वाट पाहणं!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
24 Feb 2010 - 1:05 pm

कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं!
नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!!

कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का?
डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :W
हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं..

वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं!
गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :)
आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं..

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :)
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

राघव

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

24 Feb 2010 - 9:06 pm | प्राजु

अप्रतिम!!!
काळजाला हात घालणारी कविता.

ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?
इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण?
त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं..

व्वा!! राघव, जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

शुचि's picture

24 Feb 2010 - 9:09 pm | शुचि

अ-प्र-ति-म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
>ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?>>
वोह जीना भी कोइ जीना होता है??

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

राघव's picture

25 Feb 2010 - 11:00 am | राघव

प्राजु अन् शुची,
तुम्हा दोघींचेही मनापासून आभार. :)

राघव

मदनबाण's picture

25 Feb 2010 - 11:10 am | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

जितक्या %नी महागाई वाढली, तितक्या %नी तुमचा पगार तरी कधी वाढला होता का ?
http://i740.photobucket.com/albums/xx46/Madanban/Mix/ur_salary.gif

बेसनलाडू's picture

25 Feb 2010 - 11:13 am | बेसनलाडू

कविता गीत म्हणूनही - विशेष करून एखाद्या मराठी चित्रपटात शोभावेसे चित्रपटगीत - छान आहे.
(कविताप्रेमी)बेसनलाडू