कोकणातली भटकंती...

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
2 Feb 2010 - 8:58 pm

सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता...

पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो... पहाटेच्या कोवळ्या उन्हात सोनेरी समुद्र पाहिला...

(आंबेनळी घाट)

(मधु-मकरंद गड... आंबेनळी घाटातून)

(नजारा... आंबेनळी घाटातून)

(नजारा... आंबेनळी घाटातून)

(वेळणेश्वरचा समुद्र-किनारा)

(म्हावरा)

(सुर्यास्त... वेळणेश्वर)

(सुर्यास्त... वेळणेश्वर)

(सुर्यास्ता नंतर... वेळणेश्वर)

(सुर्योदय... वेळणेश्वर)

(वेळणेश्वर मंदिर)

दुसऱ्या दिवशी वेळणेश्वर - गुहाघर - धोपावे - दाभोळ - दापोली - हर्णे - केळशी - वेशवी - कोलमांडले - हरिहरेश्वर असा प्रवास केला... धोपावे ते दाभोळ आणि वेशवी ते कोलमांडले हा प्रवास बोटीने करावा लागतो... दुचाकी/चारचाकी आरामात बोटीत मावतात...

आजची संध्याकाळ केळशीच्या समुद्र-किनाऱ्यावर घालवली... सुर्यास्ता नंतर उरलेला प्रवास करुन हरिहरेश्वरला पोहचलो...

(आंजर्ले समुद्र-किनारा)

(केळशी समुद्र-किनारा)

तिसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हरिहरेश्वरच्या समुद्र-किनाऱ्यावर भटकलो...

(शंख... हरिहरेश्वर)

(चामू... हरिहरेश्वर)

(खेकडा... हरिहरेश्वर)

(हरिहरेश्वर समुद्र-किनारा)

हरिहरेश्वरला दुपारचं जेवण उरकुन परतीचा प्रवास सुरु केला... हरिहरेश्वर - म्हसळा - माणगाव - निजामपूर - विळे - ताम्हिणी घाट - मुळशी - पुणे असा प्रवास केला... मुळशीच्या काठावरच्या सुरेख सुर्यास्ताने भटकंतीची सांगता झाली...

(सुर्यास्त... मुळशी)

(मी... मुळशीला सुर्यास्ताच्या वेळी)

३ दिवस समुद्रात मनसोक्त पोहलो आणि खूप मासे खाल्ले... हलवा, सुरमाई आणि सुंगटं... खूप दिवसांनी इतके ताजे मासे खाल्ले...

घाई नव्हती, चिंता नव्हती... वेळ होता, दुचाकी होती आणि भटकायची प्रचंड आवड... फार मजा आली... केवळ आनंदी आनंद...

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

प्रवास

प्रतिक्रिया

खान्देशी's picture

2 Feb 2010 - 9:08 pm | खान्देशी

बाहेर खुरट्या झाडांवर प्रचंड बर्फ पडतोय आत बसून माझे कोकण दर्शन चालुये ...चीडचीड होतीये.... हेवा वाटतोय !!

वर्णन आणि फुटो लई भारी !

प्राजु's picture

2 Feb 2010 - 9:11 pm | प्राजु

बाबारे.. तुझा इतका प्रचंड हेवा वाटतो ना...
दंडवत तुला..
असाच विमुक्त रहा..
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

संदीप चित्रे's picture

3 Feb 2010 - 12:58 am | संदीप चित्रे

आणि चतुरंग म्हणाला त्यात थोडा बदल करून म्हणतो की असे लेख आणि फोटो टाकून आधीच शत्रूपक्षात गेला आहेस ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2010 - 9:12 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर, उत्तम, बेष्ट, अप्रतिम... इ. इ.

बिपिन कार्यकर्ते

मेघवेडा's picture

2 Feb 2010 - 9:13 pm | मेघवेडा

कोकणातली सफर म्हणजे धमालच राव! छान फोटोज् आहेत!

वेळणेश्वरा पर्यंत जाऊन हेदवीला नाही गेलात राव? का पूर्वीच जाऊन आलायत? देऊळ सुंदर आहेच पण तिकडची 'हेदवी फेम' भेळसुद्धा मस्त आहे. (म्हणजे एकाने आपल्या दुकानावर 'येथे हेदवी फेम भेळ मिळेल' असा स्पष्ट फलक लावला आहे!

माझेही कोकणसफरीचे काही अनुभव आहेत .. सवडीने लेखच लिहीन म्हणतो!

-- (कोकणी नीरफणस)

प्रभो's picture

2 Feb 2010 - 9:16 pm | प्रभो

मस्त रे.....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

भटकंती अनलिमिटेड's picture

2 Feb 2010 - 9:58 pm | भटकंती अनलिमिटेड

झक्कास आहेत फोटो.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

चतुरंग's picture

2 Feb 2010 - 10:02 pm | चतुरंग

म्हावर्‍याचा आणि सूर्यास्तानंतरच्या वेळणेश्वराचा फोटू केवळ य!!
(हे असले लेख टाकून तू लवकरच माझ्या शत्रुपक्षात जाणार आहेस! ;) )

चतुरंग

फ्रॅक्चर बंड्या's picture

3 Feb 2010 - 9:51 am | फ्रॅक्चर बंड्या

छान फोटो आहेत...
binarybandya™

manjiri puntambekar's picture

3 Feb 2010 - 12:49 pm | manjiri puntambekar

शाळेत असताना स रा ते॑ हायस्कूल च्या मागच्या समुद्रावर जाऊन सूर्यास्त पहाण्याचा एक छ॑द जडला होता. आताही रेवद॑डा ब॑दरावर गेल्यावर क्षीतिजावर पाण्याला टेकलेले सुर्यबी॑ब पहायची जी मजा आहे. त्याला तोड नाही.
तुझा "सुर्यास्त... वेळणेश्वर" फोटो बघुन जरा भुतकाळात जाउन आले....... आभारी आहे.

गणपा's picture

3 Feb 2010 - 1:48 pm | गणपा

एक से बढकर एक फोटो.

अश्विनीका's picture

3 Feb 2010 - 1:59 pm | अश्विनीका

अप्रतिम . सर्वच फोटो सुंदर आले आहेत. तरी त्यात नं. ६ , ८ , १ ०, १३ आणि शेवटून २ रा हे फार आवडले.
- अश्विनी

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 5:54 pm | स्वाती२

नेहमी प्रमाणेच अप्रतिम ! म्हावर्‍याची पाटी बघूनच खल्लास.

ज्ञानेश...'s picture

3 Feb 2010 - 6:00 pm | ज्ञानेश...

8>

चित्रा's picture

4 Feb 2010 - 9:34 am | चित्रा

खूपच छान. नुसते फिरण्यातला केवढा आनंद घेता त्याचे कौतुक वाटते. फोटो आवडले. पण काहीसे ओव्हरएक्स्पोज झाले आहेत का? पण हे आपले तुमच्या सुंदर भटकंतीला तीट लावल्यासारखे समजा.

ऋषिकेश's picture

4 Feb 2010 - 9:49 am | ऋषिकेश

प्रकाशचित्रे एकापेक्षा एक भारी आली आहेत. कोकणातल्या सूर्योदयाचे चित्र त्याच्या वेगळेपणामुळे मला फारच आवडले
अजून येऊ दे

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बबलु's picture

5 Feb 2010 - 4:21 am | बबलु

अप्रतिम.....

हेवा.....

लाळ.....

मजा करा लेको.....

...अजून काय बोलणार?

__बबलु

प्रचेतस's picture

5 Feb 2010 - 11:08 am | प्रचेतस

विमुक्ता,
अजुन काही प्रकाशचित्रे टाक ना. एवढ्याने समाधान झाले नाही.