कांगावा

विकास's picture
विकास in काथ्याकूट
26 Feb 2010 - 1:52 am
गाभा: 

चित्रकार एम एफ हुसैन यांच्यातील कलाकाराबद्दल मला आदर आहे. मात्र, हिंदू देवदेवतांचे (विशेषतः सीता, सरस्वती आणि मला वाटते मारूती) अत्यंत असभ्य रेखाटन करून त्यांनी स्वतःच्या कलागुणांचा गैरवापर केला असे वाटते. कलेचे आणि कलाकाराचे स्वातंत्र्य हे प्रस्थापित कायदे, समाजव्यवस्था आदींचा किमान आदर राखत जबाबदारीने पाळले जावे असे वाटते.

आज हे सर्व लिहायचे कारण इतकेच की मला भारत सोडायचा नाही पण पर्याय नाही म्हणत हुसेनबाबांनी कत्तारचे नागरीकत्व घेतले आहे/घेणार आहेत. त्यांनी म्हणे तसे ते मागितले नव्हते तरी देखील तेथील राजाने त्याला बहाल केले. खालील चित्र त्यांनी हिंदू दैनिकात पाठवले आहे:


The black-and-white line drawing eminent artist M.F. Husain shared with The Hindu. Though this exemplar of secular art did not apply for it, he was conferred citizenship by Qatar. (The Hindu)

एक उदाहरण म्हणून सांगतो: असेच जालावरून कोणीतरी अमेरिकेत हिंदू देवदेवतांची काही गैरचित्रे काढली त्याबद्दल बंदी आणण्यावरून विचारले तर तेंव्हा ते अयोग्य वाटले. कारण अमेरिकेत त्याहूनही भिषण रेखाटने ख्रिस्तीधर्मा बद्दल काढलेली, ज्यूंची थट्टा केलेली पाहीलेली आहे आणि ती प्रस्थापीत कायद्यातील कलेच्या स्वातंत्र्यात पटत नसली तरी बसते. त्यामुळे त्याविरुद्ध आवाज करणे योग्य वाटत नाही. पण भारतात तसे नाही. इतर धर्मीयांवर केले तर धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात (त्यातही जर परधर्मीयाने केले तर जास्तच!) मात्र हिंदूच्या देवदेवतांची कशीही रेखाटने म्हणजे नुसतेच कलेचे स्वातंत्र्य ठरत नाही, तर, "सेक्यूलर आर्ट" ठरते!

त्यावर झुंडशाही हा उपाय आहे असे मला अजिबात वाटत नाही. तसा कोणी केल्यास कायद्याने सर्व कठोर उपाय करावेत. मात्र जर कोणी त्या विरुद्ध न्यायालयाचे दार ठोठावले अथवा कायद्याच्या चौकटीत सरकारकडे बंदी घालायची मागणी केली (मला स्वतःला अशी बंदी कशावरच मान्य नाही) तर त्यात काही गैर वाटत नाही...

आज स्वत:च्या जीवाला धोका असलेले अनेक आहेत. त्यात सर्वच पक्षातील प्रमुख राजकारणी आहेत, विविध विचारसरणींचे समाजकारणी आहेत, अनेक नटनट्या आहेत, आणि उद्योजकपण आहेत... कोणी कुठे रहायचे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे पण, यातील कोणीच असले कारण देत देश सोडत नाही. मग स्वतःच्या "सेक्युलर आर्ट"ला धोका आहे असे म्हणत डाव्या विचारांच्या हिंदू दैनिकांचा आधार घेत हुसैन आणि हिंदू दैनिकही हा उगाच कांगावा करत आहेत असे म्हणल्यास चुकीचे ठरेल का?

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

26 Feb 2010 - 3:00 am | भास्कर केन्डे

काय हा योगायोग... कित्येक महिन्यांनी मी आज काही लिहिले. अन त्याच वेळी तुम्ही सुद्धा त्याच विषयावर लिहित होता. :)

"सेक्युलर आर्ट"चा सामान्य इंग्रजी अर्थ अर्थ बिगर-धार्मिक (ऐहिक) कला असा होत असावा. "सेक्युलर राज्यपद्धतीशी संबंधित कला" असा होत नसावा. चू.भू.द्या.घ्या.

उदाहरणार्थ जे. एस. बाख या संगीतकाराला सेक्युलर राज्यपद्धतीबद्दल विशेष आवड नसावी, असे त्याच्या चरित्रावरून वाटते. पण त्याने चर्चमध्ये गाण्यासाठी संगीत लिहिले, आणि चर्चबाहेर गाण्यावाजवण्यासाठी संगीत लिहिले, त्याला अनुक्रमे "रिलिजियस म्यूझिक" आणि "सेक्युलर म्यूझिक" असे म्हणायची पद्धत आहे.

त्याच प्रमाणे लिओनार्दो दा विंची याने "रिलिजियस आर्ट"ही बनवली, आणि "सेक्युलर आर्ट"सुद्धा. त्यालासुद्धा सेक्युलर राज्यपद्धतीविषयी काय वाटत होते, त्याचा संबंध या वाक्प्रचारात येत नाही.

"सेक्युलर आर्ट" हा वाक्प्रचार मी अनेकदा ऐकल्यामुळे (किंवा येथे गूगलून त्याचा सामान्य इंग्रजी उपयोग शोधता येईल) वरील चर्चाप्रस्तावाने चक्रावलो आहे. भारतीय इंग्रजी बोलीत "सेक्युलर आर्ट"चा "सेक्युलर राज्यपद्धती"शी अर्थसंबंध लागतो का?

अर्थातच व्युत्पत्तिजन्य संबंध आहे : दोन्ही ठिकाणी मूळ लॅटिन शब्द सेक्युला [अर्थ=काळ] हाच आहे. पण दोन्ही वाक्प्रचारांमध्ये अर्थ वेगळा आहे, असे वाटते.

वैद्यकातल्या आकडेवारीत आम्ही ऐतिहासिक कालक्रमणाला "सेक्युलर ट्रेंड" म्हणतो ("सेक्युलर ट्रेंड इन बर्थ रेट"=इतिहासात जन्मदराचे कालक्रमण कसे झाले.) पण "जन्मदर धार्मिक की बिगरधार्मिक" असा अनर्थ माझ्या निबंधांत कोणी वाचू नये! :-)

हुसेन यांनी बरीच चित्रे काढली. जर हुसेन यांनी बहुतेक चित्रे प्रार्थनास्थळात पूजण्यासाठी बनवली नसतील, तर सामान्य इंग्रजी वापराप्रमाणे त्यांची बहुतेक चित्रकला "सेक्युलर आर्ट" ठरते.

विकास's picture

26 Feb 2010 - 6:05 am | विकास

"सेक्युलर आर्ट"चा सामान्य इंग्रजी अर्थ अर्थ बिगर-धार्मिक (ऐहिक) कला असा होत असावा. "सेक्युलर राज्यपद्धतीशी संबंधित कला" असा होत नसावा.

बरोबर आहे आणि हाच अर्थ मी देखील घेतला होता/आहे.

त्याच प्रमाणे लिओनार्दो दा विंची याने "रिलिजियस आर्ट"ही बनवली, आणि "सेक्युलर आर्ट"सुद्धा.

हा आणि त्या आधीचा जे एस बाख यांचा संदर्भ मात्र हुसैन यांच्या संदर्भात पटला नाही. लिओनार्दो दा विंचीची सेक्युलर चित्रे ही काही धर्मावर आधारीत गोष्टींची नाही आहेत. तर वेगळी वाटली. (उ.दा. मोनालीसा). तर धार्मिक चित्रातले सुप्रसिद्ध चित्र हे "लास्ट सपर" आहे. अर्थात मी दा विंचीच्या बाबतीत काही माहीतगार नाही, त्यामुळे जर काही चुकत असेल तर अवश्य सांगावे.

मात्र हुसैन यांच्या बाबतीत सरस्वती, सीता, दुर्गा आदी जी काही चित्रे आहेत ती केवळ देवळात नाहीत म्हणून सेक्यूलर समजायची का? असे (एन राम आणि तत्सम डाव्यांचे) लेखन हे अशावेळेस सेक्युलरचा संदर्भ देते, ते पटत नाही.

कदाचीत जर चर्चेत स्पष्ट झाले नसले तर, माझा आक्षेप हा हुसैन यांच्या चित्रापेक्षा त्याचे जे असे विश्लेषण केले जाते आणि त्यासंदर्भात वेगळा न्याय लावला जातो त्याला आहे. स्विडीश (बरोबर ना?) कार्टूनिस्ट आणि त्याचे चित्र जर भारतात (हिंदूमधेच!) आले असते तर त्याला सेक्युलर आर्ट (फारतर सेक्यूलर कार्टूनिस्ट) असे म्हणले जाईल का? उत्तर नाही असेच आहे. कायदा माहीत नाही तरी सांगतो की कायद्याच्या वापर करून हे चालून घेतले नसते... मग तेच हिंदूंच्या बाबतीत पण जर लागू केले तर दोन गोष्टी होतातः (१) सगळ्यांना समान न्याय आणि कायदा (जे सगळ्यात महत्वाचे) आणि (२) अशाच्या विरुद्ध आंदोलन करणार्‍यांची हवाच निघून गेली असती!

पण तसे घडत नाही. मग "इरादे नेक"पण वाटत नाहीत आणि "सेक्यूलर" पण वाटत नाहीत. हे परत माध्यमे/विचारवंत/सरका यांच्या संदर्भात जास्त आहे. हुसैन यांच्या संदर्भात आत्तात्च जेंव्हा गुगगलले तेंव्हा अनेक चित्रे मिळाली. त्यातील एका ब्लॉगवर ठेवलेली दिसली. ती खरी आहेत असे मी गृहीत धरत आहे. त्यातील भारतमाता (ज्यावर २००६ मधे भारत सरकारने आक्षेप घेतला), हिंदू देव-देवता, डोके (शीर) नसलेले गांधीजी, मदर तेरेसा, हुसैन यांची आई वगैरे बघितल्यावर कुठल्या कलेला काय म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. माझ्यापुरते म्हणाल तर मला सगळ्यात स्वातंत्र्य आवडते म्हणून आक्षेप घेणार नाही, जो पर्यंत हे स्वातंत्र्य सर्वांना समान उपभोगता येत असेल तो पर्यंत.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनील's picture

26 Feb 2010 - 10:15 am | सुनील

स्विडीश (बरोबर ना?)

स्वीडीश नव्हे, डॅनिश

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

26 Feb 2010 - 10:20 am | विकास

स्वीडीश नव्हे, डॅनिश

धन्यवाद! :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Feb 2010 - 9:19 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास यांनी दिलेल्या दुव्यावर हुसेन यांची चित्रे पाहिली. त्या चित्रांमध्ये मला काही वावगे आढळले नाही. त्यांचा काय कलात्मक दृष्टीकोन असावा याविषयी काही भाष्य करण्यास मी असमर्थ आहे. पण ज्यांची या देवतांवर श्रद्धा आहे त्यांना ही चित्रे अवमानकारक वाटण्याची शक्यता मी नाकारत नाही. या संदर्भात सलमान रश्दी यांच्या 'सॅटॅनिक वर्सेस' या पुस्तकाची आठवण आल्यावाचून राहवत नाही. ते पुस्तक वाचल्यानंतर मला काही वावगे आढळले नाही. अनेक मुस्लिम धर्मियांना मात्र ते पुस्तक अवमानकारक वाटते. डॅनिश व्यंगचित्रकाराने काढलेल्या चित्राबाबतही असेच म्हणता येईल. मला व्यक्तिश: काही वाटले नाही. अनेक मुस्लिम धर्मियांना मात्र ते व्यंगचित्र इस्लामला नाकारणारे वाटले. अनेक ख्रिश्चन धर्मीयांनाही येशू ख्रिस्ताबाबत कलेमध्ये घेतलेले स्वातंत्र्य अयोग्य वाटते, जे मला वाटत नाही.

एन राम यांनी 'सॅटॅनिक वर्सेस'वर भारतात (इतर देशांच्या आधी) बंदी घातल्यानंतर भारतातील व्यवस्था 'impotent' (षंढ) वाटली की नाही हे मला माहीत नाही. भारतात समुदायांच्या भावनांविषयी नको तितकी संवेदनशीलता आहे. ती काही आजकाल अस्तित्त्वात आलेली नाही. तेव्हा भारतीय व्यवस्था ही नेहमीच व्यक्तिस्वातंत्र्याबाबत बोटचेपे धोरण स्विकारते, हे त्यांना नवीन नसावे. तेव्हा व्यवस्थेला नपुंसक म्हणण्याइतपत उद्विग्नता त्यांना वाटणे हे आश्चर्यकारक आहे.

ते आपल्या लेखात म्हणतात हुसेन यांना कतार सरकारने न मागता राष्ट्रीयत्व दिले. कतारमध्ये राजेशाही आहे. राणी साहेबांनी त्यांना 'अरब संस्कृतीचा इतिहास' यावर चित्रे काढावयास लावली आहेत. हुसेन इसवीसनापुर्वीच्या अरब संस्कृतीस कसे रेखाटतात हे पाहणे रोचक ठरावे. कमीत कमी प्रेषित पैगंबर तत्कालीन अरबांच्या नजरेने रेखाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कलेविषयीच्या निष्ठेचा अनुभव येईल.

दुसर्‍या देशात रहावे लागण्याचा जाच त्यांना उतारवयात सहन करावा लागत आहे, हे दुर्दैवी आहे. पण तो त्यांचा स्वत:चा निर्णय आहे. त्यांना हात धरून कोणी भारतातून हाकललेले नाही. त्यांना जीवास धोका असल्यास सरकारने त्यांना सरकारने संरक्षण दिले असते याविषयी थोडीफार खात्री बाळगण्यास जागा आहे. तेव्हा त्यांच्या देशाबाहेर राहण्याच्या स्वयंनिर्णयाविषयी मला ममत्व वाटले तरी तो भारतीयांचा किंवा भारतीय व्यवस्थेचा दोष आहे, हे मान्य करणे मला कठीण वाटते.

हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावणार्‍या झुंडशाहीचा निषेध करणे आवश्यक आहे. त्यांच्या घरावर हल्ला करणार्‍या माथेफिरुंचाही निषेध नोंदवावा तितका कमीच आहे. न्यायालयात जाण्याचा वैधानिक मार्ग पत्करणार्‍या लोकांचे पाऊल मात्र योग्य दिशेनेच पडले आहे. जर धर्माच्या नावाखाली कलेला केलेला विरोध मान्य करायचाच आहे तर कुठल्याही धर्माबाबत हे तत्त्व सारखेच लागू व्हावे.

अशा प्रकारे कलेला विरोध करणे मला व्यक्तिश: सर्वथा अयोग्य वाटते. कुठल्या कलाकाराच्या कलेमुळे कुठल्या धर्माच्या अनुयायी असलेल्या व्यक्तिचा धर्माविषयी आदर कमी होतो असे तर मला मु़ळीच वाटत नाही. भारतीय व्यवस्थेने प्रगल्भ होण्याची आवश्यकता आहे. सर्व समुदायांकडून ही अपेक्षा सारख्याच प्रमाणात केली जावी.

विकास's picture

26 Feb 2010 - 10:04 am | विकास

श्री. अक्षय यांच्या प्रतिसादाशी सहमत, विशेष करून शेवटच्या दोन परिच्छेदांशी.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनील's picture

26 Feb 2010 - 10:29 am | सुनील

हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावणार्‍या झुंडशाहीचा निषेध करणे आवश्यक आहे. त्यांच्या घरावर हल्ला करणार्‍या माथेफिरुंचाही निषेध नोंदवावा तितका कमीच आहे. न्यायालयात जाण्याचा वैधानिक मार्ग पत्करणार्‍या लोकांचे पाऊल मात्र योग्य दिशेनेच पडले आहे. जर धर्माच्या नावाखाली कलेला केलेला विरोध मान्य करायचाच आहे तर कुठल्याही धर्माबाबत हे तत्त्व सारखेच लागू व्हावे.

सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Feb 2010 - 4:00 pm | बिपिन कार्यकर्ते

अक्षयच्या प्रतिसादातील शब्दाशब्दाशी सहमत. याहून काहीच वेगळे लिहिले नसते मी. फक्त एवढेच वेगळेपण की ती चित्रे मला व्यक्तिशः चूक वाटली होती. जी अक्षयला वाटली नसावीत असे वाटते. पण तो वैयक्तिक विचारांचा भाग.

काल ही कतारची बातमी वाचली, त्यावरचा ऊहापोह वाचला काही स्थळांवर, ट्विटरवर राजदीप सरदेसाईची ट्वीटही बघितली. आणि 'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' मधील या विषयावरील त्यांची मते वाचली. खरंच मूळातून वाचण्यासारखी आहेत. या सर्व प्रकरणात त्यांनी हुसेनला पूर्णपणे दोष दिला आहे.

अक्षय म्हणतो तसे सटॅनिक व्हर्सेसच्या बाबतीत एन. राम यांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आज समाजाचे धृवीकरण इतके जलदगतीने होत असताना, अतिरेकी प्रवृत्ती वाढत असताना हे जे तथाकथित सेक्युलरवादी असल्या भोंगळ भूमिका घेतात त्याने खुल्या विचारव्यवस्थेचे अधिक नुकसान होते असे वाटते. कट्टरतेचे पाप फक्त हिंदुत्ववाद्यांच्याच (किंवा जिहादी म्हणा अथवा ख्रिस्ती मिशनरी वगैरे म्हणा) माथी नाहीये... सेक्युलरवादीही त्या पापाचे धनी आहेत. आणि कट्टरता आली की मग सत्य परकं आणि धोकादायक बनतं ....

बिपिन कार्यकर्ते

सन्जोप राव's picture

26 Feb 2010 - 5:23 pm | सन्जोप राव

श्री. अक्षय पूर्णपात्रे (त्यांच्या नावाच्या उच्चारावरुन ते नाव असे लिहिले जावे असे वाटते. चू.भू.दे.घे.) यांच्या प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत आहे.
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2010 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावणार्‍या झुंडशाहीचा निषेध करणे आवश्यक आहे. त्यांच्या घरावर हल्ला करणार्‍या माथेफिरुंचाही निषेध नोंदवावा तितका कमीच आहे.

सहमत आहे...!

-दिलीप बिरुटे

Dipankar's picture

26 Feb 2010 - 10:10 am | Dipankar

मग हुसेन यांनी नग्न चित्रे काढताना का सर्वधर्म समभाव नाही दाखवला? हिंदू देवतां बरोबर स्वधर्मातील पवित्र व्यक्तीची, स्वताच्या आईची अशी चित्रे का काढली नाहीत?

प्रदीप's picture

26 Feb 2010 - 11:18 am | प्रदीप

परवाच 'अल जझि़रा' वर हुसेन ह्यांची रियाझ खान (पूर्वी सी. एन. एन. वर कार्यरत होते ते) ह्यांनी घेतलेली मुलाखत पाहिली. त्यात हुसेन म्हणाले की त्यांच्या अगदी लहानपणीच त्यांची आई निवर्तली. तिचे त्यांना काहीही आठवत नाही. तेव्हा आईची चित्रे त्यांनी का काढली नाहीत ह्याचे उत्तर (कदाचित) मिळावे.

त्याहीपुढे जाऊन ते म्हणाले की स्त्रीरूपाची अनेक चित्रे त्यांनी काढली कारण त्यांतून त्यांना त्यांच्या कधीही न पाहिलेल्या/अनुभवलेल्या आईचा शोध घ्यावयाचा होता.

ह्या मुलाखतीत ते भारताविषयी उमाळ्याने बोलले. रियाझ खानांनी त्यांना भारतात जे अनेक सरकारी बहुमान प्राप्त झालेले आहेत त्याची आठवण करून देताच ते म्हणाले की 'हा माझ्या देशाने मला दिलेला मान आहे! त्याचे मोल माझ्या दृष्टिने खूप आहे'.

Dipankar's picture

26 Feb 2010 - 11:51 am | Dipankar

प्रदीप मलाही तुमचा शोध घ्यावासा वाटतो पण माझी चित्रकला तितकीशी (तितकीशी काय आजीबात) चांगली नाही

:)) :))

नितिन थत्ते's picture

26 Feb 2010 - 1:06 pm | नितिन थत्ते

ती तीच चित्रे आहेत असे गृहीत धरून विकास यांच्याशी साधारण सहमत.

(ब्लॉगचा दुवा दिलेला पाहून दुसर्‍या एका धाग्यावर एका नाटकातली सावरकरांची म्हणून दाखवलेली विधाने काढायला लावली गेल्याची आठवण झाली)

नितिन थत्ते

मदनबाण's picture

26 Feb 2010 - 4:50 pm | मदनबाण

हिंदुलोक अतिसहिष्णु असल्याने त्यांच्या भावनांची किंमत आता या हिंदुस्थानात उरली नाही.त्यांच्या धार्मीक भावना त्या धार्मीक आणि हिंदुंच्या भावना मात्र कवडी मोलाच्या.
हुसेन यांना जर चित्रकारीचा एव्हढाच शौक असेल तर त्यांनी त्यांच्याच प्रेषिताची अशीच सुंदर चित्रे काढावीत आणि त्याचे भव्य प्रदर्शन भरवुन दाखवावे,मग एखादा तरी फतवा निघतो की नाही ते पहाच !!!
ह्यांनी गजगामिनी काढला आणि बहुधा माधुरीच्या पाठी शिवाय दुसरा कसलाही भाग यांना संपुर्ण चित्रपटात दिसलाच नसावा...

एकदा न्युज चॅनल वरती ह्यांचीच एक अदाकारी पाहत होतो...माधुरीचे चित्र काढताना समोर माधुरी होती...ह्यांनी तीन गोळे काढले आणि माधुरी साकार झाली...आता बोला. ;)
ह्या असल्या चित्रकारांसमोर रस्त्यावर कोळश्याने किंवा रंगीत खडुने साचेबद्ध चित्र काढणारे गरिब तरुण मला जास्त सृजनशील वाटतात.
कुठलाही अर्थ नसलेल्या चित्रामधे अर्थ शोधणारी माणसे पाहिली की मला त्यांची कीव करावी वाटते,अशाच लोकांना त्या चित्रांमधे काहीही गैर मात्र दिसत नाही हा भाग वेगळाच... ;)

(कला म्हणजे नक्की काय रे भाऊ ? :? )
मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

अप्पा जोगळेकर's picture

26 Feb 2010 - 3:01 pm | अप्पा जोगळेकर

हुसेनने स्वतःच्या आईबापाची नग्न चित्रे काढावीत. संभोग करतानाची असलि तरी चालेल. आणि आठवत नसेल तर स्वतःचे नग्न चित्र काढावे. दिप्या, आज मी चक्क हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने भांडतोय. तू लढ. आपला फुल सपोर्ट आहे.

श्रावण मोडक's picture

26 Feb 2010 - 5:34 pm | श्रावण मोडक

केवळ अज्ञानातून हा प्रश्न - हे हुसेन खरंच इतके थोर चित्रकार आहेत का हो? थोर चित्रकार म्हणजे, खरंच त्यांच्या (त्या देव-देवतांच्या सोडून इतर तरी) चित्रात तसा दम असतो का? येथे सापेक्षता लागू होणार असली तरी, सरासरीत त्यांची चित्रे अशी थोर आहेत का?

विकास's picture

26 Feb 2010 - 5:52 pm | विकास

हा प्रश्न एन.राम यांना आणि इतर प्रसिद्धीमाध्यमांना विचारायला पण हरकत नाही. आजही गुगलन्यूजवर २०० तरी दुवे मिळतात.

असो. बाकी माझ्या वैयक्तीक दृष्टीकोनातून ते नक्की चांगले चित्रकार आहेत. म्हणूनच सुरवातीस म्हणल्याप्रमाणे त्यांच्या कलेबद्दल आदरही आहे.

माझ्यापुरते बोलाल तर माझा मुद्दा (परत उगाळत सांगतो ;) ) हा हुसैनपेक्षा तथाकथीत सेक्युलर म्हणवणार्‍यांच्या संदर्भात आणि समान न्याय न वापरण्यासंदर्भात आहे. त्यांनी त्यांच्या आईंची चित्रे कशी काढावी याच्याशी माझे काही देणेघेणे नाही. मात्र ती जर अशी चुकीची काढली असती तरव्यक्तीगत मला आवडली नसती हे पण तितकेच सत्य आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

कानडाऊ योगेशु's picture

26 Feb 2010 - 5:55 pm | कानडाऊ योगेशु

पते की बात मोडकसाहेब.!

काही दिवसांपूर्वी हुसेनच्या वादग्रस्ततेवर्/गुणवत्तेवर लिहिलेला एक लेख वाचला होता.

खजुराहो येथील नग्न शिल्पांचा आणि हुसेनच्या चित्रात दिसणार्या नग्नते बाबत तुलना केली होती.

लेखकाच्या मते खजुराहो शिल्पांचे मूर्तीकार हे अज्ञात आहेत.त्यांची नावे कोणाला ठावुक नाहीत.ती शिल्पे कालौघात टिकली ती केवळे त्यांच्यातील सौंदर्यात्मक गुणवत्तेमुळे.

हुसेनच्या चित्रातुन हुसेनची सही वजा केली तर काय उरते?

चित्राला किंमत आहे ती केवळ हुसेन या नावामूळे.

अन हे माहीत असल्यामुळेच की काय हुसेनसाहेब चित्रामध्ये नेहेमीच वादग्रस्ततेचा योग्य उपयोग करुन घेतात.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चिरोटा's picture

26 Feb 2010 - 7:43 pm | चिरोटा

अन हे माहीत असल्यामुळेच की काय हुसेनसाहेब चित्रामध्ये नेहेमीच वादग्रस्ततेचा योग्य उपयोग करुन घेतात.

हुसैन ह्यांचे चित्र वादग्रस्त झाले(किंवा मुद्दामून तसे करण्यात आले) ते एका हिंदी दैनिकामुळे.१९७० साली काढलेले चित्र १९९६ साली छापून त्या दैनिकाने त्या चित्रात धार्मिक रंग ओतायचा प्रयत्न केला.
ह्या घटनेआधी हुसेन ५० वर्षे चित्रे काढतच होते.
भेंडी
P = NP

विकास's picture

26 Feb 2010 - 8:32 pm | विकास

१९७० साली गडबड झाली नाही कारण तेंव्हा बहुसंख्य हिंदू समाज हा अल्पसंख्यांकाच्या भावना दुखावू नयेत म्हणून बहुसंख्येने समजून घेत असे. शिवाय प्रसार माध्यमे पण १९९६ साला इतकी तंत्रज्ञानाने पोचलेली नव्हती. मात्र जेंव्ह समाजात असमान वागणूक दिली जाते तेंव्हा त्याचे परीणाम कधीतरी मोठे होणारच... मग ते हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन असोत, मराठी-अमराठी असोत का अजून काही. अर्थात या नैसर्गिक प्रतिक्रीयेप्रमाणेच कोणी राजकीय अथवा अजून काही फायद्यासाठी पण असे करू शकते.
१९९६ साली अचानक बाहेर येण्याचे कारण काय होते? तसेच त्यांची सर्वच हिंदू देवदेवतांची चित्रे आधीची आहेत का नंतरची? हा पण एक प्रश्न आहे.

बर हे आपण प्रस्थापित कायद्याच्या आणि न्यायाच्या अनुषंगाने बोलतोय. नाहीतर मुशारफने आग्र्याला येऊन काफीर म्हणत तलवार चालवणे पण योग्य ठरेल आणि अडवाणींनी त्याला गळामिठी मारत वाघनखे वापरणे पण ;) पण तसे चालू शकत नाही. अगदी शीतयुद्धात जे अमेरिका करू शकली तसे आज करू शकत नाही - स्वसंरक्षणासाठीपण - कारण प्रस्थापीत कायदे. थोडक्यात आपण इतिहास बोलत नसून वर्तमान बोलत आहोत.

आता अजून एक आठवली म्हणून हुसैन यांच्या संदर्भातील गोष्टः

मला वाटते ८०चे दशक असावे. एकदा हुसैन हे मुंबईतील एका उच्चभ्रू क्लब मधे गेले. तेथे असा नियम होता की पायात बूट हवेत म्हणून. मला आठवते त्याप्रमाणे ते अनवाणीच होते अथवा त्यांच्या पायात चपला असतील. त्यांना बूट घालून येयला सांगीतले. अर्थात त्यांनी ते ऐकले नाही आणि वाद घातला. पण क्लबने मान्य केले नाही कारण त्यांच्या नियमात बसत नव्हते आणि एकासाठी मोडला की सगळ्यांसाठीच मोडणे आले. परीणामी त्यांना परत पाठवण्यात आले. झाले तमाम वर्तमानपत्रात विचारवंतांनी गोंधळ घातला आणि त्यावेळेस (फॉर अ चेंज) उच्चभ्रूंना नावे ठेवली (हिंदूत्ववाद्यांना नाही). अपवाद फक्त एकच होता, तो म्हणजे तत्कालीन म.टा. संपादक गोविंद तळवळकर. त्यांनी हुसैन यांच्या नियम न पाळता इतरांवर नियम मोडायचा हट्ट करण्याच्या वृत्तीवर कडक टिका केली होती.

आजही हाच मुद्दा आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

भारतीय चित्रकलेला आणि शिल्पकलेला नग्नतेचे वावडे कधीच नव्हते आणि अजूनही नसावे. त्यामुळे केवळ सीता नग्न दाखवली, किंवा सरस्वती, म्हणून असे वाटण्याचे कारण नाही. मग ती टेंपल आर्ट असो नाहीतर सेक्युलर आर्ट.

हुसेन यांचा विरोध ज्याप्रकारे दोन जीवांना एकत्र आणलेले दिसते आहे, त्यामुळे अधिक झाला असावा असे वाटते. त्यामागचा त्यांचा हेतू कदाचित वेगळा असू शकतो. उदा. लक्ष्मी आणि हत्ती. (माझे इंटरप्रिटेशन असे झाले की लक्ष्मीने विचारवंतांना आपल्या काबूत ठेवले आहे, - हत्तीवर टाच जशी ठेवली आहे त्यावरून - गजगामिनी हा त्यांचा चित्रपट मी पाहिलेला नाही, पण त्यावरून काही तरी अजून इंटरप्रिटेशन होऊ शकेल असे वाटते. कदाचित हुसेन यांच्या मानसिक अवस्थेचा किंवा द्वंद्वाचा वेध घेता येईल असे वाटते, पण ते ज्यांना वेळ आहे आणि इच्छा आहे त्यांनी करावे). पण असे करत असताना त्यांनी दुसरीकडे सीता ज्याप्रकारे मारूतीच्या शेपटीवर, किंवा रावणाच्या मांडीवर नग्नावस्थेत बसलेली दाखवलेली आहे, ते रामायणातल्या प्रसंगांना धरून नसावे, आणि असले तरी ते दाखवताना काहींच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही चर्चा कलेची अभिव्यक्ती कशी असावी ह्याबद्दल होऊ शकते. कलाकार आणि सामान्य माणूस यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधी होऊ शकते. हुसेन यांनी आपल्या आईचे चित्र असे का काढले नाही, आणि वडिलांचे असे का काढले नाही, याबद्दलचे प्रश्न म्हणजे कलाकाराची मर्जी याखेरीज देता येत नाही.

असो. बाकी अक्षय यांच्याशी सहमती.

शुचि's picture

26 Feb 2010 - 8:28 pm | शुचि

ज्या जमातीला "हिंदू" देवतांची "विटंबना" करण्याचा इतिहास आहे त्या जमतीतील कोणीही तरी नग्न चित्र पाडू नयेत आमच्या देवतांची. PERIOD!!!!

आधी ओरबाडायचं , विटंबना करायची आणि नंतर कलेच्या साळसूद नावाखाली तेच करायचं असच वाटणार.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

»

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:28 am | विसोबा खेचर

ह्या हुसेनला एकदा दोन लाफा मारायला पाहिजेत..:)

एक नंबरचा भिकारचोट माणूस आहे तो..

तात्या.