कोडगं सूख.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
22 Jan 2010 - 2:20 pm

कोडगं सूख.....

अंदाज पावलांचा माझ्या मला न आला
हातात हात माझा ,घेता तुला न आला !

सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला
तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला !

केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो
चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला!

तू चुंबतेस आता निष्प्राण हात माझे
सत्कार असा ओठांचा , करता तुला न आला!

मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ !
हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !

गझल

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 Jan 2010 - 6:33 pm | मदनबाण

सॉलिट्ट्ट्ट्ट....गझल. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

प्राजु's picture

22 Jan 2010 - 7:51 pm | प्राजु

मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ !
हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !

जबरदस्त!!!
अतिशय प्रभावी.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

sanjubaba's picture

23 Jan 2010 - 10:14 am | sanjubaba

कविता फार प्रभावी....अन् भावना अगदी नेमकेपणानें मांडल्या आहेत....छान !!संजूबाबा

jaypal's picture

23 Jan 2010 - 10:29 am | jaypal

मस्तच आहे कविता. अजुन येउद्यात वाट पहतो आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विदेश's picture

23 Jan 2010 - 10:43 am | विदेश

कविता आवडली. तरी (आपलेपणाच्या अगांतुकपणामुळे-) बदल सुचवावे वाटतात..

केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो
केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला

हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !
दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला !

उदय सप्रे's picture

25 Jan 2010 - 2:27 pm | उदय सप्रे

केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो
केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला

हे नाही पटलं , वरील (पहिल्या) ओळीतील गेयता कमी होते.

हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !
दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला !

हे मात्र अगदी चपखल बसते आहे , धन्यवाद ! माझ्याकडील प्रतीत हा बदल करत आहे.

या आपलेपणाबध्द्ल (हा अगंतुकपणा आहे असे खरंच नाही वाटले मला !) आपला ऋणी आहे !

उदय सप्रे

अनामिका's picture

24 Jan 2010 - 4:46 pm | अनामिका

सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला
तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला
!
मस्तच !!!!!!!!!!!!!

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jan 2010 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला
तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला !

केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो
चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला!

अहाहा ! मस्त ओळी.

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

24 Jan 2010 - 6:24 pm | श्रावण मोडक

छान!

आनंदयात्री's picture

24 Jan 2010 - 9:35 pm | आनंदयात्री

उत्तम गझल .. आवडली !!

-
आंद्या सप्रे'म

पॅपिलॉन's picture

25 Jan 2010 - 6:35 pm | पॅपिलॉन

कविता उत्तम पण गझल म्हणवून घेण्यासाठी दोन बोटे कमीच (यतिभंग आणि गझलेच्या बाराखडीतील चुका)

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.