हल्ली भरपूर शिकवण्यातून वेळ मला असतो
'आयुष्याच्या मध्या वरचा घोळ' मला छळतो
वळवळणारा किडा नाही बसू देत शांत
खाज सुटून शिवशिवतात रोज माझे हात
विचार करून डोक्याचा या होतो नुसता भुंगा
शेवटी म्हटलं जालावरती करू थोडा दंगा
लिहायला बसलो आणि लक्षात माझ्या आलं
पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं
पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही
म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही
हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज
नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज
कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला
ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला
काठावर बसून आता मजा बघतील कोणी
विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी
हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे
कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे
प्रतिक्रिया
18 Feb 2010 - 5:48 pm | विकास
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
18 Feb 2010 - 5:49 pm | विंजिनेर
है शाब्बास... !!!
18 Feb 2010 - 5:53 pm | मुक्तसुनीत
अपन एक मारा लेकिन सॉलिड मारा की नही ? ;-)
18 Feb 2010 - 5:59 pm | श्रावण मोडक
हेच... हेच...
जुने जालकरी असे बोलू लागले की जान येते.
18 Feb 2010 - 6:01 pm | चतुरंग
क आणि ड आणि क!!
असला भारी हातोडा बघून राव पडले चिंतेत
पहिल्या अंकानंतर घेऊ का एक्झिट लगेच विंगेत? :?
(घण)चतुरंग
18 Feb 2010 - 6:06 pm | प्रमोद देव
:D :D :D :D :D :D :D
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
18 Feb 2010 - 6:12 pm | गणपा
मनोगत आवडल :)
18 Feb 2010 - 6:16 pm | शुचि
जुगलबंदी आवडली.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
19 Feb 2010 - 1:48 am | टारझन
हॅहॅहॅहॅ ..
- जुगल हंसराज
18 Feb 2010 - 6:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं
पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही
म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही
सुंदर....! :) [ इथे आम्ही जाग्यावर उभे राहून आपल्या कवितेला दाद देत आहोत असे चित्र डोळ्यासमोर आणावे]
स्वगत : बरं झालं कवी महाराज तुमची कविता आली. नै तर आम्ही आता काय लिहावं म्हणून अस्वस्थ होतो. आता कसं शांत शांत आणि मस्त वाटतंय...! :)
-दिलीप बिरुटे
18 Feb 2010 - 6:25 pm | श्रावण मोडक
नै तर आम्ही आता काय लिहावं म्हणून अस्वस्थ होतो.
तुम्हालाही मिडलाईफ क्रायसीसनं गाठलं की काय? ;)
18 Feb 2010 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>तुम्हालाही मिडलाईफ क्रायसीसनं गाठलं की काय?
श्रामो, व्यनीने कळवायच्या ना राव आपल्या भावना..! ;)
-दिलीप बिरुटे
18 Feb 2010 - 6:34 pm | श्रावण मोडक
अर्र... चुकलं, चुकलं... ;)
18 Feb 2010 - 6:45 pm | रेवती
वाहव्वा!
मस्त! बरे झाले फटकारलेत!
रेवती
18 Feb 2010 - 8:19 pm | सन्जोप राव
अस्वस्थ आत्म्यांना व्यासपीठ उपलब्द्ध करुन दिलेत, हे छान झाले. काय आहे, हल्ली तथाकथित साहित्यिकांना प्रतिभा सोडून गेली आहे. मिड लाईफ क्रायसिस- दुसरं काय?
एक्झिटच्या अपेक्षेत असणार्यांनी आणि त्यांच्या फटकारतृप्त वामांगांनी अपेक्षभंगाची तयारी ठेवावी.
वेळ मिळतो हे गृहितक बाकी बरोबर नाही. वेळ काढावा लागतो. लगेचच पळपुटेपणा वगैरे शब्द शोधून ठेवणार्यांसाठी हे डिस्क्लेमर.
खाज बाकी भागली. आता कसं शांत शांत आणि मस्त वाटतंय...!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
19 Feb 2010 - 12:31 am | मिसळभोक्ता
हॅ हॅ हॅ...
एक वेळ मिड-लाईफ क्रायसिस परवडला. काहींचा अजूनही मिड-वाईफ क्रायसिस सुरू आहे असे दिसते.
बाकी, नुकतीच प्रकाशित झालेली "एक क्वार्टर कमी पडते" ही सर्वांगसुंदर कविता, आणि हणम्याचा काही संबंध आहे का, ह्याचा अभ्यास सुरू आहे. काल तर मला चक्क चित्तरंजन भट मिसळपावावर दिसले !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
18 Feb 2010 - 8:27 pm | चित्रा
काठावर बसून आता मजा बघतील कोणी
विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी
हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे
कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे
ह्या ओळी पटल्या.
बाकी मस्करीची कुस्करी झालेली नाही, हे पटलेले नाही. असो.
18 Feb 2010 - 9:16 pm | सुवर्णमयी
चालू द्या..
मुद्दा आणि प्रॉब्लेस असा आहे की हा मिडलाइफ क्रायसिस आजकाल नेमका कधीही चालू होतो आणि किती काळ चालतो..
18 Feb 2010 - 9:19 pm | विकास
हा मिडलाइफ क्रायसिस आजकाल नेमका कधीही चालू होतो आणि किती काळ चालतो..
ह्या संदर्भात गेल्या आठवड्यातील टाईम साप्ताहीकातील हा लेख पहा. :-)
____________________________
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
19 Feb 2010 - 8:25 am | विसोबा खेचर
केश्या, जबराच रे! :)
तात्या.
19 Feb 2010 - 9:16 am | ब्रिटिश टिंग्या
बर्याच जणांचे जीव भांड्यात पडण्याचा आवाज आला :)
19 Feb 2010 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे
हातोड्यासहित माणुस आवल्डा नी मनोगतबी आवल्डे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
19 Feb 2010 - 10:07 am | विजुभाऊ
पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं
पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही
म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही
हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज
नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज
कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला
ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला
वा वा वा वा झक्कास.
19 Feb 2010 - 5:12 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार
19 Feb 2010 - 9:16 pm | जयवी
:) चलने दो केशवसुमारजी ....चलने दो :)
19 Feb 2010 - 10:48 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला!!! केसुशेठचा दणका!!! जबरी...
बिपिन कार्यकर्ते
21 Feb 2010 - 11:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, कविता लैच आवडली. :)
[दुसर्यांदा प्रतिक्रिया लिहितोय तो स्वतःचा आनंद वाढविण्यासाठी. धागा वर यावा म्हणून नव्हे ]
-दिलीप बिरुटे