा?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

पक पक पक's picture

16 Mar 2010 - 10:40 pm | पक पक पक

सोदा धरा काहिहि करा , कितिहि करा घाला ,परिनाम चान्गला मिलाला म्हन्जे झाले.

काजुकतली's picture

12 Mar 2010 - 3:38 pm | काजुकतली

हम्म्म.. मला नाही वाटत इतकी सोप्पी आहे म्हणुन... मी खुप वेळा प्रयत्न केला पण तो बाहेर मिळतो तसा जाळीदार ढोकळा माझ्या हातुन तरी अजुन बनलेला नाहीये. :(

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2010 - 9:26 pm | प्रकाश घाटपांडे

ढोकळा खाल्ला की तोटरा कशामुळे बसतो?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि's picture

13 Mar 2010 - 1:11 am | शुचि

आमच्या पुण्यामधल्या दव्यांचा ढोकळा खाला की ठोठरा नाही बसत बर का. आमच्या पुण्याची गोष्टच वेगळी म्हणा .... O:)
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

म्हानुन 'स्वीट होम्स' मध्ये त्यावर फोडानीत थोड़े साखर-पाणी टकुन ओल्सर टेवतात.

शानबा५१२'s picture

16 Mar 2010 - 11:47 pm | शानबा५१२

छान झाले तर ईमेलने पाठवा

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

शानबा५१२'s picture

16 Mar 2010 - 11:49 pm | शानबा५१२

ढोकळा हमका खुप अछ्छा वाट्तो.........

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........