...नाही नाही कोणत्याही गाण्याचे रसग्रहण नाही हे! तेवढी (चौफेर) प्रतिभा आमच्या असती तर आम्ही 'विसोबा खेचर' नावाने नसते का लिहिले? :)
तेव्हा आता तुमच्या उपसलेल्या तलवारी म्यान करा आणि शांतपणे ही प्रकाशचित्रे बघा...
नुकतेच येशु ख्रिस्ताची पुण्यतीथी जोडून आलेल्या विकांताला थोडीशी भटकंती केली आणि वसंत आगमना बरोबर येणारी हे रानफुले टिपाविशी वाटली.. कुठल्याही फुलदाण्यांमध्ये न दिसणारी, रानातच शोभणारी ही रानफुले..
वसंता आगमनाने झाडाला आलेला मोहोर :
----------------------------------------------------------------------------
आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :)
-कोलबेर
प्रतिक्रिया
3 Apr 2008 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll
मस्त आली आहेत फुलांची चित्रे. मला अशी फुलांची चित्रे काढता आली असती तर फार बरे झाले असते. म्हणजे फुले आणि फुलपाखरे यांची चित्रे उत्तम काढली असती. :)
पुण्याचे पेशवे
3 Apr 2008 - 10:10 am | विसोबा खेचर
शिंच्या कोलबेरा, चित्रं सुंदर आहेत रे!
नाही नाही कोणत्याही गाण्याचे रसग्रहण नाही हे! तेवढी (चौफेर) प्रतिभा आमच्या असती तर आम्ही 'विसोबा खेचर' नावाने नसते का लिहिले? :)
हा हा हा! करतोच थांब आता जाईन विचारीत चं रसग्रहण! :)
आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :)
ओक्के! मला काही वाळत घातलेल्या राजापुरी पंच्यांची आणि कळकट नी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकांची चित्रं हवी होती! आमची ऑर्डर लिहून ठेवा शेठ, पैशे नंतर पाठवतो! :)
असो, मला शेवटचं चित्रं सर्वात जास्त आवडलं रे कोलबेरा!
आपला,
(रानफुलांचा प्रेमी) तात्या.
3 Apr 2008 - 11:04 am | धमाल मुलगा
वाह! क्या केहने!!!!
कोलबेरशेठ, मस्त.
ते दुसर्या क्रमा॑काचा फोटो असलेल॑ कोणत॑ फूल आहे हो? एकदम चिकण॑ आहे! माझ्या आवडत्या र॑गाच॑!!!!!
आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :)
फुटलो रे...फुटलो रे मी !!!! ज ह ब ह र्ह्या
- ध मा ल.
3 Apr 2008 - 11:04 am | चतुरंग
सगळीच चित्रे अप्रतीम आहेत.
शेवटल्या चित्रातला वसंतागमनाने आलेला मोहोर तर इतका आसुसलेला आलाय की काय बिशाद आहे फुलपाखरु सोंड वाकडी करुन मध प्यायला अलगदणार नाही!
अभिनंदन वरुणा!
चतुरंग
3 Apr 2008 - 11:18 am | ध्रुव
फुलांची चित्रे सुरेखच... त्यांची नावे कळतील का?
--
ध्रुव
3 Apr 2008 - 11:46 am | सृष्टीलावण्या
इंदिरा संत म्हणतात...
गवतफुला रे गवतफुला, कसा लागला तुझा लळा...
चित्रे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. पण तुम्ही वरूण वैद्यांची चित्रे ढापायचे कारणच काय?
>
>
बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...
3 Apr 2008 - 12:45 pm | विसुनाना
कोलबेर = वरुण वैद्य असे असू शकते नं? :)
3 Apr 2008 - 12:59 pm | सृष्टीलावण्या
मला तर बुवा कोलबेर = काळंबेरं वाटले...
असले दुष्ट विचार पैदा करणार्या ह्या मनावर काहीतरी इलाज केला पाहिजे.
>
>
बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...
3 Apr 2008 - 9:53 pm | सर्किट (not verified)
पण तुम्ही वरूण वैद्यांची चित्रे ढापायचे कारणच काय?
हा हा हा !!!!
तुम्ही "विसोबा खेचरांविरुद्ध" जनरल डायरकडे तक्रार केली होती, असे ऐकिवात आहे.
पण हे तर खूपच मस्त !!
- सर्किट
4 Apr 2008 - 7:05 am | सृष्टीलावण्या
तुम्ही "विसोबा खेचरांविरुद्ध" जनरल डायरकडे तक्रार केली होती, असे ऐकिवात आहे.
त्याचं काय आहे माझा स्वभाव मुळातच तोंडात खडिसाखर आणि डोक्यावर बर्फाची
लादी असा आहे. कोणी सारखं सारखं चिडून आणि चिडवून दाखवलं तरी आपण काय आपला शांत स्वभाव मुळीच सोडत नाही.
पण हा जमाना भेसळीचा आहे. कधीतरी खडिसाखरेत पादेलोण निघते आणि बर्फाची लादी लौकर विरघळते. त्यामुळे होतात असे प्रमाद आपल्या हातून. चालायचंच. त्यात माझा काही दोष नाही.
>
>
आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...
4 Apr 2008 - 7:13 am | सर्किट (not verified)
कधीतरी खडिसाखरेत पादेलोण निघते
विसोबा हे खडीसाखर,
आणि जनरल डायर हे पादलोण,
असे तर म्हणायचे नाही ना तुम्हाला सॢलाताई ?
- (बर्र्फाची लादी) सर्किट
3 Apr 2008 - 11:48 am | बेसनलाडू
फारच आवडली प्रकाशचित्रे!
(आस्वादक)बेसनलाडू
3 Apr 2008 - 12:04 pm | स्वाती दिनेश
फार सुंदर चित्रे आहेत,ही पाहून आजच्या दिवसाची सुरुवात अगदी छान टवटवीत झाली.:-) आणि अगदी सुयोग्य, समर्पक शीर्षक! मस्त..
स्वाती
3 Apr 2008 - 12:47 pm | विसुनाना
वा! काय सुंदर प्रकाशचित्रे आहेत!
मनाला प्रसन्न वाटले.
3 Apr 2008 - 2:28 pm | प्रभाकर पेठकर
अतिशय सुंदर फोटो आहेत हे रानफुलांचे. अभिनंदन.
मला अजून आश्चर्य वाटतं की तुम्ही फोटोग्राफर लोकं फोटोंची टेक्निकल डिटेल्स लपवून का ठेवता? सुंदर फोटोंबद्दन नुसतेच कौतुक मिळविण्यापेक्षा थोडे 'ज्ञानदाना'चे पुण्यही पदरी पडू शकेल. कुठली लेन्स, किती ऍपरचर, किती स्पीड इत्यादी माहिती दिलीत तर जास्त चांगले होईल.
3 Apr 2008 - 2:37 pm | सहज
पण इतकी मोजकीच का? ही बघ मला दिसलेली रानफुले!!
फरगेट-मी-नॉट असे म्हणे ह्या फुलाचे नाव.
3 Apr 2008 - 2:54 pm | छोटा डॉन
बघितलं ह्याला म्हणतात प्रतिसाद [ वि.सू . = यात कोणाला चिमटा काढायचा हेतू नाही.]
मस्त . सहज आणि कोलबेर, दोघांनी दिल खूष कर दिया ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
3 Apr 2008 - 11:28 pm | मुक्तसुनीत
सहज पंत !
तुमची ही बाजू सुद्धा आवडली ! सुरेख चित्रे !
3 Apr 2008 - 2:54 pm | प्रमोद देव
वरूणशेठ आणि सहजशेठ आपल्या दोघांची छाया-चित्रणकला आवडली.
झकास !!!!!!
मला अजून आश्चर्य वाटतं की तुम्ही फोटोग्राफर लोकं फोटोंची टेक्निकल डिटेल्स लपवून का ठेवता? सुंदर फोटोंबद्दन नुसतेच कौतुक मिळविण्यापेक्षा थोडे 'ज्ञानदाना'चे पुण्यही पदरी पडू शकेल. कुठली लेन्स, किती ऍपरचर, किती स्पीड इत्यादी माहिती दिलीत तर जास्त चांगले होईल.
ह्या बाबतीत पेठकर साहेबांशी सहमत आहे.
3 Apr 2008 - 5:58 pm | पिवळा डांबिस
कोलबेर आणि सहज,
दोघांनीही लावलेली चित्रे मस्तच आहेत.
कोलबेरशेठ, आता "फक्त गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यांची चित्रे "दाखवण्याबाबतच्या तुमच्यावरील आरोपातून तुमची मुक्तता!!!:))
बाकी #१ चित्रातलं फूल माझं #१ दुश्मन आहे. ते डॅन्डेलियन आहे ना! ते एकदा बॅकयार्डमध्ये आलं की काही दिवसांत सगळ्या लॉनची वाट लावतं!!! दिसायला गोंडस दिसतं म्हणून जाऊ नका...
3 Apr 2008 - 6:04 pm | मनस्वी
रानफुले खरंच किती आकर्षक असतात. निसर्गाशी जास्त जवळची वाटतात.
बघून डोळे मस्त गार होतात.
कोलबेर आणि सहज - सहीच आहेत फोटो. आणखीन असतील तर टाका.
3 Apr 2008 - 6:38 pm | व्यंकट
मस्त आहे.
व्यंकट
3 Apr 2008 - 8:08 pm | कोलबेर
पेठकर काका आणि प्रमोदकाका,
हि घ्या ह्या चित्रांची रेसेपी ;
चित्र १
लेन्स - कॅनन १८-५५ @ ५५ मी.मी.
ऍपर्चर : ५.६
शटर स्पीड : १/१२५
चित्र २
लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ २६० मी.मी.
ऍपर्चर : ५.६
शटर स्पीड : १/१००
चित्र ३
लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ ३०० मी.मी.
ऍपर्चर : ५.६
शटर स्पीड : १/८००
चित्र ४
लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ ३०० मी.मी.
ऍपर्चर : ५.६
शटर स्पीड : १/३००
सर्व चित्रांसाठी आय एस ओ = २०० आणि अल्ट्रा व्हायोलेट फिल्टर.
अधिक टिपा : शक्यतो पावसाची एखादी सर येउन गेलेली असताना आणि थोडेसे ढगाळ वातावरण असताना फुलांची चित्रे काढावीत. फुले टवटवीत दिसतात आणि रंग खुलुन येतात. थेट सुर्यप्रकाश (डायरेक्ट सनलाईट) एखाद्या पातळश्या (फार गडद नको) ढगाआडून फुलावर पडत असेल तर आपोआप नैसर्गिक डिफ्युज्ड लाईट तयार होतो जो अश्या चित्रांसठी सर्वोत्तम.
प्रोत्सहना बद्दल सर्वांचे आभार!
-(वरूण वैद्य) कोलबेर ;)
3 Apr 2008 - 11:06 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. कोलबेर......
चित्र क्रमांक ३ साठी एवढा हाय शटर स्पीड काय उद्देशाने? आय्. एस्. ओ. १०० ठेवून किंवा एपरचर थोडे बंद करून चालले नसते का? जसे, ८ किंवा ११?
4 Apr 2008 - 12:26 am | कोलबेर
खरं आहे तुमचं म्हणणं.. पण मला ट्रायपॉड उपलब्ध नसल्याने जितका वेगवान शटर स्पीड शक्य असेल तेवढा हवाच होता.
आय. एस. ओ. मी सहसा २०० वरच ठेवतो (इनडोअर प्रकाशचित्रां व्यतीरिक्त) लख्ख प्रकाशात १०० ठेवायला काही हरकत नाही पण कधी कधी ते विसरले जाते आणि प्रकाश जरासा कमी असेल तर चित्रावर नॉइज येऊ शकतो .. म्हणून (माझ्या विसरभोळे पणा मुळे) मी शक्यतो तो २०० वर सेट करुन ठेवतो.
4 Apr 2008 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. कोलबेर.
आपल्या छायाचित्रणातील पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा....!
आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्हाला नक्कीच उपयोग करून घेता येईल.
5 Apr 2008 - 1:48 am | चित्रा
आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्हाला नक्कीच उपयोग करून घेता येईल.
असेच.. फोटो आवडले.
4 Apr 2008 - 12:35 am | विसोबा खेचर
अरे प्रमोदकाकांना आणि पेठकरकाकांना उत्तर दिलेस, परंतु मला हव्या असलेल्या राजापुरी पंच्याचं आणि कळकट व भोकं पडलेल्या वाळत घातलेल्या गंजिफ्रॉकच्या ऑर्डरचं काय झालं?
अशी काही चित्रं मिळतील का? :)
घाबरू नकोस, ती चित्रं पाहून मी काही लगेच कुठलं ऍब्स्ट्रॅक रागचित्र रंगवणार नाहीये! :)
तात्या.
4 Apr 2008 - 12:47 am | कोलबेर
तात्या,
ऑर्डर नोंदवुन घेतलीय.. पुढच्या भारत भेटीत नक्की काढतो :)
आणि पैशाचं नंतर बघू वगैरे चालणार नाय बरंका.. समर्थ भोजनालयात मस्त पार्टी द्यावी लागेल! :))
4 Apr 2008 - 10:32 am | ध्रुव
तुम्ही मन्युअल सेटींग वापरता की ऍपर्चर/शटर सेटींग?
exif माहिती मिळेल का?
--
ध्रुव
3 Apr 2008 - 11:21 pm | मुक्तसुनीत
डोळे निवले , कोल्बेर्राव ! :-)
4 Apr 2008 - 12:38 am | प्राजु
कोलबेरपंत आणि सहजराव,
आपण इतकी सुंदर चित्रे टिपली आहेत.. काय सांगू?
कोलबेर पंत,
मी आपल्या या चित्रांमधील १-२ चित्रे माझ्या कडे कॉपी करून घेतली तर चालतील का? आपली काही हरकत नाही ना?
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
4 Apr 2008 - 12:43 am | विसोबा खेचर
मी आपल्या या चित्रांमधील १-२ चित्रे माझ्या कडे कॉपी करून घेतली तर चालतील का? आपली काही हरकत नाही ना?
अगं पण त्याला कुठे काय कळणार आहे? हळूच राईट क्लिक करून सेव्ह करून टाक! हां, आता सेव्ह करताना कुठलाही मोठा आवाज वगैरे होणार नाही याची काळजी घे. नायतर वरूणला ऐकू जायचं! :)
4 Apr 2008 - 12:44 am | कोलबेर
धन्यवाद प्राजुताई! अहो १-२ काय सगळी घेतलीत कॉपी करुन तरी माझी काही हरकत नाही.
4 Apr 2008 - 2:22 am | धनंजय
सुंदर चित्रे.
(अवांतर : फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच. म्हणजे फर्माइशी वाळत घातलेल्या लंगोट्याच!)
4 Apr 2008 - 8:27 am | विसोबा खेचर
अवांतर : फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच. म्हणजे फर्माइशी वाळत घातलेल्या लंगोट्याच!)
माझ्या मते हे या शतकातलं सर्वात जबरदस्त वाक्य ठरावं! :))
धन्याशेठ, तुझ्यापुढे साष्टांग नमस्कार रे बाबा!!!
आपला,
(लंगोटी लावून ठाण्याच्या खाडीत मच्छी पकडणारा!) तात्या कोळी.
4 Apr 2008 - 2:45 am | नंदन
सुरेख फोटोज.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
4 Apr 2008 - 5:13 am | मीनल
फोटो मस्त आहेत.जिवंतच वाटतात.
जरा शोधा.मनस्वीच फुलपाखरू इथेच कुठतरी सापडेल.
फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच.
सुंदर उपमा.दोघेही मिलनोत्सुक! श्रुंगाराच्या गुलाबी छटेत आकंठ बुडालेले.तरीही संयमीत!
4 Apr 2008 - 8:30 am | सर्किट (not verified)
तुला बरे कळले...
चीन मध्ये अशा फुलपाखरांचे सगळे केसर काढून टाकतात ना ?
उगाच हम दो फुलपाखरू, हमारा एक.
ह्याल बाधा यायला नको ना ?
- (मनस्वी फुलपाखरू) सर्किट
4 Apr 2008 - 11:25 am | आनंदयात्री
पहिले चित्र वाळलेल्या पानाच्या पार्श्वभुमीवर काय वेगळे सांगुन जात असावे बरे ??
5 Apr 2008 - 9:05 am | ऋषिकेश
वसंतागमन होताच मिपावर उत्तमोत्तम प्रकाशचित्रांचा बहर आलेला आहे.
सुर्योदयानंतर ही नितांतसुंदर फुले पाहून दिल खूश हो गया.. चित्र#१ फारच आवडले
कोलबेरराव आणि सहजराव दोघांचेही उत्तम प्रकाशचित्रांपद्द्ल अभिनंदन आणि इथे दिल्याबद्द्ल धन्यु!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश