असा नको अवेळी
वारा पदराचा.
झाकले इंगळ
राखेखाली .
मन माझे.
+++++
माझी फितूर पानं
गुलाम तुमची झाली .
हुकुम आमचा झाला
बाजी तुमची झाली.
अवघड खेळ आहे बुवा.
++++++=
आळंबीचं पांढरं रान माजलं आहे
तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं .
आता, शोधाशोध निरर्थक आहे.
उपेक्षेच्या उंबर्यावर मनाचा चुडा फोडून
मी जगण्याचे गाव सोडले आहे.
+++
ते म्हणाले,
हा वेडा आणि ती वेडी
पण..
मी खोल खोल डोहात
तू काठावर कोरडी.
++++
नव्या वर्षाची सुरुवात करू या.
प्रतिक्रिया
2 Jan 2010 - 12:46 pm | विनायक प्रभू
कविता
2 Jan 2010 - 3:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
2 Jan 2010 - 4:18 pm | टारझन
कवितेत प्रभुबाबा दिसले !
- मंदन
2 Jan 2010 - 10:07 pm | धनंजय
असेच म्हणतो!
2 Jan 2010 - 11:49 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री रामदास, कविता आवडल्या.
उपेक्षेत धीर धरवत नाही हे खरेच.
अजुनही तूच आहे की ती?
अवांतर: कवितांमधील + या चिन्हांची संख्या, =चा वापर तसेच काही ठिकाणी एक जागा सोडून टिंब यांचा काही विशेष अर्थ असावा का याचा विचार करतोय.
3 Jan 2010 - 1:31 am | टुकुल
काही कळल नाही
--टुकुल
3 Jan 2010 - 1:37 am | निमीत्त मात्र
दुर्बोध कविता आहेत. अश्या (दुर्बोध) कवितांवरचा विजुभाऊंचा प्रतिसाद वाचण्यासारखा असतो. त्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे.
3 Jan 2010 - 4:27 pm | विजुभाऊ
कोण म्हणतं कविता दुर्बोध आहेत.
प्रत्येक ओळ न ओळ बोलकी आहे
असा नको अवेळी
वारा पदराचा.
झाकले इंगळ
राखेखाली .
मन माझे.
भावना जेंव्हा प्रदीप्त होतात तेंव्हा मनाला प्रत्येक बाह्यगोष्ट ही कॅटॅलिस्टच वाटत असते.. ( कॅटॅलिस्ट हा रासायनीक प्रक्रीयेत सहभागी न होता त्या प्रक्रीयेचा वेग/संहतता नियंत्रीत करत असतो)
माझी फितूर पानं
गुलाम तुमची झाली .
हुकुम आमचा झाला
बाजी तुमची झाली.
अवघड खेळ आहे बुवा.
रमी खेळताखेळता भीकारसावकार खेळायला गेले की असेच होते.
आळंबीचं पांढरं रान माजलं आहे
तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं .
आता, शोधाशोध निरर्थक आहे.
उपेक्षेच्या उंबर्यावर मनाचा चुडा फोडून
मी जगण्याचे गाव सोडले आहे.
हम्म्......एक दीर्घ श्वास घेऊन......
अळंबीसारखी मृतोपजीवी वनस्पती मराठीत भाषेच्या इतिहासात प्रथमच वापरली गेली असावी. कवीच्या अव्यक्त मनात खोल दडून बसलेल्या कोकणच्या मातीतील व्यवसायाच्या नव्या वाटा हा ग्रंथ अधून मधून वर उडी मारत असतो. आणि व्यक्त होत असतो.
कवीने ब्यांके कडून आळंबी उत्पादनासाठी नाबार्ड / खादीग्रामोद्योग मंडळ आणि ब्यांकेकडून जे कर्ज घेतले होते ते सगळे संपून गेले.
अळंबी उगवली पण विकली मात्र गेली नाही. घरी नुसतीच आळंबी खाऊन राहिल्यामुळे अजीर्ण झाले.
गावात फिरताना पोरेटोरे सुद्धा" ए अळंबीवाला" असे चिडवायला लागली.
प्रेयसीला डोक्यात माळायला मोगयाची फुले देताना सुद्धा मोगर्याऐवजी बटण आळंबी दिली गुलाबाऐवजीधिंगरी अळंबी दिली.
व्हायचा तोच परिणाम झाला. हात झिडकारताना इतक्या जोरात झटकले की तिच्या हातली बांगडी फुटली.
गावात रहावेसे फार वाटत होते पण नवे कर्ज कोणीच द्यायला तयार नव्हते, सासरे आणि मेहुणे सुद्धा टाळू लागले शिवाय देणेकर्यानी तगादे लावल्यामुळे गाव सोडावेच लागले.
ते म्हणाले,
हा वेडा आणि ती वेडी
पण..
मी खोल खोल डोहात
तू काठावर कोरडी.
पाऊस जास्त पडला तर ओला दुष्काल पडतो/कमी पडला तर कोरडा दुष्काळ पडतो.
पाऊस पडायचा तसा पडतो. भाजी घेणारा मात्र वेडा ठरतो.
3 Jan 2010 - 7:29 pm | निमीत्त मात्र
विजुभाऊंची ऑन डिमांड प्रतिक्रिया.
अळंबीपुराण तर केवळ अ प्र ति म!
जियो *विजुभाऊ:)
*सरपंचांकडून साभार
4 Jan 2010 - 11:06 am | jaypal
श्री हरी,श्री हरी.
निरुपण लै भारी.
कविता ईस्कटुन सांग्ल्या बद्दल आभारी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Jan 2010 - 2:52 am | पाषाणभेद
अतिशय उत्स्पुर्त रसग्रहण विजूभौ.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी