महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली
उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली
धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला
बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला
मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो
इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं
अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा
टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा
शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं
मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं
कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला
मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला
द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार
दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्नं करू साकार
प्रतिक्रिया
4 Mar 2010 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या माय मराठीबद्दलच्या भावना पोहचल्या. मन कसं गदगदून आलं. :)
महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली
उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली
उपद्रवी लोण्धे हा सध्या वाढत्या महागाई इतकाच किंवा त्या पेक्षाही महत्त्वाचा विषय झाला आहे, हे एकदम मान्य. बरं ! वर आणखी आशाबाईंनी आपल्या मराठी माणसालाच खडे बोल सुनावले. महाराष्ट्राचं मन थोर आहे, याचा अर्थ महाराष्ट्राची कवाडं उपद्रवी लोण्ध्यासाठी किंवा उद्योग धंद्यासाठी उघडी आहेत असा त्याचा अर्थ थोडी होतो. आणि दुर्दैवानं आमच्या पोटावर पाय देणार्यांनी तसा अर्थ घेतला आणि आपल्या [आळशी] मराठी माणसाची तब्येतच बिघडून गेली. हा आशय वरील दोन ओळीतून खूप सूंदर व्यक्त झाला आहे. :)
कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला
मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला
मराठी माणूस पार अटकेपार गेला. घरात 'शुभं करोती' 'कराग्रे वसते लक्ष्मी' 'गणपती बाप्पा मोरया ' चा आवाज येत असायचा पण डॉलरांची रेलचेल झाली..आणि सर्व आवाज बंद झाला [स्वगतः मेलो आता] बदलते जग, बदलती व्यवस्था, जगण्याचे बदलते संदर्भ, वाढती धावपळ या सर्व दगदगींमुळे आपल्या संस्कृतीवर जसा आघात होत गेला तसा आणि त्याचा परिणाम मराठी लावणी आणि पॉप पोवादा म्हणजेच मराठी लोकसंस्कृतीवरही झाला हेही पटण्यासारखं आहे. चुभुदेघे :)
असो, कविता आवडली. कवितेच्या आशयावर अजून खूप लिहिण्यासारखं आहे. पण आता थांबतो.
-दिलीप बिरुटे
[मराठी माणूस आणि मराठी पोवाद्याचा फॅन]
5 Mar 2010 - 7:06 am | राजेश घासकडवी
तुमच्या रीसर्चमध्ये खालील प्रश्नांची उत्तरं मिळाली असल्यास सांगा.
- भारुड, गोंधळ असले प्रकार सोडून लोकं चवचाल लावण्या करायला लागले तेव्हा अशा कविता कोणी लिहिल्या का?
- संस्कृतआजी, अर्धमागधीकाकू, यांना सोडून इथल्याच तरण्या मराठीच्या मागे लोकं धावले तेव्हाच्या 'काई हा अनठ्ठ जाईला' असं म्हणणाऱ्या कविता सापडलेल्या आहेत का?
- शिवाजीच्या काळी शुभं करोति वगैरे हाय फाय संस्कृत बोलनारे किती होते? वाचन वगैरे करणारे किती होते? तेव्हापासून ते वाढले असल्यास नक्की कमी कधी झाले? या ऱ्हासाचा उगम नक्की कधी झाला?
राजेश
5 Mar 2010 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तुमच्या रीसर्चमध्ये खालील प्रश्नांची उत्तरं मिळाली असल्यास सांगा.
आमच्या रिसर्चमधे वरील विषयाचा अभ्यास केलेला नाही.
आपला अभ्यास करुन उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2010 - 10:49 am | नाद्खुळा
डॉ. सर , धन्यवाद.
-------------------------
राजेश सर , जेवढे मला महिति अहे त्य सन्दरभाने
१.भारुड, गोंधळ असले प्रकार सोडून लोकं चवचाल लावण्या करायला लागले तेव्हा देखिल लावण्यान विरोध झाला, तथापि तेन्व्हाचि संस्कृती अति पुरुषप्रधान असल्याने आणि मेडिया समाजात रुजला नसल्याने विरोध लोकांसमोर आला नसावा
छत्रपती, शिवाजी महाराजांच्या काळात किम्बहुना पूर्वी पासून संस्कृत (प्राकृत रुपात ) आपल्याकडे बोलले जात होते. शुभंकरोती ची सुरवात महाराष्ट्रात कधी आणि कशी झाली या बाबतीत मला जन नाही :)
चुभुदेघे