व्हॅलेन्ताईन डे ज्या संत व्हॅलेन्ताईन च्या स्मृती साठी उजवला जातो त्या संत व्हॅलेन्ताईनचे कार्य कायाहे याची कोणाला माहिती आहे का? असल्यास इतरानाही द्यावी ही विनन्ती
पितरांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायचा जसा एक दिवस असतो तसा प्रेम व्यक्त करायला असा काही दिवस असावा लागतो का?
जर एखाद्याने त्याला/तीला मिळालेले व्हॅलेन्ताईन गिफ्ट परस्परच दुसर्या कोणास दिले व त्याने /तीने ते तिसर्या कोणास दिले ( लग्नात आलेले एक्स्ट्रा ठरलेले किंवा लेमनसेट/ कूकर/फुलदाणी वगैरे सारखे निरुपयोगी आहेर जसे दुसरीकडे दिले जातात तसे) तर ज्याला गिफ्ट सर्वात शेवटी मिळाले त्याला/तीला कोणाचे व्हॅलेन्ताईन म्हणायचे?
अवांतरः भारतातील संत ; संसार परीत्याग करून परमार्थाची वाट चोखाळा असे सांगतात. संत व्हॅलेन्ताईनचे म्हणणे याच्या उलट म्हणजे कोणाला तरी प्रपोज मारून संसारात पडायचा प्रयत्न करा असे का असावे?
व्हॅलेन्ताईन डे
गाभा:
प्रतिक्रिया
8 Feb 2010 - 12:26 pm | शुचि
>>जर एखाद्याने त्याला/तीला मिळालेले व्हॅलेन्ताईन गिफ्ट परस्परच दुसर्या कोणास दिले व त्याने /तीने ते तिसर्या कोणास दिले ( लग्नात आलेले एक्स्ट्रा ठरलेले किंवा लेमनसेट/ कूकर/फुलदाणी वगैरे सारखे निरुपयोगी आहेर जसे दुसरीकडे दिले जातात तसे) तर ज्याला गिफ्ट सर्वात शेवटी मिळाले त्याला/तीला कोणाचे व्हॅलेन्ताईन म्हणायचे>>>
=)) =)) =)) विजूभाऊ यु आर सो मच फन टू बी अराऊंन्ड :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
8 Feb 2010 - 12:37 pm | बंडू बावळट
धाग्यात केलेल्या विचारणेसंबंधी आम्हाला काही उत्तर देता येणार नाही.
तूर्तास आम्ही मुखपृष्ठावरील ममता मोहनदास हिला व्हॅलेन्टाईन दिनाच्या दिवशी गुलाबाचे पुष्प द्यायचे असे ठरवले आहे. पुढे ते तिने कुणाला द्यावे हा तिचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. कालपासून मिपावर एकदा गरमागरम लज्जतदार (!) मटणासोबत आणि आज सात्विक शिक्रणीसोबत झळकणार्या ममताने आम्हाला मोहीत केले आहे एवढे मात्र निश्चित!
-- बंड्या.
8 Feb 2010 - 12:52 pm | Nile
त्याबरोबर हारासकट फोटो द्यायला विसरु नका बरं का! :)
-का. ते. आठवले(?)
8 Feb 2010 - 1:31 pm | छोटा डॉन
जबरा रे निळुभौ !
बाकी जाणकारांच्या प्रतिसादाची वाट पहात आहे.
गेल्या व्हॅलेंटाईननंतर आम्ही "ती काही उमेद हारत नाही "..... नावाच्या समस्येने संत्रस्त होतो त्याची आठवण झाली. असो.
------
अ.रे. सुखाने जगुदे
8 Feb 2010 - 1:56 pm | सुनील
बाकी मिपाच्या मुखपृष्ठावर मोहनदास हे नाव झळकते आहे, ही त्या ममताचीच कृपा. नाहीतर काय बिशाद होती!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
8 Feb 2010 - 1:36 pm | विजुभाऊ
व्हॅलेन्ताईन हा बहुधा "व्हाल ना ताई" या वाक्याचा इंग्रजी उच्चार असावा अशी एक शंका व्यक्त केली गेलेली आहे
8 Feb 2010 - 6:07 pm | शुचि
=)) =)) =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 6:08 am | शुचि
विजुभाऊ मेंदूला खाद्य पुरविल्याबद्दल धन्यवाद. मला अस वाटतं तो संत व्हॅलेन्ताइन थोडा नव्हे बराचसा "ओशो" मार्गाचा पुरस्कर्ता असावा - ओशो च एक पुस्तक आहे ना - "कुठुन तरी"से समाधि तक (शिंचं नाव अठवत नाही हवं त्या वेळी)...... त्या प्रमाणे .....म्हणून तो म्हणतो लग्न करा रे बाळांनो आणि परमार्थ साधा..... =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 6:41 am | शेखर
>> म्हणून तो म्हणतो लग्न करा रे बाळांनो आणि परमार्थ साधा
थोडा बदल...
म्हणून तो म्हणतो लग्न करा / करु नका बाळांनो पण परमार्थ नक्की साधा
10 Feb 2010 - 7:11 am | शुचि
>>तसा प्रेम व्यक्त करायला असा काही दिवस असावा लागतो का?>>
नाही बॉ रात्र असली तर उत्तमच =)) =)) =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 7:45 am | विजुभाऊ
ओशो च एक पुस्तक आहे ना - "कुठुन तरी"से समाधि तक (शिंचं नाव अठवत नाही हवं त्या वेळी)
शुचीभाऊ ओशोंचे ते एक व्याख्यान होते. ओशोंनी कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही. जी पुस्तके उपलब्ध आहेत ती त्यांची व्याख्याने प्रकाशीत स्वरुपात आहेत.
ओशोनी एकदा एका जैन समुहाच्या सभेत एक व्याख्यान दिले होते.विषय होता "संभोग से समाधी तक"
त्या व्याख्यानाने बरीच खळबळ माजली. पण त्यांच्या व्याख्यानातला मतीतार्थ तुम्ही समजता तसा नव्हता.त्यामुळे काही अभ्यास नसताना कृपया उगीचच ओशोंवर टीका करू नका.
"संभोगसे समाधी तक" सांगताना संभोग अवस्थेत असताना मानवी मेंदूचे कार्य कसे चालते आणि त्यावेळचा एक क्षण तुम्हाला संबोधीकडे कसा नेऊ शकतो हे सांगितले.
सर्वच धर्मात संभोग हा काहीतरी वाईट / तुम्हाला नरका कडे नेणारी गोष्ट अशी पाप वगैरे घटना मानली जाते.
खरेतर संभोग ही एक नैसर्गीक गोष्ट आहे.
विनोबा भावेनी याबद्दल बोलताना एकदा सांगितले की ज्या क्रीयेतून माझा जन्म झाला ती गोष्ट मी पाप का समजायची.
अर्थात ओशोनी मानवी व्यवहाराबद्दल बरेच काही साम्गितले आहे.
सिग्मन्ड फ्रॉईड हा मनाचा विचार करताना केवळ सेक्स आणि पर्वर्ट्नेनेस
याचाच विचार करतो ओशो त्यापुढे जाऊन मानवी व्यवहाराचा विचार करताना संबोधी शी त्याचा संबन्ध साम्गतात.
मेडीटेशन संदर्भात त्यानी बरेच प्रयोग केले. त्यानी साधारण १३८ प्रकारची मेडीटेशन्स सिद्ध केलीत.
शुचीताई /भाऊ केंव्हातरी त्यानी मांडलेले विचार अनबायस्ड मनाने वाचा.
बरेच काही नवे मिळवाल
10 Feb 2010 - 8:14 am | विसोबा खेचर
फॅक्ट सांगणारा टेक्निकल मुद्दा.
आवडला..! :)
तात्या.
10 Feb 2010 - 7:55 am | शुचि
>>त्यामुळे काही अभ्यास नसताना कृपया उगीचच ओशोंवर टीका करू नका.>>
कोण टीका करतय तुमच्या ओशोंवर?
>>शुचीताई /भाऊ केंव्हातरी त्यानी मांडलेले विचार अनबायस्ड मनाने वाचा. बरेच काही नवे मिळवाल >>
फुकट्च्या सल्ल्याबद्दल आभार
विजुभाऊ तुमच्या धाग्याला प्रतिसाद दिला हेच चुकलं. यापुढे आपल्या धाग्यातली आमची लुडबुड बंद.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
10 Feb 2010 - 1:35 pm | वर्षा म्हसकर-नायर
>>>पितरांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायचा जसा एक दिवस असतो तसा प्रेम व्यक्त करायला असा काही दिवस असावा लागतो का?
>>> =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
लै भारी.
पण आपल्याला आवडले बाबा संत वॅलेनताईन.
अहो आपण नाही का वेगवेगळे सण साजरे करित. आता पतंग वर्षातून एकदाच संक्रांतीला उडवायची गरज आहे का? रोज देखिल उडवु शकतो, पण आपण तो वर्षातून एकदाच उडवितो. तसंच आहे हे. ;)
11 Feb 2010 - 11:02 am | फक्त_ मोक्श
:?
11 Feb 2010 - 11:03 am | फक्त_ मोक्श
:?
11 Feb 2010 - 11:03 am | फक्त_ मोक्श
:?
11 Feb 2010 - 11:04 am | फक्त_ मोक्श
:?