अगतिक.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
25 Jan 2010 - 4:26 pm

अगतिक.....

हातात हात घेण्या मी वाकलो तुझा पण
सहसा कधी कुणाचा .....झालो गुलाम नाही !

तू झेललीस थुंकी ...लाचार तू सदाची ,
विकण्यास मी तयार्.....माझा कलाम नाही !

काळीज ओतुनी मी , जे मांडले , जगी या
त्या गायकास "वाहव्वा" .....मजला सलाम नाही !

नुरलो न मीच माझा मरणापल्याड सुध्दा
इतुका सखे कुणाचा , कुणीही गुलाम नाही !

भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी
शब्दांत कसे ते मांडू?- नाही - कलाम नाही !

कविता

प्रतिक्रिया

पॅपिलॉन's picture

25 Jan 2010 - 6:26 pm | पॅपिलॉन

कविता छान आहे.

काही किंचित यतिभंगाच्या चुका टाळल्या असत्यात, तर गझल झाली असती.

उदा.
इतुका सखे कुणाचा , कुणीही गुलाम नाही !
ऐवजी
इतुका सखे कुणाचा , कुणिही गुलाम नाही !

भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी
ऐवजी
भिजल्या दवांत होते , केस तुझे सोनेरी

पहा पटतय का!

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

उदय सप्रे's picture

27 Jan 2010 - 9:05 am | उदय सप्रे

खरं आहे तुमचं म्हणणं ! आणि तश्या सिधारणा केल्यामुळे मूळ भावना बदलत नाहियेत , मी नक्कीच या दुरुस्त्या करीन मूळ गझलेमध्ये ! पण मला एक सांगा की आता परत सुधारून मिपा वर टाकयचे म्हणजे आधीची गझल काढून टाकून करावे लागेल ना हे सगळे?(मह्णजे परत एकदा मिपा वाल्यांना तीच गझल थोडेसे बदल करून .....त्यापेक्षा मूळ गझलेत बदल करतो , नाही का?
ऋणी आहे !
उदय सप्रे

उदय सप्रे's picture

27 Jan 2010 - 9:27 am | उदय सप्रे

मला खरच माहिती नाहिये म्हणून विचरतोय :
हे "यतिभंग" प्रकरण काय असते हो? म्हणजे मला वृत्त माहित आहे पन हे यतिभंग खरंच माहित नाहिये.....
जमल्यास व्यं.नि.वर पाठवाल का?

प्राजु's picture

26 Jan 2010 - 7:12 am | प्राजु

व्वा!!
सुरेख!!
काळीज ओतुनी मी , जे मांडले , जगी या
त्या गायकास "वाहव्वा" .....मजला सलाम नाही !

जबरदस्त!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

उदय सप्रे's picture

27 Jan 2010 - 9:19 am | उदय सप्रे

धन्यवाद !
एक स्पष्टीकरण :

शेवटचे कडवे जरा समजण्यास (सांगितल्याखेरीज) कठीण आहे म्हणून हा द्राविडी प्राणायाम !

माणूस गेल्यावर जेंव्हा त्याला मॉर्ट्युअरीमधे ठेवतात तेंव्हा घरी तो देह आणल्यावर त्याला कंडेन्सेशन्मुळे पाणी सुटते.अश्या गेलेल्या माणसाच्या छातीवर केस मोकळे सोडून बेभान झालेल्या प्रेयसीचे सोनेरी केस त्या "थंड" बाष्पात भिजत असलेले पाहून प्रियकराचा आत्मा असं म्हणतो :
भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी
शब्दांत कसे ते मांडू?- नाही - कलाम नाही !

हे जरा अतीच होतय का हो माझ्याकडून ? :):):)

बट्ट्याबोळ's picture

28 Jan 2010 - 9:00 am | बट्ट्याबोळ

जर अर्थ कळला नसता तरी चाललं असत!!
ग्रेस ला झेलतो तसं तुला पण झेललं असतं :)

पण सुंदर गज़ल !!!

ह्ये बाकी भन्नाटच हां राव !
अगदी नावाप्रमाणेच सगळीकडे "बट्ट्याबोळ" करताय की राव !
झकास !
मि.पा.वरच्या प्रतिक्रिया पण भन्नाट असतात !