विरोधाभास..

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
18 Dec 2009 - 1:38 pm
गाभा: 

खूप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दूर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदूर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. इथल्या सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आज पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामेजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मढ्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..

उंच उंच इमारतीमध्ये, थंडगार हवेमध्ये बसून एखाद्या राज्यासंबधी, एखाद्या शहरासंबधी, एखाद्या खेड्यासंबधी निर्णय घेणे एकदम सोपे आहे. कोणी जगावे व कोणी मरावे ह्याचा निर्णयदेखील आजकाल माणसं घेतात हे पाहून नवल वाटते. कधीकाळी ३५ रु. ला मिळणारा मॅकडीचा बर्गर आता २० रु. ला मिळतो, पिझा स्वस्त झाला म्हणून कंपनीवाले टिव्हीवर, रेडिओवर, टॉयलेटच्या भिंतीवर बोंबलत आहेत. खरोखर सर्वकाही स्वस्त झाले आहे ? चार रु. किलो कांदा मिळायचा ह्यावर मुलांचा विश्वासच नाही, तेल कधी तीस रु. किलो होते ह्या वाक्यावर तर मुले हसतात, खूप पुर्वीची गोष्ट नाही आताचीच काही वर्षापूर्वीचीच गोष्ट. भाव आकाशी भिडले हा वाक्यप्रचार आम्ही पुस्तकात वाचायचो.. आजकाल मुले ह्याची देही.. ह्याची डोळा पाहतात.. आकाश खूपच ठेंगणे झाले आहे. एकीकडे हजारो टन भाजीपाला आपल्याला रस्त्यावर फेकावा लागत आहे भाव मिळत नाही म्हणून व दुसरीकडे जेवायला एकवेळचे अन्न नाही म्हणून भूकबळी पडत आहेत ह्यात किती मोठा विरोधाभास आहे.

एखादी बातमी, एखादा चित्रपट, एखादी डॉक्युमेंट्री येते आणि हलकेच आपल्याला हळवी करुन जाते व आपण परत निर्लज्जासारखे आपल्या सरावलेल्या जगात परत जातो. एखादा आत्महत्या करतो, एखादा सहपरिवार आपली यात्रा संपवतो, आपण हळहळतो व परत आपल्या जगात सराईतासारखे वावरतो. काही जणांना लाखो रुपयेही नाही पुरत महिना काढण्यासाठी तर काहीजणांच्या घरामध्ये दिवसेंदिवस चूल पेटत नाही त्यांचा आपल्याला विसर पडतो. कुठेतरी निसर्ग बचाव आंदोलन चालू असते, कुठे वन्यजीव बचाव.. पण कुठेच सामान्य माणूस बचाव हे आंदोलन चालू आहे असे कधीच पाहण्यात येत नाही. पाळीव कुत्र्यांविषयी, बैलांविषयी माणसाला आपुलकी आहे. पण आपल्याच जात बांधवावर जरा ही दया नाही... अशी विचित्र जात मानवाची.

कुठेतरी देव असेल व तो पहात असेल हे सर्वकाही. आपण चुकत आहोत कुठे ना कुठे हे नक्की. सगळीच नेते मंडळी नाकर्ती आहेत असे नाही. नाही तर आपल्या देशाचादेखील पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. पण कुठे तरी एक समाज म्हणून आपण नक्की चुकतो आहोत. आज ना उद्या कधी ना कधी आपल्याकडे असलेले इंधन संपणार आहे, पर्यायी इंधनाचा अजून काहीच शोध लागला नाही, सूर्य ऊर्जा हा एक विकल्प आहे आपल्यासमोर पण कोणीच त्यावर योग्य पध्दतीने कार्य करत नाही आहे. प्रगत देशामध्ये काय होत आहे माहीत नाही पण भारतासारख्या असामान्य पण प्रगतशील देशात खूप मोठे अडथळे दिसत आहेत. शेती व्यवसायामध्ये खूप मोठी तफावत आहे. निसर्ग नेहमी प्रमाणे साथ देत नाही. जेव्हा पाऊस पडायला हवा तेव्हा दुष्काळ व जेव्हा नको तेव्हा महापुर अशी अवस्था आहे. अनिश्चित पाऊस हे दृश्य भारतासारख्या पावसावर अवलंबून असलेल्या देशाला नक्कीच हानीकारक आहे. वीजेचे तर काय गुण गावे.. जेथे दिल्लीसारख्या राजधानी मध्ये पूर्ण २४ तास आपण वीज देऊ शकत नाही तेथे सुदूर पसरलेल्या खेड्यांमध्ये आपण २४ तास वीज कशी देणार आहोत हेच मला अजून कळले नाहीए. एखाद्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपला देश खरोखर सज्ज आहे ? हे मागेच आलेल्या वादळावरुन समजले. माहितीच्या देवाण-घेवाणीमध्ये एवढी तफावत आहे की अनेकांचे जीव गेले तरी त्याविषयी संबंधित खात्याला आकडेवारीही माहित नसते.

एकविसावें शतक चालू होऊन पण आता नऊ वर्ष पूर्ण होत आलीत पण अजूनही आपण जातीव्यवस्था, आरक्षण व सबसिडीवर अवलंबून आहोत. रस्त्यावर चालणारे शेकडॊ हजारो लोक आपल्याला कुठल्या जातीचा माणूस स्पर्श करुन गेला हे पाहण्य़ासाठी मोकळे नसताना फक्त राजकीय कारणामुळेच आज जातीव्यवस्था टिकून आहे. राहुल गांधी दलिताच्या घरात एका रात्री जेवला ही आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असते तर भाजपा सारखे राष्ट्रीय पक्ष केवळ जातीय राजकारणामुळेच पोसले जातात. सबसिडी व्यवस्था / आरक्षण व्यवस्था ही देश स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षात मागे घ्यावी अशी मागणी बाबासाहेबांनी केली असे कुठेतरी वाचले होते. आज देश स्वतंत्र होऊन ६० वर्ष झाली तरीही आपल्या खांद्यावर अजून ही आरक्षण / सबसिडी व्यवस्था जोखडासारखी तशीच आहे. आपण कुठेतरी नक्की चुकत आहोत हे आपल्याला कळतं. पण राजकीय इच्छाशक्तीची कमतरता व योग्य असा नेता नसल्यामुळे कुठेच काही फरक पडत नाही आहे.

काय होणार आहे काही कळत नाही. मी निराशवादी नाही पण समोर जे दिसत आहे, घडत आहे ते पाहून खरोखर मनामध्ये चलबिचल होते. बघू काय घडतं ते.. पण महासत्ता होण्याच्या नादात आपण कुठेतरी आपली जाणीव हरवून बसलो नाही म्हणजे झाले.

प्रतिक्रिया

sneharani's picture

18 Dec 2009 - 1:48 pm | sneharani

आज सकाळीच एक प्रश्न मनात आला, कितीतरी वर्षानी शेती करायला तरी जमीन शिल्लक राहिल काय, सगळे इंधन साठे संपल्यानंतर काय होईल? :(
हो खरोखरचं विरोधाभास आहे आजच्या युगात!

अवलिया's picture

18 Dec 2009 - 1:57 pm | अवलिया

श्री रा रा राजेजीसाहेब

अतिशय छान प्रकटन. मनातल्या भावनांना शब्दरुप देवुन कळफलकाच्या सहाय्याने त्यांना वाचकांपर्यत पोहोचवण्याचे आपले कसब वादातीत आहे. आपणास आजुबाजुच्या परिस्थितीचे असलेले भान आपली नाळ समाजापासुन तुटली नसल्याचे प्रकर्षाने दाखवुन देत आहे. अशा पद्धतीचे भान असणे ही आपल्यातल्या मनुष्याने पशुत्वावर केलेली मात आहे असे मी समजतो. थंडगार वातानुकुलीत खोल्यांमधे बसुन समाजाला दिशादिग्दर्शन करणारे अनेक रथी महारथी असतांना त्यांच्यात आणि आपल्यात असलेला फरक जाणकारांच्या लगेच लक्षात येतो. आपणाकडुन आमच्या फार अपेक्षा आहेत, त्यांची आपण उपेक्षा करणार नाही अशी आशा आहे. आपण विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखन लिहिता परंतु आपण रुढ अर्थाने विचारवंत नाहीत. तो आपला पिंड नाही. हसा मजा करा या वृत्तीचे आपण असलात तरी आपण खोलवर विचार करु शकता हे पुन्हा सिद्ध केले. आणि हेच आपले वेगळेपण आहे. एरंडेल तेल पिवुन दुस-याच्या चुका दाखवत स्वतः काहीही न करता कुणीही विचारवंत होवु शकतो, पण स्वतः चुकीचे का होईना पाउल उचलत कार्य करत, इतरांना प्रवृत्त करणे हे मोठेपण. जे आपल्यात दिसते.

लेखामधे असलेले विस्कळीत विचार आपल्या चंचल मनोवृत्तीचे नसुन एकावेळी हृदय पिळवटुन अनेक भावना मनात याव्यात आणि संताप, निराशा, वेदना यांच्यामुळे शब्द न फुटावा पण त्याचबरोबर तळमळ, आणि यातुन नक्कीच चांगले घडेल ही अपेक्षा ठेवुन व्यक्त होणारा भाव यांचे एकत्रिकरण झाल्यावर होणारी अवस्था आपल्या लेखनातुन प्रतित होत आहे असे मी मानतो. आपल्या लेखनाचा मी पुर्वीपासुन चाहता आहे हे नमुद करणे माझे कर्तव्य समजतो.

कधीकधी वैयक्तिक समस्या, कधी सामाजिक तर कधी वैश्विक समस्यांना हात घालत मनापर्यत पोहोचणारे आपले लेखन मनाला सुखवुन जाते त्याचबरोबर विचाराला प्रवृत्त करते. वास्तवाची यथार्थ जाण असलेले आपले लेखन वरवर पहाता निराशावादी वाटु शकते, पण शांतपणे विचार केल्यास त्यामागे असलेली समस्यांचे निराकरण करण्याची तळमळ वाचकांच्या मनात उतरते.

जीवनाच्या विविध क्षेत्रात आज समस्या आहेत. तसा विचार केला तर समस्या या पुर्वापार आहेत, त्यांचे स्वरुप भिन्न काळात भिन्न होत गेले. तरीही पुर्वी ब-याचशा समस्या या निसर्गनिर्मित, दैवाधीन होत्या. आजच्या बहुतांशी समस्या या मानवी आणि कृत्रिम आहेत. त्यांच्या मुळाशी आहे मनुष्याची सत्तालालसा, स्वार्थी वृत्ती. याला मार्केटिंग या गोंडस नावाने भर घालणारी ओरबाडु वृत्ती. याविषयासंबंधात अनेक विचारवंतांशी चर्चा चालु असुन त्यावर एक कथामाला लिहिण्याच्या विचारात आहे.

आपले असेच लेखन वारंवार वाचायला मिळो अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करुन मी माझा छोटासा प्रतिसाद आटोपता घेतो. मनात खरे तर खुप विचार रुंजी घालत आहेत, परंतु माझी शब्दसंपत्ती आणि विचारांना शब्दरुपात बदलवण्याची ताकद मर्यादीत आहे. आणि माझ्या मर्यांदाचे अजुन जाहीर प्रदर्शन किती करु असा विचार करुन मी येथे थांबतो.

धन्यवाद !

--अवलिया

प्रसन्न केसकर's picture

18 Dec 2009 - 2:22 pm | प्रसन्न केसकर

मनापासुन केलेले प्रामाणिक निवेदन वाचले.

सध्या आपण ज्या जोमाने लिहिते झालेले आहात त्याचे कौतुक वाटते. मुक्या भावनांना शब्दबद्ध करण्याचे आपले कसबही मनाला भावते. आपल्या लेखांमधुन आपण जी सामाजिक जाणीव दाखवता त्याबद्दल आपल्यापुढे नतमस्तक व्हावेच लागते.

जरी आपली प्रतिमा वेगळी असली तरी आपण सध्या बराच गंभीरपणे विचार करत आहात असे दिसते. परंतु आपल्याला विचारप्रक्रियेला, विचारांची मांडणी करण्याला शिस्त लावणे शिकणे गरजेचे असावे असे वाटते.

प्रस्तुत लेखामधे आपण अनेकविध गंभीर समस्यांवर एकसमयावच्छेदेकरुन विचार करण्याचा विचार केला असल्याचे जरी जाणवत असले तरी अशी शिस्त नसल्याने लेखाची मांडणी विस्कळीत आहे. तथापी सात्विक संताप, निराशा, वेदना यांच्या मनी उचंबळुन येणार्‍या कल्लोळामुळे कदाचित असे झाले असावे असे मी समजतो.

वैयक्तिक, वैश्विक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय समस्यांना आपण ज्याप्रकारे हात घातला आहे, त्यामुळेच आपले हे लेखन विचारप्रवर्तक ठरते. कटु वास्तवाचे झणझणीत अंजन ऐहिक सुखाच्या मागे लागणार्‍यांच्या डोळ्यात घालणारे असे लिखाण वरवर पहाता निराशावादी वाटेल परंतु त्यातील विचारांचेच अनुसरण करुन सर्व समस्यांचे निराकरण करणे व सफल जीवन जगणे शक्य होईल हे कालातीत सत्य आहे. या सत्याचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

अश्या प्रकारच्या समस्या अगदी प्राचीन कालापासुन प्रत्येक समाजापुढे वेळोवेळी उभ्या राहिलेल्या आहेत व तत्कालिन दार्शनिकांनी आपापल्या परीने त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्नही केलेले आहेत. या समस्यांमागे कुणाच्या मते मनुष्याची सत्तालालसा, स्वार्थी वृत्ती ही कारणे आहेत तर कुणाच्या मते वैषयिक सुखासिनता याला जबाबदार आहे. या विषयासंबंधात आद्य शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात झालेला वाद आपणास माहिती असेलच.

आपले विचारमंथन असेच सुरु राहो, त्यातुन असे विचारप्रवर्तक लेखन वारंवार वाचायला मिळो व त्यातुनच आम्हाला ऐहिक तसेच पारमार्थिक सोपान चढण्याची प्रेरणा सदैव मिळत राहो अशी त्या जगन्नियंत्याचरणी प्रार्थना.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2009 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार

खूप शहरं पाहिली मी ह्या डोळ्य़ांनी.. मंबई असो वा कलकत्ता अथवा दिल्ली नाही तर दूर उत्तरेकडे वसलेले नैनीताल नाही तर सुदूर पसरलेल्या दक्षिणेतील एखादं शहर. इथल्या सगळ्यांची सुरवात एकाच विचाराने होते आज पोट कसे भरावे ? कोमजलेली सकाळ, घामेजलेली दुपार व थकलेली संध्याकाळ.. ह्याच्या पलिकडे काहीच नाही. राबराब राबण्यात एखाद्याचा जीव जरी गेला तरी मागे वळून पाहण्यासाठीही वेळ नाही कुणाकडे...राबण्याची जिद्द असते अतोनात पण एखाद्या मढ्यावर रडण्यासाठी थोडा ही वेळ नाही..

अतिशय भिकारचोट असे हे लेखन आहे. हातला काम धाम नसले की हे असले उद्योग सुचतात. स्वतः सुखाने जगायचे नाही आणी लोकालाही सुखाने जगुन द्यायचे नाही.

काय अडचण काय आहे हो तुमची ? आय मीन तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ? इतक्या तुच्छतेने लेखन कशासाठी केले आहे ? येव्हडे बोंबलत हिंडलात, तुम्हाला एक आनंदाचा क्षण कुठे उपभोगायला मिळाला नाही ?

अरे या एका रविवारी सकाळी आमच्या पुण्यात. सकाळी ८ वाजता छानशा प्रसन्न अशा सकाळी पिशवी घेउन बाहेर पडावे, एखाद्या नुकत्याच उमललेल्या कळीसारख्या चेहर्‍याच्या, नुकत्याच न्हाउन आलेल्या सुंदर सुंदर तरुणींचे दर्शन घेत मंडईतुन बाहेर पडावे, छानशी श्रीकृष्णची मिसळ चापावी... अहो सुख सुख म्हणतात ते अजुन काय वेगळे असते ?

पण तुमच्या सारख्या सतत दुर्मुखलेल्या आणी जगाशी वैर पत्करलेल्या देवदासांना त्यातले सुख कळेल तर ना ! सतत वाईट बाजुंचाच विचार करत राहायची खोडच आहे तुम्हा लोकांना.

असो बदला

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

18 Dec 2009 - 4:02 pm | छोटा डॉन

सर्वात प्रथम श्री.रा.रा. राजे यांचा छोटेखानी पारंतु विचारप्रवर्तक लेख आवडला. त्यांनी रोजच्या जीवनात अनुभवलेल्या विविध स्थित्यंतराच्या व जगण्यातील घालमेलीचा अत्यंत सुरेख असा आलेख आपल्या लेखात मांडला आहे.

असो, मी ह्यावर भाष्य करणारी सविस्तर प्रतिक्रिया लवकरच लिहेन, ही केवळ पोच समजावी.

सकाळी ८ वाजता छानशा प्रसन्न अशा सकाळी पिशवी घेउन बाहेर पडावे, एखाद्या नुकत्याच उमललेल्या कळीसारख्या चेहर्‍याच्या, नुकत्याच न्हाउन आलेल्या सुंदर सुंदर तरुणींचे दर्शन घेत मंडईतुन बाहेर पडावे, छानशी श्रीकृष्णची मिसळ चापावी... अहो सुख सुख म्हणतात ते अजुन काय वेगळे असते ?

वा रं वा !!!
अरेरे, स्वमुर्तपुजेत मग्न असणार्‍या स्वकोषी पुणेकरांचे विश्व अजुन मंडई, त्यातल्या प्रापंचिक तरुणी आणि श्रीकॄष्ण मिसळ ह्याच्या पुढे गेलेच नाही हे पाहुन सखेद आश्चर्य वाटले.
जाऊ दे, आता ह्यांना "जरा बाहेरचे जग पहा" असे सांगायची सोयही नाही कारण पुण्याबाहेर काही जग आहे हे त्यांच्या गावीही नसेल.

राजे, तुम्ही लिहा हो !
असल्या आत्मकेंद्री प्रतिक्रिया जास्त सिरीयसली घेऊ नका.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2009 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

अरेरे, स्वमुर्तपुजेत मग्न असणार्‍या स्वकोषी पुणेकरांचे विश्व अजुन मंडई, त्यातल्या प्रापंचिक तरुणी आणि श्रीकॄष्ण मिसळ ह्याच्या पुढे गेलेच नाही हे पाहुन सखेद आश्चर्य वाटले.
जाऊ दे, आता ह्यांना "जरा बाहेरचे जग पहा" असे सांगायची सोयही नाही कारण पुण्याबाहेर काही जग आहे हे त्यांच्या गावीही नसेल.

राजे, तुम्ही लिहा हो !
असल्या आत्मकेंद्री प्रतिक्रिया जास्त सिरीयसली घेऊ नका.

जळजळ पोचली.

"चिंता करतो विश्वाची" म्हणणे समर्थ रामदासांनाच शोभते. आपले आयुष्य त्या माणसानी समाजोद्धारासाठी खर्च केले. दिवसभर छान छान, मस्त मस्त, गोड गोड, स्वप्नाळू अश्या वातानुकुलीत वातावरणात मऊ मऊ खुर्चीत बसून आंतरजालावत बागडायचे, अध्ये मध्ये धुर काढायचा आणी संध्याकाळ झाली की वारुणीचे घुटके सुरु. मग एखाद दिवशी ह्यांना अचानक गोर गरीबांचा कैवारा येतो, जगात चालु असलेला भ्रष्टाचार, अन्याय, असमानता खुपायला लागते.. वाह रे वाह !! मग हे आपला कळफलक घेउन सरसावतात आणी विचारजंती लेख लिहितात. " लेखन खुपच छान, अंतर्मुख करणारे लेखन" वगैरे प्रतिसाद देऊन फेटे उडवणारे कंपुबाज दिमतीला हजर असतातच.

ह्याला मगरीचे अश्रु म्हणतात !!!

©º°¨¨°º©छोटा पोर्न ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Dec 2009 - 4:21 pm | llपुण्याचे पेशवेll

केवळ पुण्याचा उल्लेख आल्यामुळे परिकथेतील राजकुमार -जी यांच्याशी सहमत असे म्हणावे लागत आहे. असो प्रत्येक शहरात अशी सौंदर्यस्थळे असतात. त्यामुळे पुण्याचा स्थानजनक उल्लेख सोडला तरी सर्वत्र अशा आल्हाददायक जागा असणारच. असो.
राजे -जी नर्‍ह्याचा एकटेपणा सतावतो आहे का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2009 - 4:32 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय llपुण्याचे पेशवेll-जी आपल्या सहमतीमुळे हुरुप वाढला. मनापासुन धन्यवाद.

"प्रत्येक शहरात अशी सौंदर्यस्थळे असतात" ह्या आपल्या वाक्यानी सर्वच भावना थोडक्यात व्यक्त केल्या आहेत असे वाटते. पुण्याचा रहिवासी असल्याने मी फक्त पुण्याचे उदाहरण दिले, परंतु १२ गावचे पाणी पिलेल्या माननीय श्री. राजे ह्यांना येव्हड्या शहरात एकही सौंदर्यस्थळ दिसु नये ह्याला कपाळकरंटेपणा म्हणु नये काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अवलिया's picture

18 Dec 2009 - 4:35 pm | अवलिया

श्री रा रा परीकथेतीलजी राजकुमारजीसाहेब

परंतु १२ गावचे पाणी पिलेल्या माननीय श्री. राजे ह्यांना येव्हड्या शहरात एकही सौंदर्यस्थळ दिसु नये ह्याला कपाळकरंटेपणा म्हणु नये काय ?

मी या गंभीर विषयावर नवा काथ्याकुटात्मक धागा काढावा अशी आपल्याला विनंती करतो ज्यामुळे कपाळकरंटेपणाच्या जगन्मान्य व्याख्या तयार होवुन सदस्याची माहीती मिळाल्याबरोबर तो कपाळकरंटा आहे की कसे याबाबत इतर सदस्यांना आडाखा बांधण्यास मदत होईल. तरी आपण असा धागा सुरु करावा ही विनंती.

त्याचबरोबर १२ गावांऐवजी ११ किंवा १३ गावे फिरलेला असल्यास काही फरक पडु शकतो का हे पण समजावुन सांगावे.

धन्यवाद.

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2009 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. अवलिया-जी ,

आपण मला जी सुचना केली आहेत, तीचे लवकरात लवकर पालन करण्याचा मी प्रयत्न करीनच. परंतु सध्या मी 'कपाळकरंटेपणा' ह्या शब्दाबद्दल तसेल "१२ च गावे का?" ह्या प्रश्नाबद्दल अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी विचारवंतांच्या संपर्कात आहे. योग्य वेळी त्यांच्याशी झालेला माझा पत्रव्यवहार मी येथे प्रसिद्ध करीनच.

आपल्या प्रतिसादामुळे हुरुप वाढला.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

विजुभाऊ's picture

19 Dec 2009 - 10:51 am | विजुभाऊ

राजकुमार जी ओषो नी सांगितल्याप्रमाणे बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी गौतम बुद्धाची जी अवस्था होती तीच आज तुमची आहे .
हे अवस्था प्राप्त होत असली तरिही दुर्दैवानी त्यातच रहावे असे वाटणारे तुमच्या सारखे बरेच जन आहेत.
समर्थ रामदास म्हणतात त्या प्रमाणे " शेणातची बांधूनी वाडे रहातात शेणकिडे" या अवस्थेतल्या मनुष्यप्राण्याप्रमाणे भोवताली जे दिसावे असे वाटते तेच आहे असे मानणारे जन ; जे त्यातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असतात त्या फुलपाखराना पुन्हा कोषात ओढण्याची पुणेरी वृत्ती जोपासत असतात.
असो. एखाद्या नदीच्या पाण्याचे गुण असतात.
अर्थात श्री श्री श्री छोटाजी डॉनजी यानी समर्पक शब्दात हेच सगळे मांडले आहे.
अरे या एका रविवारी सकाळी आमच्या पुण्यात. सकाळी ८ वाजता छानशा प्रसन्न अशा सकाळी पिशवी घेउन बाहेर पडावे, एखाद्या नुकत्याच उमललेल्या कळीसारख्या चेहर्‍याच्या, नुकत्याच न्हाउन आलेल्या सुंदर सुंदर तरुणींचे दर्शन घेत मंडईतुन बाहेर पडावे, छानशी श्रीकृष्णची मिसळ चापावी... अहो सुख सुख म्हणतात ते अजुन काय वेगळे असते ?
एक शंका : त्या सगळ्या सुंदर तरुण्या नुकत्याच न्हाऊन आलेल्या असतात हे राजकुमारजी ना कसे कळते?
राजकुमारजी तुम्ही म्हणता त्या फुले मंडईच्या आजूबाजूला जरा पहा कधी डोळ्याना दिसणारा बाजार तुम्हाला दिसत नसेल तर नक्कीच आत्ममग्न तेचा अभिषाप हा तुम्ही वरदान समजून मिरवताय असेच म्हणावे लागेल.
तुम्हाला नुकतेच न्हालेली वाटत असणारी एखादी सुंदरी तिच्या मेक अपच्या खाली कोणकोणत्या दु:खांचे उसासे दडवत असेल याचा कधी विचार केला आहे? ते तुमच्या गावीही नसेल.
जरा कोणी तुमच्या पेक्षा वेगळा विचार केला की त्याला सतत दुर्मुखलेल्या आणी जगाशी वैर पत्करलेल्या देवदास म्हणून हीणवणे या पुणेरी वृत्ती महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई , धोंडो केशव कर्वे या ना सुद्धा सहन करावा लागला आहे .
राजे जी तुम्ही जे लिहिलय त्यावर टीका करणार्‍या तथाकथीत पुरोगाम्यांच्या सनातनप्रभाती टीकेला अज्याबात घाबरु नका

परिकथेतील राजकुमार's picture

19 Dec 2009 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. विजुभाऊ-जी,

आपली जळजळ पोचली. आपला प्रतिसाद पाहिला (अतिशय 'अशुद्ध' लिखाणामुळे पुर्ण वाचवला नाही)

एक शंका : त्या सगळ्या सुंदर तरुण्या नुकत्याच न्हाऊन आलेल्या असतात हे राजकुमारजी ना कसे कळते?

सुर्य उगवलेला आहे का आणी असेल तर कुठल्या दिशेला हे सुर्यफुलाला सांगावे लागत नाही, तसेच पहाट झाली आता उमल हे कमळालाही सांगावे लागत नाही. सौंदर्याच्या उपासकाला हे ज्ञान उपजतच असते.

राजकुमारजी तुम्ही म्हणता त्या फुले मंडईच्या आजूबाजूला जरा पहा कधी डोळ्याना दिसणारा बाजार तुम्हाला दिसत नसेल तर नक्कीच आत्ममग्न तेचा अभिषाप हा तुम्ही वरदान समजून मिरवताय असेच म्हणावे लागेल.

आपण ज्या बाजाराविषयी बोलत आहात त्या बाजाराविषयी आम्ही 'ऐकुन' आहोत, त्याचप्रमाणे ह्या बाजराविषयीचा आपला गाढा 'व्यासंगही' आम्हास ज्ञात आहे. ह्या बाजराविषयीचा आपला शब्द हा आम्ही अंतीम मानतो.

जरा कोणी तुमच्या पेक्षा वेगळा विचार केला की त्याला सतत दुर्मुखलेल्या आणी जगाशी वैर पत्करलेल्या देवदास म्हणून हीणवणे या पुणेरी वृत्ती महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई , धोंडो केशव कर्वे या ना सुद्धा सहन करावा लागला आहे .

जग-दुनियेसाठी खोटे उमाळे काढणार्‍या प्रस्तुत लेखकाची फुले, कर्वे वगैरेंशी केलेली तुलना पाहुन स्वतःचे डोळे फोडून घ्यावेसे वाटले. स्वप्रवृत्तीच्या सदस्यास पाठींबा दर्शवण्यासाठी आपण किती बेजबादार तुलना करु शकता हे पाहुन फार वाईट वाटले. मिपावरील एक जेष्ठ सदस्य ह्या नात्याने प्रस्तुत लेखकास चार समजुतीच्या गोष्टी सांगायच्या सोडून आपण ह्या लेखकाच्या खांद्यावर बंदूक ठेवुन पुणेकर आणी त्यांची वृती ह्यावर चिखलाच्या गोळ्या मारण्याचा जो निंदनिय प्रकार चालवला आहे तो बघुन एक कनिष्ठ मिपाकर म्हणुन शरम वाटली.

फुले, कर्वें सारख्या विभुतींची एका व्यसनी, मगरीचे अश्रु गाळणार्‍या सदस्याशी केलेली तुलना पाहुन आज भारतमाता देखील शरमेनी मान झुकवुन उभी राहिली असेल. एक भारतीय म्हणुन तुमच्या ह्या अशा प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध करतो.

मिपा मालक व संपादक (जेष्ठ व कनिष्ठ) ह्यांनी थोर समाजसेवक तसेच सामान्य पुणेकर ह्यांच्यावर माननीय श्री. विजुभाऊ-जी ह्यांनी आकसाने जी टिका केली आहे तिची नोंद घ्यावी अशी मी प्रार्थना करत आहे. माननीय श्री. विजुभाऊ-जी हा जो चुकीचा पायंडा पाडत आहेत, त्याल वेळीच रोकणे व अशा सदस्यास खरमरीत तंबी देणे गरजेचे आहे असे वाटते.

ते ही शक्य नसल्यास 'मिपावर पुणेकरांचा वेगळा विभाग उघडून द्यावा 'ह्या आमच्या जुन्या मागणीला पुन्हा जोर चढल्यास आश्चर्य वाटुन घेउ नये.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

18 Dec 2009 - 4:12 pm | टारझन

भावी संपादक श्री. परिकथेतील राजकुमार-जी ,
आपल्याशी मी पुर्ण पणे सहमत आहे. हा राजे नको तिथुन पळून जातो. आणि पळून गेल्यावर कुठे धडपडला की लगेच त्या जागेला नावे ठेवायला मोकळा.
काय गरज होती खाजवुन जखमेच्या धपल्या काढण्याची ?
बरं लिहीलंय तर लिहीलंय .. ते वाचतांना अंमळ झोप लागेल असं ? हा लेख काय कुठे १५०० शब्दमर्यादेच्या निबंधस्पर्धेत भाग घेण्यासाठी लिहीला होता काय ?
आणि तिकडे रिजेक्ट केल्यामुळे घाईघाईत इकडे टाकलाय की काय ?
कॄपया असले फालतु विचारी किडे वळवळने थांबवावे .. आपला देवदास छाप प्रेमभंगाच्या कथा लिहीण्यात हातखंडा आहे (असे आपणंच म्हणता) , कॄपया तिकडे हात चालवा. हा विरोधाभास पहायला पंढरीचा ओबामा .. उप्स .. सॉरी .. विठोबा समर्थ आहे.

आणि हो , अजुन प्रतिसाद हवे असतील तर सांगा , ह्यापेक्षा छाण टंकून देवू. हा तर अंमळ लेव्हल-१ चा प्रतिसाद आहे. उगाच नको त्या लेखाला " वा ! काय छाण लिहीलंय " म्हंटलं की विनाकारन त्याचा हुरूप वाढतो.. न तो लेखक पुढचे कैक दिवस जिलब्या पाडल्यासारखे लेख पाडतो.

कृपया लोकांच्या मेंदू ला वात आणने थांबा आणि रटाळ चर्चा पाडणे बंद करा.

-(बाहुबली मालिका प्रेमी) बळीवडी

स्वानन्द's picture

18 Dec 2009 - 5:26 pm | स्वानन्द

मीही परा व टारझन च्या मताशी सहमत आहे.

एक नकारात्मक विचार आणखी तशाच विचारांना जन्म देतो.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

धमाल मुलगा's picture

18 Dec 2009 - 5:40 pm | धमाल मुलगा

श्री.राजे,
आपली तगमग समजली. पण मला एक सांगा, ह्या सगळ्या प्रश्नांबद्दल आपण वैयक्तिकरित्या आपल्या पातळीवर,आपल्या मगदुराप्रमाणे काही हालचाल करतो का?
जर उत्तर हो असेल तर ह्या लेखाला मी विचारप्रवर्तक म्हणेन.
जर उत्तर नकारात्मक येत असेल तर मात्र माझ्या दृष्टीने लेख वांझोटा होऊन बसतो.
जर ह्याविषयी आपलं काही योगदान असेल तरच प्रतिसादांना काही अर्थ उरतो. जसे मी माझ्या मायमराठीसाठी,महाराष्ट्रासाठी,इथल्या मराठी बांधवांसाठी 'केवळ आंतरजालावर कळफलक बडवुन स्वत:समोर स्वतःच आरत्या ओवाळुन, शब्दांचे कीस पाडुन कोलांट्या मारुन वादात कसं जिंकलो असं स्वतःचं रिकामं समाधान करवुन घेत आत्ममग्नतेच्या कोषामध्ये सुखनैव झोपणे' न करता, स्वतःला जमेल तसं ह्याबाबत मदत करणे, काही कामे करणॅ करतो म्हणुन मी स्वतःला त्या चर्चांमध्ये प्रतिसाद देण्यालायक समजतो.
तद्वत, ह्या आपण मांडलेल्या लेखाबद्दल बोलण्याचा मलातरी तसा फारसा अधिकार नसावा (मी नसावा अशी शंका व्यक्त करतोय, नाहीच असे म्हणत नाही!) असे मानतो.
त्यामुळे "वावा, काय छान लिहिलंय" वगैरे लिहुन दांभिकतेच्या काठावर ओठंगुन टाळ्या पिटण्यात मलातरी काही योग्य वाटत नाही.
क्षमस्व.

jaypal's picture

18 Dec 2009 - 6:23 pm | jaypal

(मागील एका धाग्याप्रमाणे) प्रत्येक प्रतिसादावर आपला एक प्रतिसाद देऊन मान्यवर सभासदांच्या शंका दुर कराव्यात आणि आपली भुमीका वेळोवेळी सुस्पष्ट कारावी ही विनंती.
धमाल मुलाशी १०,०००% सहमत

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वेताळ's picture

18 Dec 2009 - 7:13 pm | वेताळ

करंट्या विचाराचे किटाळ आमच्या माथी मारुन लेखक महोदय गायब झाले आहेत. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे.जगात काहीच चांगले नाही मग जगायचे कशाला? २२/१२/२०१२ ची तरी वाट कशाला बघायची? किंवा इच्छामरणाचा हक्क सर्वोच्च न्यायालय मान्य करील ह्या भाबड्या आशेवर अजुन किती दिवस राहयचे.ह्यावर लेख काय प्रकाश टाकु शकतील काय?
ह्याबाबत लेखक महोदय आपले मत कधी मांडतील?
बाकी परा भाउ व टारुशेठ ह्याचा विचारांशी जवळ जवळ सहमत आहोत.
वेताळ

निमीत्त मात्र's picture

18 Dec 2009 - 7:19 pm | निमीत्त मात्र

श्री. राजे तुमचा हा लेख फार आवडला. शुद्धलेखनातल्या चुका, व्याकराणाचे तीन तेरा आणि विरामचिन्हांचा अत्याचार बराच कमी झाल्याने तुम्ही लेखन करुन द्यायला एखादे माकड ठेवले आहे का अशी शंका आली.

श्रावण मोडक's picture

18 Dec 2009 - 7:31 pm | श्रावण मोडक

नाय हो. राजे पुण्यात आले. सदाशिवात त्यांनी हापिस थाटले. त्याचा हा परिणाम!

लवंगी's picture

18 Dec 2009 - 8:35 pm | लवंगी

छोट्याश्या लेखात बरेच मोठमोठाले प्रश्न मांडलेत.. सुरेख प्रकटन...

श्रिमान धमाल मुलग्याच्या विचाराशी सहमत.. असे विचार बरेचदा आपल्या मनात येऊन मनी नैराश्य येते पण 'पुढे काय करावे??' हे ठाऊक नसल्याने हे विचार वांझोटे ठरतात.

पण असे गंभीर विचार करताना माननिय परासाहेबांनी सुचवल्याप्रमाणे रोजच्या दिवसातील छोट्या-छोट्या सुखांना अनुभवणे पण तितकेच महत्वाचे.. अन्यथा अकाली वार्धक्य येण्याची शक्यता नाकारता येत नाहि..

माननिय श्री श्री श्री अवलिया साहेबांची प्रतिक्रीया मूळ लेखाइतकीच मोठी असल्याने वाचली नाहि, तरी त्यांच्या विचारांशी पूर्ण सहमती..

ताक... माननिय निमित्र मात्रजींच्या बोलण्यात तथ्य असावेसे मला वाटते.. माझ्यातर्फे मर्कटाला शाबासकि द्यावी..

लेखाबद्दल धन्यवाद..

प्रकाश घाटपांडे's picture

18 Dec 2009 - 9:20 pm | प्रकाश घाटपांडे

राजे! याला जीवन ऐसे नांव. ही आपली संवेदनशील अवस्थेतील मनाची स्पंदन आहेत. विषमता असह्य झाली कि त्याला विविधता असे म्हणुन मोकळे व्हायचे. आपल्या परीने आपल्याला शक्य होईल ते करत राहयचे एवढच व्यावाहरिक विचार करणे. नाहीतर जगणे मुश्किल होईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

18 Dec 2009 - 10:04 pm | विकास

या लेखाचा विचार करत असताना आजही लोकप्रिय असलेला १९४६ चा It's a wonderful life" चित्रपट आठवला:

एक सज्जन बँकर(परत विरोधाभास!) हा एका दुष्ट आणि मोठ्या बँकेच्या बँकरमुळे गोत्यात येतो आणि आत्महत्या करायला जातो. तिथे त्याला एक म्हातारा माणूस (जो स्वतःस देवदूत म्हणतो) तो वाचवतो. हा त्याला म्हणतो की "माझे आयुष्य व्यर्थ गेले, मी काहीच केले नाही. जन्माला आलो नसतो तर बरे झाले असते." अर्थात हा देवदूत त्याला परत त्याच्या गावात घेऊन जातो, असे गाव ज्यात हा अस्तित्वातच नसतो... त्यामुळे गावातील दुरावस्था, लोकांचे हाल वगैरे त्याला दिसतात आणि त्याच्या लक्षात येते की आपल्याला लहान वाटणार्‍या पण सत्कृत्यांचा किती दूरगामी (चेन रीअ‍ॅक्शन) परीणाम झाला आहे ते.

त्यातील हा भाग प्रत्येकाने लक्षात ठेवून आत्मपरीक्षण करण्यासारखा आहे. की आपण आयुष्यात नक्की काय केले ज्याने काहीतरी चांगला फरक पडला? - गेल्या वर्षात, पाच/दहा वर्षात वगैरे... त्याच्या उत्तरातून कधी कधी समाधान मिळू शकते तर बर्‍याचदा पुढच्या आयुष्याची दिशा...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

दशानन's picture

19 Dec 2009 - 9:38 am | दशानन

विकासराव,

तुमचे प्रतिसाद नेहमी वाचनीय व दिशादर्शक असतात.
खरोखर प्रतिसाद आवडला .

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

शाहरुख's picture

19 Dec 2009 - 10:00 am | शाहरुख

कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते हे..

"व्हॉटेवर यु से अबाऊट इंडिया, इक्वली ऑपोझिट इज अल्सो ट्रू"

बाकी, कंपूबाजांना 'ट्रिगर' कुठून मिळालाय हा ? प्रचंड सर्दीने गच्च झालेले नाक मोकळे होताच त्यातून शेंबुड टपटप गळावा तसे ठोकळेबाज प्रतिसाद गळत आहेत नुसते :-D

विकास's picture

19 Dec 2009 - 1:57 pm | विकास

"व्हॉटेवर यु से अबाऊट इंडिया, इक्वली ऑपोझिट इज अल्सो ट्रू"

१००% सहमत!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

jaypal's picture

21 Dec 2009 - 11:10 am | jaypal

"प्रचंड सर्दीने गच्च झालेले नाक मोकळे होताच त्यातून शेंबुड टपटप गळावा तसे ठोकळेबाज प्रतिसाद गळत आहेत नुसते "
हा हा हा

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुधीर's picture

20 Dec 2009 - 12:08 am | सुधीर

विनोबाजींचा शाळेतला धडा आठवतो, त्यातलं हे एक वाक्य, "स्वरूप पाहा, विश्वरूपाची चिंता करू नका, विश्वरूप पाहण्यास परमेश्वर समर्थ आहे." त्या धड्याचा सारांश असा होता, स्वरूप बदलणं जास्त सोपं आहे, त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करावे. स्वरूप बदललं की विश्वरूप आपोआप बदलतं.

तिमा's picture

20 Dec 2009 - 7:54 am | तिमा

राजे यांचा लेख आवडला. त्यावरील विरोधी प्रतिक्रिया वाचून ग. वा. बेहेर्‍यांच्या 'टीकेविना' या सदराची आठवण झाली.
राजे यांनी दाखवलेले वास्तव या टीका करणार्‍यांना माहित नाही असे नाही. पण हा जनरेशन गॅप चा प्रकार आहे. तरुण पिढीला मनसोक्त मजा करायची आहे. त्यांना आपल्या आजुबाजुला काय चालले आहे हे मुद्दामच बघायचे नाही. तेंव्हा राजे, कशाला उगाच या मंडळींची नशा उतरवता ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

दशानन's picture

21 Dec 2009 - 7:33 pm | दशानन

बरोबर बोललात .
त्यामुळेच ह्या मुलांना मी काही उत्तर दिले नाही आहे.
अज्ञनी बालक आहेत.. होतील हळू हळू मोठी.

असो,

तुम्हाला लेख आवडला हे वाचून खरोखर आनंद झाला.

*****

राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

विनायक प्रभू's picture

20 Dec 2009 - 10:33 am | विनायक प्रभू

श्रीमान रा.रा.राजे(रा रा रासपुटीन च्या चालीवर)
अश्या विरोधाभासाच्या त्रासापासुन मुक्ती साठी कार्बन हायड्रोजन आणि ओएच बॉन्डींग वर विश्वास ठेवावा.
प्रमाण २:५:१

मिसळभोक्ता's picture

22 Dec 2009 - 12:13 am | मिसळभोक्ता

श्री रा रा प्रभूजीसाहेबांशी सहमत आहे. मुख्य म्हणजे, सदर द्रव्याचा एक रेणू तयार करण्यासाठी, एक कार्बन मोनॉक्साईड, एक मिथेन, आणि एक हायड्रोजन चा रेणू लागतो. त्यामुळे, फक्त विरोधाभासावरच नव्हे, तर वैश्विक तापवृद्धी वर देखील सदर द्रव्य हा हमखास उपाय आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

यशोधरा's picture

21 Dec 2009 - 7:36 pm | यशोधरा

छान लिहिलं आहे, आवडलं.

दशानन's picture

22 Dec 2009 - 11:23 pm | दशानन

दुनिया घेऊन येते आपला धागा वर.... ह्या ना त्या कारणाने. आम्हीच स्वतःच धागा वर रहावा ह्या इच्छेने हा प्रतिसाद टाकतो.
उगाच ताकाला जायचे तर भांडे का लपवा ;)

असो,

प्रतिसाद द्या.

=))

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©