कळीचे उमलणे, बहरणे
तीच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे,
तीला उमलावे, तीने झंकारुन जावे
भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे
तीच्या हाती नव्हते,
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने मग तीला सोडुन जावे
तीला दु:खात बुडवुन टाकावे
भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे
तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे
पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे
सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते
जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने एका फुलावरुन दुसर्या फुलावर जाणे
हा देखिल प्रेमबनाचाच नियम होता,
येणारा भ्रमर जाणार आहे
हे माहीत असुनही आकंठ त्याच्या प्रेमात स्वतःला झोकुन देणे
हेही तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
कधीतरी ह्या प्रेमबनानी नियम सोडुन वागावे
कधीतरी प्रेमबनात एकातरी भ्रमराने
फक्त तीच्याच जवळ रहावे आणि प्रेमरसात डुंबुन दोघांनी एकत्र प्राण सोडावे
असे कळीला वाटे
पण तसे होणेही तीच्या हाती नव्हते
प्रेमबनाचे हे नियम असे आखणे, बदलणे तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
मग कधीतरी एक पांथस्थ आला,
त्याने त्या फुलाला तोडले आणि देवाला अर्पण केले
प्राण सोडता सोडता फुलाला उमगले
कळीला पुन्हा पुन्हा बहरविणारा, फुलविणारा भ्रमर कुणीही असु देत,
पण त्या प्रेमभावना मात्र प्रत्येकवेळी सारख्याच होत्या
चिरंतन होत्या आणि तिच्याच होत्या
आता त्याचे निर्माल्य झाले होते
पण असे निर्माल्य होणे
हेही तीच्या हाथी थोडेच होते
प्रेमबनातील तीचा अंत देखिल तीच्या हाती नव्हता.
प्रतिक्रिया
25 Feb 2010 - 4:22 pm | शुचि
आवडली
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
25 Feb 2010 - 7:34 pm | वर्षा म्हसकर-नायर
धन्यवाद शुचि!.
25 Feb 2010 - 7:34 pm | वर्षा म्हसकर-नायर
धन्यवाद शुचि!.
25 Feb 2010 - 7:37 pm | वर्षा म्हसकर-नायर
धन्यवाद शुचि.
25 Feb 2010 - 7:38 pm | वर्षा म्हसकर-नायर
धन्यवाद शुचि.
25 Feb 2010 - 8:38 pm | शशिकांत ओक
या जीवन बगिचाचा कोणी पाहिला माळी
कोणी येतो आस्वादाने मोहुन
कोणी रंगात रंगून
कोणाला मोहवतो आकार
कोणी माळायला सरसावतो
कोणी हुंगायला खुडतो
पण कोणी जाणेना कळीचे मन
तिचे जीवन आणि मरण.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत
25 Feb 2010 - 8:51 pm | वर्षा म्हसकर-नायर
शशिकांतजी,
धन्यवाद.
वरील कवितेचा (आपण दिलेली) कवी कोण आहे?
27 Feb 2010 - 8:46 am | विसोबा खेचर
अतिशय सुरेख कविता...!
तात्या.
27 Feb 2010 - 9:24 am | मदनबाण
सुंदर कविता... :)
मदनबाण.....
जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif
27 Feb 2010 - 10:38 pm | sur_nair
वा फारच सुरेख. कुठे ती कमोदिनी जिला माहीतहि नाही "भ्रमर सकळ भोगीतसे" आणि कुठे तुमची ही कळी. एकदम मनाला भावली.
2 Mar 2010 - 4:00 pm | दिपक
सुंदर कविता!
2 Mar 2010 - 4:33 pm | सुरेन्द्र
खुपच छान