*************************************
कोपर्यात रस्त्यांच्या कलेवर अहिंसेचे...
संपले दिवस बापु.., तुमच्या रामराज्याचे
आता उरली भयाण केवळ..,शांतता शेवटाची
किं गर्भ कोवळे हे उद्याच्या अनावर हिंसेचे?
रक्ताने भरली झाडे.., फळे शस्त्रांची...
किं पुरावे ते अमुच्या...? कोडग्या मुर्दाडपणाचे ...
द्वेषाने बरबटली मने .., वाहले पाट रुधिराचे
हे फक्त कोसळणे मानवतेचे ...
किं संपणे संवेदनांचे ?
******************************************
विशाल.
प्रतिक्रिया
14 Jan 2010 - 11:22 pm | अविनाशकुलकर्णी
बापुंच्या अहिंसे मुळे नौखोलित हजारो हिंदुंचे प्राण गेले....देशाचे तुकडे ़झाले..
14 Jan 2010 - 11:22 pm | अविनाशकुलकर्णी
बापुंच्या अहिंसे मुळे नौखोलित हजारो हिंदुंचे प्राण गेले....देशाचे तुकडे ़झाले..
14 Jan 2010 - 11:24 pm | अविनाशकुलकर्णी
..
14 Jan 2010 - 11:36 pm | सागरलहरी
अहिंसेच्या आवाहनाची कविते मागील भावना रास्तच आहे.. पण हिंसे मागचा किंवा अहिंसे मागचा उद्देश देखील महत्वाचा आहे
पाणियाचे पाणीपण | आकाशीचे व्यापकपण |
अग्नीचे दाहकपण | कैसे राहे ||
कलिकेचे सुमन | सुमनाचे गंधाळण |
भ्रमरा त्याचे आकर्षण | कैसे होये ||
देवा अंगी देव पण | भक्तां अंगी समर्पण |
दुष्टा अंगी वाकुड पण | कैसे ठाये ||
लीला केली विश्वंभरे | पाही कौतुक साजरे |
जेथे तेथे नाना परे | विठ्ठ्ल राहे ||
कंटक आणि पुष्पासरी | भिन्न गुणे राहे हरी |
त्या त्या तैसे वंदन करी | प्रकृती धर्मे ||
सज्जनास पूजावे | दुष्टां निर्दाळावे |
सुमनाचे गंध घ्यावे | त्या त्या परी ||
सागर लहरी ०८-०१-२०१०
14 Jan 2010 - 11:42 pm | सागरलहरी
कंटक आणि पुष्पासरी | भिन्न गुणे राहे हरी |
त्या त्या तैसे वंदन करी | प्रकृती धर्मे ||
फूल आणि काटा याचे गुण (बोचणे -- सुगंध देणे) हे जरी वेगळे असले तरी त्या गुण धर्मामधे (प्रकृती) तेच ते विश्व चैतन्य नांदत असते. सज्जन आणि दुर्जन यांचा चांगुलपणा /वाईटपणा या मागे देखील वैश्विक चैतन्य असतेच सज्जनात ते असते आणि दुर्जनात ते नसते असे काही नाही. फक्त त्या कड़े री-अक्ट होताना त्या त्या वस्तूच्या प्रकृति धर्मा नुसार व्हावे. यामुले असे होते की काही जन म्हणतात की सर्वत्र देव आहे सारी कड़े देव पहा वगैरे " दया सर्वाभूती " वगैरे .... तर काही म्हणतात की ; "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठालाचे माथी हाणु काठी " मग हे reconcile कसे करायचे नक्की कसे वागायचे ? (उदा. सावरकर की गांधी ?) (शिवाजी की साने गुरूजी ?) तर त्या त्या वास्तुच्या प्रकृति प्रमाणे त्यातल्या चैतन्या ला सामोरे जावे ..
सज्जनास पूजावे | दुष्टां निर्दाळावे |
सुमनाचे गंध घ्यावे | त्या त्या परी ||
म्हणजे कृती तीच पण त्या मागचा attitude सजग राहील.
असा विचार केला की कलते की गीतेत कृष्णाने अर्जुना ला युद्धोपदेश का केला ? नाहीतर वाटेल एकीकडे कृष्ण सांगतो की सर्वाभूती मी आहे मग .. कौरावात ही तो आहेच की मग त्याना राज्य मिलाले तर काय बिघडले ?,,, कौरावाना कशाला मारायचे ?
तर त्याचे उत्तर वरच्या ओलीतून येते असे वाटते ..
असा विचार केल्यास हिंसा किंवा अहिंसा अशी सरळ विभागणि चांगले वाइट अशी करता येत नाही असे दिसते.. ती ती परिस्थिती पाहणे देखील गरजेचे आहे
15 Jan 2010 - 11:22 am | विशाल कुलकर्णी
हे राम ;-)
अविनाशजी, सागर.... बळी बापुंच्या अहिंसेमुळे गेले की ब्रिटीशांच्या क्रौर्यामुळे गेले हा नाहीचे इथे. कवितेच बापुंचे नाव फक्त एवढ्यासाठी आले आहे की अहिंसा म्हणले की आपोआप बापुंचे नाव डोळ्यांसमोर येतेच येते. मी स्वतः स्वा. सावरकरांचा भक्त आहे. पण म्हणुन मी हिंसेचे समर्थन कधीच करणार नाही.
इथे मुद्दा हा आहे की बापुंची तथाकथीत अहिंसा उघडी पडलीये. सागर, हिंसेच्या मागच्या कारण काहीही असो ती कधीच समर्थनीय नसते. हिटलरने जे केलं तेही निंद्य होतं आणि सम्राट अशोकाने जे केलं ते ही निंद्यच होतं.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"