या गूढ सावल्यांनी..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
21 Jan 2010 - 9:22 pm

या गूढ सावल्यांनी सांज फ़ाकीत आहे
जणू चांदणे मला हे अजमावीत आहे

ते वाहता तराणे, स्वर कापराच त्याचा
वार्‍यास सय कुणाची, ही सतावीत आहे

ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?

'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते'
अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?

अंधार हा विषारी, विळखा भयाण त्याचा
हातात ज्योत इवली, वाट दावीत आहे

हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे

- प्राजु

कविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Jan 2010 - 9:28 pm | मदनबाण

ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?

सुरेख...

हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे

व्वा...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

प्रभो's picture

21 Jan 2010 - 10:48 pm | प्रभो

मस्त

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

शेखर's picture

21 Jan 2010 - 11:07 pm | शेखर

तुमच्या कविता कायम एक से एक असतात...
खुपच छान ...

मीनल's picture

22 Jan 2010 - 8:08 am | मीनल

सहमत .
मीनल.

निमीत्त मात्र's picture

22 Jan 2010 - 1:09 am | निमीत्त मात्र

प्रमोदकाकांनी चाल लावली अजूनच बहार येईल.

चिऊ's picture

22 Jan 2010 - 9:34 am | चिऊ

एकदम मनाला भिडून गेली....सु॑दर...

उदय सप्रे's picture

22 Jan 2010 - 1:52 pm | उदय सप्रे

अ‍ॅज युज्वल ! प्राजु स्ट्राईक्स नथिंग लेस थॅन अ सिक्सर !
खूपच छान !
कधी एकदा तरी हे असले विचार यावे
काव्य माझेही प्राजुच्या काव्या सारखे व्हावे !

मला आवडलेल्या सर्वात सुंदर दोन ओळी :

'होईल सर्व काही, जे आपणा हवे ते'
अंदाज हा तुझा की सांग भाकीत आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jan 2010 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

छान.

बिपिन कार्यकर्ते

ज्ञानेश...'s picture

22 Jan 2010 - 2:21 pm | ज्ञानेश...

चमकदार कल्पना आहेत.
अचूक वृत्ताचे कोंदण लाभल्यास अजून मजा येईल.

हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे

सु रे ख!

चतुरंग's picture

22 Jan 2010 - 7:56 pm | चतुरंग

चतुरंग

sneharani's picture

22 Jan 2010 - 4:04 pm | sneharani

मस्तच कविता.
नेहमीप्रमाणे दर्जेदार...

गणपा's picture

22 Jan 2010 - 4:22 pm | गणपा

नेहमी प्रमाणेच झक्कास :)

प्राजु's picture

22 Jan 2010 - 7:53 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अविनाशकुलकर्णी's picture

22 Jan 2010 - 10:06 pm | अविनाशकुलकर्णी

या गूढ सावल्यांनी सांज फ़ाकीत आहे
जणू चांदणे मला हे अजमावीत आहे....कविता खुप नादमय आहे..मस्त..नेहमीप्रमाणे..

चन्द्रशेखर गोखले's picture

23 Jan 2010 - 5:06 pm | चन्द्रशेखर गोखले

काय बोलावे .. एक नितांत सुंदर कविता वाचल्याचा आनंद मिळाला.

प्रशांत उदय मनोहर's picture

24 Jan 2010 - 12:17 am | प्रशांत उदय मनोहर

आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2010 - 11:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओढून पापण्यांचा पडदा अलगद थोडा
हळुच लोचनी या कोण डोकावीत आहे?

आणि

हा श्वास कोंडताना, मजला कळून आले
कि आयुष्य दार माझे, ठोठावीत आहे

मस्तच...!

-दिलीप बिरुटे