धोका

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
7 Feb 2010 - 4:29 pm

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

बंद केली मी सुखाची सर्व दारे,
एकही नाही घराला या झरोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

गझल

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

7 Feb 2010 - 5:33 pm | अमृतांजन

प्रत्येक ओळ सुंदर! विशेष्त मला आवडलेल्या ह्या ओळी-

हास्य वरचे, आत दु:खाशी सलोखा
बेगडी आयुष्य देते रोज धोका

हारणे हा वारसा की धर्म माझा?
सोडला हातातला प्रत्येक मोका!

जियो.

राघव's picture

7 Feb 2010 - 10:20 pm | राघव

प्रत्येक कडवे सुंदर!

अवांतर: तुम्ही कवितांचे पुस्तक कधी काढताय याची वाट बघतोय!

राघव

विसोबा खेचर's picture

8 Feb 2010 - 9:09 pm | विसोबा खेचर

अगदी सहमत!

तात्या.

प्रमोद देव's picture

7 Feb 2010 - 10:36 pm | प्रमोद देव

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

शेवटच्या द्विपदीतील अंत्ययमक 'अनोखा' ?
त्यामुळे आधीचे सगळे कष्ट पाण्यात गेले.
ही द्विपदी सोडून बाकी सगळ्या द्विपदी ऊत्तम जमल्या आहेत.
तेव्हा क्रांति,शेवटच्या द्विपदीत योग्य तो बदल कर.बाकी चाल तयार आहे....

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

शुचि's picture

8 Feb 2010 - 12:57 am | शुचि

आवडली
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्राजु's picture

8 Feb 2010 - 7:07 am | प्राजु

सोबती काळोखगर्भाचा उबारा,
आणि चुकलेल्या क्षणाचा मंद ठोका

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा

या ओळी खूप सुंदर आहेत.
फार फार सुंदर!

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

फ्रॅक्चर बंड्या's picture

8 Feb 2010 - 10:05 am | फ्रॅक्चर बंड्या

फारच छान..

binarybandya™

मेघवेडा's picture

8 Feb 2010 - 9:00 pm | मेघवेडा

आवडली.. फार सुंदर..

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

टारझन's picture

8 Feb 2010 - 10:20 pm | टारझन

छाणंच हो कविता :)

- गेमवेडा
खरडवही आणि खरडफळा अनुमती मिळाली ना ? आता सही बदला :)

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2010 - 10:01 pm | बिपिन कार्यकर्ते

कविता आवडली. थोडी वेगळ्या धाटणीची वाटली. राघवप्रमाणेच आम्हीही वाट बघू आता. :)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

8 Feb 2010 - 10:09 pm | चतुरंग

आणि त्याचप्रमाणे आमची दुसरी दाद 'धोका' देणार नाही! ;)

(निर्धोक)चतुरंग

सुधीर काळे's picture

8 Feb 2010 - 10:10 pm | सुधीर काळे

क्रांती,
कविता छान जमली आहे.
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

अश्विनीका's picture

8 Feb 2010 - 10:38 pm | अश्विनीका

सुंदर कविता.

ध्यास आता थांबण्याचा, संपण्याचा
अंत व्हावा वेगळा, नवखा, अनोखा
ह्या ओळी तर खासच.

- अश्विनी