आता,
आपण मोठं होऊ या.
तू जा घरी.
मला वाळवणं घालायची आहेत.
मग,
माझा उभा जन्म उन्हातच.
---------------------------
माझं इवलंस मन
घे तुझ्याकडे ठेवून.
बाकी सगळं लागेल मला
उरलेल्या आयुष्यासाठी.
-----------------------
तू जा रे माघारी
नको भेटूस रे वेळी अवेळी.
बोभाटा होतो पाय घसरल्याचा.
मग ? मग ?
स्सालं ...
आख्खं आयुष्य स्किड झालं
जळल्या रबराचा वास न येता.
----------------------
हॅपी व्हॅलेंटाईन डे.
प्रतिक्रिया
13 Feb 2010 - 12:18 pm | बिपिन कार्यकर्ते
च ट का ! ! !
माझं इवलंस मन
घे तुझ्याकडे ठेवून.
बाकी सगळं लागेल मला
उरलेल्या आयुष्यासाठी.
या ओळी विशेष त्रास देऊन गेल्या...
बिपिन कार्यकर्ते
13 Feb 2010 - 12:26 pm | श्रावण मोडक
खरं तर, या रचनांचं गांभीर्य पाहता 'क्या बात है' सारखे शब्द तोंडातून उमटतात कसे असा प्रश्न एखाद्याला पडायचा. पण ते शब्द उमटले, कारण - वेदना किंवा गांभीर्यही कसं मांडावं ते इथं कळलं!
13 Feb 2010 - 12:33 pm | बिपिन कार्यकर्ते
अगदी अगदी
बिपिन कार्यकर्ते
13 Feb 2010 - 1:08 pm | आनंदयात्री
आठवणींच्या शिंपल्यातुन क्षणांचे मोती जेव्हा झळकले
तेव्हा मी भावविभोर झालो....
---
आपल्याला इथेच येईल का राहता ?
---
तुझ्या गालावरचा टप्पोरा मोती मला टिपता आला नव्हता !!
----------------------
हॅपी व्हॅलेंटाईन डे.
14 Feb 2010 - 7:58 pm | टारझन
चांगल्या क्वालिटीचे रबर असनारे टायर वापरले तर गाडी स्किड होत नाही ..
कविंना ह्यातून चांगले आणि ब्रांडेड टायर वापरण्याचा सल्ला द्यायचा नसेल का ?
- (ब्रांडेड रबरी) टी.आर.एफ.
13 Feb 2010 - 1:30 pm | विसोबा खेचर
रामदासराव, चांगलं आहे मुक्तक...
म्हणजे? बोभाटा न होता हळूच पाय घसरला तर चालणारे की क्काय? ;)
तात्या.
13 Feb 2010 - 1:30 pm | शुचि
आख्खं आयुष्य स्किड झालं
जळल्या रबराचा वास न येता.
.......
फक्त शान्त झाले ......... पाणी सुद्धा डोळ्यांतून यायला ..... मेंदूला त्या वाक्यावर विश्वास ठेवावा लागला......... इतकं जीव्घेणं कोणी कसं वेदना पकडू शकतं शब्दात?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
13 Feb 2010 - 3:39 pm | पॅपिलॉन
अगदी मोजल्या शब्दांत भाष्य करणारं मर्मभेदी मुक्तक आवडले.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
13 Feb 2010 - 4:52 pm | धनंजय
वा!
14 Feb 2010 - 1:21 am | चतुरंग
खासच!!!
चतुरंग
14 Feb 2010 - 1:51 am | प्राजु
व्वा!!
अप्रतिम!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
14 Feb 2010 - 11:18 am | सन्जोप राव
सुरेख मुक्तके. 'रबर' या शब्दावर श्लेष अपेक्षित आहे, असे वाटते. अमेरिकन इंग्रजीत या शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे असे ऐकून आहे. हे रबर जळण्याइतपत टिकाव असेल तर आयुष्य स्किड होणारच, हा या मुक्तकाचा एक मला कळालेला (आणि कदाचित कवीला अपेक्षित नसलेला) अर्थ!
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
15 Feb 2010 - 10:51 am | विजुभाऊ
'रबर' या शब्दावर श्लेष अपेक्षित आहे, असे वाटते. अमेरिकन इंग्रजीत या शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे असे ऐकून आहे.
हम्म्......बरोबर आहे.
योग्य प्रतिसादच जाणकारच देऊ शकतात. याची प्रचिती आली.
15 Feb 2010 - 8:08 pm | सुवर्णमयी
तिन्ही रचना आवडल्या. नेहमीप्रमाणे तुमच्या लेखनात वेगळेपणा असतो त्याची जाणिव पुन्हा एकदा झाली.
(हे रबर जळण्याइतपत टिकाव असेल तर आयुष्य स्किड होणारच, हा या मुक्तकाचा एक मला कळालेला (आणि कदाचित कवीला अपेक्षित नसलेला) अर्थ!-
कवीला अर्थ अपेक्षित असावा म्हणूनच श्र्लेष आहे:) अस मला वाटल.
सोनाली
14 Feb 2010 - 7:41 pm | स्वाती दिनेश
सुरेख मुक्तके!
स्वाती
15 Feb 2010 - 3:29 am | अक्षय पुर्णपात्रे
मनात रेंगाळत राहतील.
17 Feb 2010 - 12:21 pm | जयवी
काहितरी वेगळेपण आहे तुमच्या प्रत्येक कवितेत.
फारच सुरेख आहेत ह्याही कविता....... नेहेमीप्रमाणेच !
17 Feb 2010 - 12:28 pm | नीधप
वा!
व्हॅलेंटाइन डे च्या गुलगुलीत गोड कवितांचं/ मुक्तकांचं अजीर्ण झाल्यावर हे साधे सरळ वास्तव बोल छान वाटले.
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
17 Feb 2010 - 12:39 pm | दत्ता काळे
वाचल्यानंतर बराचवेळ विचार करायला लावणारी मुक्तके आवडली.
18 Feb 2010 - 1:27 pm | वाहीदा
उदास करून गेल्या खालिल ओळी
माझं इवलंस मन
घे तुझ्याकडे ठेवून.
बाकी सगळं लागेल मला
उरलेल्या आयुष्यासाठी.
म्हणजे राहीले ते फक्त व्यवहारीक आयुष्य और जिंदगीभर की घुटन ...
:-(
It reminds me of the sweet-bitter sides of love.
मला माझे आवडते गाणे आठविले SACRIFICE BY ELTON JOHN
It's a human sign
When things go wrong
When the scent of her lingers
And temptation's strong
Into the boundary
Of each married man
Sweet deceit comes calling
And negativity lands
Cold cold heart
Hard done by you
Some things look better baby
Just passing through
And it's no sacrifice
Just a simple word
It's two hearts living
In two separate worlds
But it's no sacrifice
No sacrifice
It's no sacrifice at all
Mutual misunderstanding
After the fact
Sensitivity builds a prison
In the final act
We lose direction
No stone unturned
No tears to damn you
When jealousy burns
-- ELTON JOHN
~ वाहीदा
19 Feb 2010 - 3:36 am | बेसनलाडू
आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
19 Feb 2010 - 4:11 am | शाहरुख
छान..
(शाहरुख) शाहरुख