(इतिहास)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Apr 2008 - 1:00 am

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांचा इतिहास

शोधून काढल्या मी गझला जुन्या टनाने
पाडू विडंबने ही आता नव्या दमाने

चुकलेच आज माझे प्रतिसाद टाकला मी
होईल वाद चालू तिरपा नव्या दमाने

उकरून काढला मी इतिहास हा तिचा अन
आली अनेक लफडी माझ्या पुढे नव्याने

ठाऊक सर्व होते घडणार काय आहे !
गेलो तरी तिच्या मी होतो घरी धिटाने

खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की
थोबाड सजवते ती नक्की किती थराने

हा ही प्रकार केला बदलून रूप गेलो
गेलोच पण पकडला मग तिंबले बुटाने

टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना?
चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने

ओढून बांधले मी नाडीस या तुमानी
येतेच ती सुटोनी खाली तुझ्या भयाने

आतून येत आहे आवाज हा कशाचा?
पोटात गुरगुरावे अत्ताच हे कशाने?

सोडून टाक "केश्या" होईल त्रास याचा
गझला लिहू नये या जाली विडंबकाने!

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

7 Apr 2008 - 1:01 am | बेसनलाडू

:)
(:))बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

7 Apr 2008 - 1:07 am | इनोबा म्हणे

वाटच पाहत होतो तुझ्या विडंबनाची. अगदी फर्मास झालंय बघ.

खिडकीतुनी तिच्या मी वाकून पाहिले की
थोबाड सजवते ती नक्की किती थराने

हे लईच बेस ;)

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 4:31 am | मदनबाण

टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना?
चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने
हा क्रम तर जबरदस्त आहे.....

(कुठलाही पूर्व इतिहास नसलेला)
मदनबाण

(अवांतर - एक शंका - धिटाने? असा शब्द बरोबर आहे का)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 9:40 am | विसोबा खेचर

टाळायचे कुणाला, मज हेच आठवेना?
चाळून पाहिल्या मी पोरी क्रमाक्रमाने

आतून येत आहे आवाज हा कशाचा?
पोटात गुरगुरावे अत्ताच हे कशाने?

मस्त! :)

सहज's picture

7 Apr 2008 - 10:34 am | सहज

आवडले!!

अविनाश ओगले's picture

7 Apr 2008 - 8:05 pm | अविनाश ओगले

मस्त....

ठणठणपाळ's picture

7 Apr 2008 - 10:09 pm | ठणठणपाळ

केशवसुमार, तुमच्याकडे काय विडंबनाचं मशीन आहे वाटतं? अहो, एक तरी कविता तशीच राहू द्या.
तरी पण हे विडंबन चांगलं जमलं आहे.

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 10:40 pm | छोटा डॉन

आयला विडंबनासाठी एखादं "ग्रॅमी अवॉर्ड" ठेवलं आणि ते तुम्हाला नाही मिळालं तर तिच्यायला खूनकी नदीया बहैंगी ...

आणि हे काय नविन काढलतं ? स्वताच एखादी गजल लिहायची आणि लगेच त्याच विडंबन हजर ...
असो. मज्जा येतीय . लगे रहो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार's picture

8 Apr 2008 - 9:02 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) केशवसुमार