नमस्कार,
आपण मला माझ्या लेखनाला चांगली दाद दीली त्या मुळे मला माझे प्रकल्प सर्वांपर्यंत पोचवण्यास नवा हुरूप आला.
मित्रांनो मी या वर्षी राबवीत असलेल्या एका प्रकल्पा बाबत आपणास थोडक्यात माहीती करून देणार आहे.
माझा हा प्रकल्प मी शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता देवगड या ग्रामिण भागात असणा-या शाळेतील इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या मुलांवर मी राबवत आहे. मित्रांनो माझ्या या प्रकल्पासाठी मी २२ विद्यार्थी व १२ विद्यार्थीनी अशी एकूण ३४ विद्यार्थी सहभागी आहेत. हा माझा प्रकल्प शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी आम्ही राबवत असतो. या प्रकल्पात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग हा फार महत्वाचा व गरजेचा आहे.
विषय : १० वी पास झाल्यावर खेडे गावातील मुले शहराच्या ठिकाणी जेव्हा पुढील शिक्षणासाठी जातात किंवा नोकरी साठी जातात तेव्हा ती अभ्यासात हूशार असूनही चार वाक्ये धड बोलू शकत नाहीत तसेच त्याच्यात ते धाडस पण नसते त्या मुळे त्याना आपल्या हुशारीवर शरात चांगली नोकरी मिळात नाही. या वर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की हे असे का घडते ? विचारा अंती मला असे समजले की या मुलांचा पुस्तकी अभ्यास चांगला असतो मात्र ती मुले शहरातील लोकांत त्याच्या भाषण काव्शल्या मुळे मागे पडतात. त्यांच्यात असणारी ही कमतरता नाहीशी करण्यासाठी मी www.ted.com या वेबसाईट चा उपयोग करून घेतला व त्याला मला चांगला प्रतिसाद मुलांकडून मिळाला.
प्रक्ल्पाची थोडक्यात माहीती व क्रुती : मी २ मुले व २ मुली अशा ४ विद्यार्थ्यांचा एक गट असे ८ गट तयार केले. त्या प्रत्येक गटाने दर शनीवाॠ व बुधवारी शाळा सुटल्यावर संगणक कक्षांत जाऊन www.ted.com या वेब साईट वरील टेड पहायला सुरवात केली व त्याना ज्या विषयाची टेड आवडली ती त्यानी डाऊनलोड केली ती त्यानी काळजी पुरवक पाहून त्या टेड चा अभ्यास केला उदा : ती कोणात्या विषयाची आहे? त्यात नाविन्य काय आहे? त्याचा गाभा कोणाता आहे? ती त्याना का भावली ? अशा प्रशांची तयारी करत असत. म्हणजेच ती टेड सखोल अभ्यासत असत. नंतर येणा-या रविवारी दुपारी ३ वाजता ( कारण त्या दिवशी शाळेला सुट्टी असते व अभ्यासाचे नुकसान होत नाही ) सर्व गट संगणक प्रयोग शाळेत जमा होत असत. त्यातील एक गट ( ज्याने टेड डाइनलोड करून टेड ची तयारी केली आहे ) आपले टेड एल. सी.डी प्रोजेक्टार चा उपयोग करून सर्व मुलांसमोर सादर करत त्या नंतर बाकिचे ७ गट त्याना त्या टेड वर प्रश्न वविचारत्तेव्हा सादर केलेल्या गटाने त्यांच्या प्रशांची उत्तरे देत. म्हणाजेच त्याच्या शं़आंचे निरसन वेगवेगळी उदाहरणे, किंवा दाखले देऊन करत थोडक्यात सांगावयाचे म्हणाजे आम्ही तुम्हाला दाखवलेली टेड कशी चांगली आहे. त्यात काय नाविन्य आहे ह्या गोष्टी सर्वाना पटऊन देत . त्या नंतर बाकीचे गट त्या टेड्ला १० पाईकी गुणादान करत. पुढच्या आठवड्याला दुस-या गटाचा नंबर असायचा तेव्हा बाहिच्यानी त्या गटाला गुणादान करावयाचे असायचे. अशी ही प्रकल्पाची वाटाचाल मागील २७ आठवड्या पासून सुरू आहे.वर्षाच्या शेवटी ग्या ज्या गटाला सर्वात जास्त गुण मिळातील तो गट विजेता ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांची आकलन शमता वाढलेली मला दिसून आली. तसेच त्यांच्या भाषण या कवशल्यात पण चांगल्या प्रकारे प्रगती दिसून आली. तसेच आपला मुद्दा अशा प्रकारे समोरच्या व्यक्तिला पटवून व समजाऊन द्यावयागुण् गुण त्यान्ही आत्मसाद केलेला दिसला. मला अभिमान वात वाटतो की आमच्या या मुलांत बोलण्याचे धाडस निरमाण झाले आहे. आता ते निश्चित पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी बाहेर गावी जातील तेव्हा आपली छाप समोरच्या व्यक्तीवर पाडतील अशी मला खात्री आहे.
पुस्तकी शिक्षणा व बरोबरच या मुलानी आपले व्यक्तीमत्व विकसित करण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करणे गरजेचे आहे.मला अभिमान आहे की अशा प्रकारचा प्रकल्पासाट्।ई आम्च्या सारख्या या खेडेगावातील मुलानी मला चांगले सहकार्य केले. तसेच पालकानी पण सहकार्य केले. त्यांचे धन्यवाद मानावे तेव्हडेच कमी
अशा प्रकारे मुलांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे.
धन्यवाद ! आपल्या कडेही काही कल्पना असल्यास ज्या मुलाना उपयुक्त ठरतील तर आवश्य सुचवा. तसेच माझ्या या प्रकल्पात काही त्रुटी असल्यास सांगाव्यात व नविन उपाय सुचवावेत
पुन्हा धन्यवाद!!!!
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 8:36 pm | अक्षय पुर्णपात्रे
तुमचा प्रकल्प नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण आहे. शाळेत असतांना अशा प्रकारच्या गोष्टींनी मुलांमध्ये ज्ञानाविषयी एक नवीच ऊर्मी निर्माण होते, जी सकस आणि दीर्घकाळ टिकणारी ठरते. टेडवरच्या बर्याच गोष्टी इंग्रजी भाषेत असतात. त्या समजावून घेतांना मुलांना काही अडचणी येतात का?
या संकेतस्थळावर विज्ञान, कला, इतिहास अशा निरनिराळ्या विषयांवर उत्तमोत्तम लेख आहेत. काही चर्चा मुलांच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नाहीत. पण बहूतांश लेख अतिशय उपयुक्त ठरतील.
26 Feb 2010 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला उपक्रम चांगला आहे. आपले मन:पुर्वक अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
27 Feb 2010 - 2:44 am | मीनल
+१
मीनल.
27 Feb 2010 - 2:49 am | धनंजय
नाविन्यपूर्ण शिक्षणप्रकल्प, त्याबद्दल विद्यार्थ्यांची हौस आहे, हे सगळे वाचून फार बरे वाटले.
27 Feb 2010 - 7:23 am | राजेश घासकडवी
आपण एखादी कल्पना कोणाला समजावून सांगतो, जेव्हा आपली तितकी तयारी असते तेव्हा आपण जास्त शिकतो. अशा प्रकारे मुलांना छोटी आव्हानं देऊन तुम्ही त्यांना नवीन कल्पना तर शिकवतच आहात. शिवाय आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगायची असेल तर त्यासाठी किती तयारी लागते याचा अंदाज देत आहात. याहीपुढे त्यांच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने किती माहिती असल्यावर आपण खात्रीपूर्वक कोणाला काही समजावू शकतो हेही माहीत असणं महत्त्वाचं आहे - ते यातून होतं. या उपक्रमाला शुभेच्छा.
27 Feb 2010 - 7:43 am | Nile
अरे वा. सुंदर उपक्रम. जर काही उपयोगाचं सापडल तर तुम्हाल नक्कीच कळवेन. शुभेच्छा!
27 Feb 2010 - 12:58 pm | विजुभाऊ
सर हे वाचा http://misalpav.com/node/10160
27 Feb 2010 - 1:42 pm | विसोबा खेचर
आत्तार साहेब, अभिनंदन..
तात्या.
27 Feb 2010 - 2:00 pm | कपिल काळे
सुंदर उपक्रम!!