व्यथा

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जे न देखे रवी...
2 Jan 2010 - 1:19 pm

पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा
मास्तर मालकाची माडी चढला .
तवा
मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी
विलायती गरमी गिलासात वतत हुती.
या मास्तर ,
हे मास्तर आमच्या साळंचे.
यांचा लई जीव पोरांवर
आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर
मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात.
पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला .
तवा मालक म्हणलं
घ्या मास्तर गिलासात गरमी भरून.
सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं
चार हिरव्या नोटा भेटल्या तर.....
दोनाचे चार करीन म्हणतो
धावीचे वर्ग.
आनी,
थोडा सोडा घाला की मालक.
लई सवकलास की मास्तरा.
थोडी गिलासातली बरुबरी दिली
तर सोडा मागतोस व्हय.?
मालक गिरमटून बोललं
तवा,दोन पाहुणं
चार हिरव्या नोटा चुरगळून मास्तराला देत
म्हणलं
या आता .
आमी जातो देशी तमाशाला .
जोराजोरी चनेके खेतमे.
*********
घरच्या रस्त्याला मास्तरला बोचत हुती थंडी
का चार हिरव्या नोटा
पन घसाशी आलेली दारु गिळून मास्तर
गप रायला

**********
पुसाच्या रात्री दरोडा पडला
तवा.
मालकाची म्हातारी अंधार चाचपत
घरभर फिरली .
एका बेरडाणं गुंडाळली तिला घोंगडीत
आंधळ्या म्हातारीला कळना काई
पण चिप गार बसली पहाट होईतो.
पाहुणं आलं सकाळी तवा
ट्रंका फोडलेल्या .
आनी मालकाच्या देव्हार्‍यातले
चांदीचे देव पण लुटलेले.
देव्हारा गळ्याशी बांधून
म्हातारी सकाळी उनात बसलेली
चांदीचे टाक आठवत.
***********
सकाळी म्हातारी हाडं शेकत
उनात बसली
तवा मास्तर आला.
म्हातारीचे पाय चेपत
पंचनाम्याचा कागुद वाचत
चुटपुटत र्‍हायला.
तवा
म्हातारी म्हणली
मला आंधळीला कळंत नायी काही
मास्तरा पन येवढं नक्की
त्या बेरडाचा हात मातुर वळखीचा वाटत होता .
डोळ्यातलं पानी पुसत मास्तर साळेत गेला .
पुसाच्या थंडीत डोळ्यात पाणी येतच म्हना की.

करुणसंस्कृती

प्रतिक्रिया

प्रभो's picture

2 Jan 2010 - 1:53 pm | प्रभो

सकाळ सकाळ माणूस उठतो...दात घासतो...तिकडे जाउन येतो...चहा पितो..आणी मग बादलीत पाणी घेऊन आंघोळीला जातो....तांब्यात पाणी भरतो आणी तो तांब्या डोक्यावर उपडा करतो..पाणी डोक्यावरून जाते...

थोडक्यात काय तर भिजलोय पण आणी डोक्यावरून पण गेलय...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2010 - 3:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, शेवटच्या चार ओळी भारी वाटल्या.
व्यथा पोहचली.

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

2 Jan 2010 - 4:14 pm | टारझन

क्रमशः कुठे दिसत नाही ते ?

संजा's picture

2 Jan 2010 - 6:35 pm | संजा

वाक्य छोटी केली की कवीता जन्म घेते काय?

संजा

अक्षय पुर्णपात्रे's picture

3 Jan 2010 - 12:01 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री प्रभू, लिखाण वाचले. बियरच्या बाटलीतून पांचट चहा दिल्यास (चहाच्या) चवीत फरक पडेल काय याचा विचार करतोय.

टुकुल's picture

3 Jan 2010 - 1:38 am | टुकुल

नीट वाचुन पाहील्यावर वाटत आहे कि मास्तरनेच (कवीतेतला) मालकाच्या घरी दरोडा टाकला. बाकी कवितेतल काहीच कळत नाही आपल्याला

--टुकुल

शुचि's picture

26 Mar 2010 - 4:19 am | शुचि

मलाही तसच वाटतय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||