आज मावळात दंग..

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
3 Apr 2008 - 10:27 am

थोर कृषिवल 'अमित'जी हेच आमचे खरे स्फूर्तिस्थान. बाकी दादांच्या मूळ काव्याबद्दल सांगणे न लगे!

आज मावळात दंग 'अमित' हा तरी
जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी!

तो लबाड वित्तचोर वाट लावतो
दाम देउनी खुशाल टोपी घालतो
गुंगवूनि संगती दलाल 'फासतो'
'चारतो' अजूनही तिथे खरोखरी!

त्याच 'अमर'सुंदरास हात जोडले
शेती लाटल्याविना कुणा न सोडले
कोणि राव कोणि रंक करुन टाकले!
एकटीच 'बाराबंकी' नाही ती तरी !

भू तिथे करुन दान वाद संपला;
थोर 'अमित' तो बनून काळ लोटला;
कृषक बनुनि आज फिरुनि तोच पातला
हाय! वाजली फिरून गाडी ती खरी!

चतुरंग

विडंबन

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

3 Apr 2008 - 11:17 am | केशवसुमार

चतुरंगशेठ,
प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे..
केशवसुमार

केशवसुमार's picture

3 Apr 2008 - 11:17 am | केशवसुमार

चतुरंगशेठ,
प्रासंगिक विडंबन उत्तम झाले आहे..
केशवसुमार

बेसनलाडू's picture

3 Apr 2008 - 11:47 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

व्यंकट's picture

3 Apr 2008 - 6:30 pm | व्यंकट

म्हणतो.
व्यंकट

स्वाती दिनेश's picture

3 Apr 2008 - 12:11 pm | स्वाती दिनेश

हेच म्हणते,केसु आणि बेला सारखेच.
प्रासंगिक विडंबन उत्तम!
स्वाती

धम्मकलाडू's picture

4 Apr 2008 - 10:58 pm | धम्मकलाडू

केसु आणि बेला सारखेच

खिख्खिखिख्खिख्खिखिख्खि...(हे खिख्खि..चोली के पीछे मधल्या कुक्कुकुक्कुक्कु...सारखं बरं का..;)

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुवर्णमयी's picture

3 Apr 2008 - 8:05 pm | सुवर्णमयी

जोरदार विडंबन. आवडले.

सर्किट's picture

3 Apr 2008 - 9:57 pm | सर्किट (not verified)

हाय! वाजली फिरून गाडी ती खरी!

ह्यातली गाडी कळली नाही !

बाकी छान !

- सर्किट

तो गाडीतून परत आलाय एवढेच सूचित करायचे आहे - काही खास वेगळा अर्थ सांगायचा नाहीये.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 12:55 am | विसोबा खेचर

जपून जा जरा कशी 'जयू' तुझ्या घरी!

ही ओळ सर्वात क्लास! :)

आपला,
(गुड्डीतल्या जयूचा प्रेमी) तात्या.

चतुरंग's picture

4 Apr 2008 - 1:11 am | चतुरंग

दोन वेण्या आणि फ्राक घातलेली;) कुठल्या कुठल्या आठवणी काढता बॉ!

चतुरंग

प्राजु's picture

4 Apr 2008 - 1:04 am | प्राजु

एकदम धडाकेबाज...

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:20 am | मीनल

असेच एक विडंबन इथे वाचले.
http://www.maayboli.com/node/539

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 7:23 am | सर्किट (not verified)

मायबोलीवरचा मिल्या जबरन आहे..

- सर्किट

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:26 am | मीनल

मग काय ?
आहे की नाही नविन माहिती ?
तुझ म्हणणं पुन्हा एकदा खर ठरवल की मी .

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 7:29 am | सर्किट (not verified)

मान्च्युरियन आणि शेजवान, इतकीच शिळी बातमी ही, मीनल..

बाय द वे. एम एस जी, विषयी तुला कही नवीन माहिती द्ययची असेल, तर नक्की दे.

- सर्किट

मीनल's picture

4 Apr 2008 - 7:40 am | मीनल

अरे रे !
मला वाटल चायनीज नाही ,गझल नाही ,निदान `मिल्या`ची तरी असेल बातमी तुझ्या करता नविन.

जाउ द्या काय?

एम एस जी--हो -
मीनल संजय गद्रे.
अरे मोठ्ठा ग्रंथ तो .आत्मचरित्र.
लिहीते आहे .लिहून झाला की पहिली कॉपी तुला .प्रॉमिस.

मीनल.

सर्किट's picture

4 Apr 2008 - 8:19 am | सर्किट (not verified)

तुझ्या आत्मचरित्राच्या उत्कंठेत,

- सर्किट संजय गद्रे

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:12 pm | मीनल

संजयला नचिकेत हा एकच मुलगा आहे हे मला माहित होतं.
हा सर्किट कोणता?
आत्ताच छडा लावते, त्याला विचारून.

मीनल.

(अवांतर - मीनलताई, 'मायबोली' वरचे आपण दाखविलेले विडंबनही झकास आहे.)
चतुरंग

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:09 pm | मीनल

मला तुम्ही केलेले विडंबन जास्त आवडले.
बच्चन + सामाजिक परीस्थिती.

मीनल.